Tuesday, 16 November 2021

 तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणार

- कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

·        स्टार्टअप प्रदर्शनातून तरुणांमधील संशोधन, नवसंकल्पनांना मिळाली चालना

·        साधारण ५० स्टार्टअप्स, ७० हून अधिक गुंतवणूकदारांचा सहभाग

 

            मुंबई, दि. 15 : नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo - VC Mixer) हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रदर्शनात ५० स्टार्टअप्ससह साधारण ७० हून अधिक गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला. तरुणांनी शोधलेल्या विविध स्टार्टअप्सच्या नवनवीन संकल्पनांची गुंतवणूकदारांनी पाहणी केली व त्यामध्ये गुंतवणुकीत स्वारस्य दाखविले. तरुणांमधील संशोधन, नवसंकल्पना यांना चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.   

            हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथुन जॉन, सिकोया कॅपिटल इंडियाच्या मुख्य सार्वजनिक धोरण अधिकारी श्वेता राजपाल-कोहली आदी मान्यवर उपस्थित होते. ­

            Startup Expo - VC Mixer च्या माध्यमातून स्टार्टअप्स व गुंतवणूकदार यांना एकमेकांशी जोडणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ सप्ताहातील पन्नासहून अधिक विजेत्या स्टार्टअप्सना संभाव्य निधी उभारणीसाठी आघाडीच्या स्टार्टअप गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची संधी आजच्या या प्रदर्शनातून मिळाली. यामध्ये Blume Ventures, Avanaa Capital, Sequoia Capital India, Equanimity, IvyCap Venture Advisors, १००X, Indian Angel Network, Tomorrow Capital, Mumbai Angels, Asha Impact, Ankur Capital, Venture Catalysts, Artha Ventures, Ah! Ventures, Lead Angels, Marico Innovation Foundation, IDBI Capital, Majority Fund, Social Alpha यांसारख्या नावाजलेल्या स्टार्टअप गुंतवणूकदारांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

            कौशल्य विकास मंत्री श्री. मालिक यावेळी म्हणाले, स्टार्टअप्सला प्रोत्साहनासाठी विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्टार्टअप सप्ताहातून पुढे आलेल्या संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांना १५ लाख रुपयांची शासकीय कामे देण्यात येत आहेत. नविन संकल्पनांना पेटंट मिळविण्यासाठी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या क्षेत्राला अजून पाठबळ देण्यासाठी बीकेसी येथे जागतिक दर्जाचे इनक्युबेशन सेंटर चालू करण्यात येईल. स्टार्टअप्सना ग्रामीण, तालुका, जिल्हा पातळीवरही प्रोत्साहन देण्यात येईल. महिला उद्योजकतेला चालनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्टार्टअप्स व गुंतवणूकदारांना जोडून स्टार्टअप्सना त्यांच्या कल्पनांचे मोठ्या उद्योगात रूपांतर करण्यासाठी Startup Expo – VC Mixer हा उपक्रम फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या, भारतातील काही सर्वात मोठ्या स्टार्टअप्सच्या यशोगाथांचे  मूळ महाराष्ट्रात आहे, ज्या आज जागतिक स्तरावरही आपल्या यशाची पताका झळकवत आहेत. राज्य शासन आणि स्टार्टअप परिसंस्थेतील भागधारक  यांच्या संयुक्त भागीदारीने पारंपरिक तसेच नवीन काळातील क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची मोठी क्षमता आहे. प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सच्या क्षमता बांधणीसाठी सिकोया इंडियाचा “सर्ज” उपक्रम व त्याची मार्गदर्शक पुस्तिका अतिशय उत्तम आहे. सर्वसमावेश पाठबळामुळे महाराष्ट्रातून येत्या काळात जास्तीत यशस्वी स्टार्टअप्स निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

            नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह म्हणाले,  महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत विजेत्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन, सेवेच्या प्रकल्पांची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोजिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी १५ लाख रुपयांचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात.  यामध्ये कृषी, आरोग्य सेवा, स्वच्छ ऊर्जा, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, प्रशासन, शिक्षण आणि कौशल्य या क्षेत्रांचा समावेश आहे. या वार्षिक उपक्रमाच्या आजवर चार आवृत्या आयोजित केल्या गेल्या असून विजेत्या स्टार्टअप्सचे काम विविध विभागांसोबत चालू आहे. आज आयोजित प्रदर्शनातून या स्टार्टअप्सना नामांकीत गुंतवणूकदारांसमवेत चर्चा करण्याची संधी मिळाली असून यातून तरुणांमधील संशोधनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिकोया कॅपिटल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सच्या क्षमता बांधणीसाठी “Surge - Founder Starter Pack” या मराठीतील  पुस्तिकेचे प्रकाशन झाले. पुस्तिकेतील स्टार्टअप यशस्वीतेची मूलभूत तत्वे महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील उद्योजकांना उपयोगी ठरणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती www.surgeahead.com या संकेतस्थळावर उपलब्ध

Sunday, 14 November 2021

Jai ho


 


 


 

 बालगोपाळांच्या ‘कट्टी – बट्टी’ने राज्यपाल प्रभावित

राज्यपालांच्या हस्ते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान

उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

संगीतकार ओंकार घैसास, दिग्दर्शक जयंत पवार, अनुश्री फडणीस, प्रकाश पारखी

राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

            मुंबई, दि. १४:    लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंब, समाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या 'गंधार' कला संस्थेतर्फे  लहान मुलांच्या 'कट्टी बट्टी' या कार्यक्रमाचे  तसेच 'गंधार गौरव' पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.   

            बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            आमदार आशिष शेलार, आमदार संजय केळकर,  ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की  व गंधारचे अध्यक्ष मंदार टिल्लू व्यासपीठावर उपस्थित होते.

            संगीत, कला, नाट्य या गोष्टींचा ज्याला गंध नाही अश्या व्यक्तीला विना शेपटीचा पशु संबोधले जाते, या अर्थाच्या सुभाषिताचा उल्लेख करून संगीत व नाट्यात दुःख विसरायला लावण्याची ताकत आहे, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.  

            'कट्टी बट्टी' या कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केलेल्या बालभारती पुस्तकातील बडबडगीतांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली व बालनाट्य चमूला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

            बालप्रेक्षक हा महत्वाचा प्रेक्षक आहे व त्याचे पुढे सादर करणे आव्हानात्मक काम असते. करोनाचे निर्बंध संपल्यावर आपण पुन्हा बालनाट्य घेऊन रसिकांपुढे येऊ, असे अतुल परचुरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक जयंत पवार, निवेदिका अनुश्री फडणीस, संगीतकार ओंकार घैसास व प्रकाश पारखी यांना गंधार युवा गौरव पुरस्कार देण्यात आले.

            गंधार ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून कार्य करीत असून संस्थेने १०० च्या वर बालनाट्य सादर करून त्याचे हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.   

 

Applauds Children’s theatre on Bal Din

Maha Governor presents Gandhar Gaurav Puraskar to Atul Parchure; senior actor Usha Nadkarni is honoured with Jeevan Gaurav Puraskar

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari applauded children’s musical performance and acknowledged the role of children’s theatre in shaping the personality of children at a function held at Raj Bhavan, Mumbai on Sunday (14th Nov).

The Governor also presented the Gandhar Gaurav Puraskar for 2021 to theatre and film personality Atul Parchure and gave the Lifetime Award to actress Usha Nadkarni for her contribution to theatre.

The Children’s programme and the awards presentation function was organized by Gandhar Arts, an organization promoting children’s theatre at Raj Bhavan Mumbai.

MLA Ashish Shelar, MLA Sanjay Kelkar, music composer Ashok Patki and Chairman of Gandhar Art Mandar Tillu were present. 

The Governor also presented the Gandhar Yuva Gaurav Puraskars to director Jayant Pawar, Anushree Fadnis, musician Omkar Ghaisas and theater personality Prakash Parkhi.

0000

 राज्यात ऑक्टोबरमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार

          कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

 

            मुंबई, दि. १४: कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये १९ हजार ६४८ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

            अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर अखेर १ लाख ४७ हजार ८८१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

            मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

            विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ९०८ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

मुंबईत ऑक्टोबरमध्ये ७ हजार ६८६ बेरोजगारांना रोजगार

            मंत्री श्री. मलिक म्हणाले की, माहे ऑक्टोबर २०२१ मध्ये विभागाकडे ५१ हजार ८६२ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ११ हजार ६९५, नाशिक विभागात ९ हजार ३९३, पुणे विभागात १३ हजार ९८४, औरंगाबाद विभागात ८ हजार ६७२, अमरावती विभागात ५ हजार ०७१ तर नागपूर विभागात ३ हजार ०४७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

            माहे ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १९ हजार ६४८ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ७ हजार ६८६, नाशिक विभागात ४ हजार ००४, पुणे विभागात ४ हजार ७४२, औरंगाबाद विभागात २ हजार ३७४, अमरावती विभागात ४८४ तर नागपूर विभागात ३५८ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.


 

Featured post

Lakshvedhi