Thursday, 6 July 2023

रात्रीचे जागरण करणे टाळा* ( भाग - ०२ )

 *🔸 रात्रीचे जागरण करणे टाळा*

( भाग - ०२ )


पहिल्या भागात आपण बघितले की रात्रीचे जागरण केल्याने शरीरात आप महाभूत न्यून होऊन कोरडेपणा वाढतो आणि अग्नी एकदम भडकतो. त्यामुळे आपण खाल्लेले अन्न करपून आंबट ढेकरा येतात ह्यालाच पित्त म्हणतात. परिणामी उष्णता जाणवणे , शरीर शिथिल पडणे , थकवा येणे , पित्ताच्या गांधी / पुळ्या येणे असे विविध आजार होऊ शकतात. आता पुढचा भाग पाहूया.


.....शरीरातील आप महाभूत न्यून झाल्याने मलातील पाण्याचा अंशही न्यून होतो त्यामुळे त्याचे पुढे सरकणे मंदावते. मला शुष्क झाला तर तो तिथेच थबकतो आणि ' बद्धकोष्ठता ' निर्माण होते. मल थबकून राहिल्याने वाताच्या मार्गात अडथळा येतो आणि तो उलट फिरतो. असा उलट फिरलेला वायू पोटात गेला , तर तेथे पचन होत असलेले , म्हणजे अग्नीने युक्त असे अन्न वरच्या दिशेने ढकलू लागतो. यामुळे छातीत किंवा घशात जळजळ होते. वायू पोटात घुटमळत राहिला तर पोटात दुखू लागते , वायू हृदयात गेला तर हृदयाचे विकार , फुफ्फुसात गेला तर दमा किंवा खोकला ह्यासारखे श्वसनसंस्थेचे विकार , डोळ्यात गेला तर डोळ्यांचे विकार , डोक्यात गेला तर डोकेदुखी किंवा डोक्याच्या रक्तवाहिन्यांत जाऊन त्यामुळे तेथील एखादी रक्तवाहिनी फुटली , तर मेंदूत रक्तस्त्राव होऊन पक्षाघात ह्यासारखे विकार होऊ शकतात.


प्रतिदिनचे जागरण हे अशाप्रकारे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. जोपर्यंत जागरण बंद करत नाही , तोपर्यंत कारण चालूच रहात असल्यामुळे हे रोग बरे होत नाहीत. तरुणपणी किंवा शरीरबळ चांगले असेपर्यंत जागरण पाचून जाते ; परंतु सातत्याने असे होत राहिले तर शरीरबल क्षीण होऊन अनेक विकार उद्भवतात. यामुळे रात्री जागरण करणे टाळावे.


© आयुर्वेद




बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होणार आयटी प्रोफेशनलटेक-बी प्रोग्रामसाठी 38 हजारांहून अधिक नोंदणी

 बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होणार आयटी प्रोफेशनलटेक-बी प्रोग्रामसाठी 38 हजारांहून अधिक नोंदणी


 


            मुंबई दि. 6 : आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीसोबत महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (MYLAP) राबविला जात आहे. एचसीएल टेक कंपनीच्या ‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमांतर्गत 38 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 20 हजार विद्यार्थ्यांना स:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


            ‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमांतर्गत बारावी गणित विषय असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सहा महिने सःशुल्क प्रशिक्षण व सहा महिने लाइव्ह प्रोजेक्टस् वर काम करण्याची संधी मिळणार आहे. या सहा महिन्यांच्या आंतरवासिता कालावधीमध्ये दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता (स्टायपेंड) मिळेल. एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी प्रोफेशनल म्हणून पूर्णवेळ नोकरी, पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठीचेही नियोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांचे बिटस् पिलानी, शास्त्रा, ॲमिटी, आयआयएम-नागपूर व केएल अशा नामवंत विद्यापीठांमधूनच उच्च शिक्षण पूर्ण केले जाईल. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशीप स्वरूपात देणार आहे.


            अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नांदेड व पुणे येथील समग्र शिक्षा अभियान व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या मार्गदर्शन व नोंदणी कार्यशाळेमध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक व इतर ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.


            या उपक्रमासाठी सन 2023 मध्ये बारावी विज्ञान शाखेमधून किमान 60 टक्के व गणित विषयात 60 गुण मिळविलेले विद्यार्थी www.hcltechbee.com या संकेतस्थळावर निःशुल्क नोंदणी करू शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 7020637271 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘समग्र शिक्षा’चे राज्य प्रकल्प समन्वयक समीर सावंत यांनी केले आहे.


0000

ब्राम्हमुहूर्तावर उठल्याने होणारे लाभ*

 *🔸 ब्राम्हमुहूर्तावर उठल्याने होणारे लाभ*


ब्राम्हमुहूर्त रात्री २ ते ६ या वेळेत , म्हणजे वाताच्या काळात येतो आणि त्या वेळेत वात सर्वाधिक बलवान असतो. त्यामुळे या काळात उठल्यास मल-मुत्रांचे उत्सर्जन आपसुख होते; कारण उत्सर्जनासाठी गती आवश्यक असते आणि ती वातामुळेच प्राप्त होते. ब्राम्हमुहूर्त हा ऋषींच्या साधनेचा काळ आहे. त्यामुळे या काळात उठल्यास वातावरणातील सात्विकतेचाही लाभ होतो.


🔸 उशिरा उठण्याने होणारी हानी


ब्राम्हमुहूर्तानंतर कफाचा काळ चालू होतो. कफ गतिमान अशा वाताच्या विरुद्ध गुणधर्माचा, म्हणजे स्थिर आहे. उशिरा उठल्यामुळे मल-मुत्रांचे उत्सर्जन होण्यास वाताची गती मिळत नाही. मग ही गती निर्माण करण्यासाठी चहा ,कॉफी किंवा गरम पाणी प्यावे लागते. यामुळे पुन्हा अजीर्ण ( अपचन ) होते. मलाचे योग्य रीतीने उत्सर्जन न झाल्याने अग्नीवर परिणाम होतो. यामुळे आरोग्य बिघडते. उशिरा उठणे आणि दिवसभर झोपणे या कारणांमुळे अनेक लठ्ठ व्यक्तींना वजन न्यून होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करूनही यश येत नाही.




मुंबई शहराच्या विकासासाठी 365 कोटींच्या विकास आराखड्यातील कामांना जिल्हा नियोजन

 मुंबई शहराच्या विकासासाठी 365 कोटींच्या विकास आराखड्यातील कामांना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी


शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावित


                                                                                         - पालकमंत्री दीपक केसरकर


 


               मुंबई, दि. ६ : मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना 2023-24 च्या माध्यमातून 365 कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्प‍ित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावित, असे निर्देश शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.


            या अर्थसंकल्प‍ित झालेल्या निधी अंतर्गत संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या कामांना पालकमंत्री श्री केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सर्व संबंधित सदस्य, विशेष निमंत्रित तसेच उपस्थित अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती मान्यता दिली. या कामांची निकड व गरज लक्षात घेऊन प्राधान्याने प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी संबंधित विभागांना व यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना या बैठकीमध्ये त्यांनी दिल्या.


            मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक कफ परेड कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे काल आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अजय चौधरी, आमदार अमीन पटेल, आमदार सदा सरवणकर, आमदार सचिन अहीर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार ॲड. मनीषा कायंदे, आमदार यामिनी जाधव, आमदार सुनील शिंदे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुपेकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबई शहरातील 'म्हाडा' आणि इतर वसाहतींच्या इमारतींमध्ये वास्तव्यास असणारा मूळ मुंबईकर कुठल्याही परिस्थितीत मुंबईच्या बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेत मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावित. तसेच मुंबई शहरात अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावित. ज्या भागात अवैध व्यवसाय आढळून येतील त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मुंबई शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसोबत करार करण्यात आला असून त्यांचीही मदत घेण्यात येत आहे.


            मुंबई शहरातील त्या- त्या भागातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी केंद्र (फूड कोर्ट) तसेच फूड ऑन व्ह‍िल कार्यान्वित करावे. या केंद्रांसाठी जागा निश्चित करावी. घनकचरा व्यवस्थापन, बाजारपेठांचे अद्ययावतीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक केंद्र सुरू करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने आराखडा तयार करावा. या कामाला प्राधान्य देऊन अभियानस्तरावर काम पूर्ण करावे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी 'रिड महाराष्ट्र' योजना प्राधान्याने राबविण्यात यावी व यासाठीचा प्रस्ताव बृहन्मुंबई महापालिकेने तातडीने सादर करावा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्यात.


             मुंबईच्या वैभवात भर घालण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सौंदर्यीकरण आणि पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी आराखडा सादर करावा. मत्सालय उभारणीसाठी प्राधान्य द्यावे. अनुसूचित जातीच्या वसाहतीत ग्रंथालये आणि वाचनालये सुरू करावीत, असे सांगत मुंबई शहरातील प्रत्येक प्रभागात क्रीडा संकुलाची निर्मितीचा निर्णय या बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जाहीर केला.


            बृहन्मुंबई महापालिकेने मुंबादेवी विकास विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या असून त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जे. जे. फ्लायओवर व ब्रिजचे सौंदर्यकरण व सुशोभीकरण करण्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा 50 टक्के निधी व बृहन्मुंबई महापालिकेचा 50 टक्के निधी उपलब्ध करून द्यावा अशा सूचना पालकमंत्री श्री केसरकर यांनी केल्या. शहरात शिशुवर्ग सुरू करावेत. अंगणवाड्यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधून जागा उपलब्ध करून द्यावी, अशाही सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी दिल्यात. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी जिल्हा नियोजन समितीचा आराखडा, आतापर्यंत झालेला खर्च आणि निधी विनियोगाचे केलेले नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली.


            काल मंजूर झालेल्या विकास आराखड्यात नागरी दलित वस्त्यांमध्ये सुधारणांसाठी १३२ कोटी रुपये, पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता ३० कोटी, पोलिस वसाहतीत पायाभूत सोयीसुविधांसाठी ३० कोटी, शासकीय कार्यालयीन इमारतींची देखभाल, दुरुस्ती व सोयीसुविधांसाठी २७ कोटी, झोपडपट्टी वासीयांचे स्थलांतर व पुनर्वसनासाठी २६.९० कोटी, शासकीय महाविद्यालयांच्या विकासासाठी १५ कोटी, नावीन्यपूर्ण योजनांसाठी १२ कोटी, रुग्णालयांसाठी औषधे, साहित्य व साधनसामग्रीच्या खरेदीसाठी १० कोटी, गड, किल्ले, मंदिर व महत्त्वाच्या संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी ८ कोटी रुपये, रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी २० कोटी, रुग्णालयातील यंत्रसामग्रीसाठी १८ कोटी, लहान मच्छिमार बंदरांच्या विकासासाठी १० कोटी, महिला सबलीकरण व बालकांच्या विकासासाठी ५ कोटी ६५ लाख रुपये, व्यायाम शाळांच्या विकासासाठी 3 कोटी रुपये, यांसह विविध विकासकामांच्या प्रस्तावांना पालकमंत्री श्री केसरकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली.


            यावेळी अनुसूचित जाती योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेचाही सविस्तर आढावा घेवून निधी मंजूर करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


 


०००००

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज २ दिवसांच्या भेटीसाठी मुंबई

 स्वागत

            मुंबई, दि. 6 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज २ दिवसांच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचे राजभवन येथे स्वागत केले. 


            तत्पूर्वी राष्ट्रपतींचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. आगमनानंतर लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिन्ही सैन्यदलांतर्फे मानवंदना देण्यात आली.


            राष्ट्रपती आज दुपारी सिद्धिविनायक मंदिराला भेट देणार असून संध्याकाळी ६.४५ वाजता राज्य शासनातर्फे त्यांचा राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.


            दि. 7 जुलै रोजी राष्ट्रपती राजभवनातील 'क्रान्तिगाथा' या ब्रिटिशकालीन भूमिगत बंकरमध्ये तयार करण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देणार असून त्यानंतर त्या शिर्डीकडे रवाना होणार आहेत.


००००


President of India arrives in Raj Bhavan; welcomed by Governor, CM, Dy CM


 


      Mumbai, 6th July : President of India Droupadi Murmu was welcomed on her arrival at Raj Bhavan Mumbai by Governor Ramesh Bais, Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis on Thursday (6 July).


      Earlier, the President of India arrived at the CSMI airport in Mumbai . The President was welcomed by Maharashtra Governor Ramesh Bais, Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis. A Guard of Honour was presented to the President by the Armed Forces.


      The President will be visiting the Siddhivinayak Mandir in the afternoon. A civic reception has been organised by the Government of Maharashtra in honour of the President at Raj Bhavan at 6.45 pm. The President will visit 'Kranti Gatha: Underground The Gallery of Revolutionaries' created inside the British - era Bunker at Raj Bhavan on Friday morning. The President will visit the Shirdi Sai Baba Temple in the afternoon from where she

 will depart.


0000


: निवांत क्षणी ऐका खुप छान हिडीओ आहे मनाला भुरळ घालतो....*😊

 


: *निवांत क्षणी ऐका खुप छान हिडीओ आहे मनाला भुरळ घालतो....*😊

: भरवुन गेले मी सुध्दा, समाजात दुष्ट माणसं असलीतरी सद्विवेक असणारे देवदूत पण आहेत

मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठीशिक्षणाची भूमिका महत्त्वाची

 मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठीशिक्षणाची भूमिका महत्त्वाची


- राष्ट्रपती मुर्मू


गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण


 


            गडचिरोली, दि. 5 : देशातील मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले.  


            गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आदी यावेळी उपस्थित होते.


            राष्ट्रपती श्रीमती मुर्मू पुढे म्हणाल्या की, गोंडवाना विद्यापीठाच्या अथक परिश्रमातून स्थानिक आदिवासी, मागास घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे. अतिशय कमी खर्चात उपलब्ध झालेल्या उपयुक्त शिक्षणातून या ठिकाणी विद्यार्थी घडत आहेत. या विद्यापीठात चांगल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्याचा लाभ येथील पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती व परंपरा जपण्यासाठी होईल.


             या भागातील अनेक आदिवासी समूह राष्ट्रपती भवनात आपणास भेटण्यासाठी येत असल्याचे सांगून राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, या घटकांकडून संपूर्ण देशाला शिकण्यासारखे बरेच काही आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून स्थानिक विकासाला चांगली चालना दिली आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपले प्रयत्न व जिद्द कायम ठेवावी. गोंडवाना विद्यापीठाचे नाव जागतिकस्तरावर जाईल याची मला खात्री आहे.


            गोंडवाना विद्यापीठाची ओळख एक परिपूर्ण आदिवासी विद्यापीठ व्हावी, अशी इच्छा व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले की, विद्यापीठासाठी 170 एकर क्षेत्रावर येत्या काळात 1500 कोटी रुपये खर्च करून विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. विद्यापीठाने गेल्या 12 वर्षात चांगली प्रगती केली आहे. 39 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे. महाविद्यालय बाह्य असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.


            केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, गडचिरोली जिल्हा मागास, दुर्गम आहे. याचे कारण पायाभूत सुविधांचा अभाव होता. मात्र आता रस्ते, उद्योग, शिक्षण, आरोग्य आदी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री व वनमंत्री यांनी या जिल्ह्यासाठी अनेक कामे मंजूर केली आहेत. रेल्वे, विमानतळ, लोहप्रकल्प यामुळे येथे गुंतवणूक वाढणार आहे. या सर्व प्रक्रियेत गोंडवाना विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत कार्यक्रमासाठी येथे येऊन राष्ट्रपती महोदयांनी गडचिरोली जिल्ह्याचा सन्मान वाढविला आहे. गडचिरोली जिल्हा हा जल, जंगल, जमीन आणि खनिज संपत्तीने समृद्ध आहे. या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारचे लोहखनिज असून 20 हजार कोटींची गुंतवणूक येथे होत आहे. या जिल्ह्याच्या विकासात गोंडवाना विद्यापीठाचेही योगदान महत्त्वाचे आहे. राज्य सरकार विद्यापीठासाठी जमीन तसेच निधीची कमतरता कधीही पडू देणार नाही. गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ, रेल्वे आदी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून येथे रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्याची आदिवासी संस्कृती ही आपला एक समृद्ध वारसा आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून या संस्कृतीचे जतन होऊन ती आणखी विकसित होईल. या जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळ संपुष्टात येत आहे. येथील नागरिक आता मुख्य प्रवाहात येऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावत आहे, असेही ते म्हणाले.


            प्रारंभी राज्यपाल श्री. बैस यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.


राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक व आचार्य पदवी प्रदान


            राष्ट्रपतींच्या हस्ते अमित रामरतन गोहने (मानव विज्ञान विद्याशाखा), अर्पिता पुरुषोत्तम ठोंबरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा), लोकेश श्रीराम हलामी व सदाफ नफीस अहमद अन्सारी (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा), संतोष प्रकाश शिंदे (आंतर विज्ञान विद्याशाखा) यांना सुवर्णपदक, तर सारिका बाबूराव मंथनवार यांना शिक्षणशास्त्र या विषयात आचार्य पदवी प्रदान करण्या

त आली.


००००



 


Featured post

Lakshvedhi