Wednesday, 2 August 2023

प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत महाराष्ट्रात 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणांना मंजूरी

 प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत महाराष्ट्रात 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणांना मंजूरी



            नवी दिल्ली 1 : प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2022 पासून ते मार्च 2023 अखेरपर्यंत 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत. या योजनेतंर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले आहे.


            देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर व तरुण या तीन कर्ज प्रकारात 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. देशात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 6 कोटी 23 लाख 10 हजार 598 कर्ज प्रकरणांना मंजूरी दिली असून, त्यापैकी महाराष्ट्राची 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत.


            नवीन किंवा सध्या सुरू असलेल्या सूक्ष्म उद्योग/व्यवसायाला दहा लाख रुपयांपर्यंतचे संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे (पीएमएमवाय) उद्दिष्ट आहे. शेड्यूल्ड कमर्शियल बँका (एससीबी), बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएपसी) आणि लघु वित्तीय संस्था (एमएफआय) या सभासद कर्ज देणाऱ्या संस्था (एमएलआय) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाख रूपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय (विनातारण) देतात. कर्ज घेण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जिच्याकडे लघु उद्योगासाठी व्यवसाय योजना आहे, ती व्यक्ती या योजनेंतर्गत उत्पादन, व्यापार, सेवा क्षेत्रातील उत्पन्न वाढवणाऱ्या व्यवहारांसाठी कर्ज घेऊ शकते. तसेच शेतीशी संबंधित कामांसाठी तीन कर्ज श्रेणींमध्ये कर्ज उपलब्ध होते. शिशू (50,000 रूपयांपर्यंतचे कर्ज), किशोर (50,000 रूपयांपेक्षा जास्त आणि 5 लाखांपर्यंत कर्ज) आणि तरुण (5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंत कर्ज)


            आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महाराष्ट्र राज्यात 41,58,052 मंजूर कर्ज खात्यांची संख्या होती. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ह्या कर्ज खाते धारकांची संख्या 52 लाख 53 हजार 324 आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सोमवारी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.


००००

राज्यातील कोणताही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट नाही

 राज्यातील कोणताही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट नाही

रायगडरत्नागिरीपुणेसातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

 

            मुंबईदि. १ : पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट नाही व रायगडरत्नागिरीपुणेसातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

            रेड अलर्ट हा जर २४ तासात २०४ मिमी पाऊस पडला तर  देण्यात येतो. कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला नाही. ऑरेंज अलर्ट हा जर २४ तासात ११५ ते २०४ मिमी पाऊस पडला, तर देण्यात येतो.  रायगडरत्नागिरीपुणेसातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

            येलो अलर्ट हा २४ तासांत ६५ ते ११५ मिमी पाऊस पडला तर देण्यात येतो. पालघरठाणेमुंबईसिंधुदुर्गधुळेजळगावनाशिककोल्हापूरसाताराजालनापरभणीहिंगोलीनांदेडलातूरअकोलाअमरावतीभंडाराबुलढाणाचंद्रपूरगडचिरोलीगोंदियानागपूरवर्धावाशीमयवतमाळ या जिल्ह्यांना सध्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

            ग्रीन  अलर्ट हा ६५ मिमी पाऊस पडणार असेल तर देण्यात येतो. वरील सर्व जिल्हे वगळून हा अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील या धारणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग हा सामान्य पातळीचा आहे

            भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाची एकूण क्षमता ७४०.१७  दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ३२४.३२ क्युमेक्स. विसर्ग सोडण्यात आला आहे.  जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची एकूण क्षमता २५५ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ५२८ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाची एकूण क्षमता ३०४.१० दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत २३.७० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाची एकूण क्षमता २०२.४४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.  सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी धरणाची एकूण क्षमता ११२.१४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ५५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची एकूण क्षमता २१९.९७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १६१ क्युमेक्स. विसर्ग सोडण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची एकूण क्षमता ५६४.०५ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ९३ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

            यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला धरणाची एकूण क्षमता १८३.९४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती धरणाची एकूण क्षमता १६९.६७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १९.५० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा धरणाची एकूण क्षमता २१६.८७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १७.२५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणाची एकूण क्षमता ७७९.३४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १६९ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना व नजीकच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत.

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी भरतीच्या लाटांचा तपशील

दुपारी १२:३४४.८४ मीटर

            वज्राघात प्रवण जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये दामिनी: लाइटनिंग अलर्ट ॲप डाउनलोड व  इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटरच्या परिसरातील विजेसाठी जीपीएस नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयच्या खबरदारीचे उपाय देखील सामायिक करते.

            नागरिकांनी आपत्तींच्या चेतावणी आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता SACHET ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

            आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL 

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

            महाराष्ट्र शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून  १ ऑगस्ट २०२३ रोजी  संध्याकाळी ७:०० वाजता प्राप्त आकडेवारी नुसार  महाराष्ट्र: हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/


शहापूरमधील दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू; तीन जखमींवर उपचार सुरू

 शहापूरमधील दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू; तीन जखमींवर उपचार सुरू


भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी काळजी घेण्याचे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुख्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी


            ठाणे, दि. 1 (जिमाका) : शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी सोमवारी (दि. 31 जुलै) रात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 20 जण मयत झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, याची काळजी घेण्याबाबत सूचना एमएसआरडीसीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


         यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह भिवंडीचे प्रांताधिकारी अमित सानप, कामगार उपायुक्त प्रदीप पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.


           मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, झालेली घटना दुर्देवी आणि दु:खद आहे. या ठिकाणी जवळपास 700 टनांचा लाँचर आणि 1 हजार 250 टनांचा गर्डर आहे. हे तांत्रिक काम सुरू असताना दुर्देवाने लाँचर आणि गर्डर पडल्याने ही घटना घडली आहे. यामध्ये काम करणारे अभियंते व मजूर असे मिळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी आहेत. पाच जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या ठिकाणी 28 जण काम करीत होते. या घटनेची चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. व्हीएसएल ही कंपनी हे काम करीत असून या दुर्घटनेची चौकशी करण्याकरिता तज्ञांचे पथक घटनास्थळी येणार आहे. लाँचर आणि गर्डर कशामुळे पडला याचा तपास करण्यात येईल. या चौकशीमध्ये जे बाहेर येईल त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. 


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेची गांभिर्याने दखल घेतलेली आहे. त्यांनी देखील मृत व्यक्तीकरिता संवेदना व शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या परिवाराला केंद्र शासनाकडून 2 लाख रुपयांची आणि राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम करणाऱ्या व्हीएसएल कंपनीने देखील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


         रात्री या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ) अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलाचे अधिकारी व स्वयंसेवक , महसूल विभागाचे अधिकारी- कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. तसेच अपघाताची माहिती कळताच मध्यरात्री तातडीने सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचप्रमाणे ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनीही भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.


            दुर्घटनेतील जखमीपैकी एकावर शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात आणि दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. 


         घटनेची माहिती मिळताच भिवंडीचे उपविभागीय अधिकारी श्री. सानप, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रेवती गायकर, शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर यांनी तातडीने बचावकार्यासाठी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी श्री. शिनगारे हेही रात्रीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्यावर देखरेख ठेवत होते. 


मृतांची नावे -


सिनियर ग्रँटी मॅनेजर संतोष जे एतंगोवान (वय 35 रा. 2/225, व्हीआयपी नगर, लक्ष्मी निवास, बोगनपल्ली, टाटा शोरुमच्या मागे, कृष्णागिरी, तमिळनाडू,


पीटी इंजिनिअर कानन व्ही वेदारथिनम, (वय 40, 3/138, पप्पू रेत्तीकुथागाई, वेधारण्यम टीके, अयक्करांबलम, अयक्करांबूलम, नागपट्टम, तमिळनाडू-६१४७०७), 


हायड्रॉलिक टेक्निशियन प्रदीपकुमार रॉय, (वय 45, रा. मणिबाला रॉय, दक्षिण खट्टीमारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735210), 


विंच ऑपरेटर परमेश्वर खेदारूलाल यादव (वय 25, रा. वॉर्ड क्रमांक-15, सुभाषनगर, मलाहिया, सैदपूर, गाझीपूर, उत्तरप्रदेश-233304), 


हायड्रॉलिक ऑपरेटर राजेश भालचंद्र शर्मा (वय 32, रा. नौगावा थागो, उधमसिंगनगर, उत्तराखंड-262308), 


सुपरवायझर बाळाराम हरिनाथ सरकार (धौलागुरी, चारेर बारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735224), 


सुपरवायझर अरविंदकुमार उपाध्याय (वय 33, रा. 1048, बलुआ, नागरा, बलिया, उत्तरप्रदेश -221711), 


मयत मजुरांची नावे


नितीनसिंह विनोद सिंह (वय 25, रा. रसरा, बलिया, उत्तर प्रदेश -221712),


आनंद कुमार चंद्रमा यादव, (वय 25, रा. गौरा मदनपुरा, एकेल, बलिया, उत्तर प्रदेश -221711), 


लल्लन भुलेट राजभर (वय 38, रा. देहारी, कटवारी, बलिया, रसरा, उत्तरप्रदेश -२२१७१२),


राधेश्याम भीम यादव (वय 40, रा. गौरा मदनपुरा, नागरा, बलिया, उत्तर प्रदेश -221711),


सुरेंद्रकुमार हुलक पासवान (वय 35, रा. विल-माली अरवल, बिहार-804419), 


पप्पूकुमार कृष्णदेव साव, (वय 30, रा. विल-माली, ठाणे-बंशी, अरवल, बिहार-804419), 


गणेश रॉय (वय 40, रा. पश्चिम डौकीमारी, गरियालतारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735233), 


सुब्रोतो धिरेन सरकार (वय 23, रा. धौलागुरी, चारेर बारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735224), 


लवकुशकुमार राम उदित साव (वय 28, रा. ग्राम एन पोस्ट-माली, अरवल, बिहार-804419), 


मनोज सिंह इंद्रदेव यादव (वय 49, रा. नंदन, बक्सर, डुमराव, बिहार-८०२११९)


रामशंकर यादव (वय 43, उत्तरप्रदेश), 


 सत्यप्रकाश पांडे (वय 30, बिहार)


 सरोजकुमार (वय 18, उत्तर प्रदेश) 


जखमींवर उपचार सुरू, प्रकृती स्थिर


            प्रेमप्रकाश अयोध्य साव (वय 37) यांच्या पायाला दुखापत झाली असून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किशोर हिव (वय 40) व चंद्रकांत वर्मा (वय 36) या दोघा जखमींना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 


       या दुर्घटनेमधील अभिजित दास, अनभुसेल्वन के, पिताबस बिश्वाल, रामकुमार व उपेंद्र पंडित यांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. या संपूर्ण घटनेत बचावकार्य करण्यात शहापूर येथील जीवरक्षक स्वयंसेवक तसेच आपत्ती

 व्यवस्थापनात मदत करणारे आपदामित्र यांनीही सहकार्य केले.


00000


महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा

 महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा


- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेक


            मुंबई, दि. 1 : महसूल विभागासोबत समाजातील प्रत्येक नागरिकांचा संबंध येतो. त्यांच्या सेवेसाठी विभाग सदैव तत्पर असून हा विभाग प्रशासनाचा कणा असल्याचे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी काढले.


            महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. नागरिकांना या योजनांचा योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून 'महसूल सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत या सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार यामिनी जाधव, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.नवले, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            श्री.नार्वेकर म्हणाले की, कोणत्याही आपत्तीच्या वेळी प्रथम महसूल विभागाकडे जबाबदारी दिली जाते. निवडणुकीची जबाबदारी देखील महसूल विभागामार्फत यशस्वीपणे पार पाडली जाते. एकूणच राज्यातील नागरिकांच्या भविष्य, भवितव्य आणि कल्याणाची मोठी जबाबदारी हा विभाग सांभाळत असून ती चोखपणे पार पाडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


महसूल विभागाने दाखले तत्काळ देण्याचा प्रयत्न करावा


- पालकमंत्री दीपक केसरकर


            ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन नागरिकांपर्यंत पोहोचून विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी मागणी केलेले दाखले विभागाने लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथे नागरिकांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कोळीवाड्यांच्या सर्वांगीण विकासाद्वारे शहराच्या मूळ परंपरेची ओळख पर्यटकांच्या माध्यमातून जगभर करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांसाठी सर्वसमावेशक सुविधा केंद्र, धार्मिक स्थळांचा परिसर विकास, घरांना छप्पर, म्हाडाच्या घरांना लिफ्ट, कामगार केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा आदींबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असून तेथेच शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


            जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी प्रास्ताविकाद्वारे नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रत्येक कामामध्ये महसूल विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. इंग्रजांच्या काळापासूनची महसूल जमा करणारी ही महत्त्वाची यंत्रणा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.


            महसूल सप्ताहांतर्गत विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जनसामान्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.


