Saturday, 30 November 2024

एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास

  

एनसीसीमधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास

                                             : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

 

            मुंबईदि. 30 : एनसीसीमधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतोत्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी एनसीसीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.  

            ‘एनसीसीच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरणया विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेत्यावेळी राज्यपाल बोलत होते. महाराष्ट्र एनसीसी संचालनालय व एचएसएनसी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे चर्चासत्राचे आयोजन केले होते. 

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनसीसीच्या विस्ताराबाबत सूचित केले आहे. यादृष्टीने जास्तीत जास्त युवक-युवतींनी एनसीसीमध्ये आपला सहभाग वाढवला पाहिजे असे सांगून एनसीसीमुळे शिस्तपालनाचे महत्व कळते व देशभक्तीची भावना जोपासली जाते असे राज्यपालांनी सांगितले.  

            शिस्त नसली तर यश मिळत नाही त्यामुळे युवकांनी शिस्तअंगी बाणवली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. युवक-युवतींनी दिवसातील किमान 15 मिनिटे योग व ध्यानधारणेसाठी दिल्यास त्यांची एकाग्रता शक्ती वाढेल असे सांगताना युवकांनी मोबाईलवरील वेळ नियंत्रित ठेवला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. 

            चर्चासत्राला एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंहएचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ.निरंजन हिरानंदानीसर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीनमहासंचालक सशस्त्र सैन्य दल वैद्यकीय महाविद्यालयदिप्ती चावलाअतिरिक्त सचिवसंरक्षण मंत्रालयएचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.हेमलता बागलाएनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग तसेच सैन्य दलातील अधिकारीजवान व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

********

 

Maharashtra Governor inaugurates seminar on ‘Empowering Girl Cadets through NCC’

 

            Mumbai - The Governor of Maharashtra and Chancellor of state universities C P Radhakrishnan today inaugurated a Seminar on ‘Empowering Girl Cadets through NCC’ at KC College Auditorium in Mumbai.

            The Seminar was organized by NCC Directorate Maharashtra in association with HSNC University.

            Director General of NCC Lt Gen Gurbir Pal Singh, Provost of HSNC University Dr Niranjan Hiranandani, Surgeon Vice Admiral Aarti Sarin DG Armed Forces Medical College, Dipti Mohil Chawla, Additional Secretary, Ministry of Defense, Vice Chancellor of HSNC University Prof Hemlata Bagla, Additional DG, NCC Maharashtra Maj Gen Yogender Singh, officers of Armed forces and NCC cadets were present.

0000

संतान के रूप में कौन आती है ? एक बार अंत तक अवश्य पड़े...

 संतान के रूप में कौन आती है ?


एक बार अंत तक अवश्य पड़े...


पूर्व जन्म के कर्मों से ही हमें इस जन्म में माता-पिता, भाई-बहन, पति-पत्नि, प्रेमिका, मित्र-शत्रु, सगे-सम्बंधी इत्यादि संसार के जितने भी रिश्ते-नाते हैं सब मिलते है।

क्योंकि इन सबको हमें या तो कुछ देना होता है, या इनसे कुछ लेना होता है।


वैसे ही संतान के रूप में हमारा कोई पूर्वजन्म का 'सम्बन्धी' ही आकर जन्म लेता है।


जिसे शास्त्रों में चार प्रकार का बताया गया है :- 1. ऋणानुबन्ध :- 


पूर्व जन्म का कोई ऐसा जीव जिससे आपने ऋण लिया हो या उसका किसी भी प्रकार से धन नष्ट किया हो, तो वो आपके घर में संतान बनकर जन्म लेगा और आपका धन बीमारी में या व्यर्थ के कार्यों में तब तक नष्ट करेगा जब तक उसका हिसाब पूरा ना हो।

2. शत्रु पुत्र :-


पूर्व जन्म का कोई दुश्मन आपसे बदला लेने के लिये आपके घर में संतान बनकर आयेगा और बड़ा होने पर माता-पिता से मारपीट, झगड़ा या उन्हें सारी जिन्दगी किसी भी प्रकार से सताता ही रहेगा। हमेशा कड़वा बोलकर उनकी बेइज्जती करेगा व उन्हें दुःखी रख कर खुश होगा।

3. उदासीन पुत्र :-


इस प्रकार की 'सन्तान', ना तो माता-पिता की सेवा करती है और न ही कोई सुख देती है और उनको उनके हाल पर मरने के लिए छोड़ देती है। विवाह होने पर यह माता-पिता से अलग हो जाते हैं।

4. सेवक पुत्र :- 


पूर्व जन्म में यदि आपने किसी की खूब सेवा की है, तो वह अपनी की हुई सेवा का ऋण उतारने के लिये, आपके सेवा करने के लिये पुत्र बन कर आता है। जो बोया है वही तो काटोगे। अपने माँ-बाप की सेवा की है, तो ही आपकी औलाद बुढ़ापे में आपकी सेवा करेगी...

वरना कोई पानी पिलाने वाला भी पास ना होगा..? आप यह ना समझे कि यह सब बाते केवल मनुष्य पर ही लागू होती है। इन चार प्रकार में कोई सा भी जीव भी आ सकता है।

जैसे आपने किसी गाय की निःस्वार्थ भाव से सेवा की है तो वह भी पुत्र या पुत्री बनकर आ सकती है।


यदि आपने गाय को स्वार्थ वश पालकर उसके दूध देना बन्द करने के पश्चात उसे घर से निकाल दिया हो तो वह ऋणानुबन्ध पुत्र या पुत्री बनकर जन्म लेगी। 

यदि आपने किसी निरपराध जीव को सताया है तो वह आपके जीवन में शत्रु बनकर आयेगा। 


इसलिये जीवन में कभी किसी का बुरा न करें। क्योंकि प्रकृति का नियम है कि आप जो भी करोगे , उसे वह आपको इस जन्म में या अगले जन्म में सौ गुना वापिस करके देगी। 

यदि आपने किसी को एक रुपया दिया है तो समझो आपके खाते में सौ रुपये जमा हो गये हैं। यदि आपने किसी का एक रुपया छीना है तो समझो आपकी जमा राशि से सौ रुपये निकल गये।

ज़रा सोचिये , आप कौन सा धन साथ लेकर आये थे और कितना साथ लेकर जाओगे ?


जो चले गये , वो कितना सोना - चाँदी साथ ले गये ? मरने पर जो सोना - चाँदी , धन - दौलत बैंक में पड़ा रह गया , समझो वो व्यर्थ ही कमाया।

औलाद अगर अच्छी और लायक है तो उसके लिए कुछ भी छोड़कर जाने की जरुरत नहीं है , खुद ही खा-कमा लेगी और औलाद अगर बिगड़ी या नालायक है तो उसके लिए जितना मर्ज़ी धन छोड़कर जाओ , वह चंद दिनों में सब बरबाद करके ही चैन लेगी ।

मैं , मेरा , तेरा और सारा धन यहीं का यहीं धरा रह जायेगा , कुछ भी साथ नहीं जायेगा। साथ यदि कुछ जायेगा भी तो सिर्फ "नेकियाँ" ही साथ जायेंगी।


 इसलिए जितना हो सके "नेकी" करो "सतकर्म" करो।


 हरि ॐ नमो नारायणय

तिरुपति में *चंद्रबाबू नायडू* का *पहला सुधार*...!!! तिरुपति बालाजी जाने वाले *वरिष्ठ नागरिकों* के लिए खुशखबरीटीटीडी हेल्पलाइन तिरुमाला 08772277777*,

 तिरुपति में *चंद्रबाबू नायडू* का *पहला सुधार*...!!!


तिरुपति बालाजी जाने वाले *वरिष्ठ नागरिकों* के लिए खुशखबरी,


*65 वर्ष* पार कर चुके वरिष्ठ नागरिकों के लिए मीठी खबर। *वरिष्ठ नागरिकों के लिए *श्री वेंकटेश्वर तिरुमाला निःशुल्क दर्शन*।


दो स्लॉट आवंटित किए गए हैं। एक *सुबह 10 बजे* और दूसरा *दोपहर 3 बजे*। आपको *आयु प्रमाण* के साथ *फोटो आईडी* जमा करवाना होगा और *एस1 काउंटर* पर रिपोर्ट करना होगा। पुल के नीचे गैलरी से सड़क पार करके मंदिर की दाहिनी दीवार पर जाएँ। आपको *कोई सीढ़ियाँ चढ़ने की ज़रूरत नहीं*। *सबसे अच्छी *सीटें उपलब्ध हैं। बैठने के बाद, गरमागरम सांबर चावल, दही, चावल* और *गर्म दूध*।


यह सब *मुफ़्त* है। मंदिर के निकास द्वार पर *कार पार्किंग* क्षेत्र से, एक बैटरी कार* आपको *काउंटर* तक छोड़ने के लिए उपलब्ध है। देखने पर अन्य सभी लाइनें अक्षम हैं। *केवल वरिष्ठ नागरिकों को बिना किसी दबाव या जबरदस्ती के दर्शन करने की अनुमति होगी*।  दर्शन के बाद कतार में लगकर *आप 30 मिनट के भीतर दर्शन से बाहर निकल सकते हैं*।


*टीटीडी हेल्पलाइन तिरुमाला 08772277777*


विशेष नोट: कृपया इसे शेयर करें, यह बहुत उपयोगी है। सभी समूहों तक पहुँचें!!

गाईच्या शेणाचे महत्व

 


Friday, 29 November 2024

Mahshivlingum


 

*प्रयाग महाकुंभ एक थाळी एक थैला अभियान* १ थाळी आणि १ थैली करिता देणगी लिंक

 *प्रयाग महाकुंभ एक थाळी एक थैला अभियान*

१ थाळी आणि १ थैली करिता देणगी लिंक 

१४४ वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळावा करिता

१ स्टील थाळी+१ कापडी पिशवी करिता ₹१२५ किंवा याच्या पटीत दान करावे ही विनंती. 🙏🏻


https://poornamecovision.org/product/173


प्रयागराज येथे होणारा महाकुंभ हा पॉलिथिन मुक्त होण्यासाठी आपण आपले योगदान द्यावे ही विनंती. 


 *योगदान देण्याची अंतिम तारीख शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४*


अभियान झाल्यावर त्याचे वृत्त आपल्याला पाहिजे असल्यास खालील गुगल फॉर्म वर आपली माहिती द्यावी.

https://forms.gle/LmG7DztaBBr2FyWb7

अनुकंपा नोकरी विवाहित महिलाना.....



 

काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद

 काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद

 

मुंबई, दि. २९ : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'मेरा युवा भारत : वतन को जानोकार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले.

काश्मीर हा भारतातील सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणास काश्मीरचे दर्शन घडल्यापासून आपण काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विविध प्रदेशांना भेट दिल्यास आपण परस्परांना चांगले समजून घेऊ शकतो असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर सबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग असून पुढे देखील राहील असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. आपण सर्वांनी एक देश म्हणून एकत्र राहिल्यास जगातील कोणतीही महाशक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.  

यावेळी श्रीनगरअनंतनागकुपवाडाबारामुल्लाबडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक- युवतींनी राज्यपालांशी संवाद साधला. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरेजिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर उपस्थित होते. या भेटीनंतर काश्मिरी युवकांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

0000

 

Group of 125 Kashmiri Youths meet Maharashtra Governor

 

Mumbai A group of 125 youths from the six districts of Kashmir, currently on a visit to Mumbai called on Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan. The youths comprising 30 girl students are visiting Maharashtra under the 'Watan Ko Jaano' programme organised by the Nehru Yuva Kendra Sanghatan as part of the Kashmir Youth Exchange Programme.

 State Director of Nehru Yuva Kendra Sanghatan Prakash Manure, District Youth officer Nishant Rautela and others were presen

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत

 गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील

 मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत

-         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. 29 : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेतआवश्यकता वाटल्यास जखमींना खागी रुग्णालयात दाखल करावेअशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेतअशी सूचनाही त्यांनी दिली.

            अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

0000

*संत ज्ञानेश्वर महाराज* *संजीवन समाधी सोहळा*

 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


                *अलंकापूरीतून*

           *सार्थ योगी जीवनाची*


      ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

           *संत ज्ञानेश्वर महाराज* 

        *संजीवन समाधी सोहळा*

      ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

        

🚩⚜🚩🔆🙏🔆🚩⚜🚩            


    *बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल !!*

    *श्री ज्ञानदेव तुकाराम !!*

    *पंढरीनाथ महाराज कि जय !!* 

    *श्री ज्ञानेश्वर महाराज कि जय !!*

    *श्री तुकाराम महाराज कि जय !!*

        *हा प्रत्येक मंदिरात होणारा जयघोष असो वा पंढरपूर.. देहू.. आळंदी वारीत "ज्ञानोबा माऊली तुकाराम" चा जयघोष म्हणजे जगात सर्वाधिक वेळा झालेला.. होणारा जयघोष. हा जयघोष  करा असे कुणी कुणाला आजवर सांगितले नाही. पण उत्फुर्तपणे होत आहे.*

        *हा आहे ज्ञानेश्वर माऊलींचा जनमानसावरचा पगडा. ज्ञानेश्वरानंतरच्या सर्वच संतांनी ही भक्ती चळवळ घरोघरी पोहोचवली. भारतीय संस्कृती संस्काराचे फायदे प्रत्येक घराला प्राप्त होत आहेत.*    

        *जगातील सर्वच विव्देषाचे कारण माऊलींना ज्ञात होते. माऊली हरिपाठात म्हणतात..* 

    *कोणाचें हें घर हा देह कोणाचा ।*

    *आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥*

        *सामान्य जनाला जात.. वर्ण.. देहयष्टी.. घर.. संपत्ती.. पद.. प्रतिष्ठा सर्वच गोष्टीचा अभिमान.. अहंकार असतो. या सर्वाचा भोग घेतो तो  त्याचा देह. हा देह टिकविण्यासाठी सतत धडपड सुरू असते. पण या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे.. त्याचा मालक कोण हे मात्र त्याला ठाऊक नसते.*

        *पण योगी जनांचे तसे नसते. त्यांना जीवन उद्दिष्ट ठाऊक असते आणि पूर्णत्वाची कल्पनाही असते. याविषयी गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाने विचारलेल्या सात प्रश्नांच्या उत्तरात विस्तृत विवेचन केलेले आहे.*

        *ज्ञानेश्वर माऊली हे योगी. जे योगी असतात ते जन्मभर भगवंताचे नामस्मरण करतात. त्यांनी इंद्रियविजय प्राप्त केलेला असतो. योगी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यापासून कोसो दूर असतात. त्यांच्यावर मायेचाही प्रभाव पडत नाही. सुख असो वा दुःख ते स्थितप्रज्ञ असतात. त्याकडे समबुद्धीनेच बघून ते अविचल असतात.*

        *योगीजनांना अंतकालाची जाणीव होते. त्यांच्या डोक्यात अंतःकाली भगवंताशिवाय कोणतेच विषय नसल्याने काही  इच्छापुर्तीसाठी ते पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत. अंतकाळी त्यांच्या देहाला यातनाही होत नाहीत. मायेला दूर सारुन ते आनंदाने परमधामात येतात. पण संजीवन समाधी रुपातील त्यांची स्पंदने.. उर्जा चैतन्यदायी ठरते.*

        *तुळशीच्या.. फुलांच्या आसनावर पद्मासन घालून योगी आनंदाने गुरुंना वंदन करुन ॐ कार स्मरण करतात, तेव्हा या प्रिय भक्ताला आदि.. अनंत अर्थातच कधीही नष्ट न होणाऱ्या अक्षरधामात.. परमधामात सन्मानाने नेण्यासाठी प्रत्यक्ष श्रीकृष्ण अवतरतात. जन्मानंतर परमेश्वराने सोपविलेले विहित कार्य उत्तमपणे पूर्ण केल्याचे समाधान या योगींना लाभलेले असते.* 

        *ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात हेच दृश्य होते. उपस्थित संतजनांना याची कल्पना होती. पण तरीही उपस्थित कुणालाही भावनावेग आवरणे शक्य नव्हते. नामदेव, जनाबाई सह अनेक संतांनी याचे वर्णन केलेय. ज्ञानदेवांनी त्यांचे गुरु आणि बंधू निवृत्तीनाथ, सोपानदेव असो वा लहानशी मुक्ताई यांचीही माया दूर सारली. माऊलींनी त्यांना त्रास देणाऱ्यांविषयीही अवाक्षर काढले नाही. याउलट त्यांनाही कल्याणाचा मार्ग दाखवला. समतेची वाट दाखवली.*

        *ज्ञानेश्वरी.. चांगदेव पासष्टी.. हरिपाठ.. अमृतानुभव हे माऊलीचे ज्ञानामृत भक्ताना सदैव संजीवनी देत आहे. माऊलींची आत्मरुप चैतन्य उर्जा.. स्पंदने मात्र भागवत भक्तांना आजही जाणवतात.*

        *संजीवन समाधीच्या ७२८ वर्षानंतरही दरवर्षी लाखो भक्त माऊलींचे हे नित्य अनुभवतात. भौतिक जगात सुख.. समाधान.. मनःशांती.. आनंद प्रत्ययास येणारी ही देवाची आळंदी. इथेच नाही तर गावोगाव या माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्य भक्त हरिनाम संकीर्तनात दंग आहेत.*

        *या ज्ञानियाच्या राजाने  भक्तीतून विवेकी होत सत्य ज्ञान प्राप्तीचा मार्ग प्रदान केला. हा भागवत धर्म प्रसाराचा वारसा पूढे अनेक संतांनी त्याच निष्ठेने चालवला. समाजात एकोपा.. शांती आणि प्रत्येक कुटुंबात सौख्य प्रदान झाले. याचे दर्शन दरवर्षी पंढरी वारीत लाखो हरिभक्तांच्या रुपाने घडते. सदगुरु गुरु निवृत्तीनाथांनी माऊलींच्या मनात रोवलेल्या मोगऱ्यांच्या फुलांचा सुगंध या शिष्याने जगभर पसरवला. माऊली विश्वविख्यात आहेत.*

        *सत्य ज्ञानाचा.. विवेकाचा शाश्वत सुखाचा भक्ती मार्ग दाखवणे हे माऊलींचे या देशावर अनंत उपकार आहेत. अमृत रसमय खजीना प्रदान करणाऱ्या.. जगातील प्रत्येक जिवासाठी पसायदान मागणाऱ्या जगत माऊलींच्या चरणावर वंदन करुया.*        

    

🌹🛕🌸🔆🙏🔆🌸🛕🌹


  *समाधी घेऊन जाई ज्ञानदेव*

  *सोहळा अपूर्व जाहला गे माये*


  *निवृत्तीनाथांनी चालविले हाती*

  *पाहुन ती मूर्ती धन्य वाटे*

  *आपण निर्गुण मागे परी दान*

  *विश्वाचे कल्याण-निरूपण*


  *सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ*

  *मायेचे हे बळ राया बोले*

  *ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट*

  *फुटली पहाट ब्रम्हज्ञान*


  *नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो*

  *वैकुंठासी जातो ज्ञानराया*

  *सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ*

  *सज्जनाचे बळ समाधान*


  *गुरू देई शिष्या समाधी आपण*

  *देवा ऐसे मन का बा केले ?*

  *पद्माचे आसन घालविले जाण*

  *ओंकार ते पूर्ण पंचप्राण*


  *पैलतिरी हाक आली आज कानी*

  *करूनी निर्वाणी बोलविले*

  *ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला*

  *कैवल्यचि झाला भक्तजन*


🌷🍃🌸🛕🌺🛕🌸🍃🌷


  *गीत : अशोकजी परांजपे*  ✍️

  *संगीत : कमलाकर भागवत*

  *स्वर : सुमन कल्याणपूर*


  🎼🎶🎼🎶🎼  🎧


   *‼️जय जय रामकृष्ण हरी ‼️*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२९.११.२०२४-*


🌻🥀🌷🌿🌺🌿🌷🥀🌻

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका मधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेवूया.....*

 *भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका मधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेवूया.....*


*अगदी सहज सोप्या भाषेत, तसेच संविधान प्रास्ताविक किती महत्त्वाची आहे हे समजून घेवून प्रसार करु या.*


🔅 *आम्ही*-

*स्वातंत्र्यापुर्वी आपण एकत्र नव्हतो. विखुरलेले होतो. संविधानाने "मी" ला "आम्ही" केले.*


🔅 *भारताचे लोक* -

*विविध वतने, राजांची स्वतंत्र राज्ये, वेगवेगळे व आपापले भूभागाचे लोक एकमेकांना एकाच देशाचे समजत नसत. यांना संविधानाने एका देशाचे /भारताचे नागरिक/लोक म्हंटले.*


🔅 *सार्वभौम*-

 *आपण आपल्या देशात आपल्याला योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत.*


🔅 *समाजवादी* -

*आमच्या देशात गरिब आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी असणार नाही. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असेल. संपत्तीचे काही मोजक्या लोकांच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.*


🔅 *धर्मनिरपेक्ष* -

*विविध धर्माचे लोक असणारा देश चालवताना मात्र शासनातील व्यक्तींना काम करताना कोणताही धर्म असता कामा नये. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जाणार नाही. धर्म हा व्यक्तिपुरता असावा. तो रस्त्यावर आणु नये.*


🔅 *लोकशाही गणराज्य* - *लोकांकडून / मतदानाद्वारे निवडलेला प्रतिनिधी या राष्ट्राचे काम पाहील. लोकांच्या मतालाच प्रचंड किंमत असेल. लोक ठरवतील त्यांचीच टीम लोकांचे भले करणारे काम करण्यासाठी निवडली जाईल.*


🔅 *घडवण्याचा* - 

*वरीलप्रमाणे असणारा असा देश निर्माण करण्याचा*


🔅 *सामाजिक न्याय* -

*व्यक्तींमध्ये जात धर्म वंश भाषा प्रदेश जन्मस्थान किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच असेल. अस्पृश्यतेसारखी, बिहिष्कृत करण्यासारखी परिस्थिती निर्माण न होऊ देणारा.*


🔅 *आर्थिक न्याय* -

*कोणाही एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन, मुल्ये दिले जाईल. देशातील प्रत्येकाला कोणत्याही भेदभावाशिवाय आपल्या आवडीप्रमाणे उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क असेल.*


🔅 *राजनैतिक न्याय* -

*लोकशाही प्रक्रियेत महिला, पुरुष व अन्यलिंगीय व्यक्तींना व प्रत्येक घटकास निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवता येईल व त्याला त्याचे मत देण्याचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार असणारा.*


🔅 *विचार स्वातंत्र्य -*

*देशाच्या नागरिकास स्वतंत्रपणे विचार करण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यावर कोणाचाही अंकुश असणार नाही.*


🔅 *अभिव्यक्ती स्वातंत्र्य -*

*प्रत्येकास आपला विचार मांडण्याची मुभा असेल. विचार मांडताना व्यक्तिद्वेषी विचार नसतील तर त्यावर कोणाचेही बंधन नसेल. लिहिणे, बोलणे, सादर करणे याचे स्वातंत्र्य असेल.*


🔅 *विश्वास स्वातंत्र्य -* 

*प्रत्येकास आपण मानत असलेल्या मूल्यानुसार विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यावर कोणाचे बंधन नसेल.*


🔅 *श्रध्दा व उपासना स्वातंत्र्य -*

*प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्मावर श्रध्दा ठेऊ शकतो व व त्यानुसार उपासना करू शकते. धर्मांतर करणे, धर्म स्वीकारणे वा नाकारण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीस असणार आहे.*


🔅 *दर्जाची समानता-*

*प्रत्येकास समान वागणूक दिली जाईल याची खात्री. त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था. कोणासही आपला दर्जा उंचावण्याचा अधिकार असेल. आर्थिक सामाजिक व इतर प्रकारचा दर्जा उंचावताना त्या व्यक्तीस कोणीही आडकाठी करणार नाही.* 


🔅 *संधीची समानता-*

*प्रत्येक नागरिकास समान संधी व समान काम मिळेल याचे नियोजन असेल. कोणत्याही कारणाने कोणास संधीच उपलब्ध होणार नाही अशी स्थिती राहणार नाही. लोकांना आपली प्रगती साधता येईल.*


🔅 *व्यक्तीची प्रतिष्ठा* -

*नागरिकांना आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता येईल असे वातावरण निर्माण केले जाईल. कोणाच्याही प्रतिष्ठेस ठेच लागणार नाही याची आपण काळजी घेऊ.*


🔅 *राष्ट्राची एकता* - 

*राज्य, भाषा, वेश तसेच राज्यांचे सीमावाद सामंज्यसाने निकाली काढून देशांतर्गत फूट निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.*


🔅 *राष्ट्राची एकात्मता* -

*विविधतेने नटलेले राष्ट्र एकात्म रहायला हवे. आम्ही एकमेकांमध्ये इतके मिसळून जावे की एकापेक्षा दुसरा वेगळा आहे असे चित्रही न दिसावे. असे आश्वासन मिळावे.*


🔅 *बंधुता* - 

*देशातील नागरिकांनी एकमेकांशी वागताना बंधुत्व भावनेने वागावे. जगावे. प्रत्येक व्यक्ती आपलाच आहे ही भावना निर्माण व्हावी.*


🔅 *प्रवर्धित करण्याचा* - 

*वरील सारे भारतात निर्माण करण्याचा. . .*


🔅 *संकल्पपुर्वक निर्धार*-

*मनामध्ये पक्का विचार करुन, ठेवून, मनात नक्की करुन. .*


*आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान.  .*


🔅 *अंगीकृत* -

*भारतीय संविधान "स्वीकारून"*


🔅 *अधिनियमित* -

*या बाबतचा नियम, कायदा बनवुन स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.*


*📓 आशा आहे, संविधान प्रास्ताविकाचे महत्व लक्षात आले असेल तर आता सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करु या..!*

Thursday, 28 November 2024

*"वानोळा"* *घरी चाललाच आहेस तर जातांना *वानोळा* घेऊन जा.... रिकाम्या हाताने जाऊ नये....!!* वरिल वाक्य ऐकले आणि *वानोळा* शब्द मनात फिरत राहिला.... *नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेलं....* तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर..., किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना.. तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो *भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली दाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी....* आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला.... मग घरी येऊन जोवर तो *वानोळा* पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची... तो *वानोळा* केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं... वाळवणाचे दिवस असले की, मग तर बघणंच नको. पापड, कुरडई प्रत्येक घरात व्हायची, तरी शेजार पाजारी *वानोळा* जायचा. ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात ही वेगळाच आनंद असायचा.. सगळ्यात विशेष म्हणजे *"कैरीचं लोणचं."* मसाला तोच..., कैऱ्या त्याच...., पद्धतही तीच..., तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंध ही वेगळा आणि चवही वेगळी... थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या *वानोळ्या* च्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची... एखादयाची गाय किंवा म्हैस व्याली तरी खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची..., आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं तरी आपल्याला बारशाला कळतं..., हे वास्तव आहे. अशावेळी खरंच वाटतं, आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत... जोवर *वानोळा* होता तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा सुशिक्षित झाला, 'वानोळ्या'ची लाज वाटायला लागली आणि मनं दुरावत गेली.... मग 'वानोळ्या'ची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशनने घेतली.... जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया, स्नेह विसरायला लागला.. सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या.. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवं आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो.. *माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमधेच सापडते,* तिच्या गाठोड्यात *वानोळा* देणारी *माय देखील पडद्याआड जाऊ पाहते,* तरी अजूनही *तुमच्या माझ्या सारख्यांची *आई* निघताना पिशवीत काही ना काही टाकते, हाच *"वानोळा"* असतो. *देत राहणाच्या संस्काराचा....,* *वाटून खाण्याच्या वृत्तीचा....,* *लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा....,* *दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो.... '* *वानोळा*. आज असाच शब्दरूपी *वानोळा* पाठवत आहे, पोहचला की आस्वाद घ्या आणि गोड माना... पण तो अस्सल *वानोळा* खरंच कुठेतरी हरवला हे निश्चित...!!

 *"वानोळा"*


*घरी चाललाच आहेस तर जातांना *वानोळा* घेऊन जा.... रिकाम्या हाताने जाऊ नये....!!*


वरिल वाक्य ऐकले आणि

 *वानोळा* शब्द मनात फिरत राहिला....

*नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेलं....*

तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर..., किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना..


तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो *भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली दाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी....*

आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला.... 


 मग घरी येऊन जोवर तो *वानोळा* पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची...

 तो *वानोळा* केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं...


वाळवणाचे दिवस असले की, मग तर बघणंच नको. 

पापड, कुरडई प्रत्येक घरात व्हायची, तरी शेजार पाजारी *वानोळा* जायचा. ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात ही वेगळाच आनंद असायचा..


सगळ्यात विशेष म्हणजे *"कैरीचं लोणचं."* मसाला तोच..., 

कैऱ्या त्याच...., 

पद्धतही तीच..., 

तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंध ही वेगळा आणि चवही वेगळी... 


थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या *वानोळ्या* च्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची...


एखादयाची गाय किंवा म्हैस व्याली तरी खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची..., 

आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं तरी आपल्याला बारशाला कळतं..., 

हे वास्तव आहे.

अशावेळी खरंच वाटतं, आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत...


जोवर *वानोळा* होता तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा सुशिक्षित झाला, 'वानोळ्या'ची लाज वाटायला लागली आणि मनं दुरावत गेली....


मग 'वानोळ्या'ची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशनने घेतली....

जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया, स्नेह विसरायला लागला.. 


     सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या.. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवं आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो..


*माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमधेच सापडते,*

तिच्या  गाठोड्यात *वानोळा* देणारी *माय देखील पडद्याआड जाऊ पाहते,*

तरी अजूनही *तुमच्या माझ्या सारख्यांची *आई* निघताना पिशवीत काही ना काही टाकते, हाच *"वानोळा"* असतो.

*देत राहणाच्या संस्काराचा....,*

*वाटून खाण्याच्या वृत्तीचा....,* 

*लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा....,*

*दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो.... '*

*वानोळा*.


     आज असाच शब्दरूपी *वानोळा* पाठवत आहे, पोहचला की आस्वाद घ्या आणि गोड माना... पण तो अस्सल *वानोळा* खरंच कुठेतरी हरवला हे निश्चित...!!

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

 

मुंबई. दि. २८ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'महापरिनिर्वाणदिना’निमित्त 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञशिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञतत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली आणि देशाला एक सर्वंकष असे संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकारअसेही संबोधले जाते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवरही मुलाखत प्रसारित होणार आहे.  निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Du chski चालविणारा आणि पाठीमागे बसणारा दोघानाही हेल्मेट सक्तीचे

 


वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी

 वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार

हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी

 

मुंबईदि. २७ : हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.  राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे.

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन मालकाचा वाहन नोंदणी अर्ज करावा लागणार आहे. तसेच वाहन नोंदणी शुल्क व वाहन कराचा भरणा करून नोंदणी करता येणार आहे.

                सद्यस्थितीत खाजगी वाहनांच्या नोंदणीप्रमाणेच हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी या सुविधेमुळे वाहन वितरकांकडे करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता हलकी मालवाहू वाहनेयापुढे परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी आणण्याची आवश्यकता राहणार नाही व नोंदणीची प्रक्रिया विनासायास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांस काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

   तरीसर्व नागरिकांनी व संबंधित वाहन वितरकांनी याची नोंद घेऊनत्याप्रमाणे कार्यवाही करावी व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार  यांनी केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन* देशभर हा समता दिन व हाच खरा शिक्षक दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने त्यांच्या* *कार्याची ओळख व्हावी म्हणून हंटर कमिशन संदर्भात* 👇

 *महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन* 

 *देशभर हा समता दिन व हाच खरा शिक्षक दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने त्यांच्या* *कार्याची ओळख व्हावी म्हणून हंटर कमिशन संदर्भात* 👇


🧐 *महात्मा फुले आणि "हंटर कमिशन"*


💁‍♂️ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचे काम करणारे आणि बहुजनांत क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन. 


🔍 स्त्री-शोषित-पीडित-अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी म.फुले यांनी हंटर कमिशनसमोर साक्ष नोंदवली होती. याबद्दल थोडक्यात जाणून घ्या हंटर कमिशनचा इतिहास...


❓ *काय होते हंटर कमिशन?*


भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने लॉर्ड रिपन यांच्या कारकीर्दीत १८८२ साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.


🚫 *बहुजनांच्या शिक्षणाला सनातन्यांचा विरोध :* सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले. मुलींना, अस्पृश्यांना शिक्षण देणे म्हणजे देव, धर्म, समाज यांच्या विरोधात वर्तन होय. हा तर हिंदू धर्मावर आघात आहे, अशी आवई सनातन्यांनी उठवली तरीही महात्मा फुले यांनी हार मानली नाही.


🗣️ *हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबांनी नोंदवलेल्या साक्षेत ते नेमके काय म्हणाले?*


➤ १२ वय वर्षे असलेल्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे.

➤ बहुजन समाजातील शिक्षक शाळेत नेमले पाहिजेत.

➤ चढाओढीच्या तत्वावर शिष्यवृत्ती न देता, जी मुले शिक्षणात मागे आहेत त्यांना उत्तेजन दिले गेले पाहिजे. 

➤ सरकारने शूद्रांसाठी खेड्यापाड्यात खास शाळा स्थापन कराव्यात. 

➤ स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून सरकारने उपाययोजना करावी.

➤ आदिवासी जाती-जमातींना शिक्षणात प्राधान्य देण्यात यावे.

➤ लोकल सेस फंडापैकी जास्त भाग प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा.

➤ प्राथमिक शाळांना प्रांतिक सरकारने भरपूर अनुदान द्यावे.

➤ प्राथमिक शाळांवर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरपालिकांनी घ्यावी.

➤ तसेच शाळेच्या अभ्यासक्रमात व्यवहारोपयोगी शिक्षण म्हणजे शेती, आरोग्य, इतिहास, भूगोल, यांत्रिकी ज्ञान द्यावे असा आग्रह महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर धरला.


🧤 यासोबतच, महात्मा फुले पुढे हंटर कमिशनसमोर म्हणतात की ब्रिटिशांचे शैक्षणिक धोरण त्यांना मान्य नाही. उच्चवर्णियांसाठी पुष्कळ खर्च होतो पण खेड्यातील लोकांच्या शिक्षणासाठी खास प्रयत्न होत नाहीत. तसेच शिक्षण असे असावे की, तरुणांमध्ये स्वत:चा व्यवसाय करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे.


🗾 मुंबई इलाख्यात एक सुद्धा महार अथवा मांग मुलगा किंवा मुलगी महाविद्यालयात काय पण माध्यमिक शाळेतही नव्हती. १८८२ मध्ये हंटर आयोगापुढे मुंबईच्या खालोखाल पुण्यातून आठ निवेदन सादर झाली होती. यापैकी महात्मा फुलेंचे निवेदन बहुजन समाजाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे मानावे लागते. 


👌 महात्मा फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते. जोतीराव फुले यांनी एका क्रांतीला सुरुवात केली. आज आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे. या मध्ये महात्मा जोतिबा फुले यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी केलेल्या कार्याला कोटी-कोटी वंदन.

Wednesday, 27 November 2024

विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको"

 विकासाचा विचार करताना पर्यावरण 

रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको"  

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. २७ : देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजेपर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावीअसे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

'पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोनया विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथील सभागृहात झालेत्यावेळी ते बोलत होते. 

चर्चासत्राचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज संस्थेने 'कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी',  नॅशनल स्टॉक एक्स्चेंजएनआयटी वारंगलआदी संस्थेच्या सहकार्याने केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  मात्र कधी - कधी पर्यावरण विषयांवर ताठर भूमिका घेतली जाते. दक्षिण भारतातील एका मार्गावरील चार झाडांच्या रक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. या महामार्गावर पंधरा वर्षात जवळजवळ तीन हजार लोकांचे बळी गेलेअसे सांगून चार झाडे कापणे आवश्यक असेल तर त्याऐवजी २५ नवी झाडे लावण्यासारखी सकारात्मक अट घातली गेली पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

देशात जलसंवर्धन व नदीजोड प्रकल्पांचे काम झाल्यास देशातील अन्नधान्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढेल व भारत संपूर्ण जगासाठी अन्नधान्य उत्पादन करू शकेलअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृतीमध्ये नदीपर्वतराजी व वृक्षवल्लीची पूजा केली जाते. आपण निसर्गाचे व नैसर्गिक संपदेचे मालक नसून विश्वस्त आहोत ही भूमिका भारतीय विचारातून अधोरेखित केली जाते. वसुंधरा आपल्या विविधतेसह पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी भारतीय विचारधारेतील पाण्याचाअन्नधान्याचा व ऊर्जेचा जबाबदारीने विनियोग याबाबतचे चिंतन यावर भाष्य केले तसेच प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली.

            उद्घाटन सत्राला भारतीय नदी परिषदेचे सदस्य, 'रिव्हर मॅन ऑफ इंडियारमण कांत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

महाराष्ट्रासह 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी

 महाराष्ट्रासह 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी

केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी

 

नवी दिल्ली  26 : आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देतमहाराष्ट्रासह 15 राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमताबांधणीसाठी एकूण 1 हजार 115.67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय  समिती नेमण्यात आली होती. या समितीने  15 राज्यांमध्ये भूस्खलन जोखीम शमन प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून महाराष्ट्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतचसर्व राज्यांतील नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी 115.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी समितीने हिमनदी उद्रेक पूर जोखीम व्यवस्थापनासाठी 150 कोटी रुपये आणि सात शहरांमध्ये नागरी पूर व्यवस्थापनासाठी हजार 75.65 कोटी रुपये मंजूर केले होते.

आपत्ती व्यवस्थापनासाठी तसेच अनुषंगिक कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने या वर्षांतर्गत 21 हजार 476 कोटी रुपयांहून अधिक निधी विविध राज्यांना वितरित केला आहे. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीराज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी यांतील तरतुदींचा समावेश आहे.

Tuesday, 26 November 2024

संविधान दिनानिमित्त राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

 संविधान दिनानिमित्त राज्यपालांकडून 

राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

 

मुंबई, दि. २६ : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारीकर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

0000

 

Maharashtra Governor reads out 

Preamble on 'Constitution Day'

 

          Mumbai, 26th Nov : The Governor of Maharashtra  C P Radhakrishnan  read out the preamble of the Constitution of India on the occasion of the Constitution Day at Raj Bhavan.

Officers and staff of Raj Bhavan and Police personnel posted in Raj Bhavan reiterated the resolve of the nation to constitute India into a Sovereign, Socialist, Secular and Democratic Republic on the occasion

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

 

 मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली. पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडारयवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे.

या सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे सचिव डॉ. श्री. एन. रामास्वामी उपस्थित होते. प्रोत्साहनपर बक्षिस रूपये दोन लाखाचे चार क्रमांकदुसरे बक्षिस रूपये पाच लाख पाच क्रमांकतिसरे बक्षिस रूपये एक लाख पाच क्रमांक व त्यापुढे रू. १०,००/- हुन कमी रकमेची १०,४२८ बक्षिसे लागली आहेत. असे एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रू. २,२०,५०,०००/- इतकी आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी असे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी कळविले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर



 मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

 

मुंबई, दि. २६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचेसह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज (दि. २६ नोव्हेंबर) राजभवनमुंबई येथे  भेट घेऊन त्यांना आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा  राजीनामा सादर केला.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.

यावेळी मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकरदादाजी भुसे व इतर देखील  उपस्थित होते.

0000

 

CM, Dy CMs meet Governor; CM tenders own, cabinet resignation

 

       Mumbai, 26th Nov : Chief Minister Eknath Shinde accompanied by Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar met Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai on Tue (26 November).

The Chief Minister tendered the resignation of his post and that of his cabinet to the Governor on this occasion.

The Governor has asked the Chief Minister Eknath Shinde to continue to hold the charge of his post till alternate arrangements are made.

Ministers Deepak Kesarkar and Dadaji Bhuse were  also present.

0000

Featured post

Lakshvedhi