*महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन*
*देशभर हा समता दिन व हाच खरा शिक्षक दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने त्यांच्या* *कार्याची ओळख व्हावी म्हणून हंटर कमिशन संदर्भात* 👇
🧐 *महात्मा फुले आणि "हंटर कमिशन"*
💁♂️ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचे काम करणारे आणि बहुजनांत क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन.
🔍 स्त्री-शोषित-पीडित-अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी म.फुले यांनी हंटर कमिशनसमोर साक्ष नोंदवली होती. याबद्दल थोडक्यात जाणून घ्या हंटर कमिशनचा इतिहास...
❓ *काय होते हंटर कमिशन?*
भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने लॉर्ड रिपन यांच्या कारकीर्दीत १८८२ साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.
🚫 *बहुजनांच्या शिक्षणाला सनातन्यांचा विरोध :* सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले. मुलींना, अस्पृश्यांना शिक्षण देणे म्हणजे देव, धर्म, समाज यांच्या विरोधात वर्तन होय. हा तर हिंदू धर्मावर आघात आहे, अशी आवई सनातन्यांनी उठवली तरीही महात्मा फुले यांनी हार मानली नाही.
🗣️ *हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबांनी नोंदवलेल्या साक्षेत ते नेमके काय म्हणाले?*
➤ १२ वय वर्षे असलेल्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे.
➤ बहुजन समाजातील शिक्षक शाळेत नेमले पाहिजेत.
➤ चढाओढीच्या तत्वावर शिष्यवृत्ती न देता, जी मुले शिक्षणात मागे आहेत त्यांना उत्तेजन दिले गेले पाहिजे.
➤ सरकारने शूद्रांसाठी खेड्यापाड्यात खास शाळा स्थापन कराव्यात.
➤ स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून सरकारने उपाययोजना करावी.
➤ आदिवासी जाती-जमातींना शिक्षणात प्राधान्य देण्यात यावे.
➤ लोकल सेस फंडापैकी जास्त भाग प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा.
➤ प्राथमिक शाळांना प्रांतिक सरकारने भरपूर अनुदान द्यावे.
➤ प्राथमिक शाळांवर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरपालिकांनी घ्यावी.
➤ तसेच शाळेच्या अभ्यासक्रमात व्यवहारोपयोगी शिक्षण म्हणजे शेती, आरोग्य, इतिहास, भूगोल, यांत्रिकी ज्ञान द्यावे असा आग्रह महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर धरला.
🧤 यासोबतच, महात्मा फुले पुढे हंटर कमिशनसमोर म्हणतात की ब्रिटिशांचे शैक्षणिक धोरण त्यांना मान्य नाही. उच्चवर्णियांसाठी पुष्कळ खर्च होतो पण खेड्यातील लोकांच्या शिक्षणासाठी खास प्रयत्न होत नाहीत. तसेच शिक्षण असे असावे की, तरुणांमध्ये स्वत:चा व्यवसाय करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे.
🗾 मुंबई इलाख्यात एक सुद्धा महार अथवा मांग मुलगा किंवा मुलगी महाविद्यालयात काय पण माध्यमिक शाळेतही नव्हती. १८८२ मध्ये हंटर आयोगापुढे मुंबईच्या खालोखाल पुण्यातून आठ निवेदन सादर झाली होती. यापैकी महात्मा फुलेंचे निवेदन बहुजन समाजाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे मानावे लागते.
👌 महात्मा फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते. जोतीराव फुले यांनी एका क्रांतीला सुरुवात केली. आज आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे. या मध्ये महात्मा जोतिबा फुले यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी केलेल्या कार्याला कोटी-कोटी वंदन.