Friday, 7 July 2023

महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सवविविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा होणार

 महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सवविविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा होणार


- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


 


            मुंबई, दि. 7 : देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. "महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव" ऑगस्ट ते नोव्हेंबर, 2023 याकाळात विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.


            आज महाराष्ट्र विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. मुख्य कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सवातील कार्यक्रमाची आखणी करण्यात येत असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


            सन १८६१ च्या इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार स्थापित कौन्सिल ऑफ द गव्हर्नर ऑफ बॉम्बे (Council of the Governor of Bombay) ची पहिली बैठक २२ जानेवारी, १८६२ रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम १९१९ अन्वये बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल (Bombay Legislative Council) ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत गव्हर्नर ऑफ बॉम्बे (Governor of Bombay) यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल (Council) चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. नारायण चंदावरकर हे परिषदेचे पहिले नामनिर्देशित सभापती होते. रावसाहेब एच.डी. देसाई हे निवडणुकीद्वारे उपसभापतीपदी निवडून आले. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. कोविड – १९ महामारीमुळे यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.


            ऑगस्ट ते नोव्हेंबर, २०२३ याकाळात विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांचा परिसंवाद, वरिष्ठ सभागृहाचे महत्व या विषयावर कार्यशाळा, विधानपरिषदेत मांडण्यात आलेली महत्वाची विधेयके, ठराव, प्रस्ताव यांचे पुस्तक स्वरुपात संकलन, शतकपूर्ती कालावधीतील महत्वाच्या घटनांवर आधारित "एक दृष्टिक्षेप" या पुस्तिकेचे प्रकाशन, असे विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


००००

राज्य निवडणूक आयोगाकडूननिवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

 राज्य निवडणूक आयोगाकडूननिवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही


            मुंबई, दि. 7 (रानिआ) : राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केले.


            श्री. मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघांच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी 1 जुलै 2023 ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना 5 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


            स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघांच्या अद्ययावत मतदार याद्या वापरण्यासाठीच वेळोवेळी कट ऑफ डेट निश्चित केली जाते आणि त्यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाते. यापूर्वीदेखील या स्वरूपाच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अधिसूचना म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नसतो. अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यास, पुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून

 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून 


            मुंबई, दि. 7 : राज्य विधिमंडळाचे सन 2023 चे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

            विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह विधानसभा सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, गिरीष महाजन, अशोक चव्हाण, उदय सामंत, अमिन पटेल, आशिष शेलार, नरहरी झिरवाळ, तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड.अनिल परब, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, विकास पोतनीस, कपिल पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघोले, विधानसभा सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती शैला ए., यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

            विधिमंडळाच्या शतकोतर प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ वाटचालीचे दस्ताऐवजीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सूचित केले. विधिमंडळाचा गौरवशाली इतिहास संदर्भग्रंथाच्या माध्यमातून जतन करण्याचे तसेच विविध परिसंवादाद्वारे विधिमंडळाच्या आजपर्यंतच्या कामकाजातून महत्त्वपूर्ण घटना, प्रसंगांना उजाळा देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याची उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सूचना मांडली.

             मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्याबाबत जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मांडलेल्या सूचनेवर अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी संमती दर्शवत ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. दिनांक 17 जुलै ते 4 ऑगस्ट या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस 15 असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे (शनिवार, रविवार) असणार आहेत.

००

आदिवासी क्रांतिकारकांवर अधिक संशोधन करण्याची गरज

 



आदिवासी क्रांतिकारकांवर अधिक संशोधन करण्याची गरज


- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


            मुंबई, दि. 7 :- मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या 'क्रांती गाथा' या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी बंकरमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.


            राष्ट्रपतींनी प्रथम राज्यातील तसेच देशातील आदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देऊन आदिवासी क्रांतिकारकांबाबत माहिती जाणून घेतली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जनजाती समाजाचे योगदान फार मोठे असून त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे, असा अभिप्राय राष्ट्रपतींनी यावेळी दिला.


            स्वातंत्र्यासाठी १८५७ पूर्वी देखील अनेक ठिकाणी छोटे मोठे लढे झाले होते. त्याविषयी देखील व्यापक संशोधन झाले पाहिजे, असे सांगून राजभवनातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला विद्यार्थी व युवकांनी भेट दिली पाहिजे, असे राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी सांगितले.         


            यावेळी राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी राष्ट्रपतींना राजभवनाच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासाची तसेच क्रांतिकारकांच्या दालनाची माहिती दिली. ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री 'उत्कल केसरी' डॉ. हरेकृष्ण महताब सन १९५५ - १९५६ या कालावधीत मुंबई राज्याचे राज्यपाल होते व ते राजभवन येथे राहिले होते, अशी माहिती श्री. काशीकर यांनी राष्ट्रपतींना दिली. ‘क्रांती गाथा’ संग्रहालयात विशेषकरून अज्ञात क्रांतिकारकांची माहिती देण्यात आली असून १८५७ ते १९४६ या काळातील महत्त्वाच्या घटनांना शिल्प व भित्तीचित्रांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. क्रांतिगाथा संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जून २०२२ मध्ये करण्यात आले होते. पहिल्या महायुद्धापूर्वी बांधण्यात आलेले भूमिगत बंकर सन २०१६ साली प्रकाशात आले होते.


            संग्रहालय भेटीनंतर राष्ट्रपतींनी विविध अभ्यागतांच्या व शिष्टमंडळांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर राष्ट्रपती श्रीमती मुर्मू शिर्डीला जाण्यासाठी विमानतळाकडे रवाना झाल्या.


**


President Murmu visits Raj Bhavan Museum of Revolutionaries


            Mumbai, 7th July : President of India Droupadi Murmu visited the Gallery of Revolutionaries created inside the British – era bunker at Maharashtra Raj Bhavan and paid her respects to the revolutionaries today. Maharashtra Governor Ramesh Bais accompanied the President during the visit.


      The President first visited the section on Tribal Revolutionaries of India. Mentioning that the tribal revolutionaries have made significant contributions to the freedom struggle, she expressed the need to do more research to highlight the work of various tribal revolutionaries.


      The President said that there were many armed revolutions against the British even before the first war of Independence in 1857. She expressed the need to conduct more research about the armed revolutions that had taken place in India much before 1857.


      The President offered floral tributes to the memorial of Chhatrapati Shivaji Maharaj created inside the bunker. The President remarked that students and youths should visit the museum to draw inspiration from the life of revolutionaries of the freedom movement.


      Raj Bhavan Public Relations Officer Umesh Kashikar briefed the President about the pre- Independence and post – Independence history of Raj Bhavan. The President was pleased to note that ‘Utkal Keshari’ Dr Harekrushna Mahatab had served as the Governor of the erstwhile Mumbai State during 1955-56 and had stayed in Maharashtra Raj Bhavan premises during that period.


      The Gallery of Revolutionaries is a tribute to the known and unknown revolutionaries of the Indian Freedom Movement. It was inaugurated by Prime Minister Naren

dra Modi in June 2022.


0000



 


अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवावे की भांड्यात?*

 *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

*अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवावे की भांड्यात?*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


आता घरोघरी प्रेशर कुकर आले आहेत. पण मला आठवते, २५ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरात प्रेशर कुकर आला तेव्हा माझ्या आजोबांनी, "छे ! प्रेशर कुकर मधल्या डाळ-भाताला काही चवच नसते!" असे म्हणून स्वत:साठी वेगळा भात आणि वरण करायला लावले होते. आजही काही लोकांना तसे वाटते.


आहारशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्याने त्यातील पोषक पदार्थाचा नाश होत नाही. प्रेशर कुकर मध्ये अन्न लवकर शिजत असल्याने अन्नावर उष्णतेचा परिणाम जास्त होत नाही व त्यातील जीवनसत्त्वे वगैरे टिकून राहतात. दाबाखाली पाणी उकळवल्यास पाण्याचा उत्कलनबिंदू कमी होतो व त्यामुळे पाणी लवकर उकळायला लागते व अन्न लवकर शिजते.


दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अन्न लवकर शिजत असल्याने इंधनही कमी लागते. आपल्या देशात कित्येक घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक करतात. प्रेशर कुकरच्या वापराने सरपण, कोळसा, रॉकेल वा गॅस या इंघनांचा वापर कमी होईल. यामुळे इंधनाची बचत तर होईलच, पण हवेचे प्रदूषणही कमी होईल. 


एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, ती म्हणजे काहीजण प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवून झाल्यानंतर कधीकधी उतू जाऊन खाली पडणारा भात, डाळ वगैरे फेकून देतात. भातावरचे वा डाळीवरचे पाणी काढून टाकतात. हे अत्यंत चुकीचे आहे. कारण या पाण्यात अमिनो आम्ले व जीवनसत्त्वे असतात.


हो एक सांगायचे राहिलेच! सुरुवातीला प्रेशर कुकरच्या भात-वरणाला नाक मुरडणाऱ्या आमच्या आजोबांना आज मात्र प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले भात-वरणच लागते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*


*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


जी-20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलन (आरआयआयजी)

 जी-20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलन (आरआयआयजी)


प्रतिनिधींचा आयआयटी मुंबई येथे अभ्यास दौरा


 


            मुंबई, दि. 6 : जी-20 संशोधन मंत्र्यांच्या बैठकीच्या (आरएमएम) कार्यक्रम पत्रिकेचा भाग म्हणून, संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलनाच्या (आरआयआयजी) प्रतिनिधींनी आज आयआयटी मुंबईचा अभ्यास दौरा केला.


            आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. एस. सुदर्शन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव (डीएसटी) डॉ. श्रीवरी चंद्रशेखर यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. प्रा. एस. सुदर्शन यांनी आयआयटीच्या कार्याचे सादरीकरण केले. प्रा. उपेंद्र भांडारकर यांनी संशोधन आणि विकास व्यवस्थेबद्दल आणि प्रा. असीम तिवारी यांनी आयआयटी मुंबईतील उद्योजकता आणि नवोन्मेषपूरक वातावरणाची माहिती दिली. तसेच या सर्वांनी नंतर, प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांना संस्थेतील संशोधन, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान उष्मायन आणि पायाभूत सुविधांबाबत माहिती देण्यात आली.


            आयआयटी मुंबईचे विविध विभाग आणि केंद्रांनी विकसित केलेल्या अभिनव संशोधन आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या विविध प्रदर्शन स्टॉललाही प्रतिनिधींनी भेट दिली

.


००००


 संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य


- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


प्रथम आगमनप्रसंगी राष्ट्रपतींचा शासनाच्या वतीने राजभवन येथे नागरी सत्कार


            मुंबई, दि. 6 : समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य आहे सांगून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची जाणीव राज्याकडून यापुढेही जपली जावी, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केली.


            राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील प्रथम आगमनानिमित्त द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुरुवारी राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.


            कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले, उद्योजक राजश्री बिर्ला आदी उपस्थित होते.


            आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, आर्थिक व सामाजिक विकासातील तसेच संगीत व लोककला क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, राज्यात झालेल्या उत्साहपूर्ण स्वागताने आपण भारावून गेलो आहोत. हा प्रदेश विविधतेने नटलेला आहे. येथे सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला आहे. नागपूर, पुणे, मुंबई येथे देशभरातील लोक वास्तव्यास येतात. त्यांचेही या देशाच्या विकासात योगदान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, देशाच्या आर्थिक विकासात या शहराचे मोठे योगदान आहे. साखर निर्यातीत जगात देशाचा दुसरा क्रमांक आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.