            दि. 1 ऑगस्ट 2023 हा महसूल दिन असून या दिवशी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आला. त्याचप्रमाणे येणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दि. 2 ऑगस्ट रोजी विविध महाविद्यालयात युवा संवादाचे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध दाखल्याबाबत ऑनलाईन प्रक्रियांची माहिती देण्यात येणार आहे, तर मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. दि. 3 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना एनडीआरएफ मास्टर ट्रेनरकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. दि. 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत मुंबई शहरातील भाडेपट्टे धारकाला, भोगवटादार वर्ग-1, सत्ता हस्तांतरणाबाबत शिबिर आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच मिळकत पत्रिका व नकाशांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 5 ऑगस्ट रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिबिर आयोजित करून माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील भूदल व नौदल कार्यालयामध्ये शिबिर घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. दि. 6 ऑगस्ट रोजी महसूल विभागातील निवृत्त कर्मचारी वर्ग यांचे प्रश्न व सेवा विषयक बाबी निकाली काढण्यात येतील. तर दि. 7 ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा, शुद्धलेखन व टिपणी लेखन याबाबत मार्गदर्शन तसेच ताणतणाव मुक्तीबाबत व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पथनाट्य आणि सांगता समारंभाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


0000

दारू ,गुटखा, तंबाखू,सिगरेटच व्यसन Smoking Habit*

 *दारू ,गुटखा, तंबाखू,सिगरेटच व्यसन Smoking Habit*

*व तंबाखू गुटखा व्यसन सोडवा.*




१)कँल्केरीया फाँस ३×नेट्रम मूर३× चा प्रत्येकी चार चार गोळ्या ग्लासभर पाण्यात टाकून ते पाणी घोट घोट करून दहा दहा मिनिटाच्या अंतराने घ्या पंधरा दिवसांत शिसारी येऊन व्यसन बंद होईल.

२)कँफर६गोळी तलफ आली की जिभेखाली ठेवा काही दिवसात तंबाखू गुटखा सुटेल.

३)कँलाडियम२००चार चार गोळ्या स.दु.सं सिगरेट,

४)सल्फर२००पोटेन्सी चे पाच पाच थेंब पाण्यात टाकून पाजेल तरीही दारू,तंबाखूची ,गुटख्याची इच्छा होणार नाही.

वरील औषधे होमिओपॅथी च्या दूकानात मिळतील.


वैद्य.गजानन



*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



_*(

सहकारातून देशात मोठी क्रांती घडेल


 सहकारातून देशात मोठी क्रांती घडेल


खासदार डॉ. अनिल बोंडेंकडून प्रधानमंत्री, सहकार मंत्र्यांचे अभिनंदन


बहु-राज्य सहकारी सोसायटी विधेयकावर राज्यसभेत समर्थनपर भाष्य


 


केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (ता.१) राज्यसभेत बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक मांडले. या विधेयकावर खासदार तथा प्रतोद डॉ.अनिल बोंडे यांनी ११ मिनिट २० सेकंद आपले विचार मांडत त्यांनी या विधेयकाच्या माध्यमातून देशभरात सहकारात क्रांती घडेल. एका कुटुंबापर्यंतमर्यादित असलेलं हे क्षेत्र आता समृद्धी आनेल. गोरगरीब नागरिकांचा त्यातून उद्धार होईल आणि ग्रामीण क्षेत्राला मजबुती प्रदान करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना यात असल्याचे त्यांनी सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.


