Friday, 6 December 2024

महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील

 महाराष्ट्र औद्योगिकशैक्षणिकसामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 5 : महाराष्ट्र औद्योगिकशैक्षणिकसामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहीलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावेसंघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडेसचिव प्रवीण पुरोमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य राहील यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातीलअसे सांगून मुख्यमंत्री  फडणवीस म्हणालेराज्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करून विकासाचा वेग वाढविण्यात येईल. मागील अडीच वर्षांत राज्य शासनाने घेतलेले विविध निर्णय कायम राहतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना सुरूच राहतील. त्यांची आगामी काळात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने मागील काळात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील. त्यात नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू करण्यावर भर राहील. सन २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. राज्यातील जनतेच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले जातील. समृद्धी महामार्गामुळे जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत होत आहे. याच धर्तीवर शक्तीपीठ मार्गासाठी संबंधित भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढण्यात येईल.

राज्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक उद्योगांशी चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. हे उद्योग राज्यात आल्यानंतर रोजगार निश्चित वाढेल. मागील वर्षभरात राज्यात थेट परकीय गुंतवणुकीपैकी 90 टक्के गुंतवणूक केवळ मागील सहा महिन्यात आली आहे.  हा वेग असाच कायम राहीलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या शक्ती कायद्याबाबत केंद्र सरकारशी संवाद साधण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

०००००

Thursday, 5 December 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचेकडून नव्या सरकार स्थापनेचा दावा

 From Raj Bhavan P.R.O :

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचेकडून

नव्या सरकार स्थापनेचा दावा

 

मुंबई, दि. ०४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवनमुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला.

केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारमणगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीचंद्रशेखर बावनकुळेप्रफुल पटेलरावसाहेब दानवेअशोक चव्हाणसुनील तटकरेचंद्रकांत पाटीलसुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

००००

 

 

From Raj Bhavan P.R.O :

 

 

CM, Dy CMs stake claim to form new government

 

            Mumbai 04 : Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Ajit Pawar called on Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. They staked their claim to form the new government.

Union Minister of Finance and Corporate Affairs Nirmala Sitharaman, former Gujarat Chief Minister Vijay Rupani, Chandrasekhar Bawankule, Praful Patel, Raosaheb Danve, Ashok Chavan, Sunil Tatkare, Chandrakant Patil, Sudhir Mungantiwar and others were present.

000

घराची निंदा करु नये.*

 *👉घराची निंदा करु नये.*


       जरा वेगळे वाटते ना? पण आपण स्वतःशी थोडा विचार केला तर किंवा काही लोकांचे बोलणे ऐकले तर आपल्याला लक्षात येते, की घराला सहज नावे ठेवली जातात. किंवा काही मंडळी इतरांच्या घराशी आपल्या घराची तुलना करतात आणि घरी बोलावण्याचे टाळतात.  


     आज आपण हा विचार करु या. आपण जेथे राहतो त्या घरात आपल्याला कसे वाटते. या घराने आपल्याला काय काय दिले? आपली किती सुख दुःखे आपल्या बरोबर अनुभवली आहेत?  आपल्याला किती संरक्षण,आधार दिला आहे. लहान मुलांना तर स्वतःचे घर खूप प्रिय असते. लहान मुले वैश्विक शक्तीशी जोडलेली असतात. घरातील चांगली ऊर्जा त्यांना समजते. आपल्याला घर निर्जीव वाटत असेल तरी त्यालाही भावना असतात. ते आपल्याशी बोलते. जसे आपण नवी खरेदी केली की आपल्याला आनंद होतो तसेच घरही प्रसन्न होते. घराची स्वच्छता केली, रंग दिला किंवा घरातील वस्तूंच्या जागा बदलल्या तरी आपण म्हणतो  *घराची ऊर्जा बदलली आहे.* घरात छान प्रसन्न वाटत आहे. असे बरेच प्रसंग आपल्याला आठवतील. घराची विविध रुपे आपण अनुभवतो. पण लक्षात घेत नाही. आणि कधी कधी घराची निंदा करतो. अगदी सहज या घराने मला काय दिले? असे वैतागाने म्हणून जातो. त्यावेळी घर नाराज होते.  आपले पूर्वज कायम म्हणतात, *वास्तू नेहेमी तथास्तू म्हणत असते. म्हणून चांगले बोला* आपले पूर्वज फार महत्वाचे सांगत होते. त्यांचे सगळे सांगणे शास्त्रावर आधारित होते. त्यामुळे  *घराची निंदा करु नये.* हे खूप महत्वाचे वाटते. या. साठी पुढील काही संकल्प महत्वाचे वाटतात.


*घरासाठी संकल्प*


   घरात सगळेजण देवाचे करतात.पोथी वाचन अनेक वर्षे सुरु आहे. घरात सुबत्ता आहे.सर्व भौतिक सुविधा आहेत.हे सगळे असले तरी एखादा छोटासा किंतू असतो.आणि सर्व सुखांच्या आड येणारे हेच असते.थोडक्यात म्हणजे सगळे उत्तम आहे,पण..... असे ऐकू येते.आणि हा पण म्हणजे पाणी साठ्यातून जसे पाणी झिरपते तसे असते.

तर या झिरपणाऱ्या पाण्याला/पणला /किंतूला दूर करु या.

या साठी काही गोष्टी करु या.

     आपण देवपूजा,पोथी वाचन आरती किंवा अजून काही करत असू तर ते उत्तमच आहे. पण एक असे असते या सगळ्याची ठराविक वेळ असते.त्या वेळी आपले विचार अत्यंत उत्तम,सकारात्मक असतात.पण हे सगळे झाल्यावर नंतर पुन्हा असे विचार कधी करतो? याचा विचार प्रत्येकाने करावा.या गोष्टी आपण दिवसातून एकदा किंवा दोनदा करतो.पण आपण पाणी पिणे,चहा घेणे,जेवणे,झोप घेणे अशा आणि काही आवश्यक गोष्टी वारंवार करतो.मग आपल्या कुटुंबा विषयी असे सकारात्मक विचार ( संकल्प ) सुद्धा सतत करायला हवेत.

       घरातील व्यक्ती एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागणे.आनंदाने संवाद करणे,एकमेकांमचा सर्वांनी स्वीकार करणे या साठी काही संकल्प पुढील पद्धतीने करु या. कोणतीही पद्धत किंवा जमेल त्या पद्धती वापराव्यात.


 *घरात दर्शनी भागात सर्व  सदस्य असतील असा फोटो लावणे. म्हणजे आनंदी फॅमिली फोटो घरात लावावा.*


काही सकारात्मक वाक्ये नेहेमी उच्चारावीत. ही वाक्ये पुढील प्रमाणे.


▪️ *आमचे घर हे एक पवित्र मंदिर आहे.*


▪️ *मी व घरातील प्रत्येक व्यक्ती पवित्र व शक्तिशाली वैश्विक शक्तीचा अंश आहेत.*


▪️ *सगळे सुखी व आनंदी आहेत.*


▪️ *सगळे एकमेकांना समजून घेत आहेत.*


▪️ *सगळ्या सदस्यांचे एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.*


▪️ *घरातील प्रत्येकाला त्यांच्या मनाप्रमाणे सुख व समाधान मिळालेले आहे.*


▪️ *आम्ही सगळे कायम एकमेकांच्या सोबत आहोत.*


▪️ *अशा घरात व घरातील सदस्यांच्या सोबत मी रहात आहे.त्या साठी देव/निसर्ग शक्ती / वैश्विक शक्ती यांचे मनापासून आभार!*

भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणा-या मीडिया पुरस्कार-2024 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणा-या

 मीडिया पुरस्कार-2024 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

            मुबंईदि.४ : राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये  चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रीत (प्रिंट मीडिया)टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक)रेडीओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी  पुरस्कार या चार  पुरस्कारांचा समावेश आहे,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 

प्रसारमाध्यमांनी आपले प्रस्ताव दि. १० डिसेंबर २०२४ पर्यंत  राजेश कुमार सिंगअवर सचिव (संवाद),  भारत निवडणूक आयोगनिर्वाचन सदन. अशोका रोडनवी दिल्ली 110001. ईमेल: media-division@eci.gov.in ,  फोन नंबर: ०११-२३०५२१३१ केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली यांच्या कार्यालयाकडे परस्पर पाठवायचे आहेत.  प्रस्ताव इंग्रजी अथवा हिंदी भाषांमध्ये सादर करावेत. इतर भाषेतील प्रस्ताव  इंग्रजी भाषांतरासोबत सादर करावे.  पुरस्कारासंदर्भात अंतिम निर्णय हा निवड समितीचा राहील. प्रस्तावावर आपले पूर्ण नावप्रसारमाध्यमांचा सविस्तर पत्ता,संपर्क क्रमांक,ईमेल यांची अवश्य नोंद करावी.

 

निवडणुकांबद्दल जागरुकता निर्माण करूननिवडणूक प्रक्रियेबद्दल लोकांना साक्षर करूननिवडणुकीशी संबंधित माहिती व तंत्रज्ञान वापरयुनिक/रिमोट मतदान केंद्रांवरील कथा आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून मतदाननोंदणीची प्रासंगिकता आणि महत्त्व या कार्यात निवडणूक सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या  उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. 

 

 निकष -  या पुरस्कारासाठी सादर करण्यात येणारे वृत्त,प्रसिद्धी साहित्य   2024 दरम्यान प्रसारित/प्रक्षेपित प्रकाशित केले गेले असावे.  संबंधित कालावधीत केलेल्या कामाचा सारांश ज्यामध्ये बातम्या/लेखांची संख्याचौरस सेमी मध्ये एकूण मुद्रणपीडीएफ सॉफ्ट कॉपी QR संबंधित वेब पत्त्याची लिंकवर्तमानपत्र/लेखांची पूर्ण आकाराची छायाप्रत/मुद्रित प्रतथेट सार्वजनिक सहभाग इ. इतर माहिती याचा समावेश करावा.

 

            मुद्रित माध्यमांसाठी प्रसिद्ध झालेले लेख अथवा बातम्या यांचा आकारआणि पीडीएफ कॉपी सोबत जोडणे आवश्यक आहे.यासोबतच दैनिकाचा वर्ग अथवा एबीसीद्वारे प्रमाणित वर्गवारी यांची माहिती द्यावी.

ईलेक्टॉनिक माध्यमे यामध्ये विविध वाहिन्यारेडीओ यासाठी प्रसारित केलेले साहित्य पेन ड्राईव्ह मध्ये सादर करावे तसेच प्रसारित झालेल्या बातम्या,यशोगाथा विशेष वृत्तांकन यांच्या प्रसारणाची वेळ नमूद करावी. मतदान जनजागृतीबाबत इतर विशेष उपक्रम वाहिनीमार्फत राबवण्यात आले असल्यास त्याची माहिती द्यावी.

प्रसारण/टेलिकास्टचा कालावधी आणि वारंवारता आणि कालावधी दरम्यान प्रत्येक स्पॉटच्या अशा प्रसारणाची एकूण वेळ,  सर्व स्पॉट्स/बातम्यांच्या एकूण प्रसारण वेळेची बेरीज याची माहिती नमूद करावी.  सीडी किंवा डीव्हीडी किंवा पेन ड्राईव्हमध्ये इतर डिजिटल मीडियावरील बातम्या फीचर्स किंवा मतदार जागृतीवर कार्यक्रमकालावधीटेलिकास्ट/प्रसारण तारीख आणि वेळ आणि वारंवारता याची माहिती द्यावी.

समाजमाध्यमांवरील प्रसारित साहित्य यामध्ये ब्लॉगकॅम्पेनट्विट आणि लेख याची माहिती पीडीएफ तसेच सॉप्ट कॉपीमध्ये सादर करावी. तसेच प्रसारित केलेल्या लिंकचा तपशीलही त्यात द्यावा. याशिवाय लोकजागृतीसाठी इतर काही उपक्रम राबवले असल्यास त्याची माहिती द्यावी.

निवड झालेल्या पुरस्कारार्थींना राष्ट्रीय मतदार दिनी 25 जानेवारी 2025 रोजी  पुरस्कार प्रदान केले जातील,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

0000


Wednesday, 4 December 2024

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

  

सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल

आणि परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

 

            मुंबईदि. 4 : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातूनमत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण जानेवारी 2025 ते 30 जून 2025 या कालावधीत देण्यात येणार आहेया 133 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवामुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले असल्याचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारीवर्सोवा यांनी कळविले आहे. इच्छुकांनी 24 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसायनौकानयनाची मूलतत्वेसागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्तीमासेमारीची आधुनिक साधनेप्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थीकडून प्रतिमहिना रूपये 450/-दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून रूपये 100/- शुल्क आकारले जातेया प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थी निकष खालीलप्रमाणे आहेत.

            1) प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. 2) प्रशिक्षणार्थी 18 ते 35 वयोगटातील असावा. 3) प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. 4) ) प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 5) प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 6) प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक / आधारकार्डधारक असावा. 7) प्रशिक्षणार्थीचा विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज असावा व त्या अर्जावर संबंधीत मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक असून 8) प्रशिक्षणार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यासअर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्रसंबंधीत गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची स्वाक्षाकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

 

या आयोजित प्रशिक्षणासाठी निकषांची पर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई-61 येथे 24 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावया प्रशिक्षण सत्राच्या अधिक माहितीसाठी सचिन भालेरावमत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारीवर्सोवामो. 9920291237 आणि जयहिंद सूर्यवंशीयांत्रिकी निर्देशक मो. 7507988552 यांचेशी संपर्क साधावा. असे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा यांनी कळविले आहे.

 

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस कार्यक्रमाचे 10 डिसेंबर रोजी आयोजन § विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन व माहितीचे स्टॉल

 आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस कार्यक्रमाचे

10 डिसेंबर रोजी आयोजन

§  विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन व माहितीचे स्टॉल

 

मुंबईदि. 4 :  आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या वर्षाची संकल्पना (अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाऊ) अशी आहे.  यानिमित्त आयोजित राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती निवृत्त न्यायाधीश एन.एच पाटील यांची असणार आहे.

 या कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर (रा. अचलपूरजि. अमरावती) हे अनाथ विकलांग मुलांच्या जीवनाच्या पुनर्वसन या विषयावरटाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सच्या सहायक प्राध्यापक डॉ. वैशाली कोल्हे दिव्यांग व्यक्तींचे हक्कएनजीओचे श्रीरंग बिजूर ऑटीझम / एएसडी दिव्यांगाचे हक्क या विषयावरहेल्पेज इंडिया संस्थेचे सहसंचालक व्हॅलेरिअन पैस ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अंकुर ट्रस्टच्या सचिव डॉ. वैशाली पाटील आदिवासी कातकरी जमातीतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न या विषयावरवाशिम येथील फार्मलॅब येरंडा ॲग्रोसोल्युशन प्रोड्युसर कंपनीचे संचालक संतोष चव्हाण शेतीतील खर्च कमी कसा करावा या विषयावर  बीआयएफ कंपनीचे अधिकारी संजय पाटील हे शेतीतील जैव विविधता व समाजातील हक्क या विषयावर संबोधीत करतील.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या 2024 सोव्हिनिरचे प्रकाशन करण्यात येणार आहे.  कार्यक्रमात संपूर्ण राज्यातील 350 विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे व्यक्ती सहभागी होणार आहे. तसेच कार्यक्रम ठिकाणी बांधावरील प्रयोगशाळाआहार हेच औषधमहिला व मुलांची देह विक्रीबाबत जनजागृतीदिव्यांग व ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर व आदिवासी भागातील समस्या व त्यांचे हक्काबाबत जनजागृती करणारे स्टॉलही असणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य मानवी हक्क आयोगाने महात्मा गांधी यांच्या 11 शपथांवर आधारीत समाजरचनेच्या संकल्पनेची मांडणी व्याख्यानांद्वारे व स्टॉलवरील प्रदर्शनीद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहेअसे आयोगाचे अध्यक्ष के.के. तातेडसदस्य एम.ए सईदसंजय कुमारसचिव नितीन पाटील यांनी कळविले आहे.

                                    मानवी हक्क आयोगाविषयी थोडक्यात..

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना मार्च 2001 रोजी करण्यात आली. आयोगामध्ये सदस्य आहेत. 7500 प्रकरणे 2024 मध्ये प्राप्त झाली आहे. त्यापैकी 5700 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. तसेच आयोगाने 134 प्रकरणांमध्ये सुमोटो दखल घेतलेली आहे. परदेशातील अनेक संस्था भारताच्या इतर राज्यातील मानवी हक्क आयोगाचे प्रतिनिधीराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे प्रतिनिधी यांनी 2024 मध्ये आयोगास भेट दिली आहे. आयोगाने यावर्षी लोकांमध्ये जागरूकता व्हावीम्हणून जिल्हास्तरावरसुद्धा कार्यशाळा घेतल्या आहेत.

मुंबई येथील आयोगाच्या न्यायालयीन कामकाजात नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. बऱ्याच दिव्यांग मुलांना स्वयंसेवी संघटनांकडून दानाच्या स्वरूपात असिस्टीव्ह डिव्हाईसेस’ मिळवून दिले आहे.  मानवी हक्काचे विषय विधी शाखेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वेच्छा कार्यक्रम व परिविक्षाधीन कार्यक्रम राबविले आहे. आयोगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे प्रश्नदेहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्नमहिला व मुलींच्या विक्रीबाबत आळा घालण्याबाबत पोलीसांसोबत शिबिरे घेण्यात आली आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'महापरिनिर्वाण दिनानिमित्त' ‘माहिती व जनसंपर्क’तर्फे अनोखी मानवंदना § माहितीपट आणि चित्रपटाचे महासंचालनालयाच्या

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'महापरिनिर्वाण दिनानिमित्त'

माहिती व जनसंपर्कतर्फे अनोखी मानवंदना

§  माहितीपट आणि चित्रपटाचे महासंचालनालयाच्या

समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार

 

मुंबईदि.  : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'महापरिनिर्वाण दिनानिमित्तशुक्रवारदि. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.

 

महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वा. आणि बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. माहितीपट व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

 

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स - https://x.com/MahaDGIPR

फेसबुक -  https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटाचे सकाळी ११ वा. प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता. महासंचालनालयाच्या एक्स,  फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेचलाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १७ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

 

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याची ऐतिहासिक घटना दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंतिम दर्शनाचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर संगत दत्ता डावजेकर यांचे आहे. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

 

बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे दुपारी १ वा. प्रसारण

भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजन’ ची निर्मिती असलेल्या बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता महासंचालनालयाच्या एक्सफेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने एन.एस. थापा यांनी १९८१ मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दुपारी ४ वा. प्रसारण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी 4 वाजता महासंचालनालयाच्या एक्सया समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.

 

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्रीभारतीय संविधानाचे शिल्पकारमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी  हा चित्रपट नक्की पहायला हवा.

 

या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखलेमृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवालाअरूण साधूदया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेतचित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्यासंगीत अमर हल्दीपूरफोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

०००


 


Featured post

Lakshvedhi