Tuesday, 11 January 2022

Balpujarin


 

Jai hind

 *एका सरकारी शाळेतील हे शिक्षक आहेत .. बापरे !😭*

*त्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती संपत्ती कमवली होती ते निवृत्तीच्य दिवशी उघडीस आली ..😢


*

 मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटीमुळे नुकसान झालेल्यांना

भरपाई संदर्भात लवकरच निर्णय घेणार

- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 10 : कोल्हापूर जिल्ह्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात पाणी गळतीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात शासनस्तरावर नुकसान ग्रस्तांना लवकरच भरपाई देणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

             मंत्रालयातील दालनात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प अचानक फुटल्याने झालेल्या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाई मिळण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.    

           मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने लघु पाटबंधारे प्रकल्प भरलेले होते. तसेच मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पात १ सप्टेंबर २०२१ रोजी गळती सुरू झाली या पाणीगळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतीत सर्व वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्राप्त असून प्राप्त पंचनामे तसेच माहितीनुसार आपद्ग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

               आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला होता. १ सप्टेंबर २०२१ रोजी या धरणाला गळती सुरू झाली. या धरणफुटीमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पाणी विसर्गामुळे या पंचक्रोशीमधील शेकडो एकर जमीन खरबडून गेली. पाण्याच्या गाळामुळे विहिरी, मोटारपंप, पाईपलाईन, विजेचे खांब, ट्रान्सफार्मर यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कालावधीत २० ते २५ खेड्यांचे दळणवळण पुर्णपणे ठप्प होते. यामध्ये एक महिला मृत्यूमुखी पडली दुधाळ जनावरेही मृत पावली आहे. आपद्ग्रस्तांना तातडीने नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली.  

तुळशी प्रकल्पबाधीत जवाहर भोसले यांच्या मागणीबाबतीत सकारात्मक निर्णय

            तुळशी प्रकल्पासाठी श्री जवाहर भोसले यांची सहा हेक्टर ४७ आर जमिन संपादित करण्यात आली होती.हे संपादन चुकीच्या पद्धतीने झाल्याचे श्री.भोसले यांचे म्हणणे आहे. त्याबदल्यात त्यांनी मंजूर झालेली सहा हेक्टर ४७ आर जमिन मिळण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत सर्व संबधितांच्याकडून माहिती घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बैठकीत सांगितले.

*****


 

 पालघर जिल्ह्यातील लाभार्थींनी

जात पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 11: आदिवासी विकास विभागांतर्गत पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे कामकाज दि. 6 जानेवारी 2022 पासून सुरु करण्यात आले आहे. या तपासणी समितीमार्फत जात पडताळणी करण्यासाठी अर्ज स्विकारण्याचे, वैधता प्रमाणपत्र देण्याचे तसेच इतर प्रशासकीय कामकाज करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व लाभार्थीनी सह-आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पालघर विभाग, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, वर्ग-4 चे कर्मचारी निवासस्थान, बिडकोनाका कचेरी रोड पालघर (पश्चिम)-401404, या पत्त्यावर संपर्क साधावा, असे सह आयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार

- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

            मुंबई, दि. 10 : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

            शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, राज्यामध्ये इ.पहिली ते बारावीच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. इयत्ता दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

            सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाईन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देश प्रा.गायकवाड यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

00000



 राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

'कर्मयोद्धा- राम नाईक ' पुस्तकाचे प्रकाशन

            मुंबई, दि. 10 : उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची आत्मकथा मांडणाऱ्या चरैवेति! चरैवेति!! या लेखसंग्रहावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित 'कर्मयोद्धा- राम नाईक' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्री.कोश्यारी यांनी केले.

               राजभवन येथील बँक्वेट हॉलमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री.कोश्यारी बोलत होते. या प्रकाशन सोहळ्याला माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाल शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार मंगलप्रभात लोढा, नवभारत टाइम्सचे संपादक शचिन्द्र त्रिपाठी, पुस्तकाचे प्रकाशक आनंद लिमये, विधिमंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, 'कर्मयोद्धा राम नाईक' हे पुस्तक प्रेरणादायी आहे. श्री.नाईक यांनी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळविलेले यश हे देशासाठी मार्गदर्शक‍ आहेत. श्री.नाईक यांनी त्यांचे जीवन जनतेच्या सेवेत समर्पित केले आहे. विशेषत: कुष्ठरोग पिडितांसाठी सातत्याने लढा देवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनावर आधारित 'कर्मयोद्धा राम नाईक' हे पुस्तक प्रकाशित होत आहे. याचा आनंद होत आहे. श्री.नाईक यांनी देशनिर्माण कार्यात दिलेले योगदान नक्कीच वाखाणण्यासारखे आहे. अशाच प्रकारे नव्या पिढीने देखील एकत्रित येवून काम करावे. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे प्रेरणादायी कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावे, अशा शुभेच्छा श्री.कोश्यारी यांनी यावेळी दिल्या.

            पुस्तकाविषयी राम नाईक म्हणाले, उत्तरप्रदेश राज्याचे राज्यपाल असताना कर्मयोद्धा हे पुस्तक उत्तरप्रदेशातील अवधनामा या उर्दू वृत्तपत्राचे संपादक वकार रिझवी यांनी लिहिले. कोरोना महामारीमुळे या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये खंड पडला होता. या महामारी दरम्यान रिझवी यांचे निधन झाल्यामुळे या पुस्तक निर्मितीची जबाबदारी घेऊन ते पूर्णत्वास नेले. 'कर्मयोद्धा' पुस्तकाचे मराठी व्यतिरिक्त 11 भाषेत अनुवाद करण्यात आले असून याचे विशेषतः जर्मन, पारशी आणि अरबी या तीन भाषेतही अनुवाद करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ब्रेल लिपीतही हे पुस्तक उपलब्ध आहेत. 'कर्मयोद्धा' या पुस्तकाचे तीन खंड आहेत. यात माजी राज्यपाल राम नाईक यांच्या लेख संदर्भातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री, खासदार यांच्या भाषणांच्या संग्रहांचा समावेश करण्यात आला आहे. हे पुस्तक नव्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असेही श्री.नाईक यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार मंगलप्रभात लोढा, नवभारत टाइम्स संपादक शचिन्द्र त्रिपाठी, प्रकाशक आनंद लिमये यांनी मनोगत व्यक्त केले.

 कोरोना भी एक अजीब नमूना है 👇


डॉक्टर और एक व्यक्ति की बातचीत


व्यक्ति :- अगर कोरोना निगेटिव आया तो ?

डॉक्टर :- मास्क लगाओ, सोशल डिस्टेंसिंग रखो ।

व्यक्ति :- अगर पॉज़िटिव आया तो ?

डॉक्टर :- तो भी यही करना है ।


व्यक्ति :- पोज़िटिव हो तो कहां रहना है ?

डॉक्टर :- घर पर ।

व्यक्ति :- और निगेटिव हो तो ?

डॉक्टर :- तो भी घर पर ।


व्यक्ति :- अगर निगेटिव आया तो क्या लें ?

डॉक्टर :- विटामिन बी, सी, हल्दी वाला दूध इम्युनिटी के लिए ।

व्यक्ति :- अगर पॉज़िटिव आया तो ?

डॉक्टर :- तो भी यही लेना है ।


व्यक्ति :- जब दोनों में एक ही करना है तो टेस्ट क्यों करवायें ?

डॉक्टर :- अजीब हो, टेस्ट के बिना पता कैसे चलेगा कि पॉज़िटिव हो या नेगेटिव !


 😝😝🙃😂😂

 आप चाहे इसे मजाक समझिए पर सच्चाई यही है ।

                😄😄😄😄

Featured post

Lakshvedhi