Friday, 12 April 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना

जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन


 

            मुंबईदि. १२ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात गृह तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी बृहन्मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मंत्रालय सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत परदेशी, कर्मचारी संघटनेचे भारत वानखेडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खजूरात असलेल्या गुणधर्मामुळे त्याला पुर्ण आहार म्हणतात.

 *खजूर*


खजूरात असलेल्या गुणधर्मामुळे त्याला पुर्ण आहार म्हणतात. अनेक पोषक गुणधर्मामुळे हे फळ उपासात वापरले जाते. खजूरा बद्दल उष्ण असल्याचा एक चुकीचा समज आहे.पण आयुर्वेदाच्या मतानुसार तो शीतल गुणधर्म असलेला पदार्थ आहे.

*खजूराचे गुण

हे मधूर, पौष्टिक, बलवर्धक, श्रमहारक ,पित्तशामक, वीर्यवर्धकआणि  शीतल गुणधर्म वाला आहे.  यात जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट आणि शर्करा असल्यामुळे त्याला संपूर्ण आहार म्हणतात.

*खजूरातील घटकः

मिनरल्स ,कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त, सोडियम.जीवनसत्त्वे- व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, नियासिन, रिबोफ्लेविन, थायामिन इ.घटक खजूरात असतात.


*दररोज किती खजूर खावेत

सामान्य पणे तीन ते चार खजूर रोज खाणे योग्य तर डायबेटीस पेशंट ने रोज दोन खजूर खायला हरकत नाही. अर्थात ज्याची शुगर नियंत्रित आहे त्यांनीच.


*खजूर खाण्याचे फायदे.

*वातपित्त शमक वात आणि पित्त कमी करते

 *बल शक्ती प्रदान करते.

*बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

*हृदयाचे आरोग्य सुधारते

*कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

*हाडांचे आरोग्य सुधारते.

रक्तदाब नियंत्रित ठेवते.

*स्त्री आणि पुरुष दोघांची लैंगिक शक्ती वाढवते.

*मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.

*थकवा (अशक्तपणा) दूर करते.अशक्तपणासाठी सर्वोत्तम.

*वजन वाढण्यास प्रोत्साहन देते,तसेच वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो. 

*मूळव्याध प्रतिबंधित करते.

*सूज येण्यावर प्रतिबंधित करते.

*निरोगी गर्भधारणेसाठी फायदेशीर.

*तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सर्वोत्तम.

*आतड्यांसंबंधी समस्या,

*रातांधळेपणाची समस्या रोखण्यासाठी देखील प्रभावी आहेत.

*आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. 

*आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. 

*खजूरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं. 

*खजुरात असलेल्या फ्लेवोनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासासाठे होतो. 

*खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. साखर नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.

*खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फाॅस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. हाडं मजबूत ठेवण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. खजूर नियमित खाल्याने हाडांच्या विकाराचा धोका टळतो.

*नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं ॲनेमियाचा धोका टळतो.

  आशा आहे आपणास आजची ही पोस्ट आवडेल.

*ही सर्वसाधारण माहिती असून आपापल्या प्रकृती नुसार व तज्ञांच्या सल्ल्याने प्रयोग करावा.*

Thursday, 11 April 2024

मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

 मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून

पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

 

            मुंबईदि. 11 :- कोणताही राजकीय पक्षनिवडणूक उमेदवारइतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एम.सी.एम.सी.) प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नयेअसे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

            राज्यात लोकसभा निवडणूक 2024 पाच टप्प्यात होणार आहे. त्यानुषंगाने मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदान दिनी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी त्या 48 तास  आधी एम.सी.एम.सी. कडून पूर्व-प्रमाणित करून घ्यावी, असे निर्देश आयोगाने दिले आहे.


सूर्य तिलक

 


राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

 राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात;

चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

 

            मुंबईदि. 11 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. नंदुरबारगोंदियारत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष  मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

पुण्यात 82 लाखांहून अधिक मतदार

            पुण्याची एकूण मतदार संख्या 82 लाख 82 हजार 363 आहे. तर मुंबई उपनगरची एकूण मतदार संख्या 73 लाख 56 हजार 596 इतकी आहे. ठाण्याची एकूण मतदार संख्या 65 लाख 79 हजार 588नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 48 लाख 08 हजार 499 इतकी आहे. तर नागपूरची एकूण मतदार संख्या 42 लाख 72 हजार 366 इतकी आहे.

रत्नागिरीनंदुरबारगोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या अधिक

            चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या 13 लाख 03 हजार 939असून यामध्ये 11 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 31 हजार 012 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 72 हजार 916 इतकी आहे. नंदुरबारची एकूण मतदार संख्या 12 लाख 76 हजार 941 असून यामध्ये 12 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 37 हजार 609 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 39 हजार 320 इतकी आहे. गोदिंया जिल्हयातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या 10 लाख 92 हजार 546असून यामध्ये 10 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 41 हजार 272 आहे तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 51 हजार 264 इतकी आहे. सिंधुदुर्गची एकूण मतदार संख्या 6 लाख 62 हजार 745असून यामध्ये 1 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3 लाख 30 हजार 719 आहे तर महिला मतदारांची संख्या 3 लाख 32 हजार 025 इतकी आहे.

            राज्यात 19 एप्रिल26 एप्रिल7 मे13 मे आणि 20 मे अशा पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. राज्यात 8 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 मतदारांची नोंद आहे. यