*उपवास*
उपवास कसा करावा..? उपवास कोणी करु नये..? कसा उपवास कधीच करु नये..? चुकिच्या पद्धतीच्या उपवासाचे काय होणार तोटे..? उपवास आवर्जुन कोणी करवा..?
वरील सर्व प्रश्र्नांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे हवे असल्यास आपणास सर्व प्रथम उपवासा बाबतची शरीरक्रिया समजुन घेऊया.
मानवी देह प्रमुख दोन प्रकारचे कामे करते. पहिला प्रकार👉 स्वत:च्या संरक्षणासाठी, स्वत:चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आणि उपजिविका चालवण्यासाठी आपण शरीराकडुन कष्टाची तसेच बौद्धिक कामे करुन घेतो. हि कामे अनंत प्रकारची असतात.
दुसरा प्रकार👉 शरीर प्रकृती उत्तम राखण्यासाठी शरीर स्वत:साठी स्वत:च काही कामे करते. आपली इच्छा असो वा नसो पण शरीर स्वत:साठी ती कामे करतेच करते. ती कामे होत असताना आपण रोखुनी धरु नये. रोखुन धरल्यास आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते, त्यामुळे काही आजारांची निर्मिती होऊ शकते. ती एकुण कामे चौदा प्रकारची आहेत. त्याच चौदा कार्यांना वेग असे म्हणतात. अपान वेग म्हणजेच पाद, मल वेग म्हणजेच शौचविधी, मुत्रवेग म्हणजे लघवी, उदार वेग म्हणजेच ढेकर, क्षवथु वेग म्हणजे शिंक, निद्रावेग म्हणजे झोप, कासवेग म्हणजे खोकला, श्रमजन्य श्वासवेग म्हणजे धाप, जृंभावेग म्हणजे जांभई, अश्रुवेग म्हणजे रडणे, वमी वेग म्हणजे उलटि, शुक्रवेग म्हणजे कामेच्छा, तृष्णावेग म्हणजे तहान आणि क्षुधा वेग म्हणजे भुख. हि एकुण चौदा कामे आहेत. जे शरीर स्वत:हुन करते. ती आपण रोखुन धरु नयेत. असे आयुर्वेदात सांगितले आहे. आता आपल्याला उपवासा बाबत माहिती घ्यायची झाल्यास वरील चौदा पैकी तृष्णा आणि क्षुधा वेगा शी म्हणजेच तहान आणि भुक याबाबत संबंध येतो. म्हणुन याच वेगांबाबत सविस्तर माहिती घेऊया.
शरीरला कार्यक्षम आणि निरोगी राखण्यासाठी उर्जेची म्हणजेच एनर्जीची आवश्यकता असते. ती एनर्जी आहारातुन मिळते. एनर्जी जेव्हा जेव्हा संपत येते तेव्हा तेव्हा आपल्याला आपोआप भुक लागते. भुक लागल्यानंतर ही काहीही न खाणे म्हणजे उपवास होय. अशी आपली सर्व सामान्यपणे धारणा असते.परंतु भुक लागल्यानंतर ही आपण आहार घेतला नाही तर शरीर बौद्धिक आणि अंगमेहनतीचे कार्य करण्यास सक्षम राहत नाही. म्हणुन उपवावासात ही अल्प प्रमाणात काही पौष्टिक फळे आणि काही प्रकारचे अन्न जसे शेंगदाणे, गुळ, भगर, बटाटे, रताळु असे खाण्यास सांगितलेलेच आहे. यालाच आपण फराळ असे नाव दिलेले आहे. ज्यामुळे शरीर कार्य चालण्यास बाधा येत नाही.
*उपवास का करावा..?*
ईश्वराप्रति भक्तिभाव तसेच आपले मन, अंतःकरण आणि शरीर शुद्धी साठी.
*उपवासाचे फायदे*
उपवासात कुलदैवताची आराधना, भक्तिभाव, देवपुजा करुन वाईट कृत्य टाळुन मन आणि अंतःकरण शुद्ध होते. आहार नियंत्रण करुन शरीर शुद्धी होते.
*शरीर शुद्धी साठी उपावास*
शरीर शुद्धि साठी प्रत्येकाच्या प्रकृती नुसार उपवास करणे आवश्यक आहे.
*खाता-पिता म्हणजेच फराळासह उपवास👉* जी लोक हमाली, मोलमजुरी, खोदकाम, बांधकाम, ऊसतोडी अशी भरपुर अंगमेहनतीचे कामे करतात त्यांनी फराळ करुनच उपवास करने हिताचे असते. म्हणुन त्यांनी खाता-पिता उपवास करावा कारण कि अशा काबाडकष्ट करणा-यांना शरीरशुद्धी ची आवश्यकता नसते किंवा क्वचित असते. त्यांनी काहीही खाल्ले नाही तर त्यांना त्यांचे काम करण्यास शरीर सक्षम नसेल.
*फक्त द्रव पदार्थांवर उपवास कोणी करावा👉* जी माणसे अंगमेहनतीचे कोणतेही काबाडकष्ट न करता फक्त बौद्धीक क्षमतेचे कामे करतात, जी माणसे दिवसभर खुर्चित बसुन कार्य करतात त्यांनी आवश्यकतेनुसार द्रव पदार्थ, फळांचा रस घेऊन उपवास करावा. पोटाला थोडासा ताण पडु द्यावा.
*काहीच न खाता उपवास कोणी करावा👉* जी माणसे शरीराने स्थुल आहेत. ज्यांची अतिरिक्त चरबी कमी होणे गरजेचे आहे. त्यांनी वेळच्यावेळी फक्त पाणी पिऊनच उपवास करावा. जेणे करून त्यांच्या शरीरातील अतिरिक्त कैलरीज उपवासाच्या दिवशी वापरात येतात. फैट्स कमी होऊन, चरबी कमी होण्यास म्हणजेच वजन नियंत्रणात राहण्यास हिताचे ठरेल.
जी माणसे मांसाहारी आहेत त्यांनी ही काहीच न खाता उपवास करावा. कारण कि मांसाहार हा पचायला अधिक वेळ लागतो, पचायला जड असतो. मांसाहारी प्राणी एकदा का शिकार केली कि बराच काळ काहीही खात नाही. जसे वाघ, सिंहा सारखे जंगली प्राणी. अजगराने एखादा का एखादा प्राणि खाल्ला कि तो एक-दोन आठवडे काहीही खात नाही. म्हणुन मांसाहारी माणसांनी वेळच्यावेळी पाणी पिऊन उपवास करावा.
थोडक्यात काय तर शरीर शुद्धि साठी उपवास करताना शरीरयष्टि नुसार आणि शाकाहारी-मांसाहारी प्रकारानुसार आपापल्या हिताचा उपवास करावा. कोणाचेही बघुन, ऐकुन आपणही तसाच उपवास करु नये.
*उपवासा बाबत गैरसमज*
1) जितका अधिक कडकडीत उपवास केला तितकि अधिक ईश्वरभक्तिचा लाभ होईल.
👉ईश्र्वर भक्ति ही आपले मन, अंतःकरण शुद्ध ठेऊन, देव-देश-धर्मा प्रति विचार आणि आचरण करुन प्राप्त होते. आहाराचा संबंध हा प्रामुख्याने शरीरशुद्धी बाबत असल्याने आपापल्या प्रकृती नुसार आहार घ्यावा.
👉अमुक एकाने कडकडीत उपवास केला म्हणुन आपणही तसाच उपवास करने.
