Wednesday, 5 April 2023

अनेक रोगांवर रामबाण उपाय - "तुळशीची पानं" !!*

 *अनेक रोगांवर रामबाण उपाय - "तुळशीची पानं" !!* 


तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळस लावली जाते. तिची पूजा केली जाते. तुळशीचे रोप फायदेशीर मानले जाते.


आयुर्वेदात तुळशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुळशीचा वापर करून अनेक लहान-मोठे आजार बरे करता येतात. आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल, अँटी फंगल असे गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. तुळशीची पाने पोटासाठी गुणकारी असतात. पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्या असतील तर त्या तुळशीमुळे दूर करता येतात. तुळशीची पाने देखील पीएच पातळी राखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुळशीची पानं अनेक रोगांवर कशी गुणकारी आहेत हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया तुळशीचे फायदे...


*थंडीपासून संरक्षण :* 


तुळशीची पाने हिवाळ्याच्या त्रासापासून वाचवू शकतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होणार नाहीत. घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.


*हृदयाचे आरोग्य राखणे :* 


तुळशीच्या पानांना हृदयाच्या आरोग्याचा खजिना म्हटले जाते, मग तेही कमी नाही. रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. आणि हृदय नेहमी सुरक्षित राहते. तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखे आजार दूर राहतात.


*पोटाच्या समस्या दूर होतील :* 


रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर राहतील. पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाची सूजही कमी होते. इतकंच नाही तर ही पाने तुम्हाला ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, आंबट ढेकर यांसारख्या समस्यांपासूनही आराम देतात.


*त्वचेची काळजी घ्या :* 


रोज सकाळी तुळशीची पाने चघळल्याने त्वचा तजेलदार होते. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म त्वचेत खोलवर जाऊन ते स्वच्छ करतात. मुरुम देखील येणं बंद होतं.


*दुर्गंधीपासून मुक्त होणे :* 


श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने नियमित घ्या. यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी कमी करतात.


*कर्करोग टाळण्यास मदत होते :* 


तुळशीची पाने कॅन्सरसारख्या भयंकर रोगापासून बचाव करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची चार पाने खाल्ल्याने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv

मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण.

 मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे

१ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण.

            मुंबई, दि. ४ : राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. या कालावधीत एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.


            ४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य, फळ पीके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. दि. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मार्चअखेर एकूण १ लाख ९९ हजार ४८६ क्षेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.

म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

अर्जदारांना सुविधा देण्याच्या उद्देशाने संगणकीय सोडत प्रणालीतील अर्ज भरणा प्रक्रियेतही बदल

            मुंबई, दि. ४ :- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी दिली. २१ एप्रिल, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.


            श्री. मोरे म्हणाले की, अधिकाधिक अर्जदारांना अर्ज करता यावे, यासाठी सुविधा म्हणून IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय प्रणालीतील अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांना अनुकूलतेसाठी काही महत्वाचे बदल केले आहेत. या नवीन बदलानुसार सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र असणे आता बंधनकारक नाही. हे प्रमाणपत्र सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी मिळवणे गरजेचे आहे. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत ९८४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


            या सोडतीत अर्जदाराचे उत्पन्न दर्शविण्यासाठी आयकर परतावा प्रमाणपत्र (Income Tax Return certificate) प्रणालीमध्ये अपलोड करावे लागते. हे प्रमाणपत्र अपलोड केल्यावर प्रणाली Optical Character Recognition करून पोचपावतीचा क्रमांक, एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या बाबी तपासते. मात्र, अर्जदारांनी अस्पष्ट, चुकीचे आयकर परतावा प्रमाणपत्र अपलोड केल्यामुळे अर्जदाराचे उत्पन्न निश्चितीस अडचणी येत होत्या. त्यामुळे आता अर्जदाराने आयकर परतावा प्रमाणपत्र प्रणालीमध्ये अपलोड केल्यावर अर्जदाराचे एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या बाबतची माहिती एका चौकटीत (Pop Up) दर्शविली जाणार आहे. ही माहिती अचूक असल्यास अर्जदाराकडून चेक बॉक्समध्ये संमती घेतली जाणार आहे. मात्र, या माहिती प्रणालीत अपलोड केलेल्या आयकर परतावा प्रमाणपत्रातील माहितीशी जुळत नसल्यास अर्जदाराला या माहितीत सुधारणा/बदल करण्याची सुविधाही आता प्रणालीत देण्यात आली आहे. हा चेक बॉक्स तपासल्याशिवाय अर्जदाराला अर्ज भरणा करण्याविषयीची पुढील प्रक्रिया करता येणार नाही.      


            या प्रणालीत नोंदणी करताना महिला अर्जदारांना विवाहानंतरचे नाव, आडनाव बदलल्यामुळे किंवा इतर कारणामुळे येणाऱ्या अडचणी विचारात घेता अर्ज नोंदणी प्रणालीच्या पानावर आता नवीन पर्याय अर्जदाराला देण्यात आला आहे. या पर्यायानुसार अर्जदार दुसऱ्या नावाने ओळखला जात असल्यास त्याचा होकार किंवा नकार घेतला जाणार आहे. अर्जदाराने होकार लिहिल्यास अर्जदाराने त्याचे दुसरे नाव नमूद करावयाचे आहे. या सुविधेमुळे विवाहानंतरचे नाव, आडनाव बदललेल्या अर्जदारांना नोंदणी करता येणार आहे.      


            'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेतील यशस्वी विजेत्यांनी मंडळातर्फे प्रथम सूचना पत्र (Provisional Offer Letter) जारी करण्याच्या अगोदर सदनिका नाकारली, तर सदनिका परत करणार्‍या विजेत्यांची अनामत रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रथम सूचना पत्र प्राप्त झाल्यानंतर विजेत्या अर्जदाराने सदनिका नाकारल्यास सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीच्या एक टक्के रक्कम कपात करुन अर्जदाराला अनामत रक्कम परत केली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २,०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्री. मोरे यांनी दिली.                 


            मंडळातर्फे सदनिका व भूखंड विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत १० मे, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. आतापर्यंत २२,३८० अर्जदारांनी सोडतीसाठी अर्ज केले असून त्यापैकी १२,३६० अर्जदारांनी अर्जासह आवश्यक अनामत रक्कम देखील भरली आहे. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी ०४ मे, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक १० मे, २०२३ रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे.    


            सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९८४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण १४५६ सदनिका उपलब्ध असणार आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४ भूखंड व १५२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २,०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.         


००००



 

विज्ञान

 पुर्वी कुर्हाडीने झाडे कापायचे नंतर करवत आली त्यानंतर इलेक्ट्रीकल करवत, हेकसाॅ उपयोगात आली. व आता लेसर किरणांनी झाडे सहज रीत्या कापून काढता येतात


Tuesday, 4 April 2023

शेंदूर

 🌹 *शेंदूर*


---------------------------------------------------------

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

---------------------------------------------------------


*नेहमी शेंदूर चर्चित का असते हनुमान मुर्ति ?*


खरंतर शेंदूर हा विवाहित स्त्रिया आपल्या भांगात भरतात. पण काही देवतांच्या मूर्तींनाही शेंदूर लावूनच सजवलं जातं. गणपतीच नव्हे, तर हनुमानाची मूर्तीही शेंदूरचर्चित असते. बहुतांश मारुती मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर चढवलेला असतो. संपूर्ण मूर्तीलाच शेंदूर फासण्याचं काय कारण आहे?

हनुमानाला शेंदूर एवढा का प्रिय आहे याचं उत्तर ‘रामचरित मानस’ मध्ये मिळतं. एकदा हनुमानाने सीतेला आपल्या भांगात शेंदूर भरताना पाहिलं. या गोष्टीचं हनुमानाला खूप आश्चर्य वाटलं. असं शेंदूर लावण्याचं कारण हनुमानाने सीतामाईला विचारलं. त्यावर सीता माई उत्तरल्या, “माझे पती श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी मी हा शेंदूर भांगात भरते. धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत.”

सीतेचं हे उत्तर ऐकून हनुमंताने विचार केला, जर चिमुटभर शेंदुराने प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल, तर जर मी सबंध शरीरावर शेंदूर फासला तर प्रभू रामचंद्र अमर होतील. हाच विचार करून बजरंग बली हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर चढवण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच हनुमानाला शेंदूर चढवण्याची पद्धत निर्माण झाली. हनुमानास शेंदूर चढवणं हे श्रीरामांचंच पूजन असतं. त्यामुळे असा शेंदूर चढवण्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात.

श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा

 श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा


मुख्यमंत्र्यांनी दिल्या जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा.

            ठाणे, दि. 4 (जिमाका) :- महावीर जयंतीनिमित्त आज ठाण्यातील श्री ठाणा जैन महासंघाने आयोजित केलेल्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी जैन बांधवांशी संवाद साधला.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी, “भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज शांतताप्रिय समाज आहे. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले आहे. आज भगवान महावीरांच्या जयंतीदिनी त्यांचे हेच विचार आपण सर्वांना प्रेरणादायी ठरावेत”, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.


            यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, संदीप लेले आणि श्री ठाणा जैन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


0000



 



भवताल

 भवताल’चा मार्च २०२३ चा अंक प्रसिद्ध 

नमस्कार.

भवताल मासिकाचा मार्च महिन्याचा अंक प्रसिद्ध झाला आहे. तो सोबत शेअर करत आहोत.

अंकात पुढील लेखांचा समावेश आहे

• चिपळूणच्या पुरावरील उपाय आणि नष्ट होणारी ‘बांधण’ परंपरा


• जायफळाची राई - रहस्ये आणि आव्हाने


• माळ भिंगरीची गोष्ट!


• वसंतोत्सव... एक अविस्मरणीय अनुभव

• कुसुम्ब

• आणि बरेच काही...

आपण अंकासाठी नावनोंदणी केल्यामुळे आपणाला हा अंक देत आहोतच. जोडीला अंकाचे कव्हर आणि नावनोंदणीची लिंक देत आहोत. ती आपल्या संपर्कात पोहोचवून लोकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.


तसेच, आपणही वर्गणीसह अंकाची नावनोंदणी करून ‘भवताल’ च्या कार्याला पाठबळ द्यावे, ही विनंती.

नावनोंदणीसाठी लिंक:


https://www.bhavatal.com/connectus/masik-nondani-information

- संपादक, भवताल मासिक


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Featured post

Lakshvedhi