Friday, 4 October 2024

जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 

बुलढाणादि. 3 :- खामगांव येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानआळंदीअंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

खामगांवमधील घाटपुरी येथील श्री.जय जगदंबा माता संस्थान येथे आयोजित या भूमिपूजन समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधवआमदार आकाश फुंडकरआमदार संजय गायकवाडअयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजसंस्थानचे अध्यक्ष पंकज केलाउपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टडसंस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून पूजन केले. तसेच जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले, यावेळी संस्थांनच्यावतीने मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी वारकरी संप्रदायांशी संवाद साधला.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लोकराज्य अंकाचे प्रकाशन अंकात मिळणार राज्य शासनाच्या निर्णयांची समग्र माहिती

 राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लोकराज्य अंकाचे प्रकाशन

 

अंकात मिळणार राज्य शासनाच्या निर्णयांची समग्र माहिती

 

मुंबई, दि. 4 : लोकराज्य जुलै-ऑगस्ट 2024  अंकाचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांची उपस्थिती होती.

 

गेल्या दोन वर्षांत शासनाने घेतलेल्या निर्णयांचा समग्र आढावा लोकराज्य अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे मनोगतपर लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

 

 या अंकामध्ये शासनाने आतापर्यंत घेतलेला निर्णयांचा थोडक्यात आढावा लेख स्वरूपात घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचा आढावा आणि महिला लाभार्थ्यांच्या प्रतिक्रियांचाही समावेश करण्यात आला आहे.

 

विविध विभागांच्या निर्णयांचा या अंकात समावेश असल्याबद्दल मंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस देवेंद्र फडणवीस यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

 मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस

देवेंद्र फडणवीस यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

 

मुंबईदि. 3 :मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीहा दिवस उजाडावायासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. लीळाचरित्रज्ञानेश्वरीविवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहेहे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचेअभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात राज्यात मराठी विद्यापीठाची स्थापनाबोली भाषा विस्तार प्रकल्पराज्यात वाचन चळवळपुस्तकांचे गावमराठी भाषा भवन असे अनेक निर्णय समाविष्ट आहेत. माय मराठीची पताका अशीच उंच फडकत राहीलअसेही श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

००००


 

वृत्त क्र. 1839

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे

 मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

 

नवी दिल्लीदि.3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. राज्य शासनाने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहेअशी प्रतिक्रिया मुख्यमंत्रीदोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी व्यक्त केली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेक मराठी भाषकविचारवंतभाषेचे अभ्यासकसाहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांच्यासह मोलाचे सहकार्य करणाऱ्या तसेच मराठी भाषिक व मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्यासंदर्भात मराठी भाषा विभागाने दिलेली माहिती

 

अभिजात भाषेचा दर्जा देण्याची कार्यवाही केंद्र शासनाकडून केली जाते. यासाठी केंद्र शासनाने निकष विहित केले आहेत.

1.         1500-2000 वर्षापर्यंतची अगदी सुरूवातीच्या ग्रंथाची / अभिलिखित इतिहासाची अति प्राचिनता:

2.         भाषकांच्या पिढ्यांनी एक मौल्यवान वारसा म्हणून मानलेले प्राचीन साहित्य / ग्रंथाचा भाग:

3.         साहित्यिक परंपरा मूळ असावी आणि ती अन्य भाषक समाजाकडून उसनवारी केलेली नसावी:

4.        अभिजात भाषा व साहित्य हे अर्वाचीन साहित्यापेक्षा भिन्न असल्यामुळ अभिजात भाषा आणि नंतरची रूपे किंवा तिच्या उप भाषा यामध्ये खंड देखील असू शकेल.

या निकषांच्या आधारे संशोधन आणि अभ्यास करुन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात राज्य शासनाने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञ संशोधकांची समिती दि.10.01.2012 च्या शासन निर्णयानुसार गठीत केली होती.

 या समितीने बरेचसे इतिहास संशोधन केले असून जुने संदर्भप्राचीन ग्रंथपुरातन काळातील ताम्रपटकोरीव लेखशिलालेखांचा संदर्भ इ. प्राचीन दस्ताऐवज तपासले असून त्यांचा आधार घेऊन पुराव्यासह एक सर्वंकष व परिपूर्ण अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालामध्ये सविस्तर विवेचनासह मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळणेसाठी विहीत केलेल्या निकषांची पूर्तता करते हे पुराव्यांसह स्पष्ट केले.

            समितीने तयार केलेला मराठी भाषेमधील मूळ अहवाल दि.12.07.2013 च्या पत्रान्वये केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर समितीने परिशिष्टांसह सादर केलेला इंग्रजीमधील अहवाल देखील केंद्र शासनाकडे दि.16.11.2013 रोजी पाठविला.

तद्नंतर सदर प्रस्तावाबाबत सचिवप्रधान सचिव, मुख्य सचिवमंत्रीमुख्यमंत्री यांचे स्तरावर सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.

दि. 27.02.2020 रोजी 'मराठी भाषा गौरव दिनाचेऔचित्य  साघूनसन 2020 च्या द्वितीय (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी शिफारस करणारा शासकीय ठराव महाराष्ट्र विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित करुन पुढील कार्यवाहीसाठी केंद्र शासनास अग्रेषित करण्यात आला.

या संदर्भात राज्यशासनाचा प्रस्ताव अन्य मंत्रालये व साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञ समिती मार्फत विचाराधीन असल्याचे केंद्रशासनाने त्यांच्या दि. 20/10/2020 च्या पत्रान्वये कळविले. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा यासाठी पत्र माहिम राबवून राष्ट्रपती महोदयांना साधारणपणे 1 लक्ष पत्रेही पाठविण्यात आली. 

            प्रस्तावाबाबत सर्वच स्तरावरुन केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. 

मा. मुख्यमंत्री महोदयांनी दि. 24.08.2022 रोजीच्या पत्रान्वये मा. पंतप्रधान महोदयांना मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत विनंती केली आहे. त्यास अनुसरून केंद्रशासनाच्या संस्कृती मंत्रालयाने दि. 03.02.2023 रोजीच्या पत्रान्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा राज्यशासनाचा प्रस्ताव केंद्रिय मंत्रालयाच्या विचाराधीन असून त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे कळविले. 

            मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता ज्ञानेश्वर मुळे सेवानिवृत्त (भा.वि.से.) यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या अध्यक्षांचा सदस्य स्वरुपात समोवश असलेली एक समिती शासन निर्णयमराठी भाषा विभागदि.14.02.2024 अन्वये गठित करण्यात आली.

त्यानुसार सदर समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून या समितीद्वारे केंद्रशासनाकडे पाठपुरावा चालू होता.   

00000

बी.सी.झंवर/विसंअ


 

 

वृत्त क्र. 1838

 

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा

गौरवशाली इतिहाससांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

 

मुंबईदि. 3 :- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषकमराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहाससमृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेलमराठी भाषा ज्ञानभाषाअर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळाचे मी मनापासून आभार मानतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हणाले की,  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागील अनेक दशकांची मागणी होती. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. यासाठी अनेक दशके प्रयत्न करणाऱ्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त महाराष्ट्रवासीयांचेमराठीभाषकांचेमराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केले असून यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

----००००---


माय मराठीसाठी सोन्याचा दिवस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन

 माय मराठीसाठी सोन्याचा दिवस

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन

 

मुंबईदि. 3 :- आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर  प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरातसातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषासणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचाअभिमानास्पद दिवस आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाचमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमीतसेच साहित्यिकसंशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे.

आजचा हा दिवस यापुढे 'मराठी भाषा गौरव दिनम्हणून साजरा केला जाईलअसेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके।। या ओळींचाही दाखला दिला आहे. ते म्हणतातअखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे. निती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे. मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा हा निर्णय आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतला गेल्याने दुधात साखर असा योग जुळून आला आहे. आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानतो. मराठी भाषा प्रगल्भ आहेच. आता तिचा प्रचारप्रसार आणखी जोमाने करता येईल. मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केलीवाढवली. तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजेअसे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषकविचारवंतभाषा अभ्यासक- संशोधकसाहित्यिक आणि समीक्षक अशा सर्वांचे आभार मानले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे 5 ऑक्टोबरला वितरण

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे 5 ऑक्टोबरला वितरण

-कृषी मंत्री धनंजय मुंडे


मुंबई दि.3 : पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारयवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पतीपत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

 पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्याबॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

Thursday, 3 October 2024

राज्‍य नाट्य स्‍पर्धेच्‍या प्राथमिक फेरीसाठी पाच वाढीव केंद्रांना मान्‍यता कला क्रीडा

 राज्‍य नाट्य स्‍पर्धेच्‍या प्राथमिक फेरीसाठी पाच वाढीव केंद्रांना मान्‍यता

 

मुंबईदि.३ : महाराष्‍ट्र राज्‍य हौशी मराठी नाट्य स्‍पर्धेतील प्राथमिक फेरीसाठी वाढीव पाच केंद्रांना मान्‍यता देण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

          महाराष्‍ट्र राज्‍य हौशी मराठी नाट्य स्‍पर्धेतील प्राथमिक फेरीतील अस्तित्‍वातील १९ केंद्रांव्‍यक्‍तीरिक्‍त पाच केंद्रांची संख्‍या वाढवून एकूण २४ केंद्रे करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. यासंदर्भात हौशी कलावंत संघटनेतर्फे सातत्‍याने पाठपुरावा करण्‍यात आला आहे. दिनांक १० जुलै २०२३ रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह हौशी कलावंत संघटनेच्‍या पदाधिका-यांच्‍या झालेल्‍या बैठकीत वाढीव केंद्रांना मान्‍यता देण्‍याचे आश्‍वासन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता झालेली असून पाच वाढीव केंद्रांना मान्‍यता देण्‍यात आलेली आहे.

000

कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद -

 कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद

केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी

आय. टी. आय मुंबईचे नामकरण आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनींचा राज्यात सहा ठिकाणी शुभारंभ

    मुंबई,दि.३ :  महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून  हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहेज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले.

       एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथे  आय. टी. आय मुंबईचे नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुंबई  आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनी गोरेगावपुणेनाशिकछत्रपती संभाजी नगरअमरावती व नागपूर येथे शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आला. या कार्यक्रमात  केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी  बोलत होते. या कार्यक्रमाला  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,उत्तर प्रदेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अनिल कुमार,राष्ट्रीय लोकदलाचे महासचिव के.पी.चौधरीमाजी लोकसभा सदस्य मलुक नागर,कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील,कौशल्य विकास आयुक्त प्रदिप डांगेकौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकरव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

           केंद्रीय राज्यमंत्री श्री.चौधरी म्हणाले कीआजचा क्षण ऐतिहासिक आहेकारण आपल्या सर्वांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वास्तूत शिक्षण घेतले त्या वास्तूला त्यांचेच नाव देण्याचा समारंभ आणि ज्या व्यक्तीने आयुष्यभर स्वच्छतेचे महत्व पटवून दिले त्या संत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने सहा ॲकडमी सुरू करण्यात आल्या आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.या दोन्ही महापुरूषांचे विचार आपल्या युवा पिढीने  आत्मसात करून  आपल्या देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनण्यासाठीकौशल्यपूर्ण विकास करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.मात्र प्रत्येक राज्यात तिथल्या स्थानिक परिस्थिती लक्षात घेवून शिक्षण दिले पाहिजे.कोणतेही एक मॉडेल सर्वश्रेष्ट नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम केले पाहिजे.

            कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले कीमहाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन व्हावे म्हणून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून त्याची अंमलबजावणी करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी अनेक योजना सुरू केल्या त्याच धर्तीवर राज्यातही कौशल्य विकास विभाग अनेक योजना राबवून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेअसेही ते म्हणाले.   

               उत्तर प्रदेशचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अनिल कुमार म्हणाले कीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्याचबरोबर संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये मी उभा आहे. याचा मला खूप आनंद झाला.आजच्या पिढीने काळानुरूप शिक्षण घेवून राज्याचा आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचार आपल्याला दिले त्या विचारांवर आपण चालले पाहिजे असेही ते म्हणाले.

                यावेळी संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचे प्रतिनिधी मुंबईच्या दिप्ती जाधवपुणेचे सुरज महाजनछत्रपती संभाजीनगरचे सागर भारतीनाशिक प्रमोद दुंगीनागपूरच्या प्रदीप काटकरअमरावतीचे प्रफुल्ल भुसारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

0000

Featured post

Lakshvedhi