Thursday, 3 October 2024

आतुरता शक्ती उपासना पर्वाची* ⚜️

 🌹⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

    *आतुरता शक्ती उपासना पर्वाची*    

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

               

🌺🔱🌸🔆🙏🔆🌸🔱🌺


        *भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणांचा विशिष्ट उद्देश आहे. शारदीय नवरात्र हा तर नैराश्याचा अंत करुन आदिमातेकडून नवशक्ती प्राप्त करणारा कालखंड. जगताना जीवनात शक्ती हवीच. यामुळेच देवीच्या स्वागतासाठी मानवच नाहीतर सारेच सिद्ध झालेत.*

        *सुखावलेल्या निसर्गराजाने रंगीबेरंगी फुलांफळांची मुक्त उधळण केलेली आहे. ती बहरलेली झेंडूची.. गुलाबाची फुलेही आईच्या आगमनासाठी आतुर आहेत. बाजारही फुललेत.*

        *भारतात सगळेच सण सर्वदूर उत्साहानं साजरे होतात. पण तरीही काही प्रांताचे विशिष्ट सणांवर विशेष प्रेम आहे. मग कोकणाचे गणेशोत्सवावर तर बंगाल.. गुजराथ.. राजस्थान.. महाराष्ट्र हे या शारदीय नवरात्र उत्सवावर हक्क सांगतात.*

        *महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या घोर निद्रेचा प्रारंभ झालायं. देवीची निद्रा संपून देवी ३ तारखेला पहाटे घटस्थापनेच्या दिवशी आपल्या सिंहासनावर विराजमान होईल.*

        *या विश्वाची रचना जगन्मातेने केलीय. तिच्याच छत्रछायेत.. तिच्या दयेने आमचे आनंदात जगणे सुरू आहे. सगळ्या दैन्य.. दुःख.. दैत्यांवर आदिशक्ती विजय मिळवते. आमच्या आशा आकांक्षाची पूर्तता करणारी म्हणून देवी ख्यातीप्राप्त आहे. आमच्या जीवनी सर्व शुभंकर घटना तीच पूर्णत्वास नेते.*

        *या मातेनेच अजातशत्रू होण्यासाठी मंजुळ वाणी आम्हांला प्रदान केली आहे. तर सर्वांविषयीचा पवित्र भावनांचा दृष्टीकोन या नयनी आहे. हे आई.. माय भवानी याच भरवशावर हे तुझे लेकरु तुझ्याकडे आलेय. या तुझ्या अजाण बाळाला तुझ्या कुशीत घे. माझ्याकडून होईल तशी तुझी सेवा गोड मानून घे. हेच काय ते मागणे.*

                 

🌹🔱🌸🛕🌺🛕🌸🔱🌹


        *सर्व मंगल मांगल्ये* 

        *शिवे सर्वार्थ साधिके ।*

        *शरण्ये त्र्यम्बके गौरी*

        *नारायणी नमोस्तुते ॥*


  *माय भवानी तुझे लेकरु*

  *कुशीत तुझिया येई*

  *सेवा मानून घे आई*


  *तू विश्वाची रचिली माया*

  *तू शीतल छायेची काया*

  *तुझ्या दयेचा ओघ अखंडित* 

  *दुरित लयाला नेई*


  *तू अमला अविनाशी कीर्ती*

  *तू अवघ्या आशांची पूर्ती*

  *जे जे सुंदर आणि शुभंकर* 

  *पूर्णत्वा ते नेई*


  *तूच दिलेली मंजुळ वाणी*

  *डोळ्यांमधले निर्मळ पाणी*

  *तुझ्या पूजना माझ्या पदरी* 

  *याविण दुसरे नाही*


🌷☘🛕🌸🌼🌸🛕☘🌷


  *गीत : सुधीर मोघे*  ✍

  *संगीत : मीना खडीकर*

  *स्वर : लता मंगेशकर*

  *चित्रपट : शाब्बास सूनबाई (१९८६)*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧

 

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-०१.१०.२०२४-*


🌻🌼🥀🌸🌻🌸🥀🌼🌻

Ek दगड

 *🙏राम राम* 


*✍️...... एक दगड कुत्र्याला मारा, ते लगेच पळुन जाईल. पण तोच दगड उचला आणि मधमाश्यांच्या पोळ्याला मारा, त्या सर्व मिळुण तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळुन जाण्यास भाग पाडतील.....! दगड तोच..... आणि मारणारा पण तोच, फरक आहे फक्त एकटे असल्याचा आणि संघटित* *असल्याचा..... म्हणून संघटित रहा आणि एकमेकास साथ द्या.....!*


*✍️...... आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे . शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते,आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते.*


*‼श्रीराम जय राम जय जय राम‼* 

*

*🙏सु.द.विरकर, महाड 🙏*

तिरुपती बालाजी मंदिरातील पुजाऱ्याचे व सेवकांचे कारनामे पहा.‌.. ,jago bhakto jago

 तिरुपती बालाजी मंदिरातील पुजाऱ्याचे व सेवकांचे कारनामे पहा.‌.. 


म्हणूनच गाडगेमहाराज भजनात सांगत असत की, मंदिरातील दगडाच्या देवावर पुरोहित/बामणाचे पोट असते . .

पूर्ण vdo पहा (आला तसा पाठविला)

थेनांगुर, तामिळनाडूमधील हे विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील काकड आरती सोहळा एकदा पहाच. किती प्रसन्न आणि विलोभनीय विग्रह दर्शन!थेनांगुर, तामिळनाडूमधील हे विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील काकड आरती सोहळा एकदा पहाच. किती प्रसन्न आणि विलोभनीय विग्रह दर्शन! Watch this Kakad Aarti ceremony at Vitthal Rukhmini Temple in Thenangur, Tamil Nadu. What a beautiful and captivating idol viewing! 🍁🪔🙏🪔🍁


 थेनांगुर, तामिळनाडूमधील हे विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील काकड आरती सोहळा एकदा पहाच. किती प्रसन्न आणि विलोभनीय विग्रह दर्शन!


Watch this Kakad Aarti ceremony at Vitthal Rukhmini Temple in Thenangur, Tamil Nadu. What a beautiful and captivating idol viewing!


🍁🪔🙏🪔🍁

जगता आले पाहिजे

 


हवामान खात्यात नोकरी

 


जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला

 जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला।।


१५० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो इंग्रजी राज्यसत्तेचा काळ होता. गुजरातच्या काठियावाड प्रांतात जामनगर संस्थानमध्ये राजवैद्य होते विठ्ठल भट. आयुर्वेदाचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांचा हातगुण चांगला होता. त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत पसरलेली होती.


त्यांच्या मुलाचं नाव करुणाशंकर भट. पण त्याला झंडू भटजी म्हणून ओळखायचे.

हे झंडू भटजी देखील आयुर्वेदाचार्य होते. वैद्य विठ्ठल भट यांच्या हाताखाली ते तयार झाले होते. बाप से बेटा सवाई अशी त्यांची ख्याती झाली होती. स्वतःची औषधे तयार करण्यासाठी त्यांना रसशाळा सुरू करायची होती.


जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्टजी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले,त्यांनी आपल्या संस्थानात रंगमती नदीच्या किनाऱ्यावर थोडीशी जमीन झंडू भट्टजींना बहाल केली.


येथेच १८६४ साली झंडू भट्टजींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली


आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला.

झंडू भटजींची औषधे फक्त जामनगर नाही तर अख्ख्या काठियावाड मध्ये फेमस होती. दुरदूरहून लोक त्यांच्याकडे आपल्या रोगाचे निदान होईल या आशेने येत असत. झंडू भटजींची रसशाळा भारतभर गाजू लागली होती.


या भट्ट कुटुंबाच्या ज्ञानाला आधुनिक रुपात आणायचे श्रेय मात्र त्यांचा नातू जुगतराम वैद्य यांना जाते.


झंडू यांचे नातू जुगतराम वैद्य यांनी केमिस्ट्री व फिजिक्सचे आधुनिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राजकोट मधील ब्रिटिश प्रोफेसर ली यांच्या लॅबमध्ये काम केलं होतं. आपली पारंपरिक औषधे जर आधुनिक रुपात आणली तर ती जगभरात पोहचवता येईल हे जुगतराम वैद्य यांच्या लक्षात आलं.


पण आजोबा झंडू भटजी यासाठी तयार होत नव्हते.

एवढंच काय त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नव्हतं. फक्त एकजण तयार झाला ,


झंडू यांचा जावई प्रभाशंकर पट्टानी


हे प्रभाशंकर पट्टानी म्हणजे भावनगरच्या राजाचे पंतप्रधान होते. खरंतर त्यांचं देखील आडनाव भट्ट होतं. पण सुरवातीला त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्याकाळी डॉक्टर व्हायचं म्हणून ते मुंबईला गेले पण ते जमलं नाही.


राजकोटला परत आल्यावर मास्तरकी सुरू केली.

झंडू भटजींच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं पण सासर कडच्या कोणीतरी त्यांचा डॉक्टर न झाल्यावरून अपमान केला व प्रभाशंकर यांनी पट्टानी हे आडनाव धारण केल.


प्रभाशंकर मुळात हुशार होते. राजकोटमध्ये शिकायला आलेल्या भावनगरचा राजकुमार भावसिंग याला त्यांची खाजगी शिकवणी लावण्यात आली.


हा भावसिंग कायम डोकेदुखीने त्रस्त असायचा. त्यामुळे चिडचिड होऊन स्वभाव रागीट बनला होता.


त्याच्या प्रकृतीचा पट्टानी यांच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. त्याला बरे करण्यासाठी प्रभाशंकर यांनी आपल्या सासऱ्यांना सांगून बनवलेलं एक खास बाम आणून दिल.


ते बाम लावल्यावर राजकुमाराची डोकेदुखी पळून गेली. तेच ते आजचे सुप्रसिद्ध झंडू बाम.

त्यानंतर भावसिंग यांचा प्रभाशंकर यांच्या वरचा विश्वास वाढला. पुढे ते जेव्हा भावनगरच्या राजेपदी आले तेव्हा या आपल्या गुरूला पंतप्रधान बनवलं.


प्रभाशंकर पट्टानी यांनी पुढची तीस चाळीस वर्षे काटेकोरपणे राज्यकारभार चालवला. भारताच्या राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे वजन होते.


अगदी महात्मा गांधीजींचे ते खास मित्र होते.


अस सांगितलं जातं की जेव्हा असहकार आंदोलनावेळी चौरीचौरा प्रकरण घडलं तेव्हा पट्टानी यांनी गांधीजींचे तुमच्या आंदोलनात हिंसा होत आहे असं सांगून कान धरले व त्याचाच परिणाम गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्धच असहकार आंदोलन मागे घेतले.


ज्या जावयाचा झंडू भटजींच्या कुटूंबाने अपमान केला त्याचीच मदत घ्यायची वेळ त्यांच्या नातवावर आली.

पण मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रभाशंकर यांनी जुगतराम वैद्य यांना राजाकडून सर्वोतोपरी साहाय्य मिळवून दिले व या दोघांनी मिळून १९१० साली झंडू फार्मसिटीकल कंपनीची स्थापना केली.


अगदी काही काळातच झंडू बाम तुफान फेमस झाले. डोकेदुखी पासून अंगदुःखी पर्यंत प्रत्येक गोष्टीवरील रामबाण उपाय म्हणून त्याला पाहिलं गेलं.


पुढच्या ९ वर्षात ही कंपनी शेअर बाजारात देखील आली.

झंडू भटजींनी रस शाळा सुरू केली त्याला जवळपास १५० वर्षे झाली, या कंपनीचा विस्तार शेकडो कोटींचा बनला आहे. आता या कंपनीची मालकी झंडू भटजींच्या कुटुंबाकडे राहिलो नाही पण फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्यांची उत्पादने पोहचली आहेत.


दबंग मधली मलायका अरोरा देखील झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए जेव्हा म्हणते तेव्हा या आयुर्वेदिक औषधीचा संबंध भारतीय समाजावर झालेला परिणाम दिसून येतो.


डॉक्टरच्या आधी मदतीला येणारा, प्रत्येक घरात हमखास दिसणारा झंडू भटजींचा झंडू बाम १५० वर्षांचा झाला तरी त्याचा इफेक्ट कमी झाला नाही हे नक्की.

Featured post

Lakshvedhi