Sunday, 30 April 2023

लाल तांदूळ....👇 आरोग्यदायी


 *लाल तांदूळ....👇*रात्या तांदुळ (लाल तांदुळ) विकणे आहे..!
100/- रूपये प्रति किलो.
डायबिटीस, कॅन्सर इ. आजारांवर उपयुक्त..!
ईच्छुक ग्राहकांनी संर्पक साधावा :- 8975932044


   तांदूळ जगभरातील बरेच लोक खातात, आपल्या देशाच्या विशालतेत पांढरा पाॅलिश केलेला तांदूळ विशेषत: लोकप्रिय आहे,पण लाल तांदूळ हा दर्शनार्थि

 अप्रिय असला तरी, त्यांचे गुणधर्म अफाट आहे. लाल तांदळात ग्रुप बी चे अनेक जीवनसत्वे असतात. त्यामुळे नखे, केस, आणि त्वचा निरोगी राहते. तसेच हे धान्य मौल्यवान खनिजे सम्रुद्ध आहे. आयोडिन, फाॅस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

.........यात असलेले मॅग्नेशियम मायग्रेन व दमा विरूद्ध लढायला तयार करते. व मज्जासंस्था मजबूत होते. ह्रुदयविकार, हार्टअटक येत नाही, कॅल्शियम सह हा पदार्थ हाडांना मजबूत करतो.आॅस्टिओपोरोसिस व आर्थस्ट्रिसिसच्या विकासाला प्रतिबंध करतो.

             लाल तांदळाच्या कवचात असलेलं पोटॅशियम सांध्यातील मीठ काढून टाकण्यास मदत करते. आणि त्यांच्यातील वेदना, जळजळ कमी होते.. हे धान्य एक शक्तिशाली अॅंटिआॅक्सिडंट आहे. आपण नियमितपणे याचा वापर केल्यास शरीरात कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात, विशेषतः कोलन व स्तनाचा कर्करोग,) पॅरासिनाईडस्, या प्रकारचे तांदूळ एक वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग देतात. सुरकुत्या कमी होतात.

       लाल तांदुळ अतिशय पौष्टिक आहे, खुप सहज पचते, व शरिरावर भार टाकत नाही.हा तांदूळ मधुमेह रुग्णांना खूपच फायदेशीर आहे. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कोलायटिस असलेल्या व्यक्तीला फायदेशीर आहे. कारण हा पचायला हलका आहार आहे..


               


  लाल तांदळात कोलेस्टेरॉल कमी करण्याचि क्षमता आहे,. तसेच फायबर अधिक प्रमाणात असते त्यामुळे स्थूलता कमी होते, वजन नियंत्रणात राहते, व भात खाल्ल्याचे समाधान मिळतं., पोटातली जळजळ कमी होते, अॅसिडिटि समूळ नष्ट होते. यात असलेल्या.. cardiovascular diseasesचा धोका कमी होतो...serotonin आणि लाल रक्त पेशिंच्या वाढिसाठि आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी६ यात असतं. Dnaच्या निर्मितीसाठी मदत होते..

       हार्मोन्स असंतुलन दूर होतं, उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो, बाळंतिणीला दूध येतं याच्या सेवनाने.

मुत्रपिंडाचा विकार असणाऱ्यांनी लाल तांदळाचा भात नियमित पणे घेतल्यास आराम मिळतो.वर नमूद केल्याप्रमाणे हे धान्य खरोखरच बी व्हिटामिन चे स्टोअरहाउस आहे. तेव्हा हा तांदूळ जरी दिसायला फारसा चांगला नसला तरी गुणधर्म बघता, तुम्ही रोज तुमच्या आहारात समावेश करावा. व निरोगी राहावे...


 सुनिता सहस्रबुदे.

व्यायाम व्यायाम हे, आनंद का नाम है

 *😨😱🥱 अदभुत.........अद्भुत ऐसी रंगोली जो इंसान के तन से बनी हो ऐसी रंगोली आपने कभी नहीं देखी होगी पूरी वीडियो देखें और आनंद लें.......👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻*


अस्वस्थ करणारे गॅसेस आणि आयुर्वेद उपचार

 अस्वस्थ करणारे गॅसेस आणि आयुर्वेद उपचार

डॉ. आनंद ओक 

पोट जाड वाटू लागणे, पोटाचा आकार वाढणे, पोट गच्च होणे, किंवा तडस लागल्याप्रमाणे चढणीला लागणे, ढेकर येणे, गुद्द्वारावारे गॅस सरकणे सामान्यपणे वरील तक्रारी कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकास जाणवतातच. काहींना पोटात दुखते, छातीत दुखते, श्‍वास घेण्यास त्रास वाटतो, अस्वस्थ वाटू लागते. काय आहे हा त्रास? क्षु ल्लक स्वरूपाचे असूनही वारंवार उद्भवल्यास मात्र माणसाचे स्वास्थ पूर्णपणे बिघडवू शकतात. अशा तक्रारीपैंकी एक तक्रार म्हणजे पोटातील गॅसेस! ‘पोटात वायू धरणे’ असेही संबोधन यास वापरले जाते.


प्रत्येकाला कधी ना कधी तरी ही तक्रार झालेली असते. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरी उपचार करावे लागतातच असेही नाही. तरी देखील चौघात बसणे अशक्य करणार्‍या, मनस्वास्थ्य बिघडविणार्‍या या तक्रारीची शास्त्रीय माहिती प्रत्येकास असणे महत्त्वाचे वाटते. गॅसेस उत्पन्‍न होण्याची कारणे ः वास्तविक अन्‍नाचे पचन होत असताना अल्प प्रमाणात गॅस प्रत्येकातच उत्पन्‍न होत असतात; पण पचन क्रिया व्यवस्थित असल्यास ते आपोआप जीरूनही जातात. परंतु, पाचक शक्‍ती म्हणजेच पाचकस्रावांचे प्रमाण कमी असल्यास किंवा आतड्याच्या हालचालीस कोणत्याही कारणाने बाधा आल्यास गॅसेसचा त्रास सुरू होतो. पोटातील विविध अवयवांच्या वेगवेगळ्या आजारांमुळे पाचकरस व जठराची आतड्यांची हालचाल बिघडत असते. व गॅसेस उत्पन्‍न होत असतात. 


जठराचा दाह/सूज (गॅस्टायटीस) आतड्याचा दाह (कोलायटीस), अमिबियासीस, पित्त वाढणे हे विकार सामान्यपणे गॅसेसचा त्रास उत्पन्‍न करतात तर काही वेळा पित्तशयाची सूज, पित्तशयातील खडा, मूतखडा हे विकारही गॅसेस उत्पन्‍न करतात. बद्धकोष्ठता किंवा संडास साफ न होणे यामुळे गॅसेस वाढतात. वार्धक्यामुळे आतड्यांची शक्‍ती कमी झाल्याने हालचाल मंद असते. त्यामुळे गॅसेस उत्पन्‍न होतात. लहान बालकात आतड्याची शक्‍ती पुरेशी वाढलेली नसल्यामुळे गॅसेसचा त्रास होतो. 


वरील कारणांबरोबरच गॅसेस उत्पन्‍न करणारे पदार्थ जास्त किंवा वारंवार खाण्यात आल्याने गॅसेस होतात. तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे, कोणताही व्यायाम न करणे व सतत खाणे यामुळे गॅसेस उत्पन्‍न होतात. काही रुग्णांत मानसिक ताण काढल्यानंतर गॅसेसचा त्रास वाढल्याचेही वाढल्याचेही आढळते. अचानक झालेला पिण्याच्या पाण्यातील बदल अथवा अशुध्द पाणी पिण्यात आल्यानेही गॅसेसचा त्रास होतो. 

गॅसेस जास्त वाढविणारे पदार्थ ः बटाटा, शाबुदाणा, अंडी, मांसाहार, अतिप्रमाणात भात, पुरणपोळी, इडली, ढोकळा, उत्ताप्पा, भेळ, ब्रेड, उसळी, (कडधान्ये), इत्यादी पदार्थ गॅसेसचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. तसेच अतिप्रमाणात वारंवार काहीही खात राहणे व व्यायाम व फिरणे न करणे यामुळे सर्वच पदार्थांनी गॅसेस वाढतात. यामुळेच गॅसेसचा त्रास असणार्‍यांनी वरील पदार्थ नेेहमी टाळणे महत्त्वाचे असते.


