⚜🚩⚜🚩🕉🚩⚜🚩⚜
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*संतकवी, महिपती*
*दासगणू महाराज*
*यांच्या जन्मदिनाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
⚜🚩⚜🚩⚜️🚩⚜🚩⚜
*जे जे तुम्ही वदवाल कांही ।*
*तेंच लिहीन कागदीं पाहीं ।*
*स्वतंत्रता मजला नाही ।*
*मी पोषणा तुमचना असें ॥*
*.... संत दासगणु*.
*लिहण्याची प्रतिभा लाभणे ही परमेश्वर कृपाच. पण त्याला अपेक्षितच लिहतात ते संतच. यामुळेच त्यांचे लिखाण भक्तांना अमृत ठरतय. शंभर वर्षे कोट्यावधी भक्तांना त्यांच्या भक्तीरसपुर्ण शब्दानी संजीवन दिलेय. आज शिर्डी असो वा शेगाव जगभर भक्त दासगणुंचे ऋणी आहेत.*
*आधुनिक महिपती.. संत दासगणू म्हणजेच नारायण दत्तात्रय सहस्रबुद्धे (१८६८-१९६२). जन्म आकोळनेर. गणपतीसारखे त्यांचे पोट म्हणून घरच्यांनी नाव ठेवले गणेश. हे सहस्रबुद्धे घराणे हे मूळचे कोतवडे जि. रत्नागिरी येथील पण कामानिमित्त अहमदनगर येथे स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण चौथी पर्यत. सुखी परिवारात जन्म.*
*त्यांच्या जीवनातील घटना बघता त्यांच्याकडून मोठे कार्य घडावे हीच परमेश्वर इच्छा होती. त्यांना बालपणापासून काव्याची आवड. पण शिक्षणात लक्ष नव्हते. तेव्हा तमाशात त्यांच्या काव्याला मागणी होती. पण "तुझे कर्तुत्व काही नाही, गावात जो मान आहे तो आमच्यामुळे", असे घरच्यांचे बोल ऐकताच स्वाभिमानाने घर सोडले. लावणीकार ते संत प्रवास सुरू झाला.*
*देहयष्टी उत्तम होतीच. एका इंग्रजी पोलीस अधिकाऱ्याने बघताच त्यांना पोलीस म्हणून नोकरी दिली. दहा वर्षे नोकरी आणि तमाशासाठी काव्यलेखन सुरू होते. अनेक गावात दरोडे टाकून दहशत पसरवणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी नेमणूक झाली. त्यासाठी हे गणेश एका मंदिरात रामदासी वस्त्र घालून मुक्कामाला असतांना त्या डाकूला सुगावा लागला. त्याने गणेशांच्या दोन साथीदारांना मारले पण गणेशांना सोडले. त्या मंदिरात केलेल्या सेवेचे फळ म्हणून जीव वाचला असे वाटले. त्यांचे जीवनच बदलले. त्यांनी नोकरी सोडली.*
*त्यांना वामनशास्त्री इस्लामपूरकर हे गुरु लाभले. त्यांनी शिवमंत्र दिला तरीही पंढरपूर वारी करायला सांगितले. त्यांनी त्यांचे दास म्हणून दासगणू नाव स्विकारले. तमाशा सोडून महाराजांची प्रतिभा भक्तीरसात चिंब होवू लागली. त्यांचा अध्यात्माचा गाढा अभ्यास होता. ते सहजतेने तत्त्वज्ञान मांडायचे. कीर्तनकार दासगणूंच्या रसाळ वाणीने राज्यभर भक्तीचा महिमा वाढला. शिर्डीच्या साईबाबांची भेट झाली. बाबांच्या उपस्थितीतच संस्थान उभे राहीले अन् त्या संस्थानचे अध्यक्ष म्हणून ३९ वर्षे भक्तीभावाने पद सांभाळले. तिथे बाबांच्या समोरच रामनवमी उत्सव प्रारंभ केला. स्वतः दरवर्षी कीर्तन केले.*
*दासगणु महाराज निस्पृह अन् मृदू मनाचे. त्यांनी बालपणापासून अनाथ मुलाचा घरात सांभाळ केला.. संस्कार केले. यामध्ये वरदानंद भारती एक. तर दुसऱ्या छगनराव बारटक्केंना गजानन विजय ग्रंथ लिहून काढण्याचे पुण्य लाभले. ते पण पूढे कीर्तनकार झाले. दासगणुंनी प्लेगच्या साथीत अनेकांना मदत केली. नांदेड जवळ गोरटे येथे भक्त देशमुख कुटुंबाने त्यांना शेत दान दिले.. मंदिर बांधून दिले. आज गोरटे संस्थान दासगणूंचे संस्थान ओळखले जाते. वरदानंदानी दासगणुंचे साहित्य प्रकाशित केले.*
*आज आणि.सदासर्वकाळ दासगणुंचे नाव घराघरात घेतले जाणारच. गजानन महाराज स्तोत्र असो वा विजय ग्रंथ, साईबाबांची पोथी याची लाखो पारायणे होतात. आरती नित्य म्हटली जाते. दासगणुंनी वयाच्या ७२ व्या वर्षी हा गजानन महाराज विजय ग्रंथ लिहला. याचे हक्क संस्थानला दिले. या ग्रंथाचे इंग्रजी.. हिंदी.. गुजराथी.. कानडी, तेलगू.. तमिळमध्येही अनुवादीत आहे.*
*दासगणू असामान्य प्रतिभेचे धनी होती. ८५ संतांची चरित्र.. अनेक आरती, संतकथामृत.. भक्तीसारामृत, सुमध्वविजय सारामृत.. आद्य शंकराचार्यचरित्र, विष्णू सहस्त्रनाम.. उपनिषदावर टीका, अमृतानुभव, शांडिल्यसुत्र टीका तसेच १२५ बोधकथा असे प्रचंड लिखाण भक्तांना अत्यंत सुलभपणे रसाळ भाषेत उपलब्ध करुन दिलेय. दासगणूंची जीवनभरातील संत वृत्तीने संत म्हणून ओळख जगात आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी १९६२ मध्ये संत ज्ञानेश्वर समाधी दिवशीच पंढरपूरला देह ठेवला हे पण त्यांच्या भक्तीचे फळ.*
*आमच्या जीवनात भक्तीभावाची बीजे रुजविणाऱ्या संत दासगणूंना जन्मदिनी त्रिवार वंदन.*
⚜🔆⚜🔆🚩🔆⚜🔆⚜
1️⃣
*गण गण गणात बोते*
*हे भजन प्रिय सद्गुरुते*
*या श्रेष्ठ गजानन गुरुते*
*तुम्ही आठवित रहा याते*
*हे स्तोत्र नसे अमृत ते*
*मंत्राची योग्यता याते*
*हे संजीवनी आहे नुसते*
*व्यवहारिक अर्थ न याते*
*मंत्राची योग्यता कळते*
*जो खराच मांत्रिक त्याते*
*या पाठे दुःख ते हरते*
*पाठका अती सुख होते*
*हा खचित अनुग्रह केला*
*श्री गजानने तुम्हांला*
*घ्या साधुन अवघे याला*
*मनी धरून भाव भक्तीला*
*कल्याण निरंतर होई*
*दुःख ते मुळी नच राही*
*असल्यास रोग तो जाई*
*वासना सर्व पुरतिलही*
*आहे याचा अनुभव आला*
*म्हणुनिया कथित तुम्हांला*
*तुम्ही बसून क्षेत्र शेगांवी*
*स्तोत्राची प्राचिती पहावी*
*ही दंतकथा ना लवही*
*या गजाननाची ग्वाही*
*रचना : संतकवी दासगणू* ✍️
*स्वर : अनुराधा पौडवाल*
⚜🔆⚜🔆🌹🔆⚜🔆⚜
2️⃣
*संतकवी दासगणू रचित अभंग*
*स्वर : ह. भ. प. विक्रमबुवा*
*नांदेडकर (दासगणू)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-०६.०१.२०२५-*
🌻🥀🔆🌸🌻🌸🔆🥀🌻