अभियांत्रिकी उपाययोजना
तसेच अभियांत्रिकी उपाययोजना राबवण्यात येत आहे. यामध्ये 626 किमीचा रस्ता अपघात संवेदनशीलता अभ्यास त्याचप्रमाणे उच्च मृत्यू झोनमध्ये सुधारणा – चिन्हे, गो स्लो मार्किंग, वेग मर्यादा दर्शक लावण्यात आले असून 12 ठिकाणी महत्त्वपूर्ण रस्ता चिन्हांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच चालत असलेले वेग कॅमेरे, सहा वेग निर्देशक बोर्ड (VASS) बसवले. VIDES प्रणाली द्वारे चुकीच्या सवयी (सीटबेल्ट न लावणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे) पकडणे सुरू आहे. सत्तर हून अधिक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करण्यात आले आहे.
आपत्कालीन सेवा सुधारणा
वैजापूर SDH आणि जालना जिल्हा रुग्णालय यांच्यात सुविधा सुधारणा यामध्ये – डिफिब्रिलेटर, ईसीजी, सर्जिकल किट. 90 प्राथमिक प्रतिसादकर्त्यांचे BTLS प्रशिक्षण आणि WHO च्या “Chain of Survival” तत्त्वानुसार काम करण्यात येत आहे.
जनजागृती व शिक्षण
सुरक्षित वाहन चालवण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन डिजिटल मोहीम राबवण्यात येत असून यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन या विविध समाजमाध्यमांवर याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच 2025–2026 मध्ये प्रकल्पाचा विस्तार करून आणखी उपाययोजना राबवली जाणार.
हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. डेटा-आधारित उपाय, शासकीय नेतृत्व आणि बहु-हितधारक समन्वयातून रस्ते अपघातातील मृत्यू मोठ्या प्रमाणावर कमी करता येतात हे यातून स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment