Thursday, 1 December 2022

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

 ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

यांची 'माझी मुंबई, स्वच्छ मुंबई' या विषयावर उद्या मुलाखत

            मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची 'माझी मुंबई,स्वच्छ मुंबई' या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.00 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.


यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


            ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाचे महत्व, मुंबई उपनगर जिल्ह्यातील 15 वॉर्डमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, अभियानात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग,स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांचा सहभाग या विषयी सविस्तर माहिती, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000


 

शिवप्रताप दिन सोहळा

 शिवप्रताप दिन सोहळा

गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवमय वातावरणात किल्ले प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव.

            सातारा दि. 30 : शिवकालीन धाडसी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवकालीन गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी केले.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भवानी मातेची मनोभावे आरती केली. छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला.

            छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आजही प्रेरणा देणारे स्त्रोत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, किल्ल्यांची बांधणी, पाण्याचा साठा, प्रवेशद्वार स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तात्काळ दिला जाईल.

            राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. हे सर्व सामान्य कष्टकऱ्यांचे सरकार आहे, असे सांगून राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            शिवप्रताप दिनाला महत्त्व असल्याचे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन आराखड्यास निधी मिळाल्यास संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होईल. डोंगरी विभागाचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न व भूकंग्रस्तांना दाखले यासह अन्य प्रश्न तत्काळ राज्य शासन सोडवत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असेही श्री. देसाई यावेळी म्हणाले

            किल्ले प्रतापगड परिसरात अफजलखानाच्या वधाचे शिल्प उभारण्यात येऊन त्याचे लोकार्पण मोठया उत्साहात करण्यात येईल असे पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

            आज सकाळी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.

            भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

            यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री महादेव जानकर, भरत गोगावले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            या नेत्रदीपक सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000


 



 



टिप्स हेल्थ


 

फूल गुलाब का





 

जिंदगी

 








विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फस

 विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            मुंबई, दि. 30 : राज्यात अनेक ठिकाणी तरुणी, महिला यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाची तक्रार प्रकरणाबाबत व सेफ कॅंपसबाबत अनेक सूचना व निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.


            महाविद्यालयीन व विद्यापीठातील अत्याचाराच्या घटनांवरील उपाययोजना आणि नागपूर विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या अडचणी या विषयासंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे बैठक झाली.


           या बैठकीस नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव किशोर जकाते, उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रशासकीय अधिकारी सुयश दुसाने, स्त्री अभ्यास केंद्राच्या धम्मसंगिनी रमा गोरख आदी उपस्थित होते.


            डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, विशाखा समितीच्या बैठका विद्यापीठात व महाविद्यालयात नियमित झाल्या पाहिजेत. या बैठकीतील प्राप्त तक्रारींचा आढावा दर महिन्याला घेण्यात यावा. तसेच प्रत्येक महाविद्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी असली पाहिजे. तक्रार पेटी प्रत्येक महाविद्यालयात व विद्यापीठात ठेवली आहे की नाही याबाबत अहवाल मागवावा.


         विद्यापीठातील महिला अध्ययन केंद्रात महिलांच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, किती तक्रारी निकाली निघाल्या, किती तक्रारी प्रलंबित आहेत याबाबत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा. विद्यापीठे व महाविद्यालये परिसरात विद्यार्थीनींच्या छेडछाडीच्या तक्रारींचा निपटारा तात्काळ झाला पाहिजे. यासाठी आवश्कतेनुसार कायदे सहायकाची नेमणूक करण्यात यावी. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना घडतात या घटनांच्या तक्रारीची पोलीस स्टेशनमध्ये नोंद होते. या तक्रारीचा राज्यस्तरीय डाटा बेस एकत्रित असणे आवश्यक आहे.


           महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेबाबतीत नियमांचे कठोर पालन झाले पाहिजे. विद्यापीठ व महाविद्यालयातील अत्याचाराच्या घटनांबाबत राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थित लवकरच घेण्यात येईल. या बैठकीत राज्यातील महिलांविषयी अत्याचाराच्या तक्रारीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.


*****

राज्यपालांच्या हस्ते 7 वे सीआयआय कोल्ड चेन पुरस्कार प्रदान.

 राज्यपालांच्या हस्ते 7 वे सीआयआय कोल्ड चेन पुरस्कार प्रदान.

            मुंबई, दि. 30 : दुग्धजन्य पदार्थ, केळी तसेच इतर नाशवंत पदार्थांचे शीत यंत्राव्दारे साठवणुक तसेच वाहतूक करणाऱ्या सर्वोंत्तम उद्योग संस्थांपैकी निवडक संस्थांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 7 वे सीआयआय कोल्ड चेन पुरस्कार मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.


            राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई, भारतीय शाश्वत विकास संस्थेचे महासंचालक डॉ श्रीकांत पाणिग्रही, ब्लू स्टार लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी त्यागराजन, राष्ट्रीय शीत साखळी विकास केंद्राचे मुख्य सल्लागार पवनक्ष कोहली आदी यावेळी उपस्थित होते.


             कोल्ड चेन व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य आणि उत्कृष्ट योगदानासाठी वैयक्तिक किंवा संस्थांना कोल्ड चेन पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांच्या माध्यमातून सर्वोत्तम पद्धतीद्वारे शाश्वत यश आणि स्पर्धात्मकतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


            यावेळी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, रिनॅक इंडिया लिमिटेड, ग्रीन व्हॅली ॲग्रो फ्रेश, कोल्डमॅन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, आनंदा डेअरी, बनासकांठा डेअरी, अवंती फ्रोझन फूड प्रायव्हेट लिमिटेड, गुब्बा कोल्ड स्टोरेज प्रा. लि,, सेल्सिअस लॉजिस्टिक सोल्युशन्स प्रा. लि व ओटिपाय इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांना कोल्ड चैन पुरस्कार प्रदान पुरस्कार प्रदान करण्यात आले.


००००

Maharashtra Governor presents 7th Cold Chain Awards.

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 7th Cold Chain Awards to individuals and organisations for their outstanding contributions in the field of Cold Chain Management at Hotel Trident, Mumbai on Wed (30 Nov).


       ICAR, National Research Center for Banana, Rinac India Limited, Coldman Logistics Pvt Ltd, Ananda Dairy, Avanti Frozen food Pvt ltd, Gubba Cold Storage Pvt. ltd, Celsius Logistics Solutions Pvt. ltd, Otipy Internet Pvt. ltd. were among those honoured on the occasion.


      Chief Executive Officer, National Rainfed Area Authority Dr. Ashok Dalwai, Chief Advisor, National Center for Cold Chain Development Pawanexh Kohli, Managing Director of Blue Star Ltd, B Thigarajan, President and Exeuctive Director, AEEE, Prof. Mech Engineering IIT Madras, Prof. M. P. Maiya and others were present on this occasion.


0000



Featured post

Lakshvedhi