Wednesday, 6 November 2024

आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष

 आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष

यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोलीगोंदियानंदुरबारधुळेआणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने मतदार सुविधांमध्ये सुधारणा केली आहेजसे की मतदार सहाय्य केंद्रे,  मतदार हेल्पलाईनआणि सूचना फलक यांचा समावेश आहे. तरुण मतदारमहिला मतदारांना लक्षात ठेवून हे उपाय योजले आहे.

आचारसंहिता भंगाच्या २८१९ तक्रारी निकाली २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 आचारसंहिता भंगाच्या २८१९ तक्रारी निकाली

२८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

            मुंबईदि. ६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण २८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

            नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

२८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूअमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

0000


--

विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्या

 विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक

शाईच्या बाटल्या

 

            मुंबईदि. ६ : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे.

            राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात मतदान केंद्रानिहाय पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.

            यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरिता राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई विशेषरित्या बनवली जाते. या सर्व शाईच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांना पुढील वाटपासाठी ताब्यात देण्यात येत आहेत.

            मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.     मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात.

००००

राज्यातील एकूण मतदानकेंद्राचा दृष्टीक्षेप मतदान केंद्रांची संख्या – जिल्हानिहाय

 राज्यातील एकूण मतदानकेंद्राचा दृष्टीक्षेप

मतदान केंद्रांची संख्या – जिल्हानिहाय

1.         पुणे - 8462 

2.         मुंबई उपनगर - 7579 

3.         ठाणे - 6955 

4.        नाशिक - 4922 

5.         नागपूर – 4631

6.         अहमदनगर - 3765

7.        सोलापूर - 3738 

8.         जळगाव - 3683 

9.         कोल्हापूर - 3452     

10.       औरंगाबाद – 3273

11.       सातारा - 3165 

12.       नांदेड – 3088 

13.       रायगड – 2820

14.      अमरावती – 2708 

15.       यवतमाळ - 2578 

16.       मुंबई शहर - 2538 

17.      सांगली – 2482

18.       बीड – 2416

19.       बुलढाणा – 2288

20.       पालघर – 2278

21.       लातूर - 2143         

22.       चंद्रपूर - 2077 

23.       अकोला – 1741

24.      रत्नागिरी – 1747

25.      जालना – 1755

26.       धुळे – 1753

27.      परभणी – 1623

28.      उस्मानाबाद - 1523       

29.       नंदूरबार – 1434

30.       वर्धा – 1342    

31.       गोंदिया – 1285

32.       भंडारा - 1167     

33.       वाशिम – 1100

34.      हिंगोली - 1023 

35.      गडचिरोली - 972 

36.       सिंधुदुर्ग – 921

एकूण : 1,00,427 मतदान केंद्र

००००

पांडुरंग स्तुतीची* *काकडा आरतीची*

 🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


               *पांडुरंग स्तुतीची*

             *काकडा आरतीची*

            

🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹

 

  *बहिरा झालो या या जगी ॥*

  *नाही ऐकिले हरिकीर्तन ।*

  *नाही केले पुराण श्रवण ।*

  *नाही वेदशास्त्र पठण ।*

  *गर्भी बधिर झालो त्यागूने* 

  *नाही संतकीर्ती श्रवणी आली ।* 

  *नाही साधुसेवा घडियेली ।* 

  *पितृवचनासी पाठ दिधली ।*

  *तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥*

        *.... संत एकनाथ*

        *गर्भात असतानाचा मूळ स्वभाव.. वृत्ती आणि नरदेह प्राप्त होताच जेव्हा मनुष्य  संसाररत होतो, पितृवाचनाकडेही पाठ फिरवतो, या मानवी स्वभावाबद्दल संत एकनाथ यांचे हे खडे बोल काकडा आरतीवेळी हमखास ऐकू येतात. पण आजही गावोगाव होणारी काकडा आरती म्हणजे लोकं भक्ती प्रवण आहेत हेही तेव्हढेच सत्य आहे.*

        *मराठी रंगभूमीची मुहुर्तमेढ १८४३ मध्ये अधिकृतपणे झाली असली तरीही वेदकाळापासूनची आमची सनातन परंपरा. अगदी लवकुशानेही प्रभू श्रीरामासमोरचे गायन असो वा आजही काकडा आरती होते हे या परंपरेची साक्ष.*

