Friday, 2 May 2025

Making India AI Ready माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे क्रांती; ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

 Making India AI Ready

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे क्रांती;

‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

 

मुंबईदि. २ : ‘एआय’ तंत्रज्ञान हे जगभरात मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. मनोरंजन क्षेत्रात या तंत्रज्ञान वापरामुळे मोठी क्रांती होत असल्याचे मत ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

 

             वेव्हज परिषदेत वेव्हज एक्स संवादामध्ये गुगलच्या तंत्रज्ञांचे ‘एआय’ विषयी चर्चासत्र झाले.

 

            ‘एआय’ तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे बदल घडून येत असल्याचे सांगून गुगलचे व्यवस्थापक म्हणाले कीया माध्यमातून चांगल्या प्रकारे कल्पना पडद्यावर मांडता येतात. ‘एआय’चा वापर करून एका फोटोपासून कल्पनातीत व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात.

 

             ‘एआय’ तंत्रज्ञानरिल्स आणि चित्रपटनिर्मिती याबाबत या चर्चासत्रात माहिती देण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कल्पना शब्दात मांडून व्हिडिओ तयार करता येतात याचे प्रात्यक्षिकही यावेळी सदर करण्यात आले. देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि व्यक्ती यांनी आता ‘एआय’ आत्मसात करून प्रगती साधण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

Making India AI Ready माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे क्रांती; ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

 Making India AI Ready

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे क्रांती;

‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

 

मुंबईदि. २ : ‘एआय’ तंत्रज्ञान हे जगभरात मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. मनोरंजन क्षेत्रात या तंत्रज्ञान वापरामुळे मोठी क्रांती होत असल्याचे मत ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

 

             वेव्हज परिषदेत वेव्हज एक्स संवादामध्ये गुगलच्या तंत्रज्ञांचे ‘एआय’ विषयी चर्चासत्र झाले.

 

            ‘एआय’ तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे बदल घडून येत असल्याचे सांगून गुगलचे व्यवस्थापक म्हणाले कीया माध्यमातून चांगल्या प्रकारे कल्पना पडद्यावर मांडता येतात. ‘एआय’चा वापर करून एका फोटोपासून कल्पनातीत व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात.

 

             ‘एआय’ तंत्रज्ञानरिल्स आणि चित्रपटनिर्मिती याबाबत या चर्चासत्रात माहिती देण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कल्पना शब्दात मांडून व्हिडिओ तयार करता येतात याचे प्रात्यक्षिकही यावेळी सदर करण्यात आले. देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि व्यक्ती यांनी आता ‘एआय’ आत्मसात करून प्रगती साधण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा वेव्हज विशेषांक प्रकाशित

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

लोकराज्य'चा वेव्हज विशेषांक प्रकाशित

 

मुंबईदि. २ : मुंबईत सुरू असलेल्या 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटअर्थात 'वेव्हज् २०२५या जागतिक परिषदेच्या निमित्ताने लोकराज्य’ आणि महाराष्ट्र अहेडच्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या 'वेव्हजपरिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेउद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासूसिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलविकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, 'लोकराज्यचे प्रबंध संपादक तथा संचालक (माहिती) हेमराज बागुल,  संचालक (माहिती) तथा वेव्हजविषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डेसंचालक (वृत्त-जनसंपर्क) डॉ. गणेश मुळेउपसंचालक (वृत्त) श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते.

 

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि 'लोकराज्य'चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात  'वेव्हज'शी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.

 

यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनासिंहस्थ कुंभमेळाअन्नसुरक्षाजलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे.

-----०००----

भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल

 भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे

प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

मुंबईदि. १ : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंटक्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे  यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज’ परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरेल्वे,


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद सृजन क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद

सृजन क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी

उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती

·         सृजन क्षेत्राच्या विकासासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मुंबईदि. १ : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमधील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला.

 

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील लोटस बॉलरूममध्ये विविध देशातील प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी उपस्थित उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली.

 

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवकेंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनकेंद्रीय सचिव संजय जाजू तसेच उद्योजक ॲडम ग्रॅनिटीॲडम मोसरीआदर पुनावालाअजय बिजलीअक्षत राठीअक्षय विधानीभूषण कुमारचांघाम किमचार्ली जेफरीडायन स्मिथ गंडरएकता कपूरप्रिन्स फैजल बिन बंदर बिन सुलतान अल सौदसुबासकरण अलीराजाहशूजी उत्सुमीशरद देवराजनशंतनू नारायणसंकेत शाहसंजीव गोयंकाराल्फ सिमोनराजन नवानीपिरोजशा गोदरेजनितीश मिटरसेनअलेक्झांडर झरोवक्रिस रिप्लेयदिनेश विजनलिझवेटा ब्रॉडस्कायाहर्ष जैनफरहान अख्तरहार्वेय मासोनहिरोकी टोटोकीजोंग बम पार्कलुईस बॉसवेलमहेश सामतमार्क रीडनमीत मल्होत्रानिल मोहन उपस्थित होते.

 

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार आहे. कंटेंटक्रिएटिविटी आणि कल्चर यावर आधारित ऑरेंज इकॉनॉमी पुढील १० वर्षांत दुप्पट होणार आहे. या इकॉनॉमीला आणखी गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावेअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

 

भारताने सृजन क्षेत्राच्या विकासासाठी उचलेले पाऊल अत्यंत सकारात्मक असून त्यास सर्व उद्योजक उत्स्फूर्तपणे साथ देतीलअसा विश्वास सर्व उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला.

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’

 मुंबईत साकारणार आयआयसीटी

- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

मुंबईदि. १ : भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असूनत्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५  (व्हेव्ज) चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी श्री. वैष्णव बोलत होते. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकरमाहिती  प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

माहिती व प्रसारण मंत्री श्री.वैष्णव म्हणाले, ‘आयआयसीटीच्या स्थापनेसाठी गुगलॲपलमायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

सर्जनशीलतेच्या जगात सध्या मोठे परिवर्तन घडत आहे. तंत्रज्ञानामुळे सर्जनशील उद्योग आता सर्वांसाठी खुले झाले आहेत. कंटेंट तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहेतसेच कंटेंटचा उपभोग घेण्याचे माध्यमही बदलत आहे. या बदलत्या प्रक्रियेची समज आणि वाटचाल एकत्रितपणे करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण सर्जनशील जगाला वेव्हजच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हे व्यासपीठ जगभरातील निर्मात्यांसाठी खुले आहे. हे व्यासपीठ नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शनगुंतवणूकदारनिर्माते आणि खरेदीदार यांच्याशी जोडणारी संधी देईल. यामुळे नव्या आर्थिक संधींचा उगम होईल.

या परिषदेस जगभरातून धोरणकर्तेउद्योग नेते आणि ७५ देशांतील निर्माते सहभागी झाले असून पुढील चार दिवसांत १०० सत्रे विविध स्वरूपात पार पडणार आहेत. सर्जनशील समुदाय क्रिएट इन इंडिया स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले असून ३२ क्षेत्रांमध्ये ह्या स्पर्धा झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

वेव्हज हे मनोरंजन उद्योगासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ : शाहरुख खान

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले,

वेव्हज हे मनोरंजन उद्योगासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ : शाहरुख खान

आताचा काळ द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांसाठी परवडणारे चित्रपट तयार करण्याचा : शाहरुख खान

·         वेव्हज’ सर्व माध्यमांना एकाच मंचांवर आणणारा योग्य वेळी सुरू केलेला उपक्रम - दीपिका पदुकोण

·                     यापुढे वेव्हजच्या सोबतीने मोठी झेप घेण्यासाठी भारतातील सर्जक सर्व सामर्थ्याने सज्ज - करण जोहर

मुंबई, १ : वेव्हज या शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे  अभिनेता आणि चित्रपट निर्माते शाहरुख खान यांनी चित्रपट उद्योगाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली.  या परिषदेमध्ये मनोरंजन उद्योगाला अधिक मजबूत करण्याची क्षमता आहेअसे त्यांनी सांगितले. हे व्यासपीठ उद्योगासाठी किती समर्पक आहे आणि ते विविध आघाड्यांवर सरकारकडून अत्यंत आवश्यक समन्वय आणि पाठबळ उपलब्ध करून देईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारत हे एक  अमर्याद  शक्यता असलेले स्थान असल्याचे सांगून शाहरुख खान यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत 'शूट इन इंडिया कसे बनू शकते याकडे लक्ष वेधले. याशिवायआंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांशी विविध प्रकारचे करार भारताच्या मनोरंजन उद्योगाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात यावर त्यांनी भर दिला.शाहरूख खान यांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमा अधिक परवडणारा बनवण्यावरही भर दिला. या शहरांमध्ये एकल पडदा असलेल्या  चित्रपटगृहांमध्‍ये  सिनेमा पाहण्‍याचा  अनुभव निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडलीज्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही वेव्हजचे महत्त्व आपल्या शब्दात मांडले. माध्‍यम आणि मनोरंजन उद्योगातील विविध माध्यमांना एकत्र आणण्याची ही अचूक वेळ असल्याचे त्या म्हणाल्या. दीपिका पदुकोण यांनी सांगितलेकी या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आतापर्यंत माहितीचे आदान- प्रदान किंवा सहकार्य मर्यादित स्वरूपात केले जात होतेपण वेव्हजचे स्वरूप व्यापक आहे आणि त्यात चित्रपटओटीटीॲनिमेशनकृत्रिम प्रज्ञा आणि इतर भासमान तंत्रज्ञाने एकत्र आणण्याची क्षमता आहे.

वेव्हज शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानिमित्त आयोजित 'द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलरया सत्रात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या प्रवासावर आणि स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण केले ते सांगितले. शाहरुख खान यांनी 'आउटसाइडर-इनसाइडरटॅग्जबद्दल आपले विचार मांडले आणि तरुणांनी इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचे आवाहन केले. इथेही कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही असे त्यांनी सांगितले.

समाजमाध्‍यमे  आणि प्रतिमा व्यवस्थापनाच्या आजच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या बदलत्या परिमाणांबद्दल शाहरुख खान यांनी नवीन कलाकारांना केवळ त्यांच्या विशिष्‍ट प्रतिमा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील  कौशल्यांकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्यातील अद्वितीय गुण आणि क्षमतांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे असे दीपिका पदुकोण यांनी नमूद केले.

समारोपाच्या भाषणातचित्रपट निर्माते करण जोहर यांनी भारताला 'सॉफ्ट पॉवरअसे संबोधित केले. आपला देश येत्या काळात 'वेव्हज'सह उत्तुंग झेप घेण्यास सर्व सामर्थ्‍यानिशी सज्ज आहे असे जोहर यांनी अभिमानाने सांगितले.

Featured post

Lakshvedhi