Monday, 6 November 2023

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी- माजी सदस्यांचा स्नेह मेळाव्यासह परिसंवाद

 महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त

आजी- माजी सदस्यांचा स्नेह मेळाव्यासह परिसंवाद

विधान परिषदेत ८ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

            मुंबईदि. ६ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेच्या आजी- माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृहविधान भवनमुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली.

            संसदीय लोकशाहीत द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधान परिषदेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. या सभागृहाने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. माँटेग्यू- चेम्सफर्ड समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियमान्वये बॉम्बे लिजिस्लेटिव्ह कौन्सिलची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी १९२१ रोजी टाऊन हॉलमुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची सभापतिपदी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी १८६२ ते १९२० या कालावधीत गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिलचे कामकाज चालत असे. सन १९२१ मध्ये नारायण चंदावकर यांच्या रुपाने प्रथमच भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधान परिषदेचा शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. मात्र, 'कोविड १९महामारीमुळे त्यावेळी जाहीर कार्यक्रम आयोजित करता आला नाही. या पार्श्वभूमीवर आता हा कार्यक्रम होईल.  

            विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या नियोजनासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली गटनेतेसदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमंत्रीदोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

            स्नेहमेळाव्यासह 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व', 'आमच्या आठवणीतील विधान परिषद' (असे सदस्य...असे प्रसंग) या विषयांवर परिसंवाद होईल. याशिवाय 'विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विधान परिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्व आणि वैशिष्ट्ये', 'गेल्या १०० वर्षातील महत्वपूर्ण विधेयकेठराव', 'लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवरील चर्चा', 'शंभर वर्षे शंभर भाषणेआणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुकअशी पाच प्रकाशने प्रस्तावित आहेत.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi