Thursday, 27 January 2022

 राज्यपालांच्या हस्ते संस्कृती जागरण मंडळाच्या सांस्कृतिक विशेषांकाचे प्रकाशन

‘स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासोबत वनवासी बांधवांचे संस्कृती रक्षणाचे कार्य समाजापुढे आणावे’ - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 26 : देशातील वनवासी, जनजाती व आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान जसे मोठे आहे, तसेच संस्कृती रक्षणाचे त्यांचे कार्य देखील महत्वाचे आहे. वनवासी बांधवांच्या शीघ्रतम विकासासाठी कार्य करताना त्यांचे संस्कृती रक्षणाचे कार्य देखील समाजापुढे आणले पाहिजे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.  

            संस्कृती जागरण मंडळ व जनजाती विकास मंचतर्फे ‘स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान’ या विषयावरील प्रजासत्ताक दिन विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २६) राजभवन, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

            कार्यक्रमाला जनजाती विकास मंचचे अध्यक्ष नरेश मराड, सांस्कृतिक वार्तापत्राचे सचिव शिरीष पदे, वार्तापत्राच्या व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर, रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे, अजय मुडपे व इतर निमंत्रित उपस्थित होते.

            स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक क्षेत्रात महिलांची प्रगती होऊन त्या पुढे आल्या. अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांची देखील प्रगती झाली. मात्र वनवासी बांधव विकासापासून अजूनही दूर आहेत. आजही अनेक आदिवासी भागांमध्ये रस्ते, दूरसंचार, वीज आदी सेवा पोहोचल्या नसून वनवासी बांधवांच्या विकासासाठी शीघ्रगतीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले. आदिवासींच्या विकासासाठी शासनासह सेवाभावी संस्थांनी देखील अधिक प्रयत्न केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

            ‘स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान’ या विषयावरील विशेषांक प्रसिद्ध करून संस्कृती जागरण मंडळाने राज्यातील तसेच देशातील अनेक ज्ञात व अज्ञात वनवासी बांधवांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची अभ्यासपूर्ण माहिती समोर आणल्याबद्दल राज्यपालांनी व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले. 

            मुकुंद कानडे यांनी यावेळी विशेषांकाची माहिती दिली तर नरेश मराड यांनी जनजाती विकास मंचची माहिती दिली. सांस्कृतिक वार्तापत्राचे कार्यवाह शिरीष पदे यांनी आभार प्रदर्शन केले.    

000

Wednesday, 26 January 2022

 Continue भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता आता 100

            मुंबई, दि. 25: नागपूरच्या नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 60 वरुन 100 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

            या आयुर्वेद महाविदयालयातील बी.ए.एम.एस. या नमूद आयुर्वेद या पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग यांनी निर्धारीत केल्यानुसार 100 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

000

 डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता आता 200

            मुंबई, दि. 25: अहमदनगरच्या डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज अँड हॉस्पीटलच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 150 वरुन 200 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

            या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 200 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

वृत्त क्र. 269

अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेजच्या

पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता आता 150

            मुंबई, दि. 25: धुळ्यातील साक्री रोड येथील अण्णासाहेब चुडामण पाटील मेमेारियल मेडिकल कॉलेजच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 100 वरुन 150 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

            या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 150 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

00000

वृत्त क्र. 270

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता आता 150

            मुंबई, दि. 25 : अमरावतीच्या शिवाजीनगर येथील डॉ. पंजाबराव उपाख्य देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 100 वरुन 150 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

            या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 150 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

0000


 



 Continue   पर्यटन सहसंचालक डॉ.सावळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विविध श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या राज्य पर्यटन पुरस्कारांची यादी

टूर ऑपरेटर्स : बेस्ट टूर ऑपरेटर (नॅशनल), बेस्ट टूर ऑपरेटर (इंटरनॅशनल), बेस्ट ट्रॅव्हल एजंट (महाराष्ट्र), बेस्ट टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (महाराष्ट्र), बेस्ट ॲडव्हेंचर टूर ऑपरेटर्स (महाराष्ट्र).

आदरातिथ्य : बेस्ट हॉटेल, बेस्ट हेरिटेज हॉटेल, बेस्ट इको-फ्रेंडली हॉटेल, बेस्ट इको-फ्रेंडली फॉरेस्ट/टेन्टेड अकोमोडेशन, बेस्ट होस्टेड अकोमोडेशन.

फुड अँड बेव्हरेज : बेस्ट होम डायनिंग, बेस्ट रेस्टॉरंट स्टँडअलोन, बेस्ट रेस्टॉरंट हॉटेल.

विविध श्रेणी : बेस्ट टुरिस्ट गाईड ऑफ महाराष्ट्र, बेस्ट अम्युझमेंट/ थीम पार्क्स, बेस्ट माइस सेंटर, स्पेशलाईज्ड टुरिझम सर्व्हिसेस, टुरिझम एज्युकेशन अँड ट्रेनिंग, बेस्ट थीम/ निचे टुरिझम ॲवॉर्ड.

गव्हर्नमेंट डिपार्टमेंट : मोस्ट टुरिस्ट फ्रेंडली नॅशनल पार्क/ सँक्चुरी, मोस्ट टुरिस्ट फ्रेंडली पिलग्रीमेज सेंटर (ट्रस्ट/ गव्हर्नमेंट बॉडी), बेस्ट सिव्हिक मॅनेजमेंट सिटी (म्युनिसिपल कॉर्पोरेशन), बेस्ट सिव्हिक मॅनेजमेंट सिटी (म्युनिसिपल कॉन्सिल/ नगर पालिका), बेस्ट व्हिलेज (ग्राम पंचायत).

डिजीटल टुरिझम ॲवार्ड : बेस्ट इन्फ्लुएन्सर ऑन सोशल मीडिया (युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक अँड ट्विटर), बेस्ट ट्रॅव्हल रायटर/ ब्लॉगर, बेस्ट महाराष्ट्र ट्रॅव्हल फोटोग्राफर, बेस्ट टुरिझम प्रमोशन इन प्रिंट मीडिया (न्युजपेपर/ मॅगझिन/ पब्लिकेशन), बेस्ट टुरिझम प्रमोशन इन डिजीटल मीडिया (न्यूजपेपर/ मॅगझिन/ पब्लिकेशन/ वेब पोर्टल), बेस्ट टुरिझम प्रमोशन इन इलेक्ट्रॉनिक मीडिया.

विविध टुरिझम टुरिस्ट सेगमेंट : सोशल इम्पॅक्ट इन टुरिझम ॲवार्ड, स्वच्छ पर्यटन प्रोजेक्ट ॲवॉर्ड ऑर चेंज मेकर्स ॲवॉर्ड, मोस्ट इनोव्हेटीव्ह/ युनिक टुरिझम प्रोडक्ट, बेस्ट वेलनेस सेंटर, बेस्ट मेडिकल टुरिझम फॅसिलिटी, बेस्ट टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, बेस्ट म्युझियम ॲवार्ड, बेस्ट टुरिझम डेस्टिनेशन प्रमोशन थ्रू मुव्ही/ वेब सिरीज/ डॉक्युमेंटरी इ., बेस्ट मोन्युमेंट ॲक्सेसिबल टू टुरिस्ट.

एक फेब्रुवारी पासून या श्रेणींमध्ये अर्ज करता येणार असून विजेत्यांना महाराष्ट्र दिनी पारितोषिके दिली जातील. याबाबतची अधिक माहिती पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.

 वैभवशाली, निसर्गसंपन्न महाराष्ट्राचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून

जागतिक नकाशावर झळकवण्यास पर्यटन विभाग सज्ज

                                                   - मंत्री आदित्य ठाकरे

राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची घोषणna

            मुंबई, दि. 25- महाराष्ट्रात सर्व प्रकारची पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. या वैभवशाली, निसर्गसंपन्न महाराष्ट्राचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक नकाशावर झळकवण्यास पर्यटन विभाग सज्ज असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पर्यटकांना सोयी सुविधांबरोबरच नाविन्यपूर्ण पर्यटनाचा अनुभव घेता यावा, यासाठी राज्याने विविध धोरणे आखली आहेत. पर्यटनवृद्धीसाठी शासनाबरोबरच विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचाही मोलाचा हातभार असतो, ही बाब विचारात घेऊन राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या औचित्याने त्यांनी विविध 39 श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची घोषणा केली.

            पर्यटन मंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते.

            पर्यटन मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, बीच शॅक, कॅरॅव्हॅन अशा विविध धोरणांच्या माध्यमातून राज्याने पर्यटन स्थळे अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांना राहण्यासाठी देखील होम स्टे, पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्टस् आदी पर्यायांतून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन पिढीच्या पर्यटकांचाही विचार करण्यात आला असून पर्यटक, बायकर्स, सायकलिस्ट यांच्यासह पर्यटन क्षेत्रात कार्यरत भागीदारांची मते जाणून घेऊन विविध धोरणे आखण्यात आली आहेत. कोविड मुळे पर्यटनात खंड पडला असला तरीही कोविडनंतरच्या काळासाठी विविध धोरणांच्या माध्यमातून शासन सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आता राज्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती जागतिक स्तरावर करून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

            पर्यटन राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या प्राकृतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक ठेव्याचे आपण जतन करीत आहोत. राज्याचा हा मौल्यवान ठेवा पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्यासाठी महत्त्वाची धोरणे आखली आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून वेळोवेळी मिळत आहे. राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने ‘ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी, थोर समाज सुधारक व क्रांतिकारक यांच्या ऐतिहासिक चळवळींचे, जन्मभूमीचे दर्शन येत्या काळात अधिक व्यापक माध्यमातून घडविण्या noचा प्रयत्न पर्यटन विभाग करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

            प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी पर्यटकांची आवड-निवड लक्षात घेऊन पर्यटन धोरणांमध्ये लवचिकता असणे आवश्यक असून त्यानुसार राज्याने विविध धोरणे आखली असल्याचे सांगितले. राज्यात असलेली विविध संग्रहालये हा माहितीचा खजिना असून पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

            पर्यटन संचालक श्री.बोरीकर यांनी पर्यटनाचे फायदे व देशाच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्राचे महत्त्व सर्वांना पटवून देणे तसेच राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने राष्ट्रीय पर्यटन दिनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. केंद्र सरकारमार्फत ‘आझादी का अमृत महोत्सव’ही साजरा केला जात आहे. यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना ‘ग्रामीण आणि समुदायावर आधारित पर्यटन’ ही असल्याने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नव्याने जाहीर झालेल्या कृषी, कॅरॅव्हॅन आणि साहसी पर्यटन धोरणाअंतर्गत नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पर्यटन संचालनालय समाजमाध्यमांद्वारे पर्यटनस्थळांविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.

            पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते यावेळी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणाअंतर्गत पहिली नोंदणी करण्यात आलेल्या ‘मोटोहोम’ संस्थेच्या सचिन पांचाळ यांचा, साहसी पर्यटन धोरणाअंतर्गत जमीन, हवा आणि पाणी अशा विविध क्षेत्रात नोंदणीद्वारे सहभागी झालेल्या वसंत लिमये, पुष्कराज आपटे, अनुपम अविनाश जाधव, चिन्मय दिवेकर, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर आय लव्ह महाराष्ट्र या नावाने सहा भागांचा कार्यक्रम केल्याबद्दल कर्ली टेल संस्थेच्या कामिया जानी वर्मा यांचा तसेच किल्ले पर्यटन वृद्धींगत करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी ‘बायकर्स क्लब’ ने 18 किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. यातील प्रतिनिधींचा देखील श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रिएट युवर ओन स्टोरी इन्फ्लुएन्सर कार्यक्रमाअंतर्गत सिद्धार्थ जोशी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या अंतर्गत एक लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले 100 इन्फ्लुएन्सर आगामी सहा महिने राज्यातील विविध पर्यटनस्थळी जाऊन पर्यटनस्थळांची माहिती सांगणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते यावेळी दोन कॅरॅव्हॅनला झेंडा दाखवून त्याचाही शुभारंभ करण्यात आला. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील ‘फ्रीडम मुव्हमेंट सर्किट’ मधील महत्त्वाची ठिकाणे आणि टूर ऑपरेटर्सची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

            पर्यटन सहसंचालक डॉ.सावळकर यांनी उपस्थितांचे

 


 राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती


            मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, दीपिका संजय चव्हाण, आभा विजयकुमार पांडे, उत्कर्षा रुपवते या सहा जणींची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात याबाबत 25 जानेवारी 2022 रोजी अधिसूचना प्रसिध्द झाली असून अधिसूचना प्रसिध्दी दिनांकापासून ही नियुक्ती तीन वर्षे कालावधी करीता आहे.

Featured post

Lakshvedhi