*❌निर्जला उपवास❌*
काही माणसे ईश्वर भक्ति तील गैर समजाने इतका कडकडीत उपवास करतात कि पाणी देखील पित नाही. यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. उपवासा बाबत बोलताना त्या अभिमानाने सांगतात कि पाण्याचा एकही घोट न घेता उपवास केला. यालाच निर्जला उपवास म्हणतात. जो पुर्णतः चुकिचा आहे, हानिकारक आहे, अवैज्ञानिक आहे. म्हणुन असा निर्जला उपवास कोणीही कधीही करु नये.🙏
त्यास कारण कि..आपण खाल्लेल्या अन्नाचे विघटन होऊन ते पचवण्यासाठी आपल्या पोटात हायट्रोक्लोरिक एसीड ची निर्मिती दर काही तासांच्या अंतराने दररोज होत असते. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे सुक्ष्म विघटन होऊन अन्न सहज पचन होते. ज्या दिवशी आपण उपवास धरला त्या दिवशी देखील नियमितपणे हायट्रोक्लोरीक एसीडची निर्मिती तर होतेच परंतु त्याची उपयुक्तता होण्यासाठी पोटात अन्न नसते. अशा वेळी आपल्या या एसीड ची मात्रा वाढते.
हायट्रोक्लोरीक एसीड काय आणि कसे कार्य करते हे बघावयाचे असल्यास प्रयोग शाळेत हायट्रोक्लोरीक एसीड मध्ये रात्री एक लोखंडी खिळा किंवा तार टाकल्यास सकाळपर्यंत त्या लोखंडी खिळ्याचे विघटन होत असते, लोखंडी तार विरघळते. अशा या हायट्रोक्लोरीक एसीड ची मात्रा पोटात अतिरिक्त वाढु नये म्हणुन दर काही तासाला किंवा तहान लागल्यास दिवसभरात वरचेवर पाणी प्यावेच. जेणेकरुन पिलेल्या पाण्यात हे एसीड एकत्र होऊन पाण्याबरोबर लघवी वाटे शरीराबाहेर टाकले जाते. पोटात अतिरिक्त एसीड जमा होत नाही. परंतु निर्जला उपवास किंवा कडकडीत उपवास धरण्याच्या विचाराने आपण दिवसभरात पाणी पिलो नाही तर मात्र या एसीड ची मात्रा पोटात वाढते. त्यामुळे पहिली तक्रार म्हणजे एसीडीटि वाढते, असेच निर्जल उपवास वारंवार किंवा लगातर करत राहिल्यास दिवसेंदिवस पोटातील हायट्रोक्लोरीक एसीडची मात्रा वाढत वाढत जाऊन हळुहळु एसीडीटि नंतर जळजळ होऊ लागते. या एसीड ची मात्रा भयंकर वाढत गेल्यास पोटातील मोठ्या आतडीचा अल्सर होऊ शकतो. या एसीड चा प्रकोप झाल्यास कैंसर देखील होऊ शकतो. म्हणुन उपवासात वरचेवर पाणी तरी नियमितपणे प्यावेच प्यावे. निर्जल उपवास धरणे अध्यात्मिक आणि शारीरिक दृष्ट्या पुर्णतः चुकिचे असल्याने असा निर्जल उपवास कोणीही करुन नये.
आपापल्या शारीरीक प्रकृती नुसार आपणास योग्य तसा उपवास धरावा. उपवासाच्या दिवशी कुणाचे मन दुखावु नये, रागावर नियंत्रण ठेवावे. एकमेकांचा मत्सर टाळावा. मन प्रसन्न ठेवावे. आपापल्या कुलदैवताची भक्ति, आराधना, ध्यान, भजन, नामस्मरण करुन ईश्वरभक्ती तुन मन आणि चित्त शुद्धिकरण करावे. शरीर शुद्धि साठि आपापल्या शरीर प्रकृती नुसार योग्य तो संतुलित आहार घेऊन उपवास करावा. अशा प्रकारे उपवासातुन मन, चित्त आणि शरीरशुद्धी चे ध्येय साध्य करावे.
🚶♂️चला..🚶♂️
💪विश्वगुरु असणाऱ्या💪
प्राचीन भारतीय संस्कृतीकडे..🚶♂️
🇮🇳जय हिंद🇮🇳
🚩जय गोमाता🚩
🇮🇳वंदेमातरम🇮🇳
No comments:
Post a Comment