Wednesday, 6 October 2021

Haaaaaaa

Kakkav agri samajacha padht

 ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

आगरी समाजातील

*खावाची पित्रा*

                 ...डाॕ.संजीव म्हात्रे.

      *"काव काव काव"* चा जणू गजरच घूमत होता. चिल्ल्यापिल्यांनी तर अगदी बेंबीच्या देठापासून काव काव सुरु केली होती. प्रत्येक घरात लगबग दिसत होती ती छपरावर "पित्रांचं पान" ठेवण्याची. गावं आगरी-कोळ्यांची असल्याने शांततेतला सण दुर्मिळच. "सर्वपित्री अमावस्या", खरं तर हा सण शांततेतच साजरा होणारा सण, शहरात अगदी कावळ्यालाही ऐकू येणार नाही एवढीच काव काव. पण आगरी समाजात हा एक मोठा सण म्हणून साजरा केला जातो. *"खावाची (खायची) पित्रा"* म्हणूनही या सणाला त्यांनी लाडिक नाव दिलं आहे. खरं आहे, कारण पित्रांसाठी तयार होणारं हे ताट पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटणार नाही ते फक्त खवैय्येगीरी जीभेवर नसणाऱ्यांनाच.

   घराच्या पडवीला "निसन" (बांबूपासून बनलेली शिडी) लावून दादूस पित्रांचं पान (ताट) घेवून छपरावर चढला होता. खाली अंगणातील आगरी कुटुंबातील प्रमुख त्याला पान ठेवायची योग्य जागा दाखवत होते तर आयव लहानग्यांना सणाचं महत्व सांगत होती. "आथा आपले सर्गान जेलेलं डोखरं आज्जूस नं डोखऱ्या आज्जीस्सा आजचे दिसाला कावलं बनून भूकेलं येतान, मंग आपून त्यांना चांगला-चूंगला बनवून सकालचेपारा यो पित्रांचा पान वारून कौलावर ठेवतून. त्यावं टोकी(चोच) मारली, का मंग या सगला तुमाला हं." दादाने छपरावरून काव काव सुरू केली. मग खालच्या मंडळींनी पण त्याला साथ दिली. *"काव काव करा रं, मंग बगा नातवापतवासांना बगावला पित्रा कशी धावली येतीन."* केवढी ही भाबडी समजूत, परंतु तितकीच विरलेल्या आठवणींना उजाळा देणारी. पुन्हा कधीही फिरून न येणाऱ्या आपल्या माणसांचं मनात अस्तित्व टिकवण्याची. काकरूपी का होईना पूर्वजांची काल्पनिक भेट घेण्याची. याला अंधश्रद्धा म्हटल्यास पुर्वजांच्या पूनर्भेटीचा हा मार्ग बंद व्हावा असं कुणालाच वाटणार नाही.

   आगरी समाजात अगदी घराघरात या सणाची तयारी जोरात सुरु असते. मासे खाण्यात पटाईत या समाजात आपल्या पित्रांच्या पानावर खाजणातून (समुद्रालगतची मासे पकडण्याची पाणथळी) स्वतः पकडून आणलेल्या माशांचा "निसोट" (कालवण) वाढणं हे जणू अपरिहार्य आहे असाच काय तो माहोल पहाटेस सर्वच गावांमधे असे. अधुनिक युगात मात्र तो रस्ता खाजणाकडे न जाता मच्छीमार्केट कडे जाताना पहायला मिळतो. पित्रांची ती पहाट जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यच भासावे. गावातील लहान थोर आपल्या पारंपारिक वेशात अर्थात मासेमारी म्हटलं की अंगात फक्त बंडी आणि कमरेला "नंगोटा" (मोठ्ठा त्रिकोणी आकाराचा लंगोट) आणि खांद्यावर आसू (मासे पकडण्याचे जाळे), पाग, येंडी घेऊन गावापासून दूरवर असलेल्या खाजणात युद्धाला निघाल्याच्या आवेशात झपाझप पावलं टाकीत आक्रमण करीत. एकापाठोपाठ झुंडीच्या झुंडी खारींकडे (समुद्रकिनाऱ्यालगतची शेती व पाणथळी) कुच करीत. सराईत खाजणदार भराभर मासे पकडून कंबरेला बांधलेल्या डोंबली(बांबूपासून विणलेली गोलाकार लहान आकाराची हंडी)मधे टाकीत असे तर नवखे मात्र यथेच्छ पाण्यात व चिखलात चिंब होऊन या अनोख्या परवणीची मजा घेत. करफाल(मोठी कोळंबी), खऊल मासा, चिवना मासा, पेंदूरली(लहान आकाराचे खेकडे), चिंबोरी आणि जर कोणी नशीबवान असेल तर दुर्मिळ मासा जिताडा घेऊन घराकडे परतत.

    बऱ्याच आगरी गावांमधे लोकांनी स्थापन केलेल्या वेशीवरील वा दूरवरील शेतांमधील दैवतांनाही या दिवशी नैवेद्य दाखवला जाई. पूर्वी उन्हातान्हात, वादळा-पावसात, थंडी-वाऱ्यात हे लोक शेती, आगर, खाजण अशा ठिकाणी कामे करीत. *आपल्या रक्षणास त्यांनी या दैवीशक्ती स्थापित केल्या होत्या व त्या देवतांची नावेही त्यांनीच ठेवली होती. या दैवीशक्तींची आजही पुजाअर्चा होत असते. भूत अर्थात भिती, या संकल्पनेतून भूताखेतांचा संहार करणाऱ्या या शक्ती त्यांना निर्भिड बनवतात.*

    पित्रांचं पान छपरावर होतं तरी त्यातले पदार्थ सर्वांच्या सहनशिलतेची परिक्षाच पहात होते. सरासरी काढली तर क्वचितच ही कावळेसदृश पित्र तत्परतेने पानावर चोच मारीत अन्यथा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव ठसठशीत होईस्तवर ते पानाजवळ येत नसत. कोणीतरी कानात पुटपुटले, *"पयले धारंची हान, मंग बग कसं धावलं येतीन."* त्याकाळी बऱ्याच प्रमाणात आगरी पुरूषांमधे त्यांच्या व्यवसायातील श्रमांमुळे उत्तेजक द्रव्य अर्थात दारू पिण्याचं व्यसन अंगवळणी पडे. थंडी वा पावसात थरथरणाऱ्या शरीराला उभारी मिळण्यासाठी विडीचा आसरा घेत. तेंव्हा गरज म्हणून केलेलं व्यसन व आत्ताच्या पिढीत फॕशन म्हणून केलेलं व्यसन हळूहळू या समाजाच्या चिंतेचं कारण बनत चाललय हे मात्र खरं. आबवनी हा इंतजाम आधीच केला होता. वाटीत सोमरस आणून पानाजवळ ठेवला आणि पुन्हा सर्वांनी काव काव सुरू केली. आयव लहान मंडळींची समजूत काढी, "तो बग, ते निमाचे झारावर बसलाय नं तो आजूस, बग आथा वलखील आपलेला न यईल घास खावाला. मिनी सगला "रांदलाय"(स्वयंपाक बनवणे), पानगे(तांदळाच्या पिठात गुळ मिसळून तळलेले चपटे गोलाकार पानगे) नं आबारांच्या(परसातील) चवलीच्या शिंगा(शेंगा) उकरून पानान ठेवल्यान, नं त्यांचे आवरीची खीर केलीय." *आगरी समाजात ह्या तांदळाच्या खिरीचा सुगंध अगदी घराघरातून दरवळत असतो.* आजही प्रत्येक घरात अविट गोडीची ही तांदळाची खीर सणांतील पक्वान्नाचा अविभाज्य भाग बनून राहीली आहे. खीरीची ही पाककृती गावागावात व घराघरात विविधतेने नटलेली दिसते, आजच्या अन्नपूर्णेनेही ही कला आत्मसात केलेली पहायला मिळते.

   कावळा पानाला शिवायला वेळ लागला तर कुटुंबातील बुजुर्ग मंडळींच्या जीवाची घालमेल होई. नानाविध शंकांचं काहूर मनात उठे. काही चुकलं असेल तर माफ कर म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या चूकांचं समर्थन करण्यास चूकत नसे. *श्रद्धा असो वा अंधश्रद्धा परंतू यापुढे जीवनात चांगलं वागण्याचा दृढनिश्चय करायला लावणारा हा सण नक्कीच श्रद्धेपलिकडला समजायला हरकत नाही.* योगायोग जुळला आणि कावळ्याने पानातील पदार्थावर चोच मारली आणि एकच कल्ला झाला, *"पित्रांनी पान उष्टवला, चला वारा(वाढा) रं पत्रावली".*

डाॕ.संजीव व्यंकटेश म्हात्रे.

खोपटे - उरण

9870561510

dr.sanjeev.ranjana@gmail.com

Ajab gavchya gajab kahanya

 🙊अबब अजब कोकण 🙉

कोकणातील इतरही काही अद्भुत, चमत्कारिक गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो. मालवण-कुडाळ रस्त्याला चौक्याच्या पुढे, सुनीता देशपांडेंचे आजोळ असलेल्या धामापूर गावाजवळ ‘कासार टाका’ नावाचे एक विलक्षण ठिकाण आहे. अगदी रस्त्यालगत, निर्मनुष्य जागेत असलेल्या कासार टाक्याला माणसे वेगवेगळे नवस बोलतात. त्यामुळे भक्ताची कसलीही अडचण दूर होते. अडलेली कामे होतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. नवस फेडायचा असेल तर कोंबडा, दारू आणि सिगारेट यांचा नैवेद्य इथल्या ‘‘ठिकाणा’’ला देण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी गावोगाव फिरून बांगडय़ा विकणाऱया कासाराला या आडवाटेवर गाठून वाटमारी करणाऱयांनी क्रूरपणे मारले. तेव्हापासून तो कासार इथे येणाऱया प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो असा समज आहे.

सावंतवाडी तालुक्यातील दाभील नावाचे एक गाव आहे. या गावात एकही विहीर नाही. किंबहुना विहीर मारली तर पाणीच लागत नाही; परंतु वरच्या भागात गुळगुळीत काळय़ाशार दगडात सात (बावी) विहिरी आहेत. या निसर्गनिर्मित विहिरींचे पाणी साऱया गावाची तहान भागवते. कोकणात नैसर्गिक चमत्कारांची अशी उदाहरणे आहेत तशीच चमत्कारिक रीती-रिवाजांचीसुद्धा कितीतरी ठिकाणे आहेत.

मातोंड हे चहाचे एकही दुकान नसलेले गाव. जत्रेतसुद्धा चहाचे हॉटेल लावत नाहीत. गावात दारू प्यायला बंदी, पण डोंगरात भरणारी घोडेमुखची जत्रा हा देव ब्राह्मण असून त्याला शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो आणि त्याच्या गणांना मात्र कोंबडय़ाचा नैवेद्य द्यावा लागतो. म्हणून या जत्रेला ‘‘कोंब्याची जत्रा’’ म्हणतात.

देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावात कोणीही कोंबडी पाळीत नाहीत. अगर बाहेरून आणून खाऊ शकत नाही. गावाचे तसे कडक नियम आहेत. तर म्हापण गावात येसू आकाच्या देवळात नवस फेडायचा असेल तर सुक्या बांगडय़ाची चटणी आणि नाचण्याची भाकरी असा अस्सल मालवणी बेत करावा लागतो.

उभादांडा येथील ‘मानसीचा चाळा’ नावाचे एक जागृत स्थळ आहे. तिथे नवस फेडायचा असेल तर खेकडय़ांची माळ आणि गॅसची बत्ती देतात. या चाळय़ाच्या जत्रेला ‘बत्तेची जत्रा’ म्हणतात.

परुळे गावच्या येतोबाच्या देवळात म्हणे, भिंतीला लोखंडी खंजीर चिकटतो. या उत्सवाला बाक उत्सव म्हणतात तर आरवली गावात वेतोबाचे सुप्रसिद्ध देऊळ आहे. त्याचा नवस फेडण्यासाठी सोनकेळीचा घड आणि चामडय़ाची चपले भेट म्हणून देतात. वेताळाला दिलेली चपले ठेवल्या जागेवर आपोआप झिजतात. अशी झिजलेली चपले आजही पाहायला मिळतात.

मालवण तालुक्यातील पेंडुर गावचे मसणे परब लग्न लावण्याआधी देवळाच्या आवारात स्मशानातले सगळी विधी करून मग लग्नाच्या बोहल्यावर उभे राहतात. याच तालुक्यातील कोईल गावातील रहिवासी हे लग्नपत्रिकेत गणपतीची प्रतिमा छापत नाहीत. कोणाच्याच घरी गणपती पूजन करीत नाहीत. भिंतीवर गणपतीचे कॅलेंडरसुद्धा लावीत नाहीत. कणकवली तालुक्यातील कुर्ली गावचे पाटील घराण्यातले लोक तुळशीच्या लग्नादिवशीच म्हाळ घालतात. वालावल गावातला एकही माणूस म्हणे पंढरपूरला जात नाही.

फोंडाघाट येथील वाघोबाचे मंदिर हे समस्त अनिष्ट शक्तींना रोखून धरणारे शक्तिस्थळ आहे असे मानतात. इथले मंदिर फक्त एका रात्रीत बांधायचे अशी विचित्र अट होती. शेवटी गावकऱ्यांनी धाडस करून अतिशय नियोजनपूर्वक सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेत मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.

पुराणात ज्याचा ‘एकचक्रानगरी’ म्हणून उल्लेख आहे ते गाव वैभववाडी तालुक्यात सह्याद्रीच्या निबीड अरण्यात आले. इथे मोठमोठय़ा गुहा असून गाडाभर अन्न खाणाऱ्या बकासुराचे वास्तव्य तिथे 🙊अबब अजब कोकण 🙉

पुराणात ज्याचा ‘एकचक्रानगरी’ म्हणून उल्लेख आहे ते गाव वैभववाडी तालुक्यात सह्याद्रीच्या निबीड अरण्यात आले. इथे मोठमोठय़ा गुहा असून गाडाभर अन्न खाणाऱ्या बकासुराचे वास्तव्य तिथे होते असे सांगितले जाते. दगडात कोरलेला महाल आणि काळय़ा दगडाचा प्रशस्त पलंग आजही तेथे आहे. पांडवांना अन्न पुरवणाऱ्या ब्राह्मणाचा वाडाही जवळ आढळतो. या दुर्गम भागात प्रशस्त गुहा आहेत, पांडवांची लेणी आहेत आणि भरपूर पाण्याचे साठेही आहेत. अंगी खूप धाडस आणि चिकाटी असल्याशिवाय इथे पोहोचणे खूप अवघड आहे. अरण्यातील या विशिष्ट जागेला राकसमाळ असेही म्हणतात. कोकणातील अशा असंख्य अद्भुत ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणायला हवे. कोकणातील गूढता समजून घ्यायला हवी.

*🙏राम मुळ्ये🙏*होते असे सांगितले जाते. दगडात कोरलेला महाल आणि काळय़ा दगडाचा प्रशस्त पलंग आजही तेथे आहे. पांडवांना अन्न पुरवणाऱ्या ब्राह्मणाचा वाडाही जवळ आढळतो. या दुर्गम भागात प्रशस्त गुहा आहेत, पांडवांची लेणी आहेत आणि भरपूर पाण्याचे साठेही आहेत. अंगी खूप धाडस आणि चिकाटी असल्याशिवाय इथे पोहोचणे खूप अवघड आहे. अरण्यातील या विशिष्ट जागेला राकसमाळ असेही म्हणतात. कोकणातील अशा असंख्य अद्भुत ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणायला हवे. कोकणातील गूढता समजून घ्यायला हवी.

*🙏राम मुळ्ये🙏*

Garaba

Njoy

 शासकीय सेवेतील पती-पत्नी एकत्रीकरण,

महसूल विभाग बदलण्याच्या मुद्यांचे पालन गरजेचे

-महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

            मुंबई, दि.5: - शासकीय सेवेतील पती-पत्नी एकत्रीकरण व आपसात महसूल विभाग बदलणे या मुद्यांचे पालन  महिला सक्षमीकरण या भूमिकेतून होण गरजेच आहे. यासंदर्भात बदल अधिसूचनेत  आवश्यक असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले असून याबाबतची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

            पती-पत्नी एकत्रीकरण आणि आपसात महसूल विभाग बदलणे या दोन महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करून शासनाच्या गट-अ आणि गट-ब राजपत्रित आणि अराजपत्रित पदांवर सरळसेवेने आणि पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम 2021 ही अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेप्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण आणि आप-आपसात महसूल विभाग  बदलणे या मुद्दयांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शासकीय सेवेत कार्य करणाऱ्या बहुतांश महिला कर्मचारी-अधिकाऱ्यांवर ही बाब अन्याय करणारी ठरत आहे.

            महिलांना नोकरी आणि कुटुंब या दोन्ही बाबी सांभाळणे यामुळे शक्य होणार नाही. आई-वडील दोघे मुलांसोबत एकत्र नसल्याने मुलांच्या संगोपनात अडथळा निर्माण होतो. या गोष्टीचा परिणाम संबंधितांच्या कामावर होणार असून मानसिक ताणतणाव वाढण्याचे तसेच महिलांकडून  शासकीय नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याबाबतची अनेक निवेदने राज्यातील महिला अधिकाऱ्यांकडून महिला आयोग कार्यालयाला प्राप्त होत आहेत. तरी महसूल विभाग वाटप नियम 2015 च्या अधिसूचनेतील नियम बारा मधील पती-पत्नी एकत्रीकरण आणि आपसात महसूल विभाग बदलणे या तरतुदींचा समावेश महसूल विभाग वाटप नियम 2021 मध्ये होणे उचित ठरणार आहे, असे ॲड. यशोमती ठाकूर यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे.

0000

Tuesday, 5 October 2021

 राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटीं

दूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार

- वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई

            मुंबईदि.5 :- राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या डीसीपीएस योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करून  संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

           मंत्रालयातील परिषद सभागृह येथे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या त्रुटींसंदर्भात गठीत करण्यात आलेल्या अभ्यासगटाचे अध्यक्ष तथा वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रेलेखा व कोषागारे संचालक जयगोपाल मेननमहाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथेराज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर व अभ्यासगटाचे राज्यातील पंधरा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

         वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणालेराज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या (NPS) पूर्वीच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना - DCPS अंमलबजावणीतील त्रुटीं ज्या संघटनांनी सादर केल्या आहेत त्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.

          या बैठकीत अभ्यासगटातील सदस्यांनी त्यांचे म्हणणे विस्तृत स्वरूपात समितीसमोर मांडले.राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या सभासदांचे हप्ते जमा होत नसल्याबाबत (Missing Credits) बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.संघटनेच्या मागण्यांबाबत शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचनाही संघटनेच्या पदाधिका-यांनी यावेळी केल्या. कोरोनाचे संकट असूनही कोरोनाबाबतचे नियम पाळून सर्व संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला आमंत्रित केल्याबाबत सर्व संघटनांनी  वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे विशेष आभार मानले.                                                                      

0000

Featured post

Lakshvedhi