Tuesday, 3 October 2023

ह्रदयरोग आणि मानसिकता** ( जागतिक ह्रदय दिन )

 


(👇कोणी लिहील आहे माहित नाही पण अत्यंत उपयुक्त आहे...)

**ह्रदयरोग आणि मानसिकता**

( जागतिक ह्रदय दिन )


मित्रांनो नमस्कार. आज *जागतिक ह्रदय दिन* च्या निमित्ताने आजची पोस्ट आहे. बँकेतील इतरांचे अनुभव, समाजातील निरीक्षण, जवळपासच्या ओळखीच्या व्यक्तींचे निरीक्षण, याबद्दलची माझी काही मते, निरीक्षणे आहेत ती इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.


ही पोस्ट वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने, मी अधिकृतपणे सांगू शकणार नाही. ही पोस्ट माझ्या निरीक्षणांवर आहे. 


ह्रदयरोग आणि आपली मानसिकता याचा संबंध आहे का??

याचे उत्तर अगदी जवळचा संबंध आहे.


नेमकं चुकते कुठे?? 

मी तर रोज व्यायाम करतोय, मॉर्निंग वॉक करतो, आहार व्यवस्थित आहे. कुठलं व्यसनही नाही. देवदेव करतो. झोप व्यवस्थित आहे. सोशल मीडियावरपण जास्त नाही. डेली रूटीन ठीक आहे. 


*असं असताना ह्रदयरोग / हार्ट अटॅक कसा आला ???*


माझ्या दृष्टीने काही निरीक्षणे मी इथे देत आहे. 


1)हट्टीपणा 

2)ओव्हर पझेसिव्हनेस

3)डॉमिनंट स्वभाव

4)"माझेच खरं" म्हणण्याची प्रवृत्ती.

5)ताठर स्वभाव.

6)प्रचंड अहंभाव.

7)अती तात्विक असणे. 

8)माफ न करणे

9)मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल वर्षानुवर्षे डुक धरून बसणे. 

10)रागीट स्वभाव

11)अती स्ट्रेस (ताणतणाव)

12)रिझर्व्हड नेचरची माणसे. 

13)हायपर ॲक्टिव्ह स्वभाव. 

14)शब्द खाली पडू न देणे.

15)सोशल मीडियाचा मनावर होणारा परिणाम. 

16)बदला घेण्याचा स्वभाव..


वरील 16 गोष्टींपैकी कोणत्यातरी एका किंव्हा अधिक गोष्टींचे प्राबल्य आपल्या व्यक्तिमत्वावर नक्की असते, की जे शरीर सहन करत असते.सहन नाही झाले की त्याची परिणती कधीकधी ह्रदयरोगात होण्याची शक्यता असते. आपली पूर्ण आयुष्याची लाईफ स्टाईल काय आहे हे खूप महत्वाचे आहे.


आपण सगळेच बाह्य जगात जसे दिसतो, तसे स्वतःच्या एकांतात असतो का?? ( माझ्यासहित हा प्रश्न आहे बरंका ).जर दोन्ही मध्ये जास्त गॅप असेल तर स्वभाव दुरुस्ती करणे आवश्यक आहे. आपण कसे आहोत?? हे कधी कधी घरातील माणसांना पण समजत नाही, किंबहुना ते आपण कधी कधी कळूही देत नाही. वरवर आपण खूप छान आहोत, वागण्यात, बोलण्यात प्रभुत्व, हजरबाबीपणा खूप, मग असं असताना हे का ??? याचे उत्तर आपण आपल्याच मानसिकतेवर अभ्यास करत नाही पण दुसऱ्याच्या स्वभावाचे / मानसिकतेचे खूप बारीक निरीक्षण करतो. 


जुन्या पिढीतील माणसे सरळ स्वभावाची होती /असतील पण खूप हटवादी होती, अतितात्विक होती. *एखादी गोष्ट अशी झाली पाहिजे म्हणजे तशीच झाली पाहिजे* 


1) काही ज्येष्ठ नागरीक बघा, एखादी पालकची पेंडी किंवा भाजी, घराजवळ जवळ थोडी महाग मिळते म्हणून लांब स्कूटरवर 2, 3,किमी वर जातील आणि तेथून घेऊन येतील किंवा अमुक अमुक ठिकाणी एखादी गोष्ट स्वस्तात मिळते म्हणून 10, 20 किमी ड्रायव्हिंग करतील, यात त्यांचे समाधान असते, पण स्कूटर किंवा कार बाहेर काढणे, रस्त्यावर स्कूटर / कार चालवण्याचे संभाव्य धोके, ड्रायव्हिंग करतानाचा स्ट्रेस हे अजिबात लक्षात घेणार नाहीत. या गोष्टींचा मनावर अप्रत्यक्षपणे विपरीत परिणाम होत असतो, अर्थात प्रत्येकाने काय करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. 


2) मी नोकरीत असतानाचा किस्सा सांगतो. कोरोना काळात सरकार ओरडून सांगत होते की, ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडू नये. पण बँकेत दुपारी ही मंडळी चौकशी करायला दोन, तीनशे रुपये रिक्षाचे खर्च करून येणार, कारण काय तर *माझी गॅसची सबसिडी खात्यात जमा झाली का??* याची चौकशी करणार आणि ती सबसिडी किती तर 175 रुपये. उत्सुकता, अतीतात्विकपणा, हट्टीपणा कोणत्या भावात?? कोरोना काळात गर्दी नसते म्हणून मुद्दाम बँक स्टेटमेंट घ्यायला येणार. तेही लोकडाऊन मधे. अशी कितीतरी उदाहरणे नोकरीत अनुभवायला मिळाली. 


*यातून मग फ्री कसे रहायचे??* 


उत्तर :- 


1) प्रसंगानुरूप आपली मनस्थिती बदला, मनाला त्रास होईल असे करू नका. मनस्थिती नाही बदलली तर त्याचा त्रास काही तास, दिवस, महिने, काही वर्षे राहू शकतो. 

2) *लेट इट बी*, आणि *इट्स ओके* ची जमेल तशी सवय करून घ्या. 

3) थोडे मेडीटेशन करा. 

4) कमीतकमी 45 मिनिटे व्यायाम आपल्या वयानुसार करा. 

5) टाईम मॅनेजमेंट असेल तर स्ट्रेस म्यानेज करता येतो ही मी अनुभवाने सांगतो. 

6) मनाला लाईट मोडमध्ये ठेवायचा प्रयत्न करा. 

7) जी काही गोष्ट घडणार आहे ती कायमस्वरुपी नसते. 


Flexibility matters a lot. Let all of us be healthy by heart. 


*तुमचे आरोग्य उत्तम राहो, हीच माझी मनापासून इच्छा . कारण आपण कायम स्वरुपी नाही , आणि जे आहे ते पण कायम नाही सर्व सोडून जाणे हे क्रमप्राप्त आहे.

मग सर्व सोडून आनंदात जगा भगा कशी जीवन जगण्यात आनंद मिळतो की नाही.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi