Monday, 5 December 2022

शालेय विद्यार्थी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान

 शालेय विद्यार्थी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी

‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान


- पालकमंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. 05 : शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कडक उपाययोजनांची गरज असून मुंबई शहरात व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करा आणि असे ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आगामी काळात मुंबई मध्ये ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्याची आणि प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांत ‘युथ अगेन्स्ट ड्रग्ज क्लब’ स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली.


            मुंबई शहरातील शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियान राबविण्यासंदर्भात नियोजन आणि अनुषंगिक कार्यवाही संदर्भात आज मंत्री श्री. केसरकर यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, एटीएसचे महासंचालक परमजीत दहिया, मुंबई पोलीस दलाचे सहआयुक्त सुहास वारके, पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त दा.रा. गहाणे, नशाबंदी मंडळाच्या राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास, अमोल मडामे, मोहम्मद इम्तियाज आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


            यावेळी बोलताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबईमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगण्यासोबतच अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त केले पाहिजे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी धडक कार्यवाही राबविण्याची सूचना त्यांनी केली. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी आणि अशा प्रसंगी या मुलांना मदतीसाठी हेल्प लाईन तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


            यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी विविध विभागांकडून आयोजित होणाऱ्या संभाव्य उपक्रमांची माहिती घेतली. व्यसनमुक्तीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जावेत. त्यासाठीचे नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच तयार करावे. विविध दिन विशेष, उत्सव, सण, उपक्रमांच्या कालावधीत हे अभियान अधिक गतीने आणि व्यापक प्रमाणात राबवावे, असे त्यांनी सांगितले.


            यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी नशाबंदी मंडळे सध्या प्रत्येक विभागात केवळ दोन असून ती प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे करण्याबाबत कार्यवाही करण्याचा विचार असल्याचे सांगितले.


00

आली रे गावात आली

 


पौराणिक महाभारकालीन बारगड का पेड

कृपया शेअर

 यह बरगद का वह पेड़ है जो 7000 साल से आज तक ऐसा ही है इस पेड़ पर सिर्फ तीन पत्ते आते हैं जबकि बरगद का पेड़ बहुत विशाल होता है इस पेड़ का तना आज तक 1 इंच से ज्यादा नहीं हुआ और तीन पत्ते के अलावा चौथा पत्ता नहीं आया और यह तीन पत्ते ब्रह्मा विष्णु महेश के संकेत है।


यह पेड सूरत के पास तापी नदी पर स्थित है यह महाभारत के योद्धा अंगराज कर्ण की समाधि है । अब आप सोच रहे होंगे कि युद्ध तो कुरुक्षेत्र हरियाणा में हुआ था तो कर्ण को समाधि सूरत में क्यों दी गई। इसके पीछे कर्ण द्वारा मांगा गया वह वरदान था जिसे भगवान कृष्ण ने पूरा किया जब कर्ण ने कवच और कुंडल इंद्र को दान किए थे तब इंद्र से एक शक्ति बांण और एक वरदान मांगा था कि मैं अधर्म का साथ दे रहा हूं इसलिए मेरी मृत्यु निश्चित है परंतु मेरा अंतिम संस्कार कुंवारी जमीन पर किया जाए अर्थात जहां पहले किसी का अंतिम संस्कार ना किया गया हो।


युद्ध में अर्जुन के हाथों जब कर्ण का वध हुआ. तो कृष्ण ने पांचों पांडवों को बताया कि ये तुम्हारे बड़े भाई है इनकी अंतिम इच्छा थी कि इनका अंतिम संस्कार कुंवारी जमीन पर किया जाए और मेरी दृष्टि में इस पृथ्वी पर सिर्फ एक ही जगह ही तापी नदी के पास

ड्रायव्हिंग लायसन्स धारकांनी जागे

 

जागे व्हा ड्रायव्हिंग लायसन्स धारकांनी 

युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवती

 .युवा उद्योजक भारताला जगातील  तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील.



राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

●●●

मुंबई - पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतु आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे व्यक्त केला.

 

मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित 'मूव्हिंग ऍस्पिरेशन्स' - नेक्स्टजेन च्या २५ परिणामकारक कथा' या मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन रविवारी (दि. ४) राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  


या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायात उतरलेल्या दुसऱ्या पिढीतील २५ युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा देण्यात आल्या आहेत.


प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ उद्योगपती राम भोगले, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, सातारा येथील कवित्सु रोबोट्रॉनिकसचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ फडतरे, तसेच पुस्तकामध्ये नमूद केलेले नव्या पिढीतील युवा उद्योजक उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायांमध्ये दुसऱ्या पिढीतील युवक युवती नवनव्या संकल्पना घेऊन आले आहेत. हे युवक युवती उच्च विद्याविभूषित असून त्यांना जागतिक व्यापार प्रवाहांची माहिती आहे. या युवा उद्योजकांच्या यशोगाथा वाचून शंभरपैकी दहा युवकांनी प्रेरणा घेतली तरी त्याचा त्यांना व राज्याला फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले.


महाराष्ट्राला गरवारे, जैन, किर्लोस्कर अश्या अनेक औद्योगिक घराण्यांची परंपरा आहे. या कौटुंबिक उद्योगांमधील पुढची पुढे त्यांचे व्यवसाय जोमाने पुढे नेत आहेत. आज डिजिटल क्षेत्र तसेच हरित ऊर्जा क्षेत्रात देश दैदिप्यमान प्रगती करीत आहे. त्यामुळे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था केवळ ५ ट्रिलियन डॉलर इतकीच नाही १० ट्रिलियन डॉलर देखील होऊ शकते असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. राज्यातील दुसऱ्या पिढीतील व्यवसाय - उद्योगातील युवा उद्योजकांना शोधून पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी लेखक दत्ता जोशी यांचे अभिनंदन केले.


कौटुंबिक व्यवसायातील नव्या पिढीतील उद्योजकांच्या २५ परिणामकारक कथा असलेल्या दत्ता जोशी यांच्या पुस्तकाचे साहित्यमूल्य फार मोठे आहे. स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होईल त्यावर्षी किमान २५००० युवा उद्योजकांच्या यशोगाथा लिहिल्या जातील असा विश्वास मराठवाडा विभागाचे सीआयआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी यावेळी व्यक्त केला.


मराठी व इंग्रजीतून एकाच वेळी प्रकाशित झालेल्या या पुस्तकांत अथांग व अभेद्य जैन (जैन इरिगेशन, जळगाव), अमित घैसास (यशप्रभा ग्रुप, पुणे), निखिल व अभिजित (अभिजित ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, नायगाव, वसई), परीक्षित प्रभुदेसाई (पितांबरी उद्योगसमूह, ठाणे), मिहीर वैद्य ( श्री गणेश प्रेस अँड कोट्स, औरंगाबाद), स्वराली सावे (एनिकार फार्मास्युटिकल्स, बोईसर), कौस्तुभ फडतरे (कवित्सु रोबोट्रॉनिक्स, सातारा), अंकित काळे (काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, औरंगाबाद), कुशल ठक्कर (महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स, लातूर), रवी जैन (रवी मसाले, औरंगाबाद), अनुप व अतुल कोगटा (दाल परिवार, जळगाव), अनिकेत व निमिष पाटील (वेगा केमिकल्स, जळगाव), श्रुती अहिरे (आनंद अ‍ॅग्रो, नाशिक), अनुराग मोराणकर (एलमेक इंजिनियर्स, धुळे), अभिजित गव्हाणे (मेधावी सिमेंट प्रॉडक्ट्स, नांदेड), चेतन व दीपक पाटील (कृष्णा पेक्टिन्स, जळगाव), मल्हार मुतालिक (पॉझिटीव्ह मिटरिंग पंप्स, नाशिक), सिद्धार्थ कुलकर्णी (हरमन चहावाला, सांगली), क्षितिज महाशब्दे व जान्हवी म्हात्रे (वैदिक संस्कार आर्किटेक्ट्रॉनिक्स, मुंबई), आदित्य कुलकर्णी (निर्मिती ग्रुप, नाशिक), केतकी कोकीळ (संजय ग्रुप, औरंगाबाद), मयांक व वेदांती शर्मा (मयांक अ‍ॅक्वाकल्चर, सूरत), पियुष देसले (पियुष लाईफस्पेसेस, धुळे), सुमीत धूत व कपिल राठी (तुलसी पेन्ट्स प्रा. लि., नांदेड) आणि सौरभ व गौरव भोगले आणि मिहिर सौंदलगेकर (एआयटीजी ग्रुप, औरंगाबाद) या नेक्स्टजेन उद्यमींचा समावेश आहे. हे सर्व 25 उद्योग परस्परांपासून भिन्न असून या निमित्ताने 25 वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांचा गाभा समजून घेण्याची संधी या पुस्तकातून वाचकांना मिळत आहे.


राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत एआयटीजी ग्रुपचे चेअरमन श्री. रामचंद्र भोगले यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक श्री. प्रसाद कोकीळ यांनी केले. सर्व उद्योजकांच्या वतीने व्यासपीठावर श्री. कोस्तुभ फडतरे यांची उपस्थिती होती. त्यांचे स्वागत जैन उद्योगसमूहाचे उपाध्यक्ष (मीडिया) श्री. अनिल जोशी यांनी केले. सूत्रसंचालन श्री. गंधार जोशी यांनी केले तर आभार श्री. दत्ता जोशी यांनी मानले. कार्यक्रमास पुस्तकात लेखन केलेल्या सर्व उद्योगांचे दोन्ही पिढ्यांतील उद्यमी उपस्थित होते.



--

Datta Joshi

the CATALYST

B - 5, Manomay Residency,

Beside Bajaj Hospital, Behind Biz Square,

Beed Bypass, Aurangabad. 431010

9422 25 25 50 / 9225 30 90 10



--

Datta Joshi

the CATALYST

B - 5, Manomay Residency,

Beside Bajaj Hospital, Behind Biz Square,

तलाठी भरती




 

आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे"

 आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे"

 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न.

            मुंबई, दि. 4 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त करीत आहेत तसेच केंद्रिय लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उत्तीर्ण होत आहे. उज्वल भारताचे स्वप्न साकार करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महिला विद्यापीठ तसेच महिला महाविद्यालयांनी विद्यार्थिनींना कौशल्य प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.  

            एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विले पार्ले मुंबई येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. 

            नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानासोबत कला क्षेत्रात शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊन ते परिपूर्ण नागरिक होतील असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठांनी केवळ आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित न राहता देशविदेशातील संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करून खऱ्या अर्थाने विश्वविद्यालय व्हावे असे राज्यपालांनी सांगितले.

पालघर व चंद्रपूर येथे महिला विद्यापीठाची उपकेंद्रे

            महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नामुळे सुरु झालेले एसएनडीटी महिला विद्यापीठ केवळ पाच मुलींसह सुरु झाले व आज त्याचा ७ राज्यांमध्ये विस्तार झाला आहे. महिला विद्यापीठ लवकरच पालघर व चंद्रपूर याठिकाणी आपली उपकेंद्रे सुरु करणार असल्याची माहिती कुलगुरु उज्वला चक्रदेव यांनी यावेळी दिली.

            कार्यक्रमाला माजी मंत्री अमरीश पटेल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, मुंबई पोस्टल विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हिमाद्री नानावटी, प्राचार्या डॉ राजश्री त्रिवेदी, विश्वस्त अपूर्व नानावटी तसेच महाविद्यालयाचे शुभचिंतक, माजी विद्यार्थी व आजी माजी शिक्षक उपस्थित होते.  

०००

Governor Koshyari presides over Golden Jubilee Celebrations of Maniben Nanavati Women's College.

            Mumbai ; ४ Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Golden Jubilee Celebrations of the Maniben Nanavati Women's College, affiliated to SNDT Women's University at the College Auditorium at Vile Parle Mumbai on Sat (३ Dec). The Governor released a Special Postal Cover brought out by India Posts to mark the occasion.

            Speaking on the occasion, the Governor called upon Women's Universities and Women's Colleges to empower women with modern set of skills. He asked them to forge alliances with the best of national and foreign universities to make women 'Atmanirbhar'..

            Vice Chancellor of SNDT Women's University Prof Ujwala Chakradeo said the University has expanded its footprint to ७ states. She informed that the University will be opening Sub Centres in Palghar and Chandrapur districts.

            Former Minister Amrish Patel, Pro Vice Chancellor of the SNDT Women's University Ruby Ojha, Post Master General of Mumbai Region Swati Pandey, Chairperson of the Managing Committee of the College Himadri Nanavati, Trustee Apoorva Nanavati, Principal Rajashri Trivedi, well wishers, alumni, former and present staff and teachers were present.





Featured post

Lakshvedhi