Wednesday, 26 April 2023

उशीरासव....*खास, वाळा औषधी महत्त्व

 *उशीरासव....*


...*उशीर*.. याचा .. आयुर्वेद शाब्दिक अर्थ...खस..वाळा.. असा आहे.. अर्थात. हे सायरप. मूत्रपिंडाचा आजार,,. बरं करते.. तसेच. सर्व प्रकारचे पित्त विकार बरे होतात.आधी बघू या याचे घटक.. कारण. .खस हि वनस्पती प्रमुख असलि तरी, यात सहाय्यक वनस्पती देखील आहे.


  उशीर, पित्त पापडा, मोचरस, वडाचि साल, गूलरचि साल, जांभूळ झाडाचि साल, गुळ, मनुका, कांचनार झाडाचि साल, पडवळाचि पाने, धात फूलं, मंजिष्ठा चिरायता, टाका, पद्म काष्ठ, कमळ, नीलकमल, पांढरे कमळ, गंभारि, नेत्रबाला, नीलोत्पल, प्रियंगू,..


... सर्व वयोगटातील व्यक्तींना हे आसव निर्धोकपणे देता येत.. उशिरा सव. हे गुणधर्माने थंड असल्यामुळे. उन्हाळ्यात युरिनचि जळजळ होणे, तहान तहान लागणं, यावर,. रोज दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर द्या,. फार लवकर फरक पडतो.व बरं वाटतं.

..प्रमेह या आजारांत आणि. स्त्रियांच्या अंगावर जाणं, श्वेतप्रदर, मासिक पाळीत होणारे त्रास. या सर्व त्रासांवर. उशिरा सव. चांगले काम करते. किमान एक महिना हे आसव घेतल्यास. स्त्रियांचे सर्व त्रास दूर होतात.


. लहान मुलांना नेहमीच. जंताचा त्रास होतो, अगदि रात्रभर जागे राहतात, आणि अंग धरत नाही,. अशा वेळी यांना. रोज दहा थेंब उशिरासव समभाग पाण्यात मिसळून जेवणानंतर द्या. काही दिवसांतच मुलं धष्टपुष्ट होतात.. तळपायाची आग, होणं, शरिरात उष्णता वाढते, डोळ्यांची आग होणे, हे सर्व पित्त विकार आहे. आणि .उशीरासव दिल्यास शरिरात थंडावा तयार होतो, आणि वरील सर्व त्रास बरे होतात.


..भगंदर, मुळव्याध फिशर, हे सर्व उष्णता निर्माण झाल्याने होतात. रुग्णांना खुप त्रास होतो, पण उशिरा सव काही दिवस दिल्यास रुग्ण बरा होतो.. उशिरा सव तुमचे अशुद्ध रक्त शुद्ध करते. अनुषंगाने मग

. त्वचेचे विकार..जसे. नायटा खरुज, गजकर्ण, इसब होत नाही. आणि झाल्यास. रोज दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर द्या. काही दिवसांतच विकार बरे होतात.. हे आसव घेतल्यास

... तारुण्य पिटिका, पिंपल्स, मुरुमे, येत नाही व नियमित पणे सेवनाने चेहर्यावर ग्लो येतो......


    . अंगावर येणाऱ्या गांधी, पित्त प्रकोप, वारंवार ढेकर येतात, जीव घाबरतो, या सर्व त्रासांवर.. उशिरा सव द्यावे. उष्णता बाहेर पडते व बरं वाटतं.. तेव्हा या सर्व लहान लहान त्रासांवर आपण. हे आसव घेऊन. लगेच दवाखान्यात जाण्याची आवश्यकता राहत नाही.. 


.... आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे


*⭕️

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi