Saturday, 1 October 2022

चला जाणुया नदीला.

 चला जाणुया नदीला’ अभियानासाठी समिती गठित

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नदी संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढाकार

 

            मुंबईदि. 30: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत चला जाणूया नदीला हे अभियान येत्या 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सुरु होत आहे. या अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे. राज्यातील नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अभिनव उपक्रमाचे नियोजन केले आहे.

            गठित करण्यात आलेल्या समितीत मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. महसूल आणि ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव हे सदस्य असतील. वने विभागाचे प्रधान सचिव या समितीचे कार्याध्यक्ष असतील. जलसंपदाजलसंधारणकृषीशालेय शिक्षणनगरविकास -2पर्यावरणउद्योगपशुसंवर्धनमत्स्य व्यवसायपाणी पुरवठा व स्वच्छता या विभागाचे प्रधान सचिव या समितीमध्ये सदस्य असतील. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालकमहाराष्ट्र जैवविविधता मंडळनागपूरपुण्याचे प्रधान मुख्य वन संरक्षकसांस्कृतिक कार्यचे सचिव आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था अर्थात वाल्मीचे महासंचालक या समितीत सदस्य असणार आहेत. याशिवाय या समितीमध्ये अशासकीय सदस्य असणार आहेत. डॉ. राजेंद्र सिंग विशेष निमंत्रित म्हणून असणार आहेत. यात डॉ. सुमंत पांडेनरेंद्र चौघजयाजी पाईकरावरमाकांत कुलकर्णीडॉ. गुरुदास नुलकरअनिकेत लौयीयाराजेश पंडितमहेंद्र महाजन या समितीत सदस्य असणार आहेत.  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक या समितीत सदस्य सचिव असतील.या समितीचे कार्यकाळ एक वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत असेल.

            महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या पूर आणि दुष्काळ या समस्यांपासून मुक्तीसाठी नदी संवाद अभियानाचे आयोजन करणेअभियानांतर्गत जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणेत्याची अंमलबजावणी करणेअमृत वाहिनी बनविण्यासाठी मसूदा तयार करणेनदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसारासाठी रुपरेषा आखणेनदीचा तट आणि प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचारप्रसार व नियोजन करणेनदीच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करुन त्यावर संबंधितांना कार्यवाहीसाठी अहवाल सादर करणेपावसाचे पाणी अडवून भूजल स्तर उंचावणेअतिक्रमण तसेच शोषण आणि प्रदूषण या तीन कारणांचा अभ्यास आणि त्याचा नदी व मानवी जीवनावर होणारे परिणाम अभ्यासणेमहाराष्ट्रातील सुमारे 75 नदी खोऱ्यांतून नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करणेशासनाबरोबर समाज आणि नदीवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुसूत्रता आणणेस्थानिक स्वराज्य संस्था यांचे जलव्यवस्थापन तपासणे अशी या समितीची ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi