वय फक्त एक आकडा असतो.
Energy अशी असायला हवी.
👌🏼👌🏼😅🌹👍🏼
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
एका बेडकाच्या जन्माची गुंतागुंतीची गोष्ट !
(भवतालाच्या गोष्टी ४२)
“चार झाडं तोडली किंवा ओसाड पठारावर एखादा प्रकल्प येतोय म्हटलं की लगेच लागतात बोंबलायला…” पर्यावरण कार्यकर्त्यांना अशी टीका नेहमीच ऐकावी लागते. पण ही झाडं, पठारं, अगदी पावसाळ्यापुरती गढून पाणी साचणारी डबकीसुद्धा महत्त्वाची असतात. हे पावसाच्या निमित्ताने समजून घेता यावे यासाठीच ही एका बेडकाच्या जन्माची गोष्ट. परिसरातील कितीतरी गोष्टी जुळून आल्यावर मगच बेडकाचा जन्म होतो. म्हणूनच परिसर टिकवावा लागतो. कारण विस्तीर्ण गवताळ माळराने, पावसाळ्यात फुलणारे सडे किंवा मुंबईजवळील आरे सारखा हिरवा पट्टा निघून जातो तेव्हा तो एकटा नष्ट होत नाही, तर त्याच्यासोबत काय काय निघून जाते, याचे भान यावे यासाठीच ही गोष्ट!
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Frog-
(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४२ वी गोष्ट.)
भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com
इतरांसोबत शेअरही करा.अन्नधान्य व खाद्य पदार्थावर नव्याने लावलेल्या 5% जीएसटीला ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चा तीव्र विरोध
केंद्रीय अर्थमंत्री व जीएसटी काऊन्सील कडे दाद मागणार
राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी.
मुंबई ः जीएसटी काऊन्सील च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ब्रँडेड नसलेल्या व पॅकींग पुर्व अन्नधान्य व खाद्यपदार्थावर 5% जीएसटी लावण्याचा घेतलेला निर्णय सामान्य जनतेवर महागाईचा बोजा लादणारा निर्णय असुन या निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर या राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्थेने घेतला असल्याची माहीती चेंबर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
2017 साली जीएसटी करप्रणाली लागु करताना अन्नधान्यावर जीएसटी लावणार नाही असे आश्वासन दिले होते. नंतरच्या काळात ब्रँडेड अन्नधान्य व खाद्यपदार्थावर जीएसटी लावला, आणि आता तर नॉन ब्रँडेड अन्नधान्य व खाद्यपदार्थावर 5% जीएसटी लावण्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा व अन्यायकारी असल्याचे सांगुन ललित गांधी पुढे म्हणाले की, आधीच महागाईने सामान्य माणुस बेजार झाला आहे. त्यात 5% जीएसटी चा मार हा सामान्य लोकांचे कंबरडे मोडणारा ठरणार आहे.
अन्नधान्याबरोबरच दुग्धजन्य पदार्थ, दही, पनीर, ताक, चिरमुरे, गुळ, पापड यासारख्या वस्तुंवर कर लावून सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम केले जाणार आहे. त्या बरोबरच छोटे व्यापारी मोडीत निघणार असुन फक्त मोठ्या ब्रँडेड कंपन्यांचा व्यापार वाढणार आहे.
गेल्या शंभरवर्षापासुन महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणुन कार्यरत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर तर्फे या निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन केंद्रीय अर्थमंत्री, जीएसटी काऊन्सील कडे याचा विरोध नोंदविण्यात आला असुन लवकरच केंद्रीय अर्थमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेउन व्यापारी, अडत मार्केट व सामान्य ग्राहकांच्या अडचणी मांडण्यात येतील तसेच जीएसटी काऊन्सील च्या सर्व सदस्य अर्थमंत्रालयांनाही याबाबत निवेदन देणार असल्याचे सांगुन ललित गांधी पुढे म्हणाले की, याबाबत सरकारने तात्काळ स्थगिती न दिल्यास राज्यभर याविरूध्द आंदोलन करण्याची तयारी केली असुन त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी 11 जुलै 2022 रोजी दुपारी 3ः00 वा. महाराष्ट्र चेंबरच्या काला घोडा, फोर्ट, मुंबई येथील मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केल्याची माहीतीही ललित गांधी यांनी दिली.
बेंगळूरू - मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन उपलब्ध करून देणार. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दिघी पोर्टचे काम जलदगतीने सुरू करणार
.मुंबई, दि. 7 : बेंगळूरू - मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येणार असून व यासाठी जमीन संपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे बल्क ड्रग पार्कची सुरूवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या ॲपेक्स ॲथॉरिटीच्या पहिल्या बैठकीत दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या सूचनेला पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत चालना देण्यात येईल आणि दिघी पोर्टबाबत विशेष आढावा ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आजच्या अध्यक्षीय भाषणात दिली.
या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी त्याचप्रमाणे अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, केंद्रीय सचिव आदी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर मंत्रालयातून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनबलगन, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिप कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.
सुरुवातीला केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. गोयल यांनी मुख्यमंत्री या पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. तर भारतास खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनविणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आभार मानले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी वाराणसी - मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम होण्याबाबत या बैठकीत सूचना केली. हा प्रकल्प राज्याला हितकारी असल्याने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या सूचनेला अनुमोदन दिले. वाराणसी - मुंबई कॉरिडॉर झाल्यास आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या राज्यातील टेक्सटाइल पार्क, मेडिकल पार्क आणि बल्क ड्रग पार्क हे प्रकल्प प्रस्तावित असून केंद्र शासनाने लवकरात लवकर मान्यता दिल्यास या ही कामे जलद गतीने सुरू होऊन राज्याला आणि पर्यायाने केंद्रालाही मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
औरंगाबाद येथील शेंद्रा बिडकीन येथील ऑरिक सिटीला उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या ठिकाणी 5542 कोटींची गुंतवणूक आली असून 375 एकर भूखंड उद्योगांना देण्यात आले आहेत. याठिकाणी 3 लाख लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. पंतप्रधानांनी देखील या प्रकल्पाचे कौतुक केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.
दिघी - माणगाव औद्योगिक क्षेत्र देखील विकसित करण्यात येत असून महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाकडून त्वरित मदत झाल्यास विकासाला चालना मिळेल. याठिकाणी 85 टक्के जमीन संपादन पूर्ण झाले आहे. कराराची तांत्रिक प्रक्रिया केंद्राकडून लवकर पूर्ण झाली तर तीन महिन्यात उर्वरित भूसंपादन पूर्ण करता येईल, असे सांगून बिडकिन ते पैठण मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गतीने व्हावे, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या विविध प्रकल्पांना पीएम गतीशक्ती या योजनेत समावेश करून निती आयोगास तत्काळ आढावा घेण्याबाबतच्या सूचना केल्या.
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात.
मुंबई (कांजूरमार्ग १ घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१,गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ९ तुकड्या.
मुंबई -३, पुणे-१, नागपूर-१ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.
राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.
******
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क.
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता 9 जुलै पर्यंत बंद.
मुंबई, दि. 7 : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याकारणाने मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता ९ जुलै २०२२ रोजी पर्यंत बंद करण्यात आला आहे व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
कोंकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३८ मिमी. पाऊस झाला असून, जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने आणि भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ ची एक टीम तैनात आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९५.७ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पुर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ११०.६ मिमी तर सांताक्रूझ येथे १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबई मध्ये एनडीआरएफ च्या तीन टीम या आधीच तैनात आहेत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दोन अतिरिक्त टीम अशा एकूण पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०६ मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सावित्री, कुंडलिका तसेच इतर मोठ्या नद्या धोका पातळीच्या खाली वाहत आहेत. पोलादपूर, महाड व माणगाव येथील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील ११५ कुटुंब म्हणजे एकूण २८९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात १४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच ३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७३.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. या भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता ०९ जुलै २०२२ रोजी पर्यंत बंद करण्यात आला आहे व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. कराड - चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट येथे दरड कोसळली असून एकेरी वाहतूक सुरु आहे. दरड प्रवण व पूर प्रवण भागातील १३६ कुटुंब म्हणजे एकूण ४७७ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० घरांचे अंशतः नुकसान झाले आहे .
राज्यपालांच्या हस्ते नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
मुंबई, दि. 7 : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी माजी कुलगुरु डॉ मोतीलाल मदान, कुलगुरु डॉ विलास भाले, कुलसचिव, शिक्षक व स्नातक विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्वाधिक पदके, सुवर्ण पदके तसेच इतर पारितोषिके प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.
००००
Governor Koshyari confers Doctor of Science on Nitin Gadkari.
Mumbai 7 : Maharashtra Governor and Chancellor of public universities Bhagat Singh Koshyari conferred the Honorary degree of Doctor of Science on Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari at the 36th Convocation of the Dr. Panjabro Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola.
Former Vice Chancellor Dr. Motilal Madan, VC Dr. Vilas Bhale, Registrar, Deans of Faculty, Professors, teachers and graduating students were present.
Graduates receiving Gold Medals and other prizes were felicitated on the occasion.
0000