Tuesday, 25 January 2022

 आवडत्या चित्ररथाला आणि मार्चिंग तुकडीला मत देण्याची व्यवस्था

            नवी दिल्ली, 25 : यावर्षी डिजिटल नोंदणीव्दारे आपल्या आवडत्या चित्ररथाला आणि मार्चिंग तुकडीला मत देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्त राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात ब-याच अभिनव बाबींचा समावेश करण्यात आलेला. याचाच एक भाग म्हणून आणि सध्याची कोविड-19 ची पार्श्वभुमी बघता प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था कमी करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन माध्यमातून थेट प्रक्षेपण बघता येईल.

            थेट प्रक्षेपण बघण्यासाठी MyGov पोर्टलवर (https://www.mygov.in/rd2022/) नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. यासह प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या चित्ररथाला आणि मार्चिंग तुकडीला मतदान करता येईल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


०००००

 महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग नेहमीच अग्रेसर

 - महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

महिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी - विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            मुंबई, दि. 25 : महिला आयोग महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न करते. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कायदे आहेत. महिलांना उदभवणा-या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शनासाठी महिला आयोग नेहमीच महिलांच्या पाठिशी असतो, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

            लैगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणे, तसेच सामाजिक, घरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजना करणे, त्याचबरोबर महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            राज्य महिला आयोगाच्या स्थापनेस 29 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण केंद्रातील 'रंगस्वर सभागृहात' वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,पोलीस महासंचालक संजय पांडे, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी आदी उपस्थित होते.

            महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला आणि बालकांच्या सशक्तीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी महिला व बालविकास विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याद्वारे महिला आणि बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला बचतगट मोहिमेचे बळकटीकरण करणे व महिला बचत गट भवन निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नविन सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच येणार असून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे शासनाचे ध्येय आहे. नोकरी, व्यवसाय करणारी स्त्री स्वत:च्या पायावर उभी असते मात्र ग्रामीण महिला तसेच गृहिणींनाही आर्थिक समस्या भेडसावतात. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उभी राहिलेली बचत गटांची चळवळ निश्चितच महिलांना संघटित होऊन आर्थिक समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. समाजामध्ये सकारात्मक बाबी घडत असतानाच काही विकृतीदेखील दिसून येतात. बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, ॲसिड हल्ला अशा घटना घडतात.अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस दल नेहमी तत्पर असते. मात्र, समाज म्हणून आपण सर्वांनी अशा घटनांबाबत चिंतन केले पाहिजे, असेही ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'शक्ती फौजदारी कायदे सुधारणा' विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. एकल महिलांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पत्नींना ओळखपत्र यासारख्या विविध मागण्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणा-या महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य महिला आयोग यांना निधी द्यावा. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2020 ते 2030 ही दहा वर्ष ‘डिकेड ऑफ ॲक्शन’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शाश्‍वत विकासासाठी कृती करायची आहे.महिलांना त्यांचे प्रश्न कुठे मांडायचे याची माहिती झाली पाहिजे. प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी स्वच्छतागृह असले पाहिजे. राज्य महिला आयोगाने समुपदेशन केंद्र सुरू करावे,असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात समाजकारणात व राजकारणात महिलांचे मोठे योगदान आहे. पूर्वीच्या काळी महिलांना समान अधिकार मिळत नव्हते. कोणत्याही सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातूनच होते. जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

            महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावेळी महिलांच्या सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा पथक, भरारी पथक, बिट मार्शल यांची माहिती दिली.

            या कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री 155209 क्रमांकाचे तसेच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महिलांसाठीचा हा टोल फ्री क्रमांक लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            या कार्यक्रमास महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा श्रीमती प्रियांका सावंत, श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर, महिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव अ.ना. त्रिपाठी,तसेच महिला आयोगाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तर आभार दीपा ठाकूर यांनी मानले.

000

वृत्त क्र. 252

महिला सक्षमीकरणासाठीच्या योजनांना मिळणार

ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य  

- महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

            मुंबई, दि. 25 :- महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध उपक्रम राबविते. हे उपक्रम राबविण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार आहे,असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

            ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन यांनी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी महिलांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

            महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. कोव्हीड काळात महिला व बालविकास विभागाने अनाथ बालके,विधवा महिला यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले. कोव्हीड काळात अंगणवाडी ताईंनी केलेल्या कौतुकास्पद कामाबद्दल ही माहिती त्यांनी दिली.

            महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 3 टक्के निधी कायमस्वरूपी महिला व बालविकास विभागासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे तसेच त्यांनी ई-बिजनेस प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

            कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन म्हणाले, महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करण्यात येईल. महिला सबलीकरण तसेच महिलांचे विविध प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी ऑस्ट्रेलिया वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळेल, असेही श्री. ब्राऊन यांनी सांगितले.

0000



 

                         राष्ट्रीय मतदार दिन

लोकशाही परंपरांचे जतन आणि निवडणूकांचे पावित्र्य राखण्याची

मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

            मुंबई, दि. 25 :- लोकशाही परंपरांचे जतन आणि निवडणूकांचे पावित्र्य राखण्याची शपथ आज मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही शपथ दिली.

            मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने कोविड-19 बाबत सर्व शासकीय नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, उपनिवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

             “राष्ट्रीय मतदार दिवस” 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. त्याअनुषंगाने 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरूण मतदारांचा यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रकियेत सहभाग वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने सर्व शाळा व शैक्षणिक संस्थामध्ये वादविवाद स्पर्धा, प्रारूप मतदान, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी आयोजित करून लोकशाही व मतदाराचा सहभाग यांचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.

            25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि म्हणून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करावा, असे निश्चित करण्यात आले. सन 2011 पासून राष्ट्रीय, राज्य, राज्य मुख्यालय, जिल्हा आणि मतदार संघ अशा सर्व स्तरांवर हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.

            मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला अथवा दबावाला बळी न पडता आपले प्रतिनिधी निवडावेत त्याचबरोबर आपल्या देशातील निवडणूक प्रक्रिया जाणून घ्यावी, पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करावी यासाठी मतदार जागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने संपूर्ण वर्षभर मतदार जागृती (Systematic Voter Education and Electoral participation) म्हणजेच स्वीप कार्यक्रम राबविण्यात येतो. त्याचा एक भाग म्हणून ‘लोकशाही भोंडला’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातून जवळपास 500 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात मंत्रालयातील महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला होता. यापैकी काही गटाने सांघिक बक्षिसेही पटकावली. त्यातील काही विजेत्या संघांचा प्रातिनिधिक स्वरुपामध्ये मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन कणिका जाधव यांनी मानले.

0000

वृत्त क्र. 246

राजधानीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

            नवी दिल्ली 25 : महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

            महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त डॉ. निरूपमा डांगे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसा‍निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना लोकशाही परंपरांचे जतन आणि निवडणूकांचे पावित्र्य राखण्याची शपथ दिली.

            याप्रसंगी राजशिष्टाचार व गुंतवणुक आयुक्त निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

            12 वा राष्ट्रीय मतदार दिवस महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरा करण्यात आला.

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी कर्मचा-यांना राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ दिली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

0000




 26. विजय उत्तम भोग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर

27. पांडुरंग पंढरीनाथ निघोट, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नवी मुंबई

28. राजेंद्र कृष्ण चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर

29. अनिल पांडुरंग भुरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. भंडारा

30. संजय एकनाथ तिजोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर,

31. रविकांत पांडुरंग बडकी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी यवतमाळ

32. अल्ताफ मोहिउद्दीन शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर

33. सत्यनारायण कृष्णा नाईक, सहायक पोलिस निरीक्षक, सीपी मुंबई शहर

34. बस्तर लक्ष्मण मडावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी गडचिरोली

35. काशिनाथ मारुती उभे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एटीएस पुणे

36. अमरसिंग वसंतराव भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसीबी कोल्हापूर

37. आनंदराव गोपीनाथ कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी सांगली

38. मधुकर हरिश्चंद्र पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर

39. सुरेश मुरलीधर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नागपूर शहर

40. लहू मनोहर राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर

        आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

 महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदक

            नवी दिल्ली, दि. 25 : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ,7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

           प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण 939 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 88 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक' (पीपीएम), 189 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 51 पदक मिळाली आहेत.

            देशातील 88 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.     

चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम)

1.विनय महादेवराव करगावकर,अतिरिक्त पोलीस महासंचालक (पीसीआर), जुने कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई महाराष्ट्र

2. प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट एसआरपीएफ, गट 6, धुळे

3.चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक पीटीसी नानवीज, दौंड, पुणे

4.अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक एस.पी, नांदेड

       राज्यातील एकूण सात पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

 1. गोपाळ मनिराम उसेंडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

 2. महेंद्र गानु कुलेटी, नाईक पोलीस हवालदार

3. संजय गणपत्ती बकमवार, पोलीस हवालदार

4. भरत चितांमण नागरे, पोलीस उपनिरीक्षक

5. दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलीस हवालदार

6. निलेश्वर देवाजी पड, नाईक पोलीस हवालदार

7. संतोष विजय पोटवी, पोलीस हवालदार.

राज्यातील एकूण 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’

1. राजेश प्रधान, विशेष पोलीस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, दादर मुंबई

2. चंद्रकांत महादेव जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, सीपी मीरा भाईंदर, वसई विरार

3. सीताराम लक्ष्मण जाधव, पोलीस उपअधीक्षक (वायरलेस), एडीजीपी आणि संचालक कार्यालय (संपर्क आणि वाहतूक), पुणे

4. भारत केशवराव हुंबे, पोलीस निरीक्षक, ए.सी.बी. परभणी

5. गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर

6. अजयकुमार सूर्यकांत लांडगे, पोलीस निरीक्षक, सीपी नवी मुंबई 

7. जितेंद्र यशवंत मिसाळ, पोलीस निरीक्षक सी.पी. मुंबई

8. विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा, पोलीस निरीक्षक एस.पी.सी.आय.डी. नागपूर

9. जगदीश जगन्नाथ कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सी.पी., नवी मुंबई

10. सुरेंद्र गजेंद्र मलाले, पोलीस निरीक्षक सी.पी. औरंगाबाद शहर

11. प्रमोद हरिराम लोखंडे, सहायक कमांडंट, एसआरपीएफ गट 4, नागपूर

12. मिलिंद गणेश नागावकर, सहायक पोलीस निरीक्षक,मुख्य गुप्तचर अधिकारी,एसआयडी. मुंबई

13. शशिकांत दादू जगदाळे, पोलीस निरीक्षक सीपी, मुंबई शहर

14. रघुनाथ रामचंद्र निंबाळकर,सहायक पोलीस निरीक्षक, सी.पी. मुंबई शहर

15. संजय अण्णाजी कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी नाशिक शहर

16. राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल, पोलीस उपनिरीक्षक, सी पी नागपुर शहर

17. प्रकाश भिला चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर

18. नंदकिशोर शांताराम सरफरे, पोलीस उपनिरीक्षक सी.पी मुंबई शहर

19. राजेश रावणराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक, एसपी परभणी

20. शिवाजी विठ्ठल देसाई, पोलीस उपनिरीक्षक सी.पी. मुंबई शहर

21. राजाराम धर्मा भोई, पोलीस उपनिरीक्षक, एसपी जळगाव

22. देवेंद्र परशराम बागी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर

23. संभाजी सुदाम बनसोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. सातारा

24. बबन नारायण शिंदे, चालक, सहा. पोलीस उपनिरीक्षक, एच.एस.पी.एस.पी. कोल्हापूर

25. पांडुरंग लक्ष्मण वांजळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर



 महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

            नवी दिल्ली, दि. 25 : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

           प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाने आज उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या एकूण 42 अधिकारी -कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये ‘अग्निशम सेवा पदक’ जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

        बाळू देशमुख यांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’

       अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मराणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. तर मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे.

                                     राज्याला पाच ‘अग्निशमन सेवा पदक’

              उत्कृष्ट सेवेसाठी राज्यातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. यात मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील आणि संजय म्हमूनकर तसेच अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचा समावेश आहे. 

              देशभरातील अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या अग्निशमन सेवा पदकांमध्ये एक ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, शौर्यासाठी दोन ‘अग्निशमन सेवा पदक’, विशिष्ट सेवेसाठी नऊ ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ आणि उत्कृष्ट सेवेसाठी 30 ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.                

        अधिक माहितीसाठी http://twitter.com/MahaGovtMic यावर भेट द्यya






Buster dose ka asar

 


Featured post

Lakshvedhi