Sunday, 5 January 2025

सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवार्थ मध्ये ऑनलाईन नोंदणी करणे साठी स्टेप्स खालील प्रमाणे आहेत.

 सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवार्थ मध्ये ऑनलाईन नोंदणी करणे साठी स्टेप्स खालील प्रमाणे आहेत. या नोंदणी नंतर कोषागार कार्यालय मधील आपल्या विषयी माहीती आपण घरबसल्या बघू शकतो.  ऑनलाईन कार्यवाहीसाठी याचा उपयोग होतो.

1 google मधुन sevarth उघडा 

2 ID: PENSIONER

3 Pass: ifms123 टाका लॉगिन झाल्यावर

Worklist click करा

त्यामध्ये create pensioner user ला क्लीक करा 

तुमचे कोषागार निवडा,

 ppo क्रमांक टाका,

 बँकेचे नांव ब्रँच, खाते क्रमांक टाका 

शेवटी create user ला क्लीक करा आपले खाते तयार होईल.

खाते तयार झाल्यावर तुम्हाला user ID मिळेल तो लिहून घ्या user ID: PEN_तुमचा ppo क्रमांक असा असतो.

User ID मिळाल्या नंतर पुन्हा

Sevarth प्रणाली उघडा 

आता मात्र User ID मिळालेला  टाका प्रथम पासवर्ड 

ifms123 टाका 

सिस्टीम तुम्हाला सांगेल की तुमचा पासवर्ड रीसेट करा.

 तुमचा पासवर्ड ठरवा save करा बदलून घेतलेला पासवर्ड लिहून घ्यावा. त्यानंतर पुन्हा सेवार्थ प्रणाली मध्ये पुन्हा पासवर्ड ने प्रवेश करा, त्यावेळी तुमचा मोबाईल नंबर जो यापूर्वी निवृत्ती वेतन सुरू होताना कोषागार कार्यालयाकडून नोंदविण्यात आलेला आहे तो समोर स्क्रीन मध्ये दिसून येतो, जर मोबाईल नंबर बदलला असल्यास नवीन मोबाईल नंबर नमूद करण्यात यावा तसेच स्क्रीन मध्ये नमूद करण्यात आलेला मोबाईल नंबर बदललेला नसल्यास तोच मोबाईल नंबर पुन्हा नव्याने नमूद करण्यात यावा, नमूद केलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल, तो ओटीपी नंबर समोरच्या स्क्रीनवर नमूद करण्यात यावा, हि पध्दत नव्याने नोंदणी करण्यात येणाऱ्या निवृत्ती धारकांना करावी लागेल.जेव्हा तुमच्याकडून मोबाईल नंबर बदलला जाईल तेव्हा सुध्दा मोबाईल नंबर अपडेट करून घेण्यात यावा.

 आता आपल्या पासवर्ड ने आपले खाते बघा. पासवर्ड सुरक्षित ठेवा. सन २०१३ पासून अद्ययावत पेन्शन संबंधित महिना निहाय माहिती उपलब्ध होते, आयकर विवरणपत्र सुध्दा वर्षे निहाय उपलब्ध होत आहे, तुमचा संपूर्ण निवृत्ती वेतन प्रदान आदेशाची पाहणी करता येते, मुळ पेन्शन, कोणत्या तारखेला पेन्शन विकलेली आहे त्याचा कालावधी सुध्दा सर्वात खाली दिसून येत आहे.

पासवर्ड विसरल्यास संबंधित कोषागार कार्यालयातील आस्थापना शाखेत भेट देऊन रु.१००/- जमा करून त्याची विहित नमुन्यातील पावती घेऊन ATO pension यांना दाखविण्यात यावी , त्यानंतर अपर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) तुमचा पीपीओ नंबर विचारणा करुन तुम्हाला पासवर्ड रि-सेट करून देण्यात येईल, तो साधारणपणे तुमची सिस्टीम मध्ये नमूद करण्यात आलेली जन्मतारीख असते, उदा. जन्म तारीख १२ जुन १९६८ असल्यास (१२०६१९६८) याप्रमाणे तुम्हाला नवीन पासवर्ड उपलब्ध होणार आहे, त्यानंतर पुन्हा स्वतः सेवार्थ प्रणाली मध्ये आपला युझर आयडी (PEN_xxxx पीपीओ नंबर) नमूद करून वर नमूद केल्याप्रमाणे जन्म तारीख नमूद करण्यात यावी. याठिकाणी स्वतः परस्पर कोषागार कार्यालयाकडून पासवर्ड रिसेट करुन न घेता केल्यास पुढे सिस्टीम सुरू होणार नाही, पुन्हा तुमचा पासवर्ड विसरलात तर पुन्हा कोषागार कार्यालयांमध्ये भेट देऊन पुन्हा फी जमा करून द्यावी लागेल.  कोषागार यांना संपर्क करून पासवर्ड रीसेट करू शकतो.💐💐💐👍

काही अडचण आल्यास मला संपर्क करा👏👏

ईतर सेवानिवृत्त कर्मचारी यांना सुध्दा हा मेसेज पाठवा. कोषागार कार्यालय आपल्या घरी जोडा👍

काही शंका आल्यास संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयातील अपर कोषागार अधिकारी (पेन्शन) यांचे कडे संपर्क साधण्यात येवून आपल्या शंकांचे निरसन करून घेण्यात यावे हि विनंती.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi