Thursday, 13 June 2024

ये है बेल फुल, अतिशय दुर्लभ दर्शन



पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर

 पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर


आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा


- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


            मुंबई, दि. 12 : राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा पुरवठा केला जात असला तरी येणाऱ्या काळात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्य शासनातर्फे खतांचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यात येतो. पणन महासंघासह इतर संस्थांनी आवश्यकतेनुसार व प्राप्त उद्दिष्टानुसार आपल्या वाट्याच्या खतसाठ्याची संपूर्ण उचल करावी. त्यानंतरही आवश्यकता असल्यास कृषी विभागाने पणन महासंघास अतिरिक्त कोटा मंजूर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज पणन महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीस कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक पांडुरंग घुगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील, नाफेडच्या व्यवस्थापक भाव्या आनंद आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पणन महासंघाने शेतकऱ्यांसाठी चांगले काम केले आहे. महासंघाने आपल्या कामात आणखी सुधारणा करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी शासनातर्फे महासंघाला अधिक सहकार्य करण्यात येईल. राज्यात जिल्हा पणन कार्यालयांच्या माध्यमातून ग्रामीण सहकारी संस्थांच्या मदतीने गावपातळीपर्यंतच्या शेतकऱ्यांना वाजवी दरात खतांचे वितरण करण्यात येते. यामुळे पणन महासंघाअंतर्गत काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या उत्पन्नात वाढ होण्यासही मदत होते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पणन महासंघास आवश्यकतेनुसार व प्राप्त उद्दिष्टानुसार संरक्षित खतसाठा वितरित करावा. धान खरेदीसाठी आवश्यक असणारा बारदाणा पूर्वीप्रमाणे महासंघामार्फत खरेदीसाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही केली जावी. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या दराने आणि त्यांच्या पॅनेलवरील पुरवठादारांकडून बारदाण खरेदीसाठी महासंघाने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.


            शालेय पोषण आहार योजनेत पणन महासंघ निविदा प्रक्रियेद्वारे नियमानुसार सहभागी होऊ शकतो. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून चना व तूर विक्री तसेच अनुषंगिक खर्चापोटी आणि धान व भरड धान्य खरेदी पोटी अनुषंगिक खर्चाची प्रलंबित रक्कम मिळण्याबाबत शासन स्तरावर नियमाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. याबाबत लवकर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिवांनी बैठक घेऊन योग्य शिफारशी कराव्यात. नाफेड अंतर्गत खरेदी केलेल्या कडधान्य वाहतूक रकमेबाबतीतही गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी विभागांना दिले.


            पणन महासंघाच्या कृषी, पणन आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाकडील अन्य मागण्यांवर देखील सकारात्मक चर्चा झाली. याबाबतीतही वेगाने निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. अन्न व नागरी पुरवठा विभागाने त्यांच्या सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन पणन महासंघाने मागणी केलेल्या प्रलंबित रकमेबाबत अहवाल द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  


----------------०००००-------------

मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४ नियमांचे पालन करण्याचे मुद्रणालयांना निर्देश

 मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४

नियमांचे पालन करण्याचे मुद्रणालयांना निर्देश

            मुंबई, दि. १२ :- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या पार्श्वभूमीवर मुद्रणालयांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम१९५१ चे कलम १२७ ए (Section १२७A) अन्वये नियमांचे पालन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

            लोकप्रतिनिधित्व अधिनियम१९५१ चे कलम १२७ ए (Section १२७A) अन्वये मुद्रणालयांवर निवडणुकविषयी पत्रकेभित्तीपत्रकेफलक इत्यादींचे मुद्रण व प्रकाशन करणेबाबत निर्बंध लादण्यात आलेले आहेत. कलम १२७ ए मध्ये 'मुद्रित करण्यात येणारी पत्रके यांच्या मुखपृष्ठावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद करणेप्रकाशकाकडून ओळखीबाबतचे घोषणापत्र घेणेमुद्रित करण्यात आलेले पत्रकफलक इ. यांची संख्या व त्यासाठी आकारण्यात आलेले शुल्क यांची माहिती सादर करणे आवश्यक असते. कलम १२७ ए मधील तरतूदींचा भंग केल्यास करण्यात येणारी कारवाईइ. बाबतच्या तरतूदी नमूद करण्यात आल्या आहेत.

            लोकप्रतिनिधित्व अधिनियम१९५१ चे कलम १२७ ए (Section १२७A) मधील नमूद तरतूदी कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षनिवडणूक लढविणारे उमेदवार व मुद्रणालयांना निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रातील सर्व मुद्रणालयांनी कलम १२७ ए मधील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.

------000-------

मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक २०२४ १४ जून रोजी प्रथम प्रशिक्षण

 मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक २०२४

१४ जून रोजी प्रथम प्रशिक्षण

            मुंबई, दि. १२ :- मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रथम प्रशिक्षण १४ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

            सकाळी ९:०० ते दुपारी १:३० यावेळेत मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहविलेपार्ले रेल्वे स्टेशनजवळविलेपार्ले पूर्व मुंबई ४०००५७ येथे हे प्रशिक्षण होणार आहे.

            भारत निवडणूक आयोगाने  अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

            जिल्ह्यांतील मतदान केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्षमतदान अधिकारी क्र.१व ३ चे आदेश निर्गमित करण्यात आले असून सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.


शिक्षक व मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करावे

  शिक्षक व मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक २०२४

आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करावे

- जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबई, दि. १२ :- मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व संबंधित पदनिर्देशित अधिकारी व समन्वय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे तसेच या निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालनही काटेकोरपणे करावे असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

            मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४- च्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पदनिर्देशित अधिकारी व समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडनिवासी उपजिल्हाधिकारी सतिष बागल ,उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.

मतदान केंद्रे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश

            श्री. क्षीरसागर म्हणालेमुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूकीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रे सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.

            दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. वाहतूक आराखडे तयार करावे. निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी कालबद्ध वेळापत्रक तयार करण्याचे निर्देशही श्री क्षीरसागर यांनी दिले.

१४ जून रोजीच्या प्रशिक्षणास सर्व संबंधितांची उपस्थिती बंधनकारक

            मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण १४ जून रोजी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणास सर्व संबंधितांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

-----000------

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून संपूर्ण सहकार्य

 राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून संपूर्ण सहकार्य

- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा

            मुंबईदि. 12 : आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आपण रूग्णसेवा करण्याचे ईश्वरीय कार्य करीत आहोत. ही सेवा राज्यात चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र या सेवेमध्ये आणखी सुधारणा करून बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला संपूर्ण सहकार्य मिळेलअशी ग्वाही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणआयुष (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिली.

            केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्री. जाधव यांनी आरोग्य भवन येथे राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. बैठकीस राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंतआमदार संजय रायमुलकरसचिव नवीन सोना,  आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमारवैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरमहाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगेआयुष विभागाचे संचालक प्रा. व्ही. डी रमण घुंगराळेकरमहात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाणराज्य कर्मचारी विमा योजनचे आयुक्त अस्तिककुमार पांडेयवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर,  संचालक डॉ नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.

            आयुर्वेदाकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणालेआयुर्वेदामध्ये आवश्यकतेनुसार नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले पाहिजे. स्वतंत्र फार्मासिस्टस्वतंत्र संशोधनाची व्यवस्था उभारून आयुर्वेदामधील महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केले पाहिजे. देशात काही राज्यात स्वतंत्र आयुष विभाग असून राज्यात त्यासाठी प्रयत्न करावेत. आयुर्वेदासाठी आवश्यक असणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड वाढली पाहिजे. त्यासाठी हर्बल गार्डन’ ही संकल्पना राबविण्यात यावी. अशा औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून आयुर्वेद उत्पादनांसाठी कच्चा माल म्हणून उपलब्ध करून देण्यात यावा. या औषधी वनस्पतींच्या विक्रीची हमी शेतकऱ्यांना देण्यात यावी.

            सध्या पाणी नमुने घेतले जात आहेत. याकडे बारकाईने लक्ष ठेवून पाणी नमुण्यांचे अहवाल तपासण्यात यावेत. पावसाळ्यात साथीचे रोग फैलावत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे साथरोग उद्भवण्याच्या आधीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात याव्यात. या विभागाचे काम करताना नाविण्यपूर्ण संकल्पनांचा अवलंब केला पाहिजे. आयुष विभागाच्या माध्यमातून असंसर्गजन्य आजारांवर विविध उपचार पद्धतींचे संशोधन झाले पाहिजे. यासाठी आयुष विभागाने दूरगामी सकारात्मक परिणाम होतीलअशा कामांचा समावेश असलेला चांगला आराखडा बनवून द्यावा. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या बाबीअडचणी व उणीवांचा समावेश असावा.

            आरोग्य मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणालेराष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासन पीआयपी’ (कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा) अंतर्गत वर्षाला निधी देत असते. या निधीमधून राज्यात आरोग्य यंत्रणेतील विविध पायाभूत सुविधांची कामे केली जातात. यामुळे निश्चितच आरोग्य यंत्रणा बळकट होते. तरी  केंद्र शासनाकडून पीआयपीमध्ये वाढीव निधी देण्यात यावा. आरोग्य विभागातंर्गत काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठीनागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी केंद्रांचे सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी दिल्ली येथे राज्यातील आरोग्य यंत्रणेसोबत बैठक घेण्याची मागणीही त्यांनी केली.

             बैठकीत संचालक डॉ. अंबाडेकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. याप्रसंगी आरोग्य विभागराष्ट्रीय आरोग्य अभियानचे अधिकारी उपस्थित होते.

००००

लेक लाडकी योजनेला अधिक गती द्यावी

 लेक लाडकी योजनेला अधिक गती द्यावी

- महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

 

            मुंबईदि. १२ : मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या  लेक लाडकी  योजनेतून १८ हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला. ३८ हजार प्रक्रियेत असून त्यांनाही लवकरच लाभ मिळेल. परंतू या योजनेची अधिक जनजागृती करून या योजनेला गती द्यावी अशा सूचना  महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

              मंत्री कु. तटकरे यांनी आज मंत्रालयात लेक लाडकी योजनेचा राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी महिला बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवएकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त  कैलास पगारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

             ज्या जिल्ह्यात अर्जाची संख्या कमी आहे तिथे विविध माध्यमातून जनजागृती करून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या.

            लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना दिला जातो. या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपयेइयत्ता पहिलीत ६ हजार रुपयेसहावीत ७ हजार रुपयेअकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाते  आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतात अशाप्रकारे एकूण १ लाख १ हजार रुपये देण्यात येणार आहे.

००००

Featured post

Lakshvedhi