Saturday, 29 June 2024

अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ

 अर्थसंकल्पात शेतकरीकष्टकरीविद्यार्थीयुवकमहिला,

मागासवर्गीयआदिवासीअल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय

शेतीउद्योगशिक्षणव्यापारआरोग्यपर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ

 

            मुंबईदि. 28 :- महाराष्ट्राची गौरवशाली ध्यात्मिकसांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणावारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, ‘निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई-रिक्षा’ योजनाराज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, महिला लघुउद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, त्यांच्यासाठी 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावाओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकीवास्तुशास्त्रफार्मसीमेडिकलशेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्तीराज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची घोषणा, ‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठादूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीनवी मुंबईत महापे येथे जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्कची निर्मितीसिंधुदुर्ग येथे 66 कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मितीबारी समाजासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापनास्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजनमहाराष्ट्राचा अभिमानस्वाभिमान उंचावणाऱ्या अशा अनेक निर्णयांचा समावेश असलेल्याशेतकरीकष्टकरीविद्यार्थीयुवकमहिलामागासवर्गीयआदिवासीअल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्यायशेतीउद्योगशिक्षणव्यापारआरोग्यपर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला, तर विधान परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी  वित्त व नियोजनमंत्री म्हणून मार्च 2011 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून त्यांनी आज सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवातंच जगद्गगुरु संत तुकाराम महाराजांच्या उदंड पाहिलेउदंड ऐकिले... उदंड वर्णिलेक्षेत्रमहिमे ऐसी चंद्रभागाऐसे भीमातीर... ऐसा विटेवर देव कोठे || ऐसे संतजन ,  ऐसे हरिचे दास... ऐसा नामघोष सांगा कोठे |  तुका म्हणेंआम्हां अनाथाकारणें... पंढरी निर्माणकेली देवें... ||’ या अभंगाने केली.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सादर केलेल्या 2024-25 या अतिरिक्त अर्थसंकल्पात  एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महसुली जमा 4 लाख 99 हजार 463 कोटी रुपये तरमहसुली खर्च 5 लाख 19 हजार 514 कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे. वार्षिक योजना कार्यक्रम खर्चासाठी एक लाख 92 हजार कोटी रुपये आणि  अनुसूचित जाती उपयोजनेकरीता 15 हजार 893 कोटी रुपयेआदिवासी विकास उपयोजनेकरीता 15 हजार 360 कोटी रुपये तसेच जिल्हा वार्षिक योजनेसाठी  18 हजार 165 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. महसुली तूट 20 हजार 51 कोटी रुपयेराजकोषीय तूट 1 लाख 10 हजार 355 कोटी रुपये आहे.

            शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले असूनस्वावलंबी शेतकरीसंपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बी-बियाणांसाठी थेट अनुदानसिंचन सुविधाआधुनिक तंत्रज्ञानाचा वापरशेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहनशेतमालाचे मूल्यवर्धनशेतमाल साठवणूकबाजारपेठेची उपलब्धता इत्यादीबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत आजतागायत एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. एक रुपयात पीक विमा योजने अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14 लाख 33 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5 हजार 190 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. यासाठी चालू अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली आहेअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi