Friday, 16 February 2024

जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील ‘पुनर्वसनासाठी राखीव’ असे शेरे कमी करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती

  जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील

स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील

पुनर्वसनासाठी राखीव’ असे शेरे कमी करण्याचा निर्णय

मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती

 

            मुंबईदि. १६ :- पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्पकुकडी व डिंभे प्रकल्पभामा आसखेड प्रकल्पनिरा देवधर प्रकल्पगुंजवणी प्रकल्पआरळा कळमोडी प्रकल्प आणि बोपगाव रायता पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणे या निर्णयामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्जासहत्यांच्या जमिनींचे  खरेदी - विक्री व्यवहार करणे सुलभ होणार असून अन्य शेतीविषयक योजनांचा लाभ घेता येईलअशी माहिती मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

            राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव असलेले शेरे उठविण्याबाबत १८ जानेवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. यानुसार पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामधील गटांवरील ज्या स्लॅबपात्र खातेदारांच्या/भूधारकांच्या जमिनींना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीतसिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत किंवा भविष्यात उपलब्ध होणार आहेतपरंतु जमिनींचा संपादन निवाडा किंवा संपादन अद्यापर्यंत करण्यात आलेले नाहीअशा प्रकरणी विभागीय आयुक्तपुणे यांनी  केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने "पुनर्वसनासाठी राखीव" असे ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात नोंदविलेले शेरे कमी करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

            "पुनर्वसनासाठी राखीव" असे ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात नोंदविलेले शेरे कमी करताना गटांमधील क्षेत्राच्या भूसंपादनाबाबतची कार्यवाही झालेली नाहीतसेच भुसंपादन निवाडा घोषीत झालेला नाहीयाबाबत खातरजमा जिल्हाधिकारी पुणे यांनी करावी. तसेच ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नमूद क्षेत्रावरील पुनर्वसनासाठी राखीव शेरा उठविणेबाबत प्रस्तावित केलेल्या अर्जदार यांच्या हिश्यापुरते असणाऱ्या क्षेत्रावरीलच पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा उठविणेबाबतची कार्यवाही करावीअसे शासन परिपत्रकात नमूद केले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi