Thursday, 7 September 2023

हा फोटो नव्हे...ही आहे सुंदर रांगोळी

 हा फोटो नव्हे...ही आहे सुंदर रांगोळी.. काय आश्चर्य चकीत झालात ना मित्रांनो😊 ही  किमया केली आहे विठ्ठला पूर साखळी..जिल्हा पणजी येथील कलेचे आसक्त... उपासक....  शिक्षक श्री गुरुदत्त वांतेकर यांनी खूप मेहनतीने त्यांनी  रांगोळी तून साकारलेले बालकांचे अप्रतीम चित्र... अगदीं जिवंतपना आणला आहे या चित्रात... सोशल मीडिया वर खुप viral होत आहे... या अवलिया कलाकार शिक्षकाला शिक्षक दिननिमित्त 💐अभिनंदन 💐आणि अभिवादन 👍🙏👍


अक्कलकोट वटवृक्ष स्वामी सेवा संचलित वैजयंती माळेची बुकिंग सुरू आहे.*

*अक्कलकोट वटवृक्ष स्वामी सेवा संचलित वैजयंती माळेची बुकिंग सुरू आहे.*

*📲 संपर्क: 9821583485*

*कृपया हि पोस्ट सगळीकडे शेअर करावी जेणेकरून सगळ्यांना या माळेचा उपयोग व्हायला हवा.*


#वैजयंती_माळ_महत्व#

     भगवान श्रीकृष्ण एक खास प्रकराची माळ नेहमी धारण करतात, ती माळ असते वैजयंतीची. शास्त्रानुसार श्रीकृष्णाला 6 गोष्टी विशेष प्रिय आहेत. गाय, बासरी, मोरपंख, लोणी, खडीसाखर आणि वैजयंती माळ. मान्यतेनुसार ही माळ धारण केल्याने आकर्षण वाढते. येथे जाणून घ्या, वैजयंती माळेशी संबधित काही खास गोष्टी. 


वैजयंती एक वृक्ष आहे. या झाडाची पाने थोडीशी लांब असतात. या झाडाला फांद्या नसतात. या झाडाला लागणारी फुले पिवळ्या किंवा लाल रंगाची असतात. हे फुल गुच्छ रूपात असतात. फुलांसोबतच छोटे-छोटे दाणे (बिया) असतात. हे दाणे खूप कडक असतात. या दाण्यांमध्ये छिद्र पाडून माळ तयार केली जाते. 


वैजयंतीच्या झाडावर खूपच सुंदर फुल उमलतात. हे फुल खूप सुंदर आणि सुवासिक असतात. ह्यांचा बियाणांपासून माळ तयार केली जाते. वैजयंती माळ म्हणजे विजय किंवा जिंकवणारी माळ.

वैजयंतीचे फुल प्रभू श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीला फार आवडतात. श्रीकृष्णाला ही माळ फार प्रिय आहे. प्रभू श्रीकृष्ण आपल्या गळ्यात ही माळ नेहमीच घालत असतं. 


असे म्हणतात की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा राधा आणि त्यांच्या मैत्रिणींसह रासलीला खेळली होती त्यावेळी राधाने त्यांना वैजयंतीची माळ घातली होती. वैजयंती एका प्रकारचा फुलांची वनस्पती आहे ज्यामध्ये लाल आणि पिवळे रंगाचे फुल येतात. या फुलांचे कडक दाणे कधीही तुटत नाही, सडत नाही नेहमीच चकचकीत असतात. ह्याचा अर्थ असा आहे की जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत असेच राहा. दुसरे असे की या माळेतील जे बियाणं आहे, ते बियाणं स्वतःला जमिनीशी जोडून वाढतो. याचा अर्थ असे आहे की आपण कितीही यशस्वी झाला तरी नेहमी जमिनीशी जुळलेले राहा. 


अशी आख्यायिका आहे की श्री कृष्ण दोन कारणामुळे वैजयंतीची माळ घालत असे. पहिले कारण हे की वैजयंतीच्या माळे मध्ये सौंदर्य आणि माधुर्याची अधिष्ठात्री देवी लक्ष्मी वास्तव्यास असते. कारण भगवान श्रीकृष्ण यांचा मनात राधाचे पाऊल उमटलेले आहेत. म्हणून श्री लक्ष्मी यांनी वैजयंती माळेला आपल्या वास्तव्यास साठी निवडलेले आहे. जे नेहमी श्रीकृष्णाच्या वक्षस्थळी असते. आणि दुसरे कारण असे की श्रीकृष्णाला ही माळ सतत राधेची आठवण करून देत होती, ज्याला आधी मथुरेचा एक माळी आणत असतं. 


काही विद्वान सांगतात की या वैजयंतीच्या माळेत पच प्रकारांचे मणी गुंफले जाते. जे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. या मणींचे नाव इन्द्रनीलमणि (पृथ्वी), मोती (जल), पद्मरागमणि (अग्नि), पुष्पराग (वायुतत्त्व) वज्रमणि म्हणजे हीरा (आकाश) आहेत. 


#वैजयंती_माळेचे_महत्त्व : एका आख्यायिकेनुसार इंद्राने अभिमानास्तव वैजयंती माळेचा अवमान केला होता, त्या कारणास्तव महालक्ष्मी त्यांच्या वर रुसली होती परिणामास्तव त्यांना वणवण भटकावे लागले. देवराज इंद्र आपल्या हत्ती ऐरावत वर प्रवास करत होते. वाटेमध्ये त्यांना महर्षी दुर्वासा भेटले त्यांनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ काढून इंद्रांना भेट स्वरूपात दिली. इंद्राने ह्याला आपला अपमान समजून ती माळ आपल्या हत्ती ऐरावतच्या गळ्यात घालून दिली, आणि ऐरावताने ती माळ आपल्या गळ्यातून काढून पाय खाली चिरडून दिली. आपल्या दिलेल्या भेटीचा असा अपमान होत असल्याचे बघून महर्षी दुर्वासाने संतापून इंद्राला लक्ष्मीहीन होण्याचे श्राप दिले. 


वैजयंतीचे फायदे : वैजयंतीचे फूल आणि माळ खूप शुभ आणि पवित्र असतात. वैजयंतीचे फुलांचे अतिशय भाग्यवान असे झाड असतं. ह्याची माळ घातल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते. या माळेला कोणत्याही सोमवारी किंवा शुक्रवारी गंगेच्या पाण्याने किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन घालावी. 


वैजयंतीच्या बियाणांची माळेने भगवान विष्णू किंवा सूर्याची पूजा केल्याने ग्रह नक्षत्रांचे प्रभाव नाहीसे होतात. विशेषतः शनीचा दोष नाहीसा होतो. ही माळ घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ह्याला घातल्याने किंवा दररोज या माळेने आपल्या इष्ट देवांचे जप केल्याने नवी शक्तीचा संचार होऊन आत्मविश्वास वाढतो.

ही माळ घातल्याने मान सन्मानामध्ये वाढ होते. मानसिक शांती मिळते ज्यामुळे व्यक्ती आपल्या कार्याच्या क्षेत्रात मन लावून काम करते. अशी आख्यायिका आहे की पुष्य नक्षत्रामध्ये वैजयंतीच्या बियाणांची माळ घालणे खूप शुभ असतं. ही माळ सर्व प्रकारांच्या इच्छापूर्ण करते.श्री कृष्णास राधेने ही माळ भेट दिली होती म्हणुन श्री कृष्णास अत्यंत प्रिय आहे. पूजा, पाठ, मंत्रजप, यज्ञ, हवन या करिता तसेच गळ्यात धारण करण्या करीता या माळेचा उपयोग केला जातो. असे म्हटले जाते ही माळ धारण करणारा नारदमुनी प्रमाणे विद्वान श्रेष्ठ, इंद्रा प्रमाणे वस्त्र आभूषणे युक्त जगत्जेत्ता, श्री कृष्णा प्रमाणे सर्वांना मोहित करणारा व सर्वत्र यश प्राप्त करणारा बनतो. तसेच सर्व कार्यात यश प्राप्ती होते.

संपूर्ण फलप्राप्ती साठी शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी ही सिद्ध केलेली माळ एका ताम्हणात घ्यावी. त्यावर कच्चे दूध अथवा गंगाजल शिंपडावे फुले व्हावीत अशी प्रतिष्ठापना करावी. श्री कृष्णाचे ध्यान करून

*'ॐ नमो भगवते वासुदेवाय'*

या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा जप करत असताना एखादे पुष्प सतत गंगाजलात बुडवून माळेवर शिंपडत राहावे म्हणजे अभिषेक होईल. नंतर त्याच दिवशी अन्नदान करावे व नंतर ही माळ धारण करावी .

विवाहात अडचणी येत असतिल तर त्या व्यक्तीने सिद्ध केलेल्या वैजयंती माळेवर १०८ वेळा *ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः* या मंत्राचा जप करावा व केळ्याच्या झाडाचे पूजन करावे. लवकरच विवाह संपन्न होतो.

महाड येथे 200 खाटांचे रूग्णालय उभारण्याची कार्यवाही करा

 महाड येथे 200 खाटांचे रूग्णालय उभारण्याची कार्यवाही करा


-सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत


        मुंबई, दि. 7: रायगड जिल्हा मोठा असून डोंगराळ प्रदेशाचा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्याच्या अनुषंगाने महाड येथे 200 खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.


            मंत्रालयीन दालनात महाड येथे रूग्णालय उभारण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री डॉ. सावंत आढावा घेतांना बोलत होते. बैठकीस आमदार प्रविण दरेकर, अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, सहसचिव अशोक आत्राम, सहसंचालक विजय कंदेवाड, विजय बावीस्कर आदी उपस्थित होते.


            रायगड जिल्ह्यातील परसुळे (ता. पोलादपूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात निधीची उपलब्धता आणि कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत आशा कार्यकर्त्या यांना विमा संरक्षण देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच 18 वर्षावरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम, आपला दवाखाना रूग्णसंख्या व सद्यस्थिती, खरेदी प्राधिकरण, धर्मदाय रूग्णालय ॲप, आरोग्य विभागाचे नविन मंडळ कार्यालय स्थापन करणे आदीं विषयांवर चर्चा या बैठकीत करण्यात आली. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठीमंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठीमंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

            मुंबई, दि. 06 : राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नावनोंदणी करुन यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी करण्याचा अंतिम दिनांक हा 15 सप्टेंबर, 2023 असा आहे.


            राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे यांनी दिली आहे.


            राज्यात सन 2022 मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन 2023 मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांव्यतिरिक्त उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


            या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेले कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता अशा विविध निकषांसाठी गुणांकन दिले जाणार आहे.


            विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.


            अधिक माहितीसाठी नोंदणीकृत गणेश मंडळांनी संपर्क क्रमांक 8169882898, 022-243122956 / 022-24365990 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत ( सकाळी 10 ते सायंकाळी 6) अथवा स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


००००

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा

 लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

          मुंबईदि ६ :- पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोहगाव येथील सहा एकर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            पुणे जिल्ह्याच्या लोहगाव (ता. हवेली) येथील उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज घेतला. बैठकीस आमदार सुनील टिंगरेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरसार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेपुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीउपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून लोहगाव परिसरातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत. रुग्णालयाचे बांधकामआतील साधनसामुग्री इतर सोयीसुविधारुग्णांवर उपचारासाठी साधनेआरोग्य यंत्रणाआवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावीअसे  निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

0000

भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती*

 *भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती*


१) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला 

२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व 

३) महिना: श्रावण 

४) दिवस: अष्टमी 

५) नक्षत्र: रोहिणी 

६) दिवस: बुधवार 

७) वेळ: १२:०० रात्री

८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य. 

९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व

१०) जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले.

११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.

११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते.

१२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.)

१३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती.


*कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.*

मथुरेत कृष्ण, कन्हय्या 

ओडिशामध्ये जगन्नाथ

महाराष्ट्रात विठ्ठल ,विठोबा 

राजस्थानमध्ये श्रीनाथ

गुजरातमध्ये द्वारकाधीश

गुजरातमध्ये रणचोछोड

कर्नाटकातील उडुपी, कृष्णा

केरळमधील गुरुवायुरप्पन 


जन्म ठिकाण:- मथुरा

जन्मदाते माता पिता:- देवकी, वासुदेव

संगोपन करणारे पालक:- यशोदा, नंद

बहीण भाऊ:- सुभद्रा, बलराम,(द्रौपदी मानलेली बहीण.)

गुरु, शिक्षक:- ऋषी संदिपनी

जिवलग मित्र:- सुदामा


*धर्मपत्नी ८:-* रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)


*कृष्णाची मुले:-* एकूण ८०


*श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.*


*श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु.*


*श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.*


*श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.*


*श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.*


*श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०): प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.*


*श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.*


*श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०):- संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.*


*राधा:-* राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे,' असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. 


*श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु*


*आवडती फुल:-* फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे)


प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते.


*शंख:-* शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.


*आयुधं:-* त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.


*बासरी:-* कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती .


*मोरपंख:-* रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.


*शिक्षण:-* श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.


*कार्य:-* कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले.श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.


*गीता उपदेश:-* महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.


*श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण*


कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार-निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो-कर्तव्याच्या पालनासाठी. वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी. "कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं."

"मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते." गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. "अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही." सर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.

  

*अवतार समाप्ती:-* महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीच वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इ. स. पू. ५५२५ या वर्षी झाला

  

यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।

अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।

परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।।।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे।।।।


श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय ...

येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत

 येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त

व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

          मुंबईदि. ६ :- पुण्यातील येरवडा येथे मान्यता देण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त ठरणारे व्यावसायिक अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू करावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यानी दिली.

        मंत्रालय येथे आयोजित कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.

         या बैठकीला कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता  विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार सुनील टिंगरे, कौशल्यरोजगारउद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेव्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते

          उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, येरवडा येथील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कामासंदर्भात सुनियोजित आराखडा तयार करावा. विद्यार्थ्यांना आयटीआयमधील पारंपरिक अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व स्थानिक गरजा विचारात घेऊन ‘इंडस्ट्री फोर झिरो’ अंतर्गत रोबोटिक्स, सीएनएस मशीन हॅण्डलिंगमेकॅनिक्स हे अभ्यासक्रम या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू करण्याबाबत सर्व मान्यता घेण्यात याव्यात व त्याप्रमाणे कार्यवाही करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी प्राप्त होताच तत्काळ या कामांना गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

 

 


 

Featured post

Lakshvedhi