Sunday, 6 March 2022

 *राजकिय प्रसंग*

वसंतदादा पाटील पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरची एक घटना आहे... 

-----------------------------------------------

   सांगली इस्लामपूर रस्त्यावरून एक ट्रक चाललेला...

ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत निघाले होते.... रानातून घरी चाललेल्या एकानं त्या ट्रकला हात करत विचारलं.

"काय झालंय ?"

"आरंरं... आपलं दादा मुख्यमंत्री झाल्यातीं" ट्रकमधल्या माणसानं सांगितलं.

"आपल वसंतदादा ?"

"होय . "

"मग चला मीबी येतो "

"आर पण तुझ्या अंगावर ही रानातली कापड हायती"

"त्येला काय हुतंय...आपुन दादास्नीच् भेटायचं हाय.. दादा आपलंच् हायती." अस म्हणत तो माणूस अंगावर असणाऱ्या फाटक्या बंडीवर आणि मळक्या धोतरावर मुंबईला निघाला... 

शेकडो मैलाचा प्रवास करून ही गावाकडची माणसं दादांच्या बंगल्यावर पोहचली. दादा अजून येणार होते म्हणून वाट पाहत बैठकीच्या खोलीत बसली. काही वेळानं दादा आले .

आल्या आल्या...त्यांचे लक्ष या नुसत्या बंडीवर आलेल्या कार्यकर्त्याकडे गेले .

दादांनी त्याला विचारलं ,

"हरिबा असा कसा आलायंस ?तुझा शर्ट कुठं आहे ?"

"दादा , तुम्ही मुख्यमंत्री झालेलं रस्त्यात कळलं.... आता घरी कवां जावू आणि कापड कवां घालू ? तवंर ही माणसं निघून आली असती . म्हणून तसाच आलू."

ते ऐकून दादा हेलावले .

 त्यांनी लगेच त्याच ठिकाणी आपल्या अंगातील शर्ट काढला आणि त्या हरीबाला घालायला दिला.....

आपल्या कार्यकर्त्यांचे भोळे भाबडे प्रेम पाहून त्याला आपल्या अंगातील शर्ट काढून देणारे वसंतदादां हे लोकांना आठवत राहतात....

आणि....

त्यांच्या साधेपणाच्या कथा आजही घराघरातून सांगितल्या जातात....

आजचे नेते सामान्य माणसांच्या प्रश्नांला फारसे महत्व देत नाहीत. एखादा गरीब माणूस जर स्वतःची समस्या घेऊन नेत्याकडे गेला तर नेता बोलायच्या अगोदरच नेत्याच्या भोवती बसलेले त्याचे भडभुंजे अनुयायीच् त्या माणसावर खेकसतात,.. म्हणतात...

"हे काम सायेबांना सांगतोयंस?काय किंमत घालवतोय काय आमच्या सायेबांची"

हे अनेकांनी अनुभवलेलं असतं... साहेब आणि त्यांच्या अनुयायांना किरकोळ वाटणारं काम त्या माणसासाठी खूप महत्त्वाचं असतं.

अशा आजकालच्या साहेबांच्यासाठी आणि त्याच्या भोवतीच्या भडभुंज्या लोकांसाठी वसंतदादा पाटील यांचा एक किस्सा आवर्जून सांगितला पाहिजे....

एकदा काय झालं...

दादांचा एका बालमित्राला विहिरीवर बसवायचं इंजिन घ्यायच होतं. तो पैसे फेट्यात बांधून थेट मुंबईला गेला.

चौकशी करत करत दादांच्या बंगल्याच्याजवळ गेला.

त्याला पोलीस आत सोडत नव्हते. तो तिथंच उभा राहिला. योगायोगानं दादा कुठेतरी बाहेर निघालेले...

या मित्रानं त्यांना जोरानं हाक मारली

"वसंता है....

ती गावाकडच्या माणसाची हाक् ऐकून दादांनी मागे वळून पाहिले. दादा त्याच्याकडे आले.

त्याला कडकडून मिठी मारली. ज्या पोलिसांनी त्याला अडवले होते. ते हा प्रसंग पाहून चकित झाले. अधिकारीही अवाक झालेल...

राज्याचे मुख्यमंत्री एका शेतकऱ्याची गळाभेट घेत होते.

दादांनी त्याला विचारलं... 

"अस अचानक कसा आलास?"

"वसंता, गेल्यासाली हिर पाडली. पाणी लागलंय चांगल.औंदा इंजन बसवायचं हाय. तुझ्या ओळखीनं म्हटलं चांगलं इंजेन मिळलं,म्हणून आलूया"

असं म्हणत त्यांनी फेट्यातला नोटांचा पुडका दादांच्या हातात दिला.

दादा त्याला म्हणाले,"राहूदे ठेव तुझ्याजवळ. आता आलायस् तर दोन दिवस रहा"

त्या गावाकडच्या मित्राला आपण इंजिन खरेदी करायचं काम मुख्यमंत्र्यांना सांगतोय याचं काहीही वाटंत नव्हतं.

कारण दादा त्याला आपले वाटंत होते. आणि दादानाही त्यानं हे काम सांगितलं यात कसलाही कमीपणा वाटत नव्हता...

दादा हे दादाच होते....

दादांनी त्याच इंजिन घेऊन त्याच्या घरी पाठवलं.

आणि सांगलीला जाताना त्याला सोबत घेऊन गेले.

विशेष म्हणजे....

दादांनी ही गोष्ट जाहीर सभेत कधी सांगितली नाही. प्रचारात सांगितली नाही, या घटनेची जाहिरात केली नाही. कारण अशा कित्येक गोष्टी होत्या सांगण्यासारख्या.....

कोणकोणत्यां गोष्टी सांगायच्या?

आजचे नेते असे वागत नाहीत... 

आणि चुकून कोणी वागलेच् तर त्याची बातमी होते.... 

दादांच्या आयुष्यात बातमी बनण्यांसारख्या शेकडो गोष्टी घडल्या. पण त्याच्या बातम्यां झाल्या नाहीत.

पण;आदरणीय दादांच्या त्या सगळ्या आठवणी लोकांनी अंतःकरणात जपून ठेवल्या दिसतात.

आज *दादांची पुण्यतिथी*....त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 * कटू सत्य


घरे गेली अंगणे गेली

नाती गोती फाटत गेली.. 

प्रेम, जिव्हाळा,माया, ममता

सारी सारी लुप्त झाली.


चार-चार बेडरूम्सची घरे झाली!

पण आई वडिल,वृद्धाश्रमी गेली..

आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..

सारे मुले विसरून गेली.. 


आजीआजोबांची नातवंडं

पाळणाघरातली children झाली

सोडायला बाई, आणायला बाई

घरच्या मायेला पारखी झाली..


सारी 'extremely busy' झाली

विचारपूस करीना कोणी..😷

रक्ताचीही नाती आता

WhatsApp मध्ये बंद झाली..!


प्रत्येकाची वेगळी खोली

प्रत्येकाला स्पेस झाली

घरातल्याच माणसांमधल्या

संवादांची होळी झाली..


हॉटेलिंगची फॅशन आली 

घरची जेवणे बंद झाली..

Modular च्या kitchen मध्ये

सगळी..बाहेरच जेवुन आली !


खोल्यांची संख्या वाढत गेली

माणसे मात्र कुढत गेली..

मी, मला, माझे माझे 

स्वार्थामुळे ममता गेली


चिमुकल्यांची मनेच तुटली..

पैशामुळे नीती गेली..

नीतीमुळे मती गेली..

अहो पैशासाठी माणसाने

माणुसकी सोडून दिली


फेसबुक, गुगल, सगळे असून

का डिप्रेशनची पाळी आली? 

प्रत्येकाला शुगर, बीपी .. 

हार्टचीही गोळी आली ! 


इंटरनेट ने क्रांती केली ! 

मोबाईल ने जादू केली ! 

स्वत:च्याच कोषामध्ये

माणसे आता मग्न झाली.. 


माणसे जाऊन यंत्रे आली !🖥

यंत्रांची मग तंत्रे आली ! 🤕

यंत्रे-तंत्रे सांभाळताना

माणुसकीची फरफट झाली..


सुखं सांगायला कोणी नाही..

दु:ख ऐकायला कोणी नाही..

'Sharing' च्या या जमान्यात

माणुसकी मात्र उरली नाही..

चला यंत्र थोडी बाजूला ठेवूया

विचारपूस करण्या घरी जाऊया

नाती गोती सांभाळुनी 

आपण थोडे जवळ येऊया.... शुभ रात्री़़़़़़़ँ🌼


🙏🏻🙏🏻

 *☘️ जीवनात चांगली कर्म करा, कर्माप्रमाणे फळ मिळते.*🙏 

*☘️ सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते, परंतु जेव्हा सीतेचे हरण झाले तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ द्रौपदीचे रक्षक पाच पाण्डव करीत होते, पण जेव्हा द्रोपदीचे वस्त्र हरण झाले, तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते; जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता; पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते ; जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते; पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते...!!!*

*☘️ शरशय्या वरती भीष्म पितामह होते; वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते...!!!*

*☘️ राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते ; पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते...!!!*

*☘️ सर्वांसाठी त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे, की या जगात आपले कोणीही नाही. ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे, त्यापुढे कोणी जाऊ शकत नाही. "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर" हेच सत्य आहे...!!!*

*☘️ आपले चांगले कर्मच केवळ आपल्याला संकटातून बाहेर काढू शकतो, म्हणून देवापेक्षा आपण केलेल्या कर्माची नेहमी भिती बाळगावी, एक वेळ देव आपणास माफ करील पण आपली कर्म नाही. आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा शेवटी हिशोब होतो व त्याप्रमाणे तुम्हाला मोक्ष मिळतो*

*☘️ फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विझवु शकत नाही...!!!*

*☘️ आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!✌*

   *❣स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!❣*

|| *जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा*||

🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲

 


Saturday, 5 March 2022

 प्रत्येक घटकाच्या योगदानातूनच देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


शिवाजी विद्यापीठाचा ५८वा दीक्षान्त समारंभ उत्साहात.

       कोल्हापूर, दि. ५: भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

       शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्ष म्हणून स्नातकांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक डॉ. दिनकर एम. साळुंके यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. या ऑनलाईन समारंभात सुमारे ३५०० जण सहभागी झाले.

          राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सध्या जग विविध समस्यांनी ग्रस्त आहे. त्यावर उपाय योजण्याचे काम युवा पिढी सक्षमपणे करु शकते. नवोन्मेष, नवविचार आणि दर्जा या बळावर आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे, ही बाब नवपदवीधर विद्यार्थ्यांनी सदैव लक्षात ठेवावी. पदवीची प्राप्ती ही या नवीन प्रवासाची खरी सुरुवात आहे. त्यामुळे आयुष्यात कोणतेही काम करताना सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन करा आणि उच्च ध्येय ठेवून वाटचाल करा. हाती घेतलेले उपक्रम पूर्ण करताना उत्तम दर्जासाठी आग्रही राहावे. जेणेकरुन त्याची फलनिष्पत्तीही उत्तम राहील. विद्यापीठाचे कुलगुरु आणि येथे कार्यरत सर्वांचे काम उत्कृष्टपणे सुरु असल्यामुळे शिवाजी विद्यापीठाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे, असे ते म्हणाले.

            इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे विशेष स्थान आहे, तसेच स्थान शैक्षणिक क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य योग्य दिशेने सुरु असून ते देशातील प्रगतीशील विद्यापीठांपैकी एक म्हणून नावाजलेले आहे. यापुढील काळातही विद्यापीठाने आपली कामगिरी उंचावत अधिकाधिक लौकिक प्राप्त करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

          यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके म्हणाले, नवभारताच्या उभारणीत विद्यार्थ्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने आपल्या वैज्ञानिक व तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाच्या अभिव्यक्तीमध्ये कालसुसंगत संयुक्तिकता व मूल्य असले पाहिजे, याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी, कारण या बाबी जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी आणि शाश्वत उपाय प्रदान करतात.

          डॉ. साळुंके म्हणाले, नवस्नातकांनी आता आयुष्याच्या आणि उच्च शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत असताना बौद्धिक चपळता वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जेव्हा एखादी नवीन संधी येते, तेव्हा ती मिळवण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहता आणि तुमच्या स्वतःच्या संधी निर्माण करण्यासाठीही तयार असता. विद्यार्थी म्हणून मिळवलेले शिक्षण आणि ज्ञान यावर आधारित तुमचा स्वतःचा मार्ग तयार केला पाहिजे. तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल, तेथे प्रामाणिकपणा आणि बांधिलकी या दोन गुणांच्या बळावर सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

          यावेळी शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांनी सादर केला. उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, संशोधनातून उद्योगनिर्मिती, नाविन्यपूर्ण व अभिनव संशोधन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भविष्यवेधी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम या पंचसूत्रीच्या बळावर विद्यापीठाने आपली वाटचाल चालविली असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे तांत्रिक अडचणीमुळे सहभागी होवू शकले नसून त्यांनी स्नातकांना शुभेच्छा दिल्याचे कुलगुरु डॉ. शिर्के यांनी सांगितले.

          तत्पूर्वी, कुलगुरु कार्यालयापासून ते राजर्षी शाहू सभागृहापर्यंत दीक्षान्त मिरवणुकीने समारंभास प्रारंभ झाला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे यांनी हाती ज्ञानदंड घेऊन मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणुकीत कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता सहभागी झाले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी पसायदान सादर केले. समारंभाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कुलगुरु डॉ. शिर्के यांनी स्वागत केले, तर प्र-कुलगुरु डॉ. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. परीक्षा संचालक श्री. पळसे यांनी दीक्षान्त समारंभात प्रदान करावयाच्या पदव्या, पदविका आणि प्रमाणपत्रांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तृप्ती करेकट्टी आणि धैर्यशील यादव यांनी केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.


 

 उस्‍मानाबाद जिल्ह्यातील नवप्रभा महिला प्रभाग संघाला

‘आत्मनिर्भर संघटन’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.


      मुंबई, दि.५ :  केंद्राच्या दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान कार्यक्रमाअंतर्गत देशातील प्रभाग संघांना समाजोपयोगी कामांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याअंतर्गत ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) तर्फे नामांकन देण्यात आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नवप्रभा महिला प्रभाग संघाला ‘आत्मनिर्भर संघटन’ पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नवप्रभा महिला प्रभाग संघाचे अभिनंदन केले आ

            केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (day-nrlm) या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरून ‘आत्मनिर्भर संघटन’ या पुरस्कारासाठी देशभरातून नामांकने मागविली होती. देशातील विविध राज्यांनी प्रभाग संघाची नामांकने दिलेली होती. ‘उमेद’ तर्फे जेवळी, ता. लोहारा या संघाचे नामांकन देण्यात आले होते. यामधून राष्ट्रीय स्तरावर तीन संघांची निवड करण्यात आली असून या तीनपैकी नवप्रभा महिला प्रभाग संघ, जेवळी, ता. लोहारा या प्रभाग संघाला आत्मनिर्भर संघटन या पुरस्काराची घोषणा झालेली आहे. दि. ०८ मार्च, २०२२ रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे

            पुरस्कारासाठी निवड झालेल्या नवप्रभा महिला प्रभाग संघाची स्थापना ऑक्टोबर २०१७ मध्ये करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी प्रभागातील ७ ग्राम पंचायती आणि ९ गावांमध्ये मागास आणि वंचित घटकांच्या एकूण २७५ स्वयंसहायता गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी ११ गट हे ज्येष्ठ व्यक्तींचे असून ७ गट दिव्यांग व्यक्तींचे आहेत. तसेच स्वयंसहायता गटांचे गावपातळीवर संघटन म्हणून १२ ग्रामसंघांची स्थापना करण्यात आली आहे. स्वयंसहायता गटामध्ये प्रभागातील ४ हजार ८८४ कुटुंबांपैकी ४ हजार ३६१ कुटुंबांचे समावेशन करण्यात आले असून या कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये गटांना ‘उमेद’ अभियानामार्फत उपलब्ध करून देण्यात येणारा फिरता निधी आणि समुदाय गुंतवणूक निधी कर्ज स्वरुपात दिला जातो. तसेच उपजीविका निर्मिती आणि बळकटीकरणासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रभागामध्ये किशोरवयीन मुलींचे ३६ गट स्थापन करण्यात आले असून स्त्री-पुरुष समानता आणि वैयक्तिक आरोग्य या विषयांवर त्यांच्यासोबत जाणीवजागृतीचे काम करण्यात येत आहे. प्रभागातील २ हजार ७२६ कुटुंबांच्या शेती व बिगर शेती आधारित उपजीविका निर्मिती उदा. सेंद्रिय शेती निविष्ठा निर्मिती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, अन्न प्रक्रिया, डालळ मील इ. च्या बळकटीकरणासाठी तांत्रिक सल्ला व सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन इ. विभागांसोबत समन्वयातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. महिला, किशोरवयीन मुली आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या अनुषंगाने प्रभागामध्ये वैयक्तिक आणि सामुहिक पोषण परसबाग विकसन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यामध्ये ५२४ कुटुंबांनी पोषण परसबाग लागवड केली आहे. पंचायतराज संस्थामध्ये महिलांचा सहभाग  वाढविण्याच्या अनुषंगाने नवप्रभा प्रभागसंघ काम करत आहेत. प्रभागातील एकूण ७ महिला ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्या असून त्यापैकी २ महिला या सरपंच म्हणून काम करत आहे

            प्रभाग संघाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे उमेद अभियानातील महिलांचे मनोबल वाढले आहे. या पुढील काळात अभियानाला आणि राज्यातील इतर प्रभाग संघांना हा पुरस्कार दिशादर्शक ठरेल असे मत अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आले जागतिक महिला दिनाच्या मुंबईतील कार्यक्रमातही या प्रभाग संघाचा विशेष सन्मान करण्यात येणार आ हे.

0

















 

  

  

  

  

 00हे.त..हे.र


 


 


 


 


 


 



 


Featured post

Lakshvedhi