Monday, 30 August 2021

 जरूर वाचा...

भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, "भाजी घ्यायची का मावशी?"

आई आतून नेहमी सारखी ओरडली, "काय आहे भाजीला?"


"गवार हाय, तंबाटी, पालक,...." एवढे बोलताच आई म्हणाली, "थांब आले"


दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, "पालक कसा?"


रुपयाची गड्डी - भाजीवाली

पन्नास पैशाला दे, चार घेते - आई

नाय जमणार मावशी - भाजीवाली

मग राहुदे - आई


भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. "बारा आण्याला दिन - भाजीवाली

नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते - आई

नाय जमणार - भाजीवाली

आणि पुन्हा गेली


थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तीला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून परिक्षण करुन चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले. भाजीवाली भारा उचलायला लागताच तीला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, "जेवली का नाही?"


नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेउन , मग सैपाक, मग जेवण - भाजीवाली


थांब जरा. बस इथं. मी आणते." म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळ दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.


मला राहवलं नाही. मी आईला विचारले, "तु एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केली पण नंतर जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तीला खायला दिले."*


आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले...


व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi