Saturday, 4 May 2024

मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आर्वजून बजावावा

 मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आर्वजून बजावावा

- मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

·        तिसऱ्या टप्प्यासाठी  7 मे रोजी मतदान २३ हजार ०३६  मतदान केंद्र

·        सुमारे 2 कोटी 9 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज

·       उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधा

·        दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सरासरी 62.71 टक्के मतदान

            

मुंबईदि. 3 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेट तसेच मतदारांच्या संख्येनुसार पुरेशा प्रमाणात मंडप व्यवस्था, प्रतिक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

            मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

            यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणालेदुस-या टप्प्यात बुलढाणाअकोला, अमरावतीवर्धायवतमाळ-वाशिमहिंगोलीनांदेडपरभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्पात एकूण सरासरी 62.71 टक्के मतदान झाले.

            तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 02, पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे  रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  यासाठी एकूण २३ हजार ०३६  मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी ०९ लाख ९२ हजार ६१६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४६,४९१ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,०३६ आणि २३,०३६ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून तिसऱ्या टप्प्यात एकूण २५८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

       तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.  मात्र मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवढे मतदार उपस्थित असतील त्या सर्वांची  मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मतदान केंद्र सुरु राहील. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) रुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली असून घरोघरी वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या असून इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करत आपला मतदानाचा महत्वपूर्ण हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.      

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

            85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

            मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही  रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

            मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

            कायदा व सुव्यवस्थांतर्गत 1 मे पर्यंत 50,397 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 1,110 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,595  इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,11,878 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.    राज्यामध्ये दि. 1 मार्च ते  २ मे  2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 49.95  कोटी रोख रक्कम तर 36.80 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 129.89 कोटी रुपयेड्रग्ज 220.65 कोटीफ्रिबीज .४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत ९२.९२ कोटी रुपये अशा एकूण ५३०.६९ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

     ३३,४६१ तक्रारी निकाली

               16 मार्च ते 2 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ४३४२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ४३३३ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ३४,१६८ तक्रारीपैकी ३३,४६१ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे २०५ प्रमाणपत्र वितरित

               राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने २०५ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या मतदानाच्या टक्केवारी

 

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरूष मतदार

मतदान केलेले पुरूष मतदार

महिला मतदार

मतदान केलेल्या महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

मतदान केलेले तृतीयपंथी मतदार

एकूण मतदार टक्केवारी

1

05- बुलढाणा

933173

603525

(64.67%)

849503

502226

(59.12%)

24

10

(41.67%)

62.03%

2

06 - अकोला

977500

 

634116

(64.87%)

913269

 

534239

(58.50%)

45

11

 (24.44%)

61.79%

 

3

07- अमरावती

944213

 

631920

(66.93%)

891780

537183

(60.24%)

85

18

(21.18%)

63.67%

 

4

08- वर्धा

858439

 

586780

(68.35%)

824318

 

504560

(61.21%)

14

 

9

(64.29%)

64.85%

 

5

14- यवतमाळ - वाशिम

1002400

 

655658

(65.41%)

938452

 

564508

(60.15%)

64

 

23

(35.94%)

62.87%

 

6

15 - हिंगोली

946674

 

628302

(66.37%)

871035

 

526647

(60.46%)

25

 

9

(36.00%)

63.54%

 

7

16 -नांदेड

955084

 

606482

(63.50%)

896617

 

522062

(58.23%)

142

 

20

(14.08%)

60.94%

 

8

17 -परभणी

1103891

 

717617

(65.01%)

1019132

 

604247

(59.29%)

33

 

4

(12.12%)

62.26%

 

 

तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 02 आणि पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 07.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.   त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

मतदान केंद्रे

क्रिटिकल मतदान केंद्र

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

बॅलेट युनिट (बीयु)

कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1

32-रायगड

2185

06

13

2185

2185

2185

2

35-बारामती

2516

03

38

7548

2516

2516


Friday, 3 May 2024

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

 निवडणुकीदरम्यान 'डीप फेकरोखण्यासाठी

कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

 

            मुंबईदि. 3 : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओजक्लिप्सफोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे.

            फोटोशॉपमशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओजक्लिप्सफोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवारराजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओऑडिओफोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटोऑडिओव्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. असे गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडिओजक्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते. निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावीअशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

            राज्य शासनामार्फत पोलीस महासंचालकांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पोलीस खात्यामार्फत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानेही विपर्यस्त माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत.

000

समाजमाध्यमांवरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे -

 समाजमाध्यमांवरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे

- निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

 

            मुंबई उपनगरदि. 2 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतानाच उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर होणाऱ्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावेअशा सूचना 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी दिले.

            मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. थिंड माध्यम कक्षाचे कामकाजदैनंदिन पाठविले जाणारे अहवालसमाजमाध्यमवर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांचे सनियंत्रण कशा प्रकारे केले जात आहेयाची माहिती घेतली. सध्या वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा समाजमाध्यमांचा अधिकाधिक प्रचार उमेदवार करताना दिसतात. त्यामुळे या माध्यमाद्वारे उमेदवारांच्या प्रचाराकडे आणि त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चावर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या भेटीत श्री. थिंड यांनी माध्यम कक्षांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Featured post

Lakshvedhi