Friday, 4 August 2023

जास्तीत जास्त व कमीत कमी उत्पादनाच्या समन्वयातून पीक कर्ज वाढविण्याचे शासनाचे धोरण

 जास्तीत जास्त व कमीत कमी उत्पादनाच्या समन्वयातून

पीक कर्ज वाढविण्याचे शासनाचे धोरण


- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 4: हेक्टरी पीकनिहाय पीक कर्जाच्या मर्यादेबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावरील समिती करीत असते. पिकानुसार हेक्टरी कमीत कमी उत्पादन व जास्तीत जास्त उत्पादनाचा समन्वय, उत्पादनानंतर बँकेने दिलेले कर्ज परत येण्याची शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती, केंद्र शासनाकडून शेतमाल किंमतीत झालेली वाढ, या सर्व बाबींचा विचार करून पीक कर्ज समितीकडून वाढविण्यात येते. असे पीक कर्ज वाढविण्यासाठी शासनाचे धोरण आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.


            सोलापूर जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप उद्दिष्ट पूर्तीबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते –पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मागील काळात राज्यात काही जिल्हा बँका अडचणीत आलेल्या आहेत. ए ग्रेड येणाऱ्या बँकांसाठी सवलत देण्याचा निर्णय झालेला आहे. पीक कर्ज देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये खरीपपूर्व बैठकीत चर्चा होत असते. त्यावेळी पीक कर्ज लक्षांक पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात येतात. राष्ट्रीयकृत बँकांनाही लक्षांक देण्यात येतो. तसेच 0 ते 2 टक्के व्याजदराने 3 लक्ष रूपयांपर्यंत कर्ज देण्याचा शासनाचा प्रयत्न असतो. 


            या प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात सन 2023-24 करीता कर्ज वाटपाचा लक्षांक 2378.56 कोटी आहे. जिल्ह्यात 92 हजार 11 शेतकऱ्यांना 1454.88 कोटी रूपयांचे कर्ज वाटप झाले आहे. त्याची टक्केवारी 61 आहे. उर्वरित वाटप सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. कर्जमुक्ती योजनेत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या 7/12 वरील बोझा कमी करण्यासाठी जिल्हानिहाय परिस्थिती जाणून घेवून निर्णय घेण्यात येईल.


            याबाबत पुढे सहकार मंत्री श्री. वळसे-पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँक 156 कोटी, जिल्हा मध्यवर्ती बँकेने 428 कोटी, राष्ट्रीयकृत बँकांनी 1655 कोटी रूपंयाचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 75 अक्के टक्के, तर राष्ट्रीयकृत बँकांनी 47 टक्के कर्ज वाटप केले आहे. सप्टेंबरच्या आत लक्षांकाप्रमाणे पूर्ण कर्ज वाटप करण्याच्या सूचना बँकांना देण्यात येतील.


            मंत्री श्री. वळसे-पाटील पुढे म्हणाले की, राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) ने 25 मे 2023 रोजी रोजी सर्व बँकांना परिपत्रक काढून कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज देताना सीबील स्कोअर न बघण्याच्या सूचना केली आहे. दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी तालुक्यात संबंधित आमदारांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्ज वाटपाबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून पीक कर्ज वाटप लक्षांक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.  


            या प्रश्नाच्या चर्चेत विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.


0



 


ओबीसी शिष्यवृत्तीसह शिक्षण शुल्कप्रतिपूर्ती अनियमितेची तपासणी करणार

 ओबीसी शिष्यवृत्तीसह शिक्षण शुल्कप्रतिपूर्ती अनियमितेची तपासणी करणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि.4 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या अनुषंगाने आढळलेली अनियमितता तपासण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्णतः चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले.


            लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रादेशिक उपसंचालक या पदावरील नियुक्ती रद्द करण्याबाबत सदस्य आमश्या पाडवी व सचिन अहीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2023 पर्यंत याबाबत संपूर्णतः चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.


            इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे म्हणाले की, या विभागातील रिक्त पदे भरण्याच्या पार्श्वभूमीवर 19 एप्रिल 2022 रोजी बैठक झाली होती. या बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या जात पडताळणी समितीवर कार्यरत अधिकाऱ्यांपैकी ज्या अधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागात प्रतिनियुक्तींची इच्छुकता दर्शवली होती, त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या

नंदाच पोरगं


 

कीटक खाणारी, अडीच मार्कांची वनस्पती !

 


कीटक खाणारी, अडीच मार्कांची वनस्पती !




कीटक खाणाऱ्या वनस्पतीबद्दल प्रचंड कुतूहल होतं. अगदी लहानपणीपासून. जीवशास्त्राच्या पुस्तकात त्यांचे फोटो पाहून प्रचंड आश्चर्य वाटायचं. दवबिंदू आणि घटपर्णी... हे दोन शब्द मनात स्पष्टपणे कोरले गेलेत. पण आतापर्यंत त्यांचा संबंध आला तो, परीक्षेत फक्त अडीच मार्कांसाठी आकृती काढण्यापुरता. खाली एक पेल्याच्या आकार, वरती झाकण आणि त्यात काही किडे दाखवायचे. झाकणाला अर्धा मार्क असायचा 😊 आकृत्या काढताना आम्हा विद्यार्थ्यांची प्रतिभा खुलायची. मग घटपर्णीचा कधी भोपळा व्हायचा, तर कधी रांजण!




लहाणपणी या आकर्षणातून अनेक कल्पना सुचायच्या. मनात किंवा आपापसात कथा, गूढकथा निर्माण व्हायच्या. पुढे काही सिनेमांमधून माणसाला गिळणाऱ्या कल्पनेतल्या वनस्पती पाहायला मिळाल्या, पण या दोघी काही भेटल्या नाहीत. दवबिंदू अर्थात ड्रॉसेराची आपल्याकडच्या सड्यांवर (Lateritic plateau) पवसाळ्यात गाठ पडली. अतिशय सुंदर आणि आकर्षक. पण ती भिंगामधून पाहिल्याशिवाय नीट दिसणार नाही इतकी छोटीशी. आपल्याकडे तशा इतर कीटकभक्षी वनस्पतीही आहेत. त्याही अगदी छोट्या. कोणाची मुळं कीटक खाण्याचे काम करतात, तर कोणाच्या जमिनीलगत असलेलं खोडावर ही व्यवस्था. त्या स्पष्ट, थेट दिसत नसल्याने समाधान व्हायचे नाही.




ही झाली पार्श्वभूमी. खरी गोष्ट आता सुरू होतेय. “भवताल” च्या ‘Exploring Monsoon @Cherrapunjee’ या इकोटूरच्या निमित्ताने अलीकडेच चेरापुंजी, मौसमाई, शिलाँग, मॉलिनाँग, दावकी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाणे झाले. स्वच्छ गाव म्हणून नावाजलेल्या मॉलिनाँग येथे सकाळी गावाचा फेरफटका मारत होतो. त्यावेळी नाल्याच्या कडेला अचानक काहीतरी दिसलं आणि थांबलो. पाहतो तर ती घटपर्णी! एक न्याहाळायला लागलो, तर आजूबाजूला पाहावं तिकडं तीच. कुठं कुंपणावर चढलेली, तर कुठं अडगळीत वाढलेली... एखादं तण वाढावं अगदी तशी! कधीकधी लाजाळू बाबतही असं घडतं. एखादं रोप पाहून अप्रूप वाटतं, मग रस्त्याच्या कडेला सगळीकडं तीच पाहायला मिळते.




खरं तर आपल्याकडचा जास्त पावसाचा भाग आणि त्याहून जास्त पावसाचा ईशान्य भारत यामध्ये वनस्पतींच्या दृष्टीने बरेचसे साधर्म्य पाहायला मिळाले. दोन्हीकडे उष्णप्रदेशीय हवामान. पण मग घटपर्णी आपल्याकडं का नाही? वनस्पतीवैज्ञानिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या वनस्पतीविज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. मिलिंद सरदेसाई यांनी त्याचे श्रेय तिथल्या पावसाबरोबरच आर्द्रतेला दिले. या घटपर्णीचा घट मोठा होऊन त्याचे झाकण वेगळे होण्याआधी म्हणजे घट मिटलेला असताना, ती औषधी म्हणून वापरली जाते. घट वाढून झाकण उघडल्यावर त्यात कीटक जायला लागतात आणि तो मग त्यात आम्लं पाझरायला लागतात.




ईशान्य भारतातल्या, विशेषत: मेघालयाच्या सफरीत बऱ्याच गोष्टी भेटल्या, पाहिल्या, ऐकल्या. त्यातली ही कीडे खाणारी, अडीच मार्कांची घटपर्णी वेगळी विशेष!





@ अभिजित घोरपडे


Aushyman भारत अभा कार्ड


 

खुतमापूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देणार

 खुतमापूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि. 3 : नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील खुतमापुर येथे विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


            यासंदर्भात सदस्य जितेश अंतापूरकर, अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना प्रथम आर्थिक मदत म्हणून 20 हजार रुपये मदत देण्यात आली आहे. या कुटुंबीयांनी वारसाहक्क प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्यात येईल. तसेच या अपघात प्रकरणी विद्युत निरीक्षक नांदेड यांनी घटनास्थळी पाहणी करून अपघात प्रकरणी महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


000

ठाणे येथे राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान

 ठाणे येथे राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 3 : देशभरात आज ‘राष्ट्रीय अवयवदान दिवसʼ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच भविष्यात अशा स्वरूपाचे उद्यान राज्यातील इतर शहरात महापालिका आणि नगरपरिषदेतर्फे चालू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, राज्यातील हे पहिले उद्यान इंदिरा बाबुराव सरनाईक उद्यान, कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील ६ हजार चौरस मीटरच्या जागेवर तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्‍ध करून देण्यात येणार आहे. या उद्यानाची योग्य पद्धतीने देखभाल करण्यासाठी महापालिकेतर्फे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकाणी मोठ्या फलकावर लावण्यात येईल. अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयवदान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येईल. त्यानंतर तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था या राज्यस्तरीय संस्थेच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात येईल.


            अवयवदान ही काळाची गरज आहे, याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता आल्यास अनेक जीव वाचण्यास मदत होणार आहे. यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या विषयावर अधिक व्यापक प्रमाणात जनजागृतीची व्हावी आणि अवयवदानासंदर्भात सोप्या पद्धतीने माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता ठाणे येथील उद्यान महत्वाचे असणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अवयवदानाचे अर्ज भरुन शासनाच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यानिमित्ताने केले आहे.


            सध्याच्या घडीला एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. यात किडनी प्रत्यारोपणासाठी - ५,८३२, लिव्हर प्रत्यारोपणासाठी - १,२८४, हृदय प्रत्यारोपणासाठी – १०८, फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी – ४८, स्वादुपिंड प्रत्यारोपणासाठी – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपणासाठी – ३ एवढे रुग्ण प्रतिक्षेत आहेत.


0

000



 


Featured post

Lakshvedhi