   संसदेचे अधिवेशन नवी दिल्ली येथे सुरू आहे. अतिशय महत्त्वाचे असणारे बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक आज राज्यसभेत सहकार मंत्री अमित शहा यांनी मांडले. या विधयकावर राज्यसभेतील प्रतोद खासदार डॉ अनिल बोंडे यांनी सर्वाधिक ११ मिनिट २० सेकंद विचार व्यक्त केले. राज्यसभेत बोलताना ते म्हणाले, सहकार हा भारताचा आत्मा आहे. ग्रामीण नागरिकांच्या उन्नतीसाठी सहकाराला बळकटी देणे महत्त्वाचे असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात सारख्या महत्त्वाच्या असलेल्या सहकाराच्या भूमीतील अमित शहा यांच्याकडे या खात्याची जबाबदारी देत स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. सहकाराच्या माध्यमातून शेतीला चालना देणे, पुरेशा प्रमाणात पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, ग्रामीण क्षेत्रातील गरीब शेतकरी, पशुपालक, मजूर, मत्स्यपालक इत्यादींचा विचार करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीचा नारा देत अमृत काळात सहकाराला बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या सर्व बाबी कृतीत उतरवण्यासाठी व त्याची देशभरात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमित शहा प्रयत्न करत आहेत. बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक त्याच प्रयत्नाचा एक भाग असल्याचे डॉ.बोंडे म्हणाले. आदिवासी, अनुसूचित जाती, महिला इत्यादी घटक आता सहकाराच्या कक्षेत येणार आहेत. त्यांच्या विकासासाठी सहकारात सुधारणा करणे आवश्यक होते. सहकारी संस्थांची दुरावस्था झालेली होती. महाराष्ट्रात दीड लक्ष सहकारी संस्था आहेत. केंद्र सरकारच्या स्तरावर सहकार मंत्रालय नव्हते. मात्र प्रधानमंत्री यांनी सहकार मंत्रालय स्थापन केल्याने देशातील शेवटचा घटक विकासाच्या प्रवाहात आला. अनेक सहकारी संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जात नव्हती. गोरगरीब, शेतकरी, महिला, अनुसूचित जाती इत्यादींच्या प्रतिनिधित्वाला त्यातून डावलण्यात येत होते. मात्र या विधेयकामध्ये या संपूर्ण बाबींचा विचार करण्यात आला आहे. संस्थेतील भागीदार असलेल्या व्यक्तींवर अन्याय होणार नाही, याचाही विचार करण्यात आला आहे .त्यांना न्याय मागण्याची एक कार्यप्रणाली ठरवून देण्यात आली आहे. या विधेयकामध्ये पाच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे सहकाराच्या क्षेत्रात संपूर्ण पारदर्शकता येईल. निवडणूक बोर्डमध्ये महिलांसाठी दोन जागा तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधित्वकरिता एक जागा आरक्षित करण्यात आली आहे. लहान सहकारी संस्था डबघाईस येत असतील तर त्याला आर्थिक पाठबळ देऊन मजबुती देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशाही उपायोजना नव्या विधेयकामध्ये आहेत. एकंदरतच वंचित घटकांना न्याय देण्याची तरतूद यामध्ये समाविष्ट असल्याने एका कुटुंबातपूर्त मर्यादित असलेले सहकार क्षेत्र आता लोकाभिमुख होत आहेत. सहकार स्वाहाकाराकडून आता समृद्धीकडे जात आहे. गोरगरीब नागरिकांचा उद्धार होईल. ग्रामीण क्षेत्रातून त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असल्याने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी स्वागत आणि अभिनंदन सुद्धा केले.


0000




प्रेसनोट, हिंदी


 1 अगस्त, 2023


 


सहकारिता से देश में एक बड़ी क्रांति आयेगी


सांसद डॉ. अनिल बोंडे की ओर से प्रधानमंत्री, सहकारिता मंत्री को बधाई


 राज्यसभा में बहु-राज्य सहकारी सोसायटी विधेयक के समर्थन में रखे विचार


 केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शाह ने मंगलवार (1) को राज्यसभा में बहु-राज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक पेश किया। सांसद और प्रतोद डॉ. अनिल बोंडे ने इस बिल पर 11 मिनट 20 सेकेंड तक अपने विचार रखे. एक परिवार तक सीमित रहने वाला यह क्षेत्र अब समृद्ध होगा। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और सहकारिता मंत्री अमित शाह को बधाई देते हुए कहा कि इससे गरीब नागरिकों को राहत मिलेगी और इसमें ग्रामीण क्षेत्रों को मजबूत करने के लिए आवश्यक उपाय शामिल हैं।


    नई दिल्ली में संसद का सत्र चल रहा है. सहकारिता मंत्री अमित शाह ने आज राज्यसभा में बेहद महत्वपूर्ण बहु-राज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक पेश किया। राज्यसभा में प्रतोद सांसद डॉ. अनिल बोंडे ने इस बिल पर सबसे ज्यादा 11 मिनट 20 सेकंड तक विचार व्यक्त किए. राज्यसभा में बोलते हुए उन्होंने कहा, सहकार भारत की आत्मा है. चूंकि ग्रामीण नागरिकों के उत्थान के लिए सहकार को मजबूत करना महत्वपूर्ण है, इसलिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गुजरात जैसी सहकार की महत्वपूर्ण भूमि में काम कर चुके अमित शाह को इस विभाग की जिम्मेदारी देते हुए एक अलग मंत्रालय का गठन किया है। सहकारिता के माध्यम से कृषि को बढ़ावा देना, पानी की पर्याप्त सुविधा उपलब्ध कराना, ग्रामीण क्षेत्रों में गरीब किसानों, पशुपालकों, मजदूरों, मछली पालकों आदि के बारे में सोचते हुए, सहकार से स्मृद्धि का नारा देकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमृत काल में सहकारिता को मजबूत करने की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाया है। अमित शाह इन सभी पहलुओं को पूरे देश में प्रभावी ढंग से लागू करने की कोशिश कर रहे हैं। डॉ. बोंडे ने कहा कि बहु-राज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक उसी प्रयास का एक हिस्सा है।


 ----


 सभी घटकों का प्रतिनिधित्व रहेंगा


 आदिवासी, अनुसूचित जाति, महिलाएं आदि अब सहकार के दायरे में आएंगे। उनके विकास के लिए सहकार में सुधार करना आवश्यक था। सहकारी संस्थाए बुरी स्थिति में थीं। महाराष्ट्र में डेढ़ लाख सहकारी संस्थाए हैं. केन्द्र सरकार के स्तर पर कोई सहकारिता मंत्रालय नहीं था। लेकिन प्रधानमंत्री द्वारा सहकारिता मंत्रालय की स्थापना के साथ ही देश में विकास की धारा प्रवाहित हो गई। कई सहकारी संस्थाओ में चुनाव प्रक्रिया नहीं होती थी। गरीबों, किसानों, महिलाओं, अनुसूचित जाति आदि का प्रतिनिधित्व इससे बाहर रखा गया। लेकिन इस बिल में इन सभी बातों पर विचार किया गया है. सभी घटकोका अब इसमें प्रतिनिधित्व होगा ऐसा भी डॉ.अनिल बोंडे ने उल्लेख किया.


 ---


 स्वाहाकार संमाप्त होगा; पारदर्शिता, जनोन्मुख होगा काम


 इस बात पर भी विचार किया गया है कि जो व्यक्ति संस्था में भागीदार हैं, उनके साथ कोई अन्याय नहीं होगा. इस बिल में पांच बेहद अहम बातें शामिल की गई हैं. इससे सहकारी क्षेत्र में पूरी पारदर्शिता आएगी। चुनाव बोर्ड में दो सीटें महिलाओं के लिए और एक सीट अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के प्रतिनिधित्व के लिए आरक्षित की गई है। अगर छोटी सहकारी संस्था संकट में हैं तो सरकार उन्हें आर्थिक मदद देकर मजबूत करने की कोशिश करेगी, विधेयक में ऐसे उपाय भी हैं. जो सहकारी समितियाँ एक परिवार तक सीमित थीं, वे अब जनोन्मुख हो रही हैं क्योंकि उनमें समग्र वंचित वर्गों के लिए न्याय का प्रावधान शामिल है। सहकारिता आत्मनिर्भरता से समृद्धि की ओर बढ़ रही है। गरीब नागरिको को न्याय मिलेगा. सांसद डॉ. अनिल बोंडे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और सहकारिता मंत्री अमित शाह का स्वागत और अभिनंदन किया, क्योंकि ग्रामीण क्षेत्रों में इस विधेयक का व्यापक स्वागत हो रहा है।

हाडांच्या विकासाकरिता नाचणीचे फायदे*

 *हाडांच्या विकासाकरिता नाचणीचे फायदे*

*वजन कमी करण्यासाठी. नाचणी उपयुक्त*




रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी

लहान मुलांसाठी उपयुक्त.

त्वचेसाठी ठरते फायदेशीर

स्तनपानासाठी अधिक उपयुक्त

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जाणेही गरजेचे आहे. धान्याचे सेवन आपल्याला पोषण देण्यासह अनेक आजारांपासून आपले रक्षण करे. जेव्हा आपण धान्याचे नाव घेतो, तेव्हा नाचणी आणि नाचणीचे सत्व आपण नक्कीच महत्त्वाचे मानतो. नाचणीचे फायदे अनेक आहेत. नाचणीचे शरीरासाठी विविध फायदे होतात. हेच फायदे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी रागी अर्थात नाचणी म्हणजे काय हे जाणणे महत्त्वाचे आहे. रागी अर्थात नाचणी हे भारतासह आफ्रिकेच्याही विविध भागात उगवणारे एक धान्य आहे. भारतात कर्नाटक राज्यात याचे सर्वाधिक उत्पादन होते. यामध्ये अनेक पोषक तत्वे आपल्याला आढळतात. फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे रागी अर्थात नाचणीमधून शरीराला मिळतात.


 प्रमोद पाठक.


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/L5vopHeBNMLCK3kdueJtyT

Featured post

Lakshvedhi