4) गॅसेसची लक्षणे ः 


पोट जाड वाटू लागणे, पोटाचा आकार वाढणे, पोट गच्च होणे, किंवा तडस लागल्याप्रमाणे चढणीला लागणे, ढेकर येणे, तेवढ्यापुरते बरे वाटणे, गुद्द्वारावारे गॅस सरकणे सामान्यपणे वरील तक्रारी कमी अधिक प्रमाणात प्रत्येकास जाणवतातच. काहींना मात्र पोटात दुखू लागते, छातीत दुखते, श्‍वास घेण्यास त्रास वाटतो, छातीत चमका येतात, अस्वस्थ वाटू लागते. दरम्यान हृदयविकारात अशीच लक्षणे उत्पन्‍न होत असल्याचे पाहीलेले किंवा वाचलेले, ऐकलेले असते. त्यामुळे “हे हार्टचे दुखणे तर नाही ना?” अशी शंका मनात उत्पन्‍न होते. आणि एकदा अशी शंका उत्पन्‍न झाल्यावर “चिंते” मुळे छातीत धडधडू लागते. श्‍वास घेण्यास घेण्यास अधिकच त्रास वाटू लागतो, घाम येतो. मग डॉक्टरकडे नेल्यावर इ सी जी काढला जातो; पण तो ‘पूर्णपणे’ नॉर्मल असल्याचे कळते. गॅसेसचे औषध घेतल्यावर झटक्यात बरे वाटते. पण ‘शुल्लक वाटणारे गॅसेलसचे दुखणे मनात “भीती” मात्र निर्माण ठेवते. काहीजणात पाठीत दुखणे, कंबर दुखणे, डोके दुखणे या तक्रारी जाणवतात. 


5) गॅसेसचे दुष्परिणाम ः 


जडत्व, कोणतेही काम नकोसे वाटणे, मरगळ, निरुत्साहीपणा, कार्यक्षमता कमी होणे, पचन कमी झाल्यामुळे पोषकांश कमी मिळतात. सततचे गॅसेस दुर्लक्षित राहिल्यास त्याचा तब्येतीवरही परिणाम होतो. 


6) गॅसेसवरील उपचार ः


गॅसेसचा त्रास सुरू झाल्यावर अनेकजण जाहिरातीमधून कळलेल्या विविध औषधे तात्पुरती घेत असतात. गॅसेस सरकवण्याची क्रिया या औषधांनी झाल्यामुळे तात्पुरता आरामही मिळतो. पण “आपल्याला गॅसेस कोणत्या कारणांनी उत्पन्न होत आहेत? हे कळणे महत्त्वाचे असते. ते कारण दूर होणे गरजेचे असते. त्यामुळे गॅसेसचा त्रास झाल्यावर तज्ज्ञ डॉक्टरला दाखवून या कारणांचा शोध घेऊन त्या कारणाबरहूकूम उपचार करावे लागतात. 


वनस्पती औषधांपैकी सुंठ, मिरी, पिंपळी, हिंग, शेंदेलोण, पांदेलोण, जिरे, लसून, चिंचाक्षार, यवक्षार, सज्जीक्षार, लिंबू रस, शंखभस्म इत्यादी घटकांच्या सुंयक्‍त कल्पाचा रुग्णाच्या प्रकृतीनुसार वापर केला जातो. गॅसेस कमी करणारी ही औषधे अग्‍निमांद्य दूर करून पचनशक्‍ती देखील वाढवितात. या उपचारांच्या जोडीलाच क्षार किंवा लवणयुक्‍त तीळ तैल रोज रात्री 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने पोटाला लावावे व लगेच 10 मिनिटे पोट शेकावे. यामुळे उत्तमप्रकारे वातशमन होते. तसेच पोटातील स्नायुंची शक्‍ती वाढून आतड्याची गती सुधारते. काही वेळा गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात असल्यास मात्र, बस्तीचाही उपयोग करावा लागतो. तसेच गॅसेसचे कारण म्हणून सांगितलेल्या मूळ विकारांचे म्हणजे आतड्याची सूज इत्यादींचे उत्तम उपचार आयुर्वेदिक औषधांनी होतात. त्यामुळे गॅसेसवरील उपचाराबरोबरच मूळ विकाराचे देखील आयुर्वेदिक उपचार घ्यावेत.



Saturday, 29 April 2023

संसारातील गोडी सखरेविना थोडी.

 *#चिमुटभर_गोडी* ....*


" भाजीत चिमूटभर साखर घाल गं म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते " 


 स्वयंपाक करताना आजी म्हणायची भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते 

 मला नवल वाटतं आजीवर्गाचं 

त्यांना बरोबर माहित असायचं कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते 

पूर्वी घरोघरी कर्ता पुरूष म्हणजे करारी ,थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा.


 कुणाचं कश्यावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ," हो हो बरोबर आहे तुमचं" म्हणून होणारा वाद टाळायची नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची . 


चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो असं म्हणायची. 

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही.


 सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल ,चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो असं आई पण म्हणायची . 

म्हणूनच त्यांचे संसार विना कलह झाले.


कामवाल्या बाई बाबतही असच तिने कधी दांडी मारली ,कधी उशीरा आली तरी ती पण एक संसारी बाई आहे ,आपल्यापेक्षा तिला आव्हानं असतात जास्त मग अश्यावेळेस 

 का गं आज उशीर झाला ? बरी आहेस ना ?काळजी घे गं बाई.


चल दोन घास खाऊन घे म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहिल 

थोडी माणूसकी खूप मोठं काम करते . 


थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात.


आजी नेहमी म्हणायची आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण . 


एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं.


आताची सतत 

अरे ला कारे 

करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं .


*ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.*


थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू शकतो .😊👍✌️

अल्पसंख्याकांसाठीच्या कर्ज योजनांची परतफेडप्रक्रिया

 अल्पसंख्याकांसाठीच्या कर्ज योजनांची परतफेडप्रक्रिया आता अधिक सुलभऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर.

            मुंबई, दि. 29 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत (NMDFC) कर्ज स्वरुपात व राज्य शासनामार्फत भागभांडवल स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळाच्या या योजनांमधील कर्ज परतफेडीसाठी आता ऑनलाईन सेवा विकसित करण्यात आली असून त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.


            महामंडळाच्या कर्ज वसुलीसाठी आतापर्यंत लाभार्थ्याकडून आगाऊ दिनांकित धनादेश घेण्यात येत होते. महामंडळामार्फत आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्टेट बँक कलेक्ट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड सहजरित्या व सुलभपणे करणे लाभार्थ्यांना शक्य झाले आहे. कुठूनही ऑनलाईन पध्दतीने कर्जाच्या हप्त्याची परतफेड करणे शक्य झाले आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्याची पावती देखील ऑनलाईन पध्दतीनेच त्वरित लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.


      महामंडळामार्फत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी State Bank Collect प्रणालीला प्राधान्य देऊन त्याद्वारेच कर्जाची परतफेड करण्यात यावी, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्याना केले आहे

1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार

  

1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार


                                                 -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. २९: राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

            सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत.


            रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले.


            ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


            सांस्कृतिक कार्य विभागाने प्रस्तावित केल्यानुसार भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत. त्यासाठी दिल्ली, दमण दिव, तंजावर, अंदमान, बेळगाव, बडोदा, श्रीशैलम, उदयपूर, भोपाळ, दार्जिलिंग, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, पानिपत, भुवनेश्वर, लडाख, विजयपुरा, पाटणा, अमृतसर, पणजी ही ठिकाणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.


            शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होऊन त्या घटनेचे महत्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जनांसाठी ही महत्वाची घटना आहे. यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने त्याचे आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.


            सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात येणार त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा कुठलीही अडचण येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सोहळ्याच्या दिवशी शिभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सोहळ्याच्या समग्र नियोजनासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गडावर संबंधित लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.




संगणक टंकलेखन लघुळेखं संचलन नियम


 

Featured post

Lakshvedhi