        *या सृष्टीची रंगभूमी चालवणाऱ्याला इथे साद घातली जाते. रंगभूमीला अपेक्षित कलावंत.. वेषभूषा.. गायन.. वादन.. प्रेक्षक.. श्रद्धाभाव असे सारेच घटक इथे आहेत. संत नामदेव.. तुकोबा हे तर उत्कृष्ट कीर्तनकार. मंदिर असो वा उपलब्ध केलेली व्यवस्था हा रंगमंच.*

        *भक्तीमार्ग सापडायला जन्मजन्मांतरीचा पुण्यसंचय हवा. पण संतसंगत लाभली की वाट सोपी होते. संत तुकाराम महाराजांनी तर म्हणलेय की जो परमेश्वराची भक्ती करत नाही, तो कितीही उच्चशिक्षीत विद्वान असला तरी त्याचे जळो शहाणपण. तो त्याच्या वंशाला कमीपणा आणतोय.*

        *संतानी शब्दांत अमृतासम भक्तीरस मांडला. मग भक्त स्वतः त्याचा अनुभव घेऊन सुखावले. रोज पहाटेची काकड आरती हा त्याच आनंदाचा एक भाग. स्वतः संत तुकाराम महाराज हे आपले दैवत पांडुरंगासमोर ही काकडा आरती करत आहेत.*

        

🌹⚜🌸🔆🛕🔆🌸⚜🌹

  

  *भक्तीचिया पोटी*

  *बोध काकडा ज्योती* 

  *पंचप्राण जीवे भावे*

  *ओवाळू आरती*


  *ओवाळू आरती*

  *माझ्या पंढरीनाथा*

  *दोन्ही कर जोडोनि*

  *चरणी ठेवितो माथा*


  *काय महिमा वर्णू*

  *आता सांगणे ते किती* 

  *कोटी ब्रम्हहत्या*

  *मुख पाहता जाती* 


  *राही रखुमाई उभ्या* 

  *दोन्ही दो बाही*

  *मयूर पिच्छे चामरे* 

  *ढाळिती ठायी* 


  *विटेसहित पाय*

  *मनोभावे ओवाळू*

  *कोटी रवी शशी* 

  *दिव्य उगवले हेळू*


  *तुका म्हणे दीप घेऊन* 

  *उन्मनीची शोभा*

  *विटेवरी उभा*

  *दिसे लावण्यगाभा*


🌹⚜️🌸🔆🛕🔆🌸⚜️🌹


  *रचना : संत तुकाराम*  ✍️

  *संगीत : स्नेहल भाटकर* 

  *स्वर : स्नेहल भाटकर*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *‼जय जय रामकृष्ण हरि‼*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

              *-०६.११.२०२४-*


🌻🌸🥀🔆🙏🔆🥀🌸🌻

Tuesday, 5 November 2024

अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम-, कॅन्सरवर बहुगुणी

 *डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर वर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती  उपाय, प्रत्येकाने अवश्य वाचावा असा लेख!!* 


अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम-


स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा. ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा.


भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन. सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल. सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत.. 


सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत ?


◼️लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो.. 


◼️लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते.


◼️लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे. 


मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही ?


कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो.. 


तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिणींना सांगू शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत.


विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो ? 


लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्शन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.


लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते.. 

या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे : 


जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.  ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.. 


लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते. 


आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.


म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा. तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल.


डॉ. विकास बाबा आमटे, आनंदवन


कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.* 

*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक* 


राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात 1,181 मतदान केंद्रे

 राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात

1,181 मतदान केंद्रे

मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात  एकूण मतदान केंद्रे 1,00,186 आहेतयामध्ये शहरी मतदान केंद्र 42,604  तर ग्रामीण मतदान केंद्र 57,582 इतकी आहेतशहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावेयासाठी राज्यामध्ये पुणेमुंबईठाणेशहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेततसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेतसहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 इतकी आहे.

Featured post

Lakshvedhi