Thursday, 6 July 2023

रात्रीचे जागरण करणे टाळा* ( भाग - ०२ )

 *🔸 रात्रीचे जागरण करणे टाळा*

( भाग - ०२ )


पहिल्या भागात आपण बघितले की रात्रीचे जागरण केल्याने शरीरात आप महाभूत न्यून होऊन कोरडेपणा वाढतो आणि अग्नी एकदम भडकतो. त्यामुळे आपण खाल्लेले अन्न करपून आंबट ढेकरा येतात ह्यालाच पित्त म्हणतात. परिणामी उष्णता जाणवणे , शरीर शिथिल पडणे , थकवा येणे , पित्ताच्या गांधी / पुळ्या येणे असे विविध आजार होऊ शकतात. आता पुढचा भाग पाहूया.


.....शरीरातील आप महाभूत न्यून झाल्याने मलातील पाण्याचा अंशही न्यून होतो त्यामुळे त्याचे पुढे सरकणे मंदावते. मला शुष्क झाला तर तो तिथेच थबकतो आणि ' बद्धकोष्ठता ' निर्माण होते. मल थबकून राहिल्याने वाताच्या मार्गात अडथळा येतो आणि तो उलट फिरतो. असा उलट फिरलेला वायू पोटात गेला , तर तेथे पचन होत असलेले , म्हणजे अग्नीने युक्त असे अन्न वरच्या दिशेने ढकलू लागतो. यामुळे छातीत किंवा घशात जळजळ होते. वायू पोटात घुटमळत राहिला तर पोटात दुखू लागते , वायू हृदयात गेला तर हृदयाचे विकार , फुफ्फुसात गेला तर दमा किंवा खोकला ह्यासारखे श्वसनसंस्थेचे विकार , डोळ्यात गेला तर डोळ्यांचे विकार , डोक्यात गेला तर डोकेदुखी किंवा डोक्याच्या रक्तवाहिन्यांत जाऊन त्यामुळे तेथील एखादी रक्तवाहिनी फुटली , तर मेंदूत रक्तस्त्राव होऊन पक्षाघात ह्यासारखे विकार होऊ शकतात.


प्रतिदिनचे जागरण हे अशाप्रकारे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. जोपर्यंत जागरण बंद करत नाही , तोपर्यंत कारण चालूच रहात असल्यामुळे हे रोग बरे होत नाहीत. तरुणपणी किंवा शरीरबळ चांगले असेपर्यंत जागरण पाचून जाते ; परंतु सातत्याने असे होत राहिले तर शरीरबल क्षीण होऊन अनेक विकार उद्भवतात. यामुळे रात्री जागरण करणे टाळावे.


© आयुर्वेद



_*(

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi