Saturday, 2 September 2023

भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा

 *भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा


◆ *फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध..?*

पण आहे. 

◆ दुधापासुन दही  

◆ बटर पर्यंत 

◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,

◆ पोहे, 

◆ रवा, 

◆ लोणचे, 

◆ पापड, 

◆ मसाले, 

◆ सुकामेवा, 

◆ भाजीपाला 

जे असेल ते 

*कोंबा फ्रीजमध्ये,* 

ही महिलांची वृत्ती.

इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ, 

◆ कालची शिल्लक राहिलेली 

■ डाळ, 

■ भाजी, 

■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली  

■ मसालावाटण, 

■ सर्वप्रकारची कडधान्ये, 

■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, 

■ उरलेली शितपेये,  

■ मिठाया, 

एक ना धड भाराभर वस्तू!


या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.  

पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. 

अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. 

पण *१००० व्यक्तींचा* अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील *५३८ जणांना कॅन्सरची लागण* झाली असून, यात *स्त्रियांचं प्रमाण अधिक* आहे

आणि आश्चर्य म्हणजे या *५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार* चालू होता.


■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, *लागते तेवढेच आणा.*


■ इडली, डोसा, 

■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज  करण्यापुरतं.. 

आठ आठ दिवसाच नाही. 


■ चणा डाळीचं पीठ, 

■ जोंधळा पीठ, 

■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.


फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा. 


दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या. ! ठेवू नका.


*साभार : डॉ. मकरंद करमरकर*

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई


*एक विनंती हा मेसेज प्रत्येक  घरात व घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोंचवा.*🙏*ही कळकळीची विनंती*🙏💞🙏🌷🌷

For Successful Launch of Aditya L-1

 For Successful Launch of Aditya L-1

Congratulations from Chief Minister Eknath Shinde
 Participation of 'IUCAA' from Pune is matter of pride

Mumbai, 2 :- India has hoisted the tricolor on the Moon with the successful Chandrayaan-3 mission.  Now, with the successful launch of Aditya L-1, the first Solar Observatory in the solar mission, India has achieved a feat that should be written in golden letters in the history of space exploration. Any appreciation  for this achievement by  our space research organization 'ISRO' is not enough, in such words, Chief Minister Eknath Shinde has praised India's progress in solar mission.  Also, in this mission, the active participation of 'IUCAA' organization in Pune in the production of satellite research equipment is a matter of pride, said the Chief Minister.

      In his congratulatory message, Chief Minister Shri  Shinde said that the successful mission of Chandrayaan-3 has strengthened India's position in space research. India has become the fourth such country in the world.  India has created history by landing the rover 'Pragyan' on the South Pole of the Moon.  Subsequently, we have taken another big leap today in terms of solar research.  With the successful launch of Aditya L-1, the first solar observatory, India has now become a world leader in lunar and solar research.  From the findings of this research, steps can be taken for the benefit of not only India, but the global mankind.  Our India, which is the largest democratic country in the world, has been recognized as a scientifically strong country through these two missions.  With the support and encouragement of Hon'ble Prime Minister Narendra Modi, ISRO has taken this major leap after recovering from a  failure of Chandrayaan-2.  ISRO will continue to achieve more such success hereafter. There is no stopping to the growth journey of ISRO.  The Chief Minister has also congratulated all the researchers - scientists, engineers involved in this mission.

 

00000

आदित्य एल-1 के सफल प्रक्षेपण के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की ओर से बधाई

 आदित्य एल-1 के सफल प्रक्षेपण के लिए   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की ओर से बधाई 

पुणे के 'आयुका' की सहभागिता गर्व की बात है 



मुंबई, दि. 2 : - चांद्रयान-3 इस सफल अभियान से भारत ने चाँद पर तिरंगा फहराया है. अब सौर अभियान आदित्य एल-1 यह पहला ही सूर्ययान सूर्य के अध्ययन के लिए सफल रूप से प्रक्षेपण करके भारत ने अंतरिक्ष के अध्ययन से इतिहास में स्वर्ण अक्षरों में दर्ज कर सके, ऐसा काम किया है. इस सफलता के लिए हमारे ‘इसरो’ इस अन्तरिक्ष अनुसंधान संस्था की जितनी तारीफ की जाए, उतनी कम है, इन शब्दों में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सूर्य के अनुसंधान पर भारत के उडान की सराहना की है. साथ ही इस मिशन में पुणे के 'आयुका' संस्था के उपग्रह पर अनुसंधान उपकरण निर्माण में सक्रीय सहभागिता का गौरवास्पद होने का जिक्र मुख्यमंत्री ने किया. 


          अपने बधाई के संदेश में मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि चांद्रयान-3 के सफल अभियान की वजह से भारत का अन्तरिक्ष का स्थान और भी मजबूत हुआ है. भारत विश्व का चौथा देश साबित हुआ है. चाँद के दक्षिण ध्रुव पर ‘प्रग्यान’ रोव्हर उतारकर भारत ने इतिहास रचा है. इसके बाद ही हमने सूर्य के अनुसंधान की दृष्टी से और एक बड़ी छलांग लगाई है. आदित्य एल- 1 इस प्रथम सूर्ययान के सफल प्रक्षेपण से अब भारत चाँद और सूर्य के अनुसंधान में कार्य करनेवाला और इसमें निरंतरता बनाएं रखनेवाला विश्व की दृष्टी से महत्वपूर्ण देश साबित हुआ है. इस अनुसंधान के निष्कर्षों से सिर्फ भारत ही नहीं, तो विश्व के मानवजाति के कल्याण में कदम उठाएं जा सकेंगे. उन्होंने कहा कि विश्व के सबसे बड़े लोकशाही के देश यानि हमारे भारत की इन दोनों अभियान से वैज्ञानिक रूप से मजबूत ऐसा देश इस तरह से पहचान निर्माण हुई है. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सहयोग और उनके प्रोत्साहन की वजह से चांद्रयान -2 की एक असफलता के बाहर निकलकर इसरो ने बड़ी छलांग लगाई है. मुझे पूरा भरोसा है की, आगे भी इसरो की इसी तरह की ऊँची कामगिरी रहेगी. इसरो के इस कामगिरी का जवाब नहीं. इस अभियान में सहभागी सभी वैज्ञानिकों, अनुसंधानकर्ताओं, अभियंताओं आदि को बहुत बहुत बधाई.



आदित्य एल-१च्या यशस्वी प्रक्षेपणासाठीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन पुण्यातील 'आयुका'चा सहभाग अभिमानास्पद

 आदित्य एल-१च्या यशस्वी प्रक्षेपणासाठीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

पुण्यातील 'आयुका'चा सहभाग अभिमानास्पद



मुंबई, दि. २ : - चंद्रयान-३ या यशस्वी मोहिमेतून भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. आता सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे पहिलेच सूर्ययान सूर्याच्या अभ्यासासाठी यशस्विरित्या प्रक्षेपण करून, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी, अशी कामगिरी केली आहे. या यशासाठी ‘इस्त्रो’ या आपल्या अवकाश संशोधन संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूर्याच्या संशोधनातील भारताच्या भरारीचे कौतुक केले आहे. तसेच या मिशनमध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग अभिमानास्पद असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे .


            अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील स्थान बळकट झाले आहे. भारत जगातील असा चौथा देश ठरला आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर ‘प्रग्यान’ हे रोव्हर उतरवून भारताने विक्रमच केला आहे. पाठोपाठ आपण सूर्याच्या संशोधनाच्या दृष्टीने आज आणखी एक मोठी झेप घेतली आहे. आदित्य एल- १ या पहिल्याच सूर्ययानाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता भारत चंद्र आणि सुर्य संशोधनात कामगिरी करणारा आणि त्यामध्ये सातत्य राखणारा जगाच्या दृष्टीने महत्वाचा देश ठरला आहे. या संशोधनातील निष्कर्षातून केवळ भारतच नव्हे, तर जगातील मानवजातीच्या हितासाठी पावले उचलता येणार आहेत. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य असा देश अशी ओळख निर्माण झाली आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे चंद्रयान-२च्या एका अपयशातून बाहेर पडून, इस्त्रोने ही मोठी भरारी घेतली आहे. यापुढेही इस्त्रोची कामगिरी अशीच उंचावणारी राहील, असा विश्वास आहे. इस्त्रोच्या या कामगिरीला तोड नाही. या मोहिमेत सहभागी सर्व संशोधक - वैज्ञानिक, अभियंते आदींचे अभिनंदन, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाही

 राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाईफुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाही

मुंबईत शिक्षक दिनी पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई, दि. २ - सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.


            समाजाची निःस्वार्थ भावनेने, निष्ठेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहेत.


            सन २०२२-२३ च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २५ ऑगस्ट, २०२३ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार प्राथमिक प्रवर्गात ३७, माध्यमिक प्रवर्गात ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) १९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ, विशेष शिक्षक कला/ क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट गाइड साठी दोन असे एकूण १०८ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय १ सप्टेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आला आहे.


000



 

आदित्य एल-१ सूर्ययानाचे यशस्वी उड्डाणअवकाश संशोधन क्षेत्रात महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू

 आदित्य एल-१ सूर्ययानाचे यशस्वी उड्डाणअवकाश संशोधन क्षेत्रात महासत्ता बनण्याच्या

दिशेने भारताची वाटचाल सुरू


- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २:- चंद्रयान-३ च्या यशस्वी स्वारीनंतर सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे भारताचे पहिले सूर्ययान आज सूर्याच्या दिशेने यशस्वीपणे झेपावले. यशस्वी चंद्र मोहिमेनंतर अवकाश संशोधन क्षेत्रातील जागतिक सत्ता बनलेल्या भारतानं आज अवकाश महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, चंद्रयान आणि आता सूर्ययानाच्या माध्यमातून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आपल्या देशाला अवकाश संशोधन क्षेत्रात जागतिक ओळख, वलय, विश्वास मिळवून दिला आहे. यापुढे देखील अनेक अवकाश मोहिमा राबवून देशाच्या, जगाच्या संशोधन क्षेत्राच्या विकासात मोठी भर घालण्यात आपण यशस्वी होऊ

         भारताच्या या गौरवशाली वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व आजी-माजी वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अभियंता, अधिकारी-कर्मचारी आणि समस्त भारतीयांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले आहे.


000

वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीमुक्त विद्यापीठाने पुढाकार घ्यावा

 वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीमुक्त विद्यापीठाने पुढाकार घ्यावा


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील



             मुंबई, दि. १ : ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश आणि नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असे नवीन अभ्यास केंद्र तयार करायचा प्रस्ताव तयार करावा आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या शैक्षणिक अडचणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते


            या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, उच्च शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन अभ्यास केंद्र तयार करता येतील का याबाबतचा प्रस्ताव मुक्त विद्यापीठाने तयार करून संबंधित विभागाला पाठवावा. त्यामुळे जी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल आणि त्यांना पुढील उच्च शिक्षण घेता येईल.


             तसेच उच्च शिक्षणामध्ये व्यवसायिक उपयोजित व कौशल्याधिष्टीत शिक्षणक्रमांचे जिल्हा केंद्रावर आयोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करावेत, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.


            बैठकीत शैक्षणिक सुविधा, जिल्हा केंद्र समन्वयक, जिल्हा केंद्रप्रमुख मानधन, शैक्षणिक गुणवत्ता वाढ करणे, आरोग्यमित्र, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली

Featured post

Lakshvedhi