            राज्याला समृद्ध इतिहास आहे. निसर्गरम्य पर्यटन स्थळे हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. महान समाजसुधारकांचाही इतिहास या राज्याला आहे. संगीत कला क्षेत्रातही या राज्यातील कलाकारांचे मोठे योगदान आहे. लोककला, लोकनृत्य, चित्रपट यामुळे राज्याची एक वेगळी ओळख निर्माण होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य आपले शासन करीत आहे. यामुळे हे महान राष्ट्र आहे असे सांगून, राज्यातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी आशीर्वाद दिले.


स्वातंत्र्याच्या अमृत काळात द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती लाभणे भाग्य – राज्यपाल रमेश बैस


            द्रौपदी मुर्मू यांचा झारखंड राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याचे भाग्य आपणास लाभले असल्याचे राज्यपाल रमेश बैस म्हणाले. द्रौपदी मुर्मू राज्यपालांच्या परिषदेत करीत असलेल्या सूचना राष्ट्रपतींसह सर्वांकडून गांभीर्याने घेतल्या जात अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली.


            देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करीत असताना द्रौपदी मुर्मू यांसारखे साधे व निरलस व्यक्तिमत्व राष्ट्रपती म्हणून लाभणे हे देशाचे भाग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.    



 


आदिवासींच्या विकासासाठी शासन कार्यरत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचा सत्कार केला. यावेळी ते म्हणाले की, राज्याच्या भेटीसाठी आल्यावर आपण प्रथम नक्षलप्रभावीत अशा गडचिरोली भागात भेट दिली. यामुळे स्थानिकांना आणि सुरक्षा रक्षकांना ऊर्जा मिळाली आहे. नक्षलवाद संपवणे आणि रोजगार प्राप्त करून देऊन आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत आहे, ही भावना त्यांच्या मनात निर्माण होण्यास यामुळे मदत होणार आहे.


            शासन आदिवासी विकासासाठी अनेक योजना राबवित असून आदर्श आश्रमशाळा निर्मितीसाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण शून्यातून विश्व निर्माण केले असून शिक्षक ते राष्ट्रपती पदापर्यंतचा आपला प्रवास प्रेरणादायी आहे. सर्वसाधारण लोकांच्या प्रगती आणि विकासासाठी केंद्र शासनाच्यामदतीने लोकाभिमुख निर्णय घेण्यास प्राधान्य देत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.


राष्ट्रपती मुर्मू यांचे व्यक्त‍िमत्व प्रेरक आणि प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असून अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे व्यक्त‍िमत्व प्रेरक आणि प्रेरणादायी आहे. वंचित आदिवासी तसेच आदिम जनजातींप्रती त्या संवेदनशील आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते. मुर्मू यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले परंतु त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी कुटुंबात व एका लहानशा गावात जन्मलेली मुलगी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाची अध्यक्ष होणे हा लोकशाहीचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.


            सुरुवातीला राज्यपालांनी राष्ट्रपतींचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रपतींना गणेशाची व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. महाराष्ट्राची लोकसंस्कृती दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ स्नेहभोज आयोजित केले. स्नेहभोजनाला राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.


०००


अर्चना शंभरकर/श्रद्धा मेश्राम/विसंअ/


 


Civic Reception accorded to President Murmu on first visit to Maharashtra


Maharashtra Governor, CM, Dy CM host reception in honour of President Murmu


 


      President of India Droupadi Murmu was accorded a civic reception by Government of Maharashtra on her first visit to the State since becoming the President at Raj Bhavan Mumbai on Thursday (6 July).


      State Governor Ramesh Bais, Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis felicitated the President by presenting her an idol of Lord Ganesha and a bust of Chhatrapati Shivaji Maharaj. 


      The reception was attended by several ministers, former Chief ministers Sushil Kumar Shinde and Prithviraj Chavan, playback singer Asha Bhosle and director of Birla Group Rajashree Birla among others.


       The Governor also hosted a State dinner in honour of the President. A cultural programme was also organised on the occasion.


0000



 

Featured post

Lakshvedhi