Thursday, 5 September 2024

शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

 शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

 

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सोनेसांगवी येथील पिंगला सहकारी सूतगिरणीस शासकीय अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

 नवीन वस्त्रोद्योग धोरणातील तरतुदीनुसार १५:३५:५० या आकृतीबंधानुसार अटी व शर्तींच्या अधिन राहून हे अर्थसहाय्य देण्यात येईल. आतापर्यंत १४३ सूत गिरण्यांना शासकीय अर्थसहाय्य देण्यात आले आहे.


अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार

 अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार

अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी मोर्शी शहरातील जलसंपदा वसाहतीतील ०.६१ हेक्टर आर तसेच ४.०८ हेक्टर आर जागा तसेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी राष्ट्रीय मत्स्य बीज केंद्र सिंभोरा यांची ३३ हेक्टर एवढी जमीन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांना देण्यात येईल.  या महाविद्यालयातील  पदांसाठी ३१ कोटी ४८ लाख रुपये खर्च येईल. त्याशिवाय बांधकाम, फर्निचर वाहन खरेदी यासाठी १७१ कोटी ६ लाख खर्च येईल.

यापूर्वी मोर्शी तालुक्यातील मौ. पार्डी येथे हे मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली होती. मात्र, ही जागा उपयुक्त नसल्याने मोर्शी शहरातील उर्ध्व वर्धा जलसंपदा वसाहतीतील जागा निश्चित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.


पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

 पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

पुणे ते शिरुर हा 53 कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून एमएसआयडीसीमार्फत हे काम केले जाईल. यासाठी 7 हजार 515 कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण रस्ता मार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासाठी 2 हजार 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

शिरुर ते अहमदनगर या मार्गामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे.  त्यामुळे ही पथकर वसुली संपल्यानंतर हा मार्ग हस्तांतरित करण्यात येईल. अहमदनगर ते देवगड हा रस्ता सुधारण्यासाठी तो एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल.  तसेच देवगड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. ती संपुष्टात आल्यानंतर हा मार्ग एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल.


ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतमुख

  

ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये

रूपांतरणासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत

 

मुंबई, दि. ५ : ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे. अशा वाहन चालकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अनुज्ञप्तीचे (ड्रायव्हींग लायसन्स) संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.

१५ सप्टेंबरनंतर मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण केले जाणार नाही याची अनुज्ञप्ती धारकांनी नोंद घ्यावी. मुंबई (मध्य) ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात कार्यालयीन इमारतीचे बांधकाम, आय ॲण्ड सी सेंटर, वाहन चालक प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम होणार आहे. या कार्यालयाकडून नोव्हेंबर २००६ पूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व अनुज्ञप्ती धारकांना अनुज्ञप्ती मानवी स्वरूपातच आहे, अशा अनुज्ञप्ती धारकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत या कार्यालयामध्ये येऊन आपले अनुज्ञप्तीचे संगणक प्रणालीमध्ये बॅकलॉग करून घ्यावे. आणि मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्माट कार्डमध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

Drink का महिमा

 दिल्ली से न्यूयॉर्क की उड़ान में 400 यात्री थे !... लेकिन भोजन केवल 200 लोगों का लोड किया गया था !.....एयरलाइन से गड़बड़ी हो गई थी !.....और चालक दल घोर चिंता में था !....... तभी एक स्मार्ट फ्लाइट अटेंडेंट के पास एक विचार आया !..... उड़ान के लगभग 30 मिनट बाद उसने घोषणा की !.... "देवियों और सज्जनों, मुझे नहीं पता कि यह कैसे हुआ !.....लेकिन हमारे पास 400 यात्री हैं और केवल 200 लोगों के लिए डिनर है !.....कोई भी जो किसी और के लिए अपना भोजन छोड़ने के लिए तैयार है !.....तो उड़ान की पूरी अवधि के दौरान उसे मुफ्त असीमित शराब मिलेगी !.....

उसकी अगली घोषणा 6 घंटे बाद आई !...."देवियों और सज्जनों, अगर कोई अपना विचार बदलना चाहते हैं !.... तो हमारे पास अभी भी 180 लोगों के लिए भोजन उपलब्ध है !......


मोरल ऑफ़ द स्टोरी:

शराब पीने वालों के दिलों में त्याग की भावना कूट-कूट कर भरी होती है !......उनका दिल बड़ा दयालु होता है !.... कृपया उनका सम्मान करें ..

🤪🤪😄😄😅😂

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल; जागतिक कृषि परिषदेच्या 20 देशांतील प्रतिनिधींच्या मुखं

  

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची

जागतिक पातळीवर दखल;

जागतिक कृषि परिषदेच्या 20 देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

 

मुंबई, दि.04 : पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या कामांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान जागतिक कृषि परिषदेचे पदाधिकारी स्वतः महाराष्ट्रात येऊन करणार आहेत, ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची  आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत जागतिक कृषि परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे 18 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईतील एन सी पी ए सभागृहात आयोजन  करण्यात आले आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 'मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार कक्ष' सभागृह येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय बांबू मिशनचे सदस्य व राज्य टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यापूर्वी हा सन्मान सोहळा वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित केला होता. परंतु कार्य बाहुल्यामुळे तेथे येण्यास मुख्यमंत्र्यांनी असमर्थता दर्शवल्याने परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, अशा पद्धतीने विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. मुंबई येथे होणाऱ्या सन्मान सोहळ्यासाठी 18 सप्टेंबर 2024 रोजी जगातील विविध 20 देशांचे फोरमचे पदाधिकारी आणि 20 देशांचे भारतातील दूतावासात नियुक्त राजनीतिक उच्चाधिकारी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रात प्रयत्न

 मुख्यमंत्री श्री.शिंदे  यांनी पर्यावरण व शाश्वत विकास टास्कफोर्सची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री श्री. शिंदे असून अंमलबजावणीसाठी कार्यकारी अध्यक्षपदी पाशा पटेल यांना नेमले आहे. संबंधित सचिव यांचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 5% बायोमास वापरायचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यासाठी 21 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी एक लाख वीस हजार एकर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या याच प्रयत्नांमुळे ॲगीकल्चर टुडे या संस्थेने मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचा दिल्लीमध्ये नुकताच सन्मान केला आहे.  त्याची दखल आता थेट जागतिक पातळीवर घेण्यात आली व वर्ल्ड एग्रीकल्चर फोरमने पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

'जागतिक कृषि परिषदेने' अन्न सुरक्षा विषयी जागतिक व्यासपीठ 

जागतिक कृषि परिषद हे अन्न सुरक्षा विषयी जागतिक नेत्यांना चर्चा करण्यासाठी अनोखे व्यासपीठ आहे. जागतिक कृषी परिषदेचे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंज हे आहेत.

 कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या अनुषंगाने भविष्यातील धोरण आणि जागतिक स्तरांवर  होत असलेल्या कामांची दखल घेऊन जागतिक पुरस्कारासाठी जगातील विविध देशातून नामांकन विचारात घेण्यात येतात. जागतिक परिणामकारक वनस्पती विज्ञान, कृषी विषयक विविध पैलूंबद्दल माहिती घेताना उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान, व्यवसाय, धोरण आणि आर्थिक परिस्थिती, पोषण, अन्न प्रक्रिया, पाणी आणि पर्यावरण या व्यापक बाबींचा  समावेश करते.यासाठी योग्यता आणि पूर्णतेसाठी नामांकनांचे पुनर्विलोकन करून, ते निवडीसाठी पाठवले जातात. निवड समिती नंतर नामांकनांचे पुनर्विलोकन करते आणि  प्राप्तकर्त्याची शिफारस करते.

 

आंतरराष्ट्रीय बांबू दिनी चर्चासत्र व कार्यक्रमाचे आयोजन

पाशा पटेल म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटेनियो गुटेरस यांनी वातावरण बदलाबद्दल सगळ्या जगाला आवाहन केले आहे." तापमान वाढीचे युग संपले असून होरपळ युग सुरू झाले आहे आता तातडीच्या कृतीची गरज आहे, " या त्यांच्या आवाहनाला जगभरातून भारत देशाने आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले. तापमान वाढ, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली.

येत्या बुधवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन फिनिक्स फाउंडेशन लोदगा, जिल्हा लातूर यांनी केले असून 18 सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधून हा महत्त्वाचा कार्यक्रम एनसीपीए सभागृहात सकाळी 11 वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत भरगच्च चर्चासत्रांनी पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील या विषयातले तज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात मुख्य सत्काराचा कार्यक्रम पार पडेल.

जगाचा 'हॅपिनेस इंडेक्स' वाढवण्याची कलावंतांमध्ये ताकद

 जगाचा 'हॅपिनेस इंडेक्स' वाढवण्याची कलावंतांमध्ये ताकद

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे थाटात वितरण

 

मुंबई, दि. ०४ : जगभरात आर्थिक क्षमता, विविध क्षेत्रातील प्रगती यावरून 'ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स' काढण्यात येतो. मात्र तरीही चिंता,  समस्या आहेतच. त्यामुळे जगात आता या इंडेक्स ऐवजी 'हॅपिनेस इंडेक्स' महत्त्वाचा आहे. हा इंडेक्स वाढविण्याची ताकद केवळ कलावंतांमध्येच आहे, असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात काढले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव  पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभ आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. कार्यक्रमात मंत्री श्री. मुनगुंटीवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,  सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, गोरेगाव चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की,  सर्व कलावंत आणि त्यांची कला ही अनेक पिढ्यांचे समाधान करत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम या कलावंतांनी केले आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्याची प्रथा, परंपरा आहे. आपला देश संस्कृतीप्रधान आहे, एखाद्याच्या योगदानाचं मनापासून कौतुक करणं, त्याला दाद देणं यासाठी विशाल हृदय लागतं. महाराष्ट्र शासनाने ही सहृदयता जपली आहे. आपल्या मराठी माणसाचं आपण कौतुक करणं यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या कामासाठी मान्यता आणि कृतज्ञता दर्शविणारा हा सोहळा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अभिनय, लेखन, किर्तन, प्रवचन, नृत्य, दिग्दर्शन या विविधागी कलांनी आपला महाराष्ट्र नटलेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला ऐतिहासिक आणि गौरवशाली परंपरा आहे.समर्पित भावनेने काम करणाऱ्या वृद्ध कलावंतांना राज्य शासन मदत करते त्यासाठी असणारी वयोमर्यादा आपण ५० वर्ष इतकी ठेवली. ही वयोमर्यादा ठेवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या वृध्द कलावंतांचा सन्मान निधी सरसकट पाच हजार रुपये करण्यात आला आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार  म्हणाले, राज्यात ७५ चित्र नाट्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात बदल करण्यात येत आहे. राज्यामध्ये चित्रपटांना चित्रीकरणासाठीची लागणारी परवानगी एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. तसेच बालनाट्य सृष्टीच्या विस्तारीकरणासाठी सरकार कार्य करीत आहे.  त्यासाठी येणाऱ्या सूचनांचे स्वागत करून त्याची यथोचित अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

यावेळी प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कला संस्कृतीच जतन आणि संवर्धन करणाऱ्यांचा हा सन्मान आहे. विविध परंपरेने, संस्कृतीने नटलेला असा हा आपला महाराष्ट्र आहे. कलाकारांमुळे ही संस्कृती टिकली आहे. कलांवतांचा संपूर्ण मदत करण्याचे काम शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. पुरस्कारासाठीची  रक्कम दुप्पट व तिप्पट करण्यात आली आहे. 

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. 

सन २०२४ साठीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांना,  भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार सन २०२४ आरती अंकलीकर, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन २०२४ ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुध्दीसागर,  संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन २०२४ शुभदा दादरकर, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सन २०२३ चा शशिकला झुंबर सुक्रे यांना घरी जाऊन नंतर देण्यात येणार आहे. तर सन २०२४ पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना प्रदान करण्यात आला.

तसेच २०२४ साठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही या समारंभात प्रदान करण्यात आले. राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये विशाखा सुभेदार (नाटक), डॉ. विकास कशाळकर  (उपशास्त्रीय संगीत), अभिमन्यू धर्माजी सावदेकर  (लोककला), शाहीर राजेंद्र कांबळे (शाहिरी),  सोनिया परचुरे (नृत्य),  संजय नाना धोंडगे (किर्तन /समाजप्रबोधन), पांडुरंग मुखडे (वाद्यसंगीत), नागेश सुर्वे (कलादान), कैलास मारुती सावंत (तमाशा) आणि शिवराम शंकर घुटे (आदिवासी गिरीजन) यांना गौरवण्यात आले. 

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात अजित परब, संज्योती जगदाळे, केतकी भावे - जोशी, अरुण कदम, श्याम राजपूत, भार्गवी चिरमुले, विकास पाटील, शाहीर शुभम विभुते यांच्यामार्फत सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य संचालक श्री. चवरे यांनी केले.

Featured post

Lakshvedhi