[9/2, 12:28 PM] Vaishali Bhagat: ***** कोर्लईतील शिवमंदिर आणि तेथील सतीशिळा! *****
अलिबागपासून २४ किलोमीटर आणि रेवदंड्याच्या थोडे पुढे ६ किलोमीटर अंतरावर कोर्लई नावाचे खूप सुंदर गाव आणि तितकाच सुंदर किल्ला आहे. पोर्तुगीज, मुघल, मराठे व ब्रिटिशांनी केलेल्या अनेक लढायांमुळे या भागाला इतिहासात फार महत्वाचे स्थान आहे. शिवाय कोर्लई हे या भागातील एकच पोर्तुगीज गाव होते ज्याची सुरुवात ५०० वर्षांपूर्वी वर्णीझ, मार्व्हिस, व्हेगास, गोम्स आणि क्लेमेंट्स अशा पाच कुटुंबांनी केली.
कोर्लईचा किल्ला ज्या लहानशा टेकडीवर आहे त्या टेकडीच्या पूर्वेकडे पायथ्याशी हे लहानसे शंकर मंदिर आहे. वर कौलारू उतरते छप्पर, विटा मातीच्या भिंती, लाकडी जुन्या बनावटीचे दरवाजे आणि खिडक्यांची लाकडी जाळी हे सर्व अजूनही जुन्या काळापासून जतन केले आहे. मंदिरात जाण्यासाठी ४ पायऱ्या आहेत. मंदिराच्या आत समोरच एका दगडी चौथऱ्यावर लहानसा घडीव नंदी पहायला मिळतो. गाभाऱ्याच्या दरवाज्याजवळ डावीकडे खाली एका कोष्टकामध्ये शेंदूर फासलेली गणपतीची दगडी मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या उजवीकडे लावलेल्या शिळेवर दगडुजीच्या कामाचा काळ शके १८६४ (म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार सन १९४२) लिहिलेले आहे. मंदिराचे बांधकाम हे त्याही खूप आधीचे वाटते. गाभाऱ्याच्या वरील टाईल चे काम आधुनिक बनावटीचे आहे. यात श्रीकृष्ण, श्रीराम आणि महाभारतातील काही दृश्य चित्रित केले आहेत. गाभार्यामध्ये शिवलिंग आहे. या मंदिराच्या बाहेर समोरील बाजूस एक साधारण १२ फूट उंच दगडी दीपमाळ दिसते. जवळच एक लहानसे तुळशी वृंदावन आहे.
या मंदिराची सर्वात रोचक बाब म्हणजे येथील सतीशीळा! या शिळांना सतीचा दगड असेही संबोधतात. जुन्या काळात पतीच्या निधनानंतर पत्नीने पतीसोबतच सती जाण्याची प्रथा रूढ होती. यात पत्नी पतीच्या जळत्या चितेमध्ये बसून जिवंतपणीच अग्निदाह करवून प्राण त्याग करत असे. अशा प्रकारे पतिव्रता स्त्रीला देवपदाला पोहचता येते अशी समजूत होती. मध्ययुगीन काळात एखादा वीर युद्धात अथवा जनतेच्या अथवा गुरांच्या संरक्षणार्थ मरण पावल्यास आणि त्या वीरांची पत्नी सती गेल्यास त्या सतीच्या समरणार्थ असे दगड कोरून ठेवले जात. हे दगड म्हणजे तिच्या त्यागाची ग्वाही देत. पुढे १८३९ साली बऱ्याच भारतीय समाजसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे इंग्रज सरकारने ही प्रथा कायद्याने कालबाह्य ठरवली. त्यानंतर अशा शिळा बनणेही बंद झाले. या शिळा त्या काळातील सतीच्या प्रथेच्या मूक साक्षीदार म्हणून आजही तो इतिहास सांगत आहेत.
