Thursday, 3 August 2023

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थ सहाय्याच्यादृष्टीने

 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थ सहाय्याच्यादृष्टीने

बेदाण्याचा शालेय पोषण आहारातील समावेश पूरक


- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे


            मुंबई, दि. 2 : द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणे निर्मितीही मोठ्या प्रमाणात करतात. शालेय पोषण आहारात बेदाण्यांचा समावेश हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने पूरक ठरणारा असल्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य बबनराव शिंदे यांनी उपस्थित केलेल्या यासंदर्भातील लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.भुमरे बोलत होते.


            मंत्री श्री.भुमरे म्हणाले, राज्यात द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्ष उत्पादनातून अपेक्षित योग्य लाभ मिळण्यासाठी शेतकरी द्राक्षातून बेदाणे निर्मितीही करतात. शालेय पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात एक दिवस बेदाण्यांचा समावेश द्राक्ष शेतकऱ्यांसाठी पूरक ठरणारा आहे.


            प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त रु.१०.०० लाख इतके अनुदान देय आहे. तसेच मुख्यमंत्री कृषि अन्न प्रक्रिया योजनेंतर्गतही बेदाणा प्रक्रिया प्रकल्पासाठी अनुदान देय असून या योजनेंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३० टक्के किंवा जास्तीत जास्त ५० लाख एवढे योजनेतील तरतूदीनुसार अनुदान दोन समान हप्त्यात देय आहे.


            एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेंतर्गत सन २००५-०६ पासून सन २०२२-२३ पर्यंत राज्यात एकूण १८३ शीतगृहांची उभारणी करण्यात आली असून त्यांची एकूण साठवणूक क्षमता ४०९७६३ मे.टन एवढी आहे. त्यामध्ये अतिरिक्त बेदाण्यांची साठवणूक केली जाते. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत आहार शिजविणाऱ्या यंत्रणेमार्फत नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून किमान एक दिवस विद्यार्थ्यांना फळे, सोयाबिस्कीट, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गूळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे इ. स्वरुपात आहार देण्यात येतो. बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहार योजनेत यापूर्वीच करण्यात आला आहे.


0000



मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेअभिव्यक्ती मताची' स्पर्धेचे आयोजन

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेअभिव्यक्ती मताची' स्पर्धेचे आयोजन

वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 2 :- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.


             या स्पर्धेत जाहिरातनिर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तीनही स्पर्धाचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर स्पर्धाचे विषय असे आहेत : (१) युवा वर्ग आणि मताधिकारी, (२) मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, (३) एका मताचे सामर्थ्य, (४) सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, (५) लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. या स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.


या बक्षिसांचे स्वरूप असे आहे.


            जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक रु. १ लक्ष, दुसरे पारितोषिक रु. ७५ हजार, तिसरे पारितोषिक रु. ५० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १० हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ५० हजार रु., दुसरे पारितोषिक २५ हजार रु. आणि तिसरे पारितोषिक १० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५ हजार रु., दुसरे पारितोषिक १५ हजार रु व तिसरे पारितोषिक १० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५,००० रुपयांची आहेत.


            महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

भटक्या - विमुक्त समाजाच्या अडचणीसोडविण्यासाठी शासन सकारात्मक

 भटक्या - विमुक्त समाजाच्या अडचणीसोडविण्यासाठी शासन सकारात्मक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. 2 : भटक्या व विमुक्त समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भटक्या- विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज विधानभवन येथे झाली.


            बैठकीला इतर मागास व बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा आदी उपस्थित होते.


            यावेळी भटके- विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींमार्फत विविध प्रश्न मांडण्यात आले. यात शैक्षणिक प्रश्न, घरांची उपलब्धता यासह भटके- विमुक्त समाजातील लोककलावंतांच्या अडचणींची माहिती देण्यात आली. महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या लोककला जोपासणाऱ्या लोककलावंताना राज्य शासनाकडून देण्यात येणारे मानधन ५ हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली.


            या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले.


0000



 

Wednesday, 2 August 2023

जेवण झाले की पोट फुगल्यासारखे वाटते? बडीशोपेचा १ उपाय, पचन सुधारते लवकर.....*

 *जेवण झाले की पोट फुगल्यासारखे वाटते? बडीशोपेचा १ उपाय, पचन सुधारते लवकर.....*


आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवणांतर बडीशेप खाण्याची सवय असते. खरंतर बडीशेपमध्ये, अनेक औषधी गुणधर्म असतात. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन - सी चं प्रमाण भरपूर असतं. तसंच यामध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज आढळतात. शरीर निरोगी राहण्यासाठी बडीशेप खाणे आवश्यक असते, कारण बडीशेपमुळे फक्त एक नाहीतर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. बडिशेपमध्ये सुगंध आणि अँटीबॅक्टिरियल गुणधर्म दोन्ही असतात. बडीशेपमध्ये अनेक जीवनसत्त्वांसोबत विविध खनिजे देखील असतात. पोटभर जेवण केल्यानंतर बडीशेप खाल्ल्याने जेवण लगेच पचण्यास मदत होते. 


आजकाल चुकीची जीवनशैली, अयोग्य, आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास जाणवताना दिसतो. काही लोकांना पोटांत गॅस होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. काहीवेळा खूप हेव्ही जेवण झाल्यानंतर आपल्याला करपट ढेकर, पोटात गॅस, पोटदुखी, पोटात जळजळ होणे यांसारख्या विविध समस्या उद्भवतात. मुखवास म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या या बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत हे आपल्यातील अनेकांना कदाचित माहित नसते. जेवणानंतर पोटात गॅस होणे ही एक सर्वसामान्य समस्या आहे. अनेकांना रोज जेवणानंतर पोटात गॅस होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यासाठी आपण आपल्या रोजच्या बडीशेपमध्ये काही खास पदार्थ मिसळून अशी बडीशेप रोज खाल्ल्यास गॅसची ही समस्या लगेच दूर होण्यास मदत होते(Gas And Bloating Troubling You? Try Home Remedy For Gas).


*साहित्य...* 

*१. ओवा - २ टेबलस्पून, 

*२. जिरे - २ टेबलस्पून,

*३. बडीशेप - २ टेबलस्पून,

*४. जवस - २ टेबलस्पून,

*५. काळ मीठ - १ टेबलस्पून.


*कृती...* 

*१. सर्वप्रथम एक पॅन घेऊन त्यामध्ये ओवा, जिरे, बडीशेप, जवस घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर कोरडे भाजून घ्यावेत.


*२. ५ ते ६ मिनिटे हे मिश्रण कोरडे भाजून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात काळं मीठ घालावे.


*३. आता हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे. 


*४. त्यानंतर हे मिश्रण संपूर्ण गार होईपर्यंत तसेच ठेवावे.


*५. ही बडीशेप गार झाल्यावर एका हवाबंद डब्यांत व्यवस्थित भरुन स्टोअर करून ठेवावी. 


जेवण झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित पचन व्हावे, जेवणानंतर पोटात गॅस होऊ नये म्हणून एक चमचा ही बडीशेप जेवणानंतर खावी.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार,*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत महाराष्ट्रात 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणांना मंजूरी

 प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत महाराष्ट्रात 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणांना मंजूरी



            नवी दिल्ली 1 : प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2022 पासून ते मार्च 2023 अखेरपर्यंत 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत. या योजनेतंर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले आहे.


            देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर व तरुण या तीन कर्ज प्रकारात 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. देशात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 6 कोटी 23 लाख 10 हजार 598 कर्ज प्रकरणांना मंजूरी दिली असून, त्यापैकी महाराष्ट्राची 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत.


            नवीन किंवा सध्या सुरू असलेल्या सूक्ष्म उद्योग/व्यवसायाला दहा लाख रुपयांपर्यंतचे संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे (पीएमएमवाय) उद्दिष्ट आहे. शेड्यूल्ड कमर्शियल बँका (एससीबी), बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएपसी) आणि लघु वित्तीय संस्था (एमएफआय) या सभासद कर्ज देणाऱ्या संस्था (एमएलआय) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाख रूपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय (विनातारण) देतात. कर्ज घेण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जिच्याकडे लघु उद्योगासाठी व्यवसाय योजना आहे, ती व्यक्ती या योजनेंतर्गत उत्पादन, व्यापार, सेवा क्षेत्रातील उत्पन्न वाढवणाऱ्या व्यवहारांसाठी कर्ज घेऊ शकते. तसेच शेतीशी संबंधित कामांसाठी तीन कर्ज श्रेणींमध्ये कर्ज उपलब्ध होते. शिशू (50,000 रूपयांपर्यंतचे कर्ज), किशोर (50,000 रूपयांपेक्षा जास्त आणि 5 लाखांपर्यंत कर्ज) आणि तरुण (5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंत कर्ज)


            आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महाराष्ट्र राज्यात 41,58,052 मंजूर कर्ज खात्यांची संख्या होती. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ह्या कर्ज खाते धारकांची संख्या 52 लाख 53 हजार 324 आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सोमवारी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.


००००

राज्यातील कोणताही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट नाही

 राज्यातील कोणताही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट नाही

रायगडरत्नागिरीपुणेसातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

 

            मुंबईदि. १ : पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट नाही व रायगडरत्नागिरीपुणेसातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

            रेड अलर्ट हा जर २४ तासात २०४ मिमी पाऊस पडला तर  देण्यात येतो. कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला नाही. ऑरेंज अलर्ट हा जर २४ तासात ११५ ते २०४ मिमी पाऊस पडला, तर देण्यात येतो.  रायगडरत्नागिरीपुणेसातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

            येलो अलर्ट हा २४ तासांत ६५ ते ११५ मिमी पाऊस पडला तर देण्यात येतो. पालघरठाणेमुंबईसिंधुदुर्गधुळेजळगावनाशिककोल्हापूरसाताराजालनापरभणीहिंगोलीनांदेडलातूरअकोलाअमरावतीभंडाराबुलढाणाचंद्रपूरगडचिरोलीगोंदियानागपूरवर्धावाशीमयवतमाळ या जिल्ह्यांना सध्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

            ग्रीन  अलर्ट हा ६५ मिमी पाऊस पडणार असेल तर देण्यात येतो. वरील सर्व जिल्हे वगळून हा अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील या धारणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग हा सामान्य पातळीचा आहे

            भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाची एकूण क्षमता ७४०.१७  दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ३२४.३२ क्युमेक्स. विसर्ग सोडण्यात आला आहे.  जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची एकूण क्षमता २५५ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ५२८ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाची एकूण क्षमता ३०४.१० दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत २३.७० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाची एकूण क्षमता २०२.४४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.  सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी धरणाची एकूण क्षमता ११२.१४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ५५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची एकूण क्षमता २१९.९७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १६१ क्युमेक्स. विसर्ग सोडण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची एकूण क्षमता ५६४.०५ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ९३ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

            यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला धरणाची एकूण क्षमता १८३.९४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती धरणाची एकूण क्षमता १६९.६७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १९.५० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा धरणाची एकूण क्षमता २१६.८७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १७.२५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणाची एकूण क्षमता ७७९.३४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १६९ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना व नजीकच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत.

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी भरतीच्या लाटांचा तपशील

दुपारी १२:३४४.८४ मीटर

            वज्राघात प्रवण जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये दामिनी: लाइटनिंग अलर्ट ॲप डाउनलोड व  इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटरच्या परिसरातील विजेसाठी जीपीएस नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयच्या खबरदारीचे उपाय देखील सामायिक करते.

            नागरिकांनी आपत्तींच्या चेतावणी आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता SACHET ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

            आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL 

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

            महाराष्ट्र शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून  १ ऑगस्ट २०२३ रोजी  संध्याकाळी ७:०० वाजता प्राप्त आकडेवारी नुसार  महाराष्ट्र: हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/


शहापूरमधील दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू; तीन जखमींवर उपचार सुरू

 शहापूरमधील दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू; तीन जखमींवर उपचार सुरू


भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी काळजी घेण्याचे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुख्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी


            ठाणे, दि. 1 (जिमाका) : शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी सोमवारी (दि. 31 जुलै) रात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 20 जण मयत झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, याची काळजी घेण्याबाबत सूचना एमएसआरडीसीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


         यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह भिवंडीचे प्रांताधिकारी अमित सानप, कामगार उपायुक्त प्रदीप पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.


           मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, झालेली घटना दुर्देवी आणि दु:खद आहे. या ठिकाणी जवळपास 700 टनांचा लाँचर आणि 1 हजार 250 टनांचा गर्डर आहे. हे तांत्रिक काम सुरू असताना दुर्देवाने लाँचर आणि गर्डर पडल्याने ही घटना घडली आहे. यामध्ये काम करणारे अभियंते व मजूर असे मिळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी आहेत. पाच जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या ठिकाणी 28 जण काम करीत होते. या घटनेची चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. व्हीएसएल ही कंपनी हे काम करीत असून या दुर्घटनेची चौकशी करण्याकरिता तज्ञांचे पथक घटनास्थळी येणार आहे. लाँचर आणि गर्डर कशामुळे पडला याचा तपास करण्यात येईल. या चौकशीमध्ये जे बाहेर येईल त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. 


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेची गांभिर्याने दखल घेतलेली आहे. त्यांनी देखील मृत व्यक्तीकरिता संवेदना व शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या परिवाराला केंद्र शासनाकडून 2 लाख रुपयांची आणि राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम करणाऱ्या व्हीएसएल कंपनीने देखील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


         रात्री या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ) अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलाचे अधिकारी व स्वयंसेवक , महसूल विभागाचे अधिकारी- कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. तसेच अपघाताची माहिती कळताच मध्यरात्री तातडीने सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचप्रमाणे ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनीही भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.


            दुर्घटनेतील जखमीपैकी एकावर शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात आणि दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. 


         घटनेची माहिती मिळताच भिवंडीचे उपविभागीय अधिकारी श्री. सानप, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रेवती गायकर, शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर यांनी तातडीने बचावकार्यासाठी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी श्री. शिनगारे हेही रात्रीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्यावर देखरेख ठेवत होते. 


मृतांची नावे -


सिनियर ग्रँटी मॅनेजर संतोष जे एतंगोवान (वय 35 रा. 2/225, व्हीआयपी नगर, लक्ष्मी निवास, बोगनपल्ली, टाटा शोरुमच्या मागे, कृष्णागिरी, तमिळनाडू,


पीटी इंजिनिअर कानन व्ही वेदारथिनम, (वय 40, 3/138, पप्पू रेत्तीकुथागाई, वेधारण्यम टीके, अयक्करांबलम, अयक्करांबूलम, नागपट्टम, तमिळनाडू-६१४७०७), 


हायड्रॉलिक टेक्निशियन प्रदीपकुमार रॉय, (वय 45, रा. मणिबाला रॉय, दक्षिण खट्टीमारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735210), 


विंच ऑपरेटर परमेश्वर खेदारूलाल यादव (वय 25, रा. वॉर्ड क्रमांक-15, सुभाषनगर, मलाहिया, सैदपूर, गाझीपूर, उत्तरप्रदेश-233304), 


हायड्रॉलिक ऑपरेटर राजेश भालचंद्र शर्मा (वय 32, रा. नौगावा थागो, उधमसिंगनगर, उत्तराखंड-262308), 


सुपरवायझर बाळाराम हरिनाथ सरकार (धौलागुरी, चारेर बारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735224), 


सुपरवायझर अरविंदकुमार उपाध्याय (वय 33, रा. 1048, बलुआ, नागरा, बलिया, उत्तरप्रदेश -221711), 


मयत मजुरांची नावे


नितीनसिंह विनोद सिंह (वय 25, रा. रसरा, बलिया, उत्तर प्रदेश -221712),


आनंद कुमार चंद्रमा यादव, (वय 25, रा. गौरा मदनपुरा, एकेल, बलिया, उत्तर प्रदेश -221711), 


लल्लन भुलेट राजभर (वय 38, रा. देहारी, कटवारी, बलिया, रसरा, उत्तरप्रदेश -२२१७१२),


राधेश्याम भीम यादव (वय 40, रा. गौरा मदनपुरा, नागरा, बलिया, उत्तर प्रदेश -221711),


सुरेंद्रकुमार हुलक पासवान (वय 35, रा. विल-माली अरवल, बिहार-804419), 


पप्पूकुमार कृष्णदेव साव, (वय 30, रा. विल-माली, ठाणे-बंशी, अरवल, बिहार-804419), 


गणेश रॉय (वय 40, रा. पश्चिम डौकीमारी, गरियालतारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735233), 


सुब्रोतो धिरेन सरकार (वय 23, रा. धौलागुरी, चारेर बारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735224), 


लवकुशकुमार राम उदित साव (वय 28, रा. ग्राम एन पोस्ट-माली, अरवल, बिहार-804419), 


मनोज सिंह इंद्रदेव यादव (वय 49, रा. नंदन, बक्सर, डुमराव, बिहार-८०२११९)


रामशंकर यादव (वय 43, उत्तरप्रदेश), 


 सत्यप्रकाश पांडे (वय 30, बिहार)


 सरोजकुमार (वय 18, उत्तर प्रदेश) 


जखमींवर उपचार सुरू, प्रकृती स्थिर


            प्रेमप्रकाश अयोध्य साव (वय 37) यांच्या पायाला दुखापत झाली असून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किशोर हिव (वय 40) व चंद्रकांत वर्मा (वय 36) या दोघा जखमींना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 


       या दुर्घटनेमधील अभिजित दास, अनभुसेल्वन के, पिताबस बिश्वाल, रामकुमार व उपेंद्र पंडित यांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. या संपूर्ण घटनेत बचावकार्य करण्यात शहापूर येथील जीवरक्षक स्वयंसेवक तसेच आपत्ती

 व्यवस्थापनात मदत करणारे आपदामित्र यांनीही सहकार्य केले.


00000


Featured post

Lakshvedhi