Saturday, 2 October 2021

Mera bharat mahan,jai jawan,jai kisan

 *फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी* 

....  परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी

....... *गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी*

...... वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी


...... *पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी*


..... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी


....... *गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी*

 

...... पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी


...... *पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी*


...... पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी


   *_मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नी कडून वसूल केले._*

.

म. गांधीजींच्या जयंतीच्या गदारोळात त्यांचा हा कर्मयोगी शिष्य नेहमी झाकोळला जातो. 

असे साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे *आपले दुसरे पंतप्रधान  लालबहादुर शास्त्रीजी, त्यांना अनंत दंडवत....🙏*


 *यातला एक तरी गुण आजच्या  पुढार्यामधे आहे का?*

 विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज

                                                     - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       वन्यजीव सप्ताह शुभारंभ सोहळा

       मुंबई, दि. 1 : आपण स्वतःला या पृथ्वीचे मालक समजू लागलो आहोतजमिनीवरचा कायदा हा आपला आहे. पण निसर्गाचे नियम त्यापेक्षा वेगळे आहेत. ते नियम आपण पाळले नाही तर  निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे असे सांगून आपल्याला आपले वन आणि वन्यजीव वैभव जपायचे आहेच. त्यासाठी जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र गाठीशी बांधत पुढं जाऊया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी केले.

         सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साई प्रकाशप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमयेअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी आदि मान्यवर उपस्थित होते.तर राज्यभरातून वन विभागातील अधिकारी ,कर्मचारी,वन्यप्रेमी नागरिक  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

        मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले,आपण कायदे करतो आणि आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावतो. विकासाचे वेडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणता विनाश करत आहोत हे न बघता आज आपण पुढं जात आहोत.चक्रीवादळअतिवृष्टी ही त्याची उदाहरणे आहेत.आपण वनांमध्ये घुसखोरी करीत आहोत. निसर्गावर आपण आक्रमण केले आणि ते असह्य झाले की निसर्ग आपले अतिक्रमण आपल्या पद्धतीने दूर करतो.त्यामुळे समजूनविचार करून पुढे जाणे गरजेचे आहे.वनवन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्येही झाली पाहिजे असे मत मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केले.

शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा

     शालेय विद्यार्थ्यांमध्ये वनवन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भातील रुची निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.नाशिकला 'मित्रा'नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.या संस्थेत  पर्यावरणपूरक विकास कसा करायचा या संबंधीचा अभ्यास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

           अन्न,वस्त्र,निवारा या मानवी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीत्यातही निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपण वस्त्या वाढवत आहोतजंगलांमध्ये जात आहोत. वाढणाऱ्या मानवी वस्त्यांना मूलभूत सुविधा,पाणी कसे द्यायचे याचा विचार करण्याची गरज आहे कारण त्या सुविधा देताना लाखो झाडांची आहुती द्यावी लागते.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीजिथे जंगल अधिक तिकडे पाऊस जास्त पडतो. पण अलिकडच्या काळात हे चित्र बदलते आहे .चेरापुंजी नाही तर दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडत आहेकोकण मराठवाड्यात आपण अशी अतिवृष्टी पहिली आहे.त्यामुळे वन व वन्यजीव संवर्धन हे महत्त्वाचे आहे.

               वन संरक्षक हे वनांचे खरे रक्षक त्यांना आगामी काळात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

               उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेवन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. वनांचेवन्यप्राण्याचं महत्व सगळ्यांनाविशेष करुन लहान मुलांनाभावी पिढीला कळावेहा प्रयत्न आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून वनांचंवन्यप्राण्यांचे अस्तित्वजगासाठीमाणसांसाठी किती महत्वाचं आहेहे समजवण्यात आपल्याला यश मिळेलवन्यप्राणी संरक्षणाच्या चळवळीला बळ मिळेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

         राज्याच्या नागरी भागात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना 'हेरिटेज ट्रीअसे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगून

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ,महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. हेरिटेज ट्री संरक्षणासाठीचा कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 झाडांसह समस्त प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुद्ध हवाशुद्ध पाणीशुद्ध अन्नाची आवश्यकता असते. ही मूलभूत गरज आहे. ती फक्त निसर्गातूनपर्यावरणातूच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी निसर्गाचेपर्यावरणाचं संरक्षण संवर्धन महत्वाचं आहे. म्हणून राज्यात जंगलांचं क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

भारतीय वातावरणाशी नातं सांगणारी झाडं लावण्याची गरज

         गावशहरशाळामहाविद्यालयांच्या परिसरातरस्त्यांच्या कडेलाओसाड डोंगरावरमोकळ्या माळावरशक्य आहे त्या ठिकाणीआंबावडपिंपळ अशी दीर्घ काळ टिकणारीभारतीय वातावरणाशी नातं सांगणारी झाडे लावली पाहिजेत. पाण्याचे प्रदुषण ही सुद्धा गंभीर समस्या आहे. हे थांबवण्यासाठी जागरुकता आणणं महत्वाचं आहे. नदीओढेविहिरीझरे हे जलस्त्रोतजलप्रवाह प्रदूषणमुक्त ठेवले पाहिजेत. शुद्धस्वच्छमोकळीप्रदूषणमुक्त हवा मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करुया. निसर्गाच्या हानीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनतेला जागरुक करुया. त्याआधी स्वत: जागरुक होऊया. स्वत:ला शिस्त लावून घेऊया असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

             पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणालेराज्यात गेल्या दोन वर्षांपासून वने,हवामान बदल तसेच वन्यजीव संरक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे जसा शाश्वत विकास अपेक्षित आहे तसा आता होत आहे. मुंबईतील ८०८ एकर आरेचे जंगल शासनाने राखीव वन म्हणून घोषित केले आहे. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असेल. राज्यात ९ हजार ८०० हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित करण्यात आले आहे.मुंबईतील धारावीमध्येही आगामी काळात कांदळवन घोषित करण्यात येणार आहे. वन रक्षकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याची गरज आहे. प्रदूषण रोखण्याचा उपाय म्हणून तळेगाव येथे इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. जंगलकांदळवन व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. पर्यावरणाच्या जपणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही श्री. ठाकरे यांनी दिली.

             प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) जी.साईप्रकाश म्हणालेवन्यजीव  सप्ताहानिमित्त या पूर्ण आठवड्यात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाची जनजागृती वाढवणारे वेगवेगळे उपक्रम रावबविण्यात येतील.शाळांमध्ये येत्या वर्षात व महाविद्यालयातील युवकांना वन व वन्यजीव संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

          प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी म्हणाले, 'वनावर आधारित उपजीविका -मनुष्य आणि सृष्टीचा चिरंतन विकासही  यंदाच्या वन्यजीव सप्ताहाची वर्षाची संकल्पना आहे.येत्या काळात वन विभागातर्फे मानव - वन्यजीव शांततापूर्ण सहजीवनासाठी प्रयत्न करणार असून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.

        वन्यजीव सप्ताहाची सुरुवात मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. पेंच प्रकल्पाच्या लोगोचं अनावरण आणि वाईल्ड महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहितीही यावेळी देण्यात आली.

               कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी केले.

 प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा

                                      -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

इलेक्ट्रिक वाहनांच्या कार रॅलीत आदित्य ठाकरे यांनी घेतला सहभाग

 

            मुंबईदि. 2 : मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने आज मुंबईत इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच श्री.ठाकरे यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार चालवून या रॅलीत सहभागही घेतला.

            यावेळी बोलताना श्री.ठाकरे म्हणालेमागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होतोय. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे. प्रदूषण कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे. सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्थानके वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

            महालक्ष्मी रेसकोर्स पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मार्गे विक्रोळी या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये टाटाटेस्लावोल्वोऑडीजग्वारमर्सिडीजएमजीह्युंडाई अशा विविध कंपन्यांची सुमारे 30 वाहने सहभागी झाली होती. अदानी इलेक्ट्रिसिटी या रॅलीचे प्रायोजक होते.

            यावेळी ऑटोकारचे प्रमुख श्री.सोराबजीअदानी इलेक्ट्रिसिटीचे जी.अदानी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवांतर्गत 'पदव्युत्तर'साठी

तीस टक्के राखीव जागा असाव्यात

                                    - सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

          मुंबईदि. 1 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिका-यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तीस टक्के जागा राखून ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सूचना दिल्या आहेत. 

          पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेतील वैद्यकीय अधिका-यांना राखीव जागा असाव्यातअशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने (मॅग्मो) केली आहे. त्या अनुषंगाने श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.30) बैठक झाली.

          सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आदिवासीदुर्गम ग्रामीण भागात कार्यरत वैद्यकीय अधिका-यांना प्रोत्साहन देण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सेवांतर्गत वैद्यकीय अधिका-यांसाठी राखीव जागा असणे आवश्यक आहेत्यामुळे ग्रामीण भागात विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध होतीलही बाब श्री. टोपे यांनी अधोरेखित केली.    

          मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यासवैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयवैद्यकीय संचालक डॉ.दिलीप म्हैसेकरसंचालक डॉ. साधना तायडेमहाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे अध्यक्ष डॉ.राजेश गायकवाडपीजी सेलचे डॉ. गणेश काळे आदी उपस्थित होते.

          त्यावर बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यासप्रधान सचिव सौरभ विजय यांनी मते मांडली. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय डॉक्टरांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात तीस टक्के जागा वैद्यकीय शिक्षण विभागाने राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा केली जाईलअसेही सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी  स्पष्ट केले.

           बैठकीस मॅग्मो संघटनेचे डॉ. गणेश काळेडॉ. अनिल सालोकडॉ.अशोक चव्हाणडॉ.जयवंत लोढेडॉ.सत्यराज दागडेडॉ. अभिजीत होसमनी आदी उपस्थित होते.

0000


 

आरक्षणामुळे अनाथांच्या भविष्याची वाट सोपी

·       अनाथ आरक्षण संवर्गातून नियुक्त अधिकारी नारायण इंगळे यांची भावना

            मुंबई दि.01 : राज्यातील अनाथालयांमध्ये राहून शिक्षण घेतलेल्या आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या अनाथ तरुणांच्या करियरची वाट आता सोपी झाली आहे. अनाथांसाठी नोकरीशिक्षणात एक टक्का आरक्षण लागू केल्यामुळे अनाथ संवर्गातून मी पहिला अधिकारी ठरलो आहेयाचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया नारायण इंगळे यांनी व्यक्त केली.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वनक्षेत्रपाल (RFO) म्हणून अनाथ संवर्गातून नारायण इंगळे यांची नियुक्ती झाली आहे. अनाथ संवर्गातून नियुक्ती झालेले श्री. इंगळे राज्यातील पहिले अधिकारी आहेत. याबाबत त्यांनी राज्य शासनमहिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आभार मानले. अनाथ संवर्गातून आरक्षणाचा लाभ यापुढे तरुणांना नक्कीच मिळेल. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील संधीची दारे आता उघडली गेली असून त्यांच्यापुढे करिअरच्या दिशा मोकळ्या झाल्याची कृतज्ञ प्रतिक्रिया इंगळे यांनी व्यक्त केली आहे.          

      नारायण इंगळे हे मुळचे लातूर येथील आहेत. लातुर जिल्ह्यातील मुरूड येथे त्यांनी 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परभणी येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले व पुढील इंजिनीअरिंगचे शिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले.

 संदीप काळे यांचे ऑल इज वेल’ राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित

 

          मुंबई,दि.1 : युवा लेखक व पत्रकार संदीप काळे लिखित ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाचे तसेच पुस्तकाच्या हिंदी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवारी (दि. १) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले.

          यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवारहिंगोलीचे खासदार हेमंत पाटीलसकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार व लेखक संदीप काळे उपस्थित होते.

          संदीप काळे यांच्या पुस्तकातून त्यांच्या आई वडिलांचा त्याग व तपस्यातसेच त्यांचे प्रेम व परिश्रम दिसून येतात असे सांगून आई-वडील तसेच मातृभूमीला स्मरून समर्पण भावनेने कोणतेही कार्य केल्यास ते श्रेष्ठ ठरते असे राज्यपालांनी सांगितले. पुस्तकाच्या माध्यमातून युवा पिढी व लहान मुले प्रेरणा घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यपालांनी यावेळी संदीप काळे यांच्या आई वडिलांचा सत्कार केला.

          काळे यांनी आपल्या लेखणीतून शोषितांचे व वंचितांचे दुःख मांडून सामान्य माणसाला नायक बनविले तसेच अनेक गोरगरिबांना मदत मिळवून दिली असे श्रीराम पवार यांनी सांगितले.  

००००

 

 

Governor releases Sandip Kale’s book ‘All Is Well’

  

          Mumbai Dated 1 : Governor Bhagat Singh Koshyari released the book ‘All Is Well: Manatla Success Password’ and its English and Hindi edition at Y B Chavan Auditorium, Mumbai. The book has been authored by journalist and writer Sandip Kale

          Union Minister of State for Public Health and Family Welfare Dr Bharati Pawar, Member of Parliament from Hingoli Hemant Patil, Chief Editor of Sakal Shriram Pawar and author Sandip Kale were prominent among those present.

000

 राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात"

विधिमंडळ सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 

            मुंबईदि. 02 : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत मंगळवारदि. 5 ऑक्टोबर2021 रोजी दुपारी 12.30 ते 5.30 वा. तसेच बुधवारदि. 6 ऑक्टोबर2021 रोजी सकाळी 11.00 ते 1.30 यावेळेत मध्यवर्ती सभागृहविधान भवनमुंबई येथे "राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात..." या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

            या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेविधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरउपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते तसेच उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळसंसदीय कार्य मंत्री अॅड.अनिल परबविधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकरविधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस  वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाईसंसदीय कार्य राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटीलसंसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

            अर्थसंकल्प आणि त्यातील आकडेवारी समजणे क्लिष्टगुंतागुंतीचे असते. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग वाढावाअर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यांच्या मतदार संघातील विकास योजना यांचा सुयोग्य मेळ साधता यावा, यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेची आखणी व विषयांची निवड करण्यात आली आहे.

            या कार्यशाळेस वक्ते म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथीविधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसजलसंपदा मंत्री जयंत पाटीलउद्योग मंत्री सुभाष देसाईसंसदीय कार्य मंत्री अॅड.अनिल परब तसेच दोन दिवसीय व्याख्यानाच्या दोन सत्रांचे अध्यक्ष म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि विधानसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

            या दोन दिवसीय कार्यशाळेत अ) अर्थसंकल्पाची प्रक्रिया ब) अर्थसंकल्पीय प्रकाशने समजावून घेताना (उदाहरणार्थ आर्थिक पाहणी अहवाल... राज्याच्या प्रगतीचे प्रतिबिंब) क) अर्थसंकल्पावरील चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग ड) विधिमंडळ सदस्यांचा स्थानिक विकास निधी व त्याचा सुनियोजित वापर इ) अर्थसंकल्पातून होणारी विकासकामेत्यांचे नियोजन आणि पाठपुरावा या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक व्याख्यानानंतर सदस्य यांना प्रश्नोत्तरासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे.

            कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकलेमहाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत आणि वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी केले आहे.

0000


 महात्मा गांधी संकलित वाङमय जगातील

प्रत्येक वाचनालयात उपलब्ध व्हावा

                                                                                    सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबई, दि2 : ई - स्वरूपातील  महात्मा गांधी संकलित वाङमय  आज महाराष्ट्राला उपलब्ध होत आहे. मात्र लवकरच जगातील प्रत्येक वाचनालयात ते कसे उपलब्ध होईल यासाठी  दर्शनिका विभागाने प्रयत्न करावा, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या  हस्ते गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ई - स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचे आज प्रकाशन करण्यात आले. हे साहित्य पेनड्राईव्ह स्वरुपात प्रथमच प्रकाशित होत आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजयउपसचिव विलास थोरात तसेच दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ.दि.प्र.बलसेकर उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख म्हणाले, नवीन पिढीला म्हणजेच आजच्या डिजिटल पिढीला जी स्मार्टफोनई-बुकऑडिओ बुकटॅबलेट आणि लॅपटॉपचा वापर करते, त्या पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधी संकलित वाङमय भाग -1 च्या 1 ते 50 खंडांचे ई - स्वरुपात उपलब्ध करून दिल्याने नक्कीच याचा फायदा होणार आहे. नव्या पिढीलानव्या जगाला ओळख करून देण्यासाठी हे वाङमय उपयोगी ठरेल अशी आशा आहे. त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती अशा पद्धतीने साजरी करता आली, याचा आज मला आनंद होत आहे. हा ई- ग्रंथ समाजोपयोगी ठरो, अशा सदिच्छा श्री.देशमुख यांनी यावेळी व्यक्त केल्या.

            ई-स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.  त्यावेळीया उपक्रमाचे कौतुक करताना श्री. देशमुख म्हणाले कीआज आपण डिजिटल युगात आहोत. हा कार्यक्रम डिजिटल आहे. प्रकाशनाचे स्वरूपही डिजिटल आहे. काळाचा अचूक वेध घेत दर्शनिका विभागाची कार्यशैलीकार्यप्रणाली ती देखील काळाशी अनुरूप करण्याचा प्रयत्न या विभागाने केला हे कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे महात्मा गांधी संकलित वाङमय संपूर्ण जगाला सहजपणे उपलब्ध होईलत्याकरीता महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे.   

            या खंडांमध्ये महात्मा गांधी यांचे स्फूर्तिदायक जीवनत्यांचा व्यक्तिविकासत्यांनी केलेली विविध कार्येत्यांची भाषणेलेख व पत्रसंग्रह अशा विपुल साहित्याचा यात समावेश आहे. याद्वारे महात्मा गांधीचे विचार समजून घेण्याची संधी वाचकांना उपलब्ध होईल. जगात ‘फादर ऑफ नेशन’ ज्यांची ओळख राहिली आहे त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नामोल्लेख होतो. तसेच जगात भारत आणि महात्मा गांधी ही अशी एकरूप नावे जगाने पहिली आहेत. जगात भारताचा उल्लेख 'लँड ऑफ गांधीअसा होतो, याचे स्मरणही  श्री.देशमुख यांनी यावेळी केले.

            यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले कीयेत्या काळात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने दर्शनिका विभाग अशाच स्वरूपाचे नवनवीन उपक्रम हाती घेणार असून राज्यातील गड-किल्ल्यांची माहिती त्याचप्रमाणे विविध इतिहासकालीन साहित्याची निर्मिती करणार आहे. त्याचा फायदा या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

            या कार्यक्रमाचा समारोपउपसचिव विलास थोरात यांनी या कामात ज्या सर्वांचा हातभार लागला आहे त्या सर्वांचे आभार मानून केला.

000

 

Featured post

Lakshvedhi