मंदिराच्या समोर जो मोठा वृक्ष दिसतो त्याच्या पायाशी दोन शेंदूर लावलेल्या सतीशीळा दिसतात. वृक्षाच्या उजवीकडील सतीशीळा २ फूट उंच आणि १ फूट रुंद आहे. यामध्ये आकाशाकडे पाच बोटे असलेला सतीचा हात व तिच्या हातातील चुडा स्पष्टपणे दिसतात. हा हात काटकोनात वळलेला आहे. हाताच्या बाजूला चन्द्र (डावीकडे) व सूर्य (उजवीकडे) यांची प्रतिमा दिसते. चंद्र व सूर्य अमरत्वाचे प्रतीक आहेत. जोपर्यंत आकाशात चन्द्र व सूर्य आहेत तोवर त्या सतीची महती पसरत राहील असा त्याचा अर्थ होतो. वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याफार फरकाने अशा सतीशीळा संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतात पाहायला मिळतात. काही ठिकाणी चितेवर बसलेले स्त्री पुरुष, वाघावर किंवा घोड्यावर बसलेली स्त्री, शिवाची उपासना करताना पती किंवा पत्नी, दोन स्त्रिया सती गेल्या असतील तर दोन हात इ. पाहायला मिळतात. याच वृक्षाच्या डाव्या बाजूस अजूनही एक अशीच हुबेहूब शिळा दिसते. ही शिळा पहिल्या शिळेपेक्षा थोडी जास्त झिजलेली आहे. याची रचनाही पहिल्या शिळेप्रमाणेच आहे. यातही काटकोनात वळलेला सतीचा हात, तिच्या हातातील चुडा आणि चंद्र व सूर्य पाहता येतात. या दोन शिळांवरून हे सांगता येते की येथे २ स्त्रिया सती गेल्या होत्या.
कोर्लई म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो येथील ऐतिहासिक किल्ला, तेथील गावातील वैशिष्ट्यपूर्ण पोर्तुगीज मिश्रित नोलिंग भाषा आणि येथील दीपगृह! पण हे मंदिर आणि येथील सतीशिळा हे कमी माहितीत असलेले ऐतिहासिक वैभवही कोर्लईच्या इतिहासात तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाय संध्याकाळी हे मंदिर पाहून झाले की एक फेरफटका येथील समुद्रकिनाऱ्यावर मारावा. येथील किनारा अतिशय स्वच्छ - सुंदर आहे आणि येथून सूर्यास्त पाहणे म्हणजे वेगळेच सुख आहे.
संदर्भ:
१. भटकंती रायगड जिल्ह्याची - प्र. के. घाणेकर (२००७)
२. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कुलाबा गॅझेट (१८८३)
©️माहिती संकलन आणि फोटो: सुश्रुत निकाळजे (www.TheTown.in)
(www.facebook.com/aitihasikalibag)
-----------------------------------------------------------------
ही माहिती आवडल्यास जरूर शेअर करा आणि अजूनही अशी माहिती मिळवण्यासाठी या पेजला लाईक करा!
----------------------------------------------------------------
[9/2, 12:29 PM] Vaishali Bhagat: *गंमत*
आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम,बर्गर,तंदूरी
इत्यादी घरी करून पाहिले जातात
आणि
कुरडई पापड, लोणची
विकत घेतात..!
😂😂🤥🤥
*दुसरी गंमत* याऊलट म्हणजे,
घरी केलेले पदार्थ हाॅटेलसारखे झाले नाहीत म्हणून बोंब मारतात आणि बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर घरगुती खाणं/जेवण कुठे मिळेल ते शोधत बसतात 😜
*तिसरी गंमत* याहूनही कहर म्हणजे घरी गैस संपला किंवा मिक्सर बिघडला किंवा कुकरचा व्हाल्व गेला की त्रागा करुन तात्काळ कसा सुधारेल ते बघतात.
आणि बाहेर जाऊन चुलिवरच अमकं, पाट्यावरच्या मसाल्याचं टमकं, मडक्यात मंद आचेवर शिजवलेले ढमकं किती छान चव देतं ते कौतुक करुन जास्तचे चार पैसे मोजतात.
आहे की नाही गंमत 😜 😜 🤪🤐😷
No comments:
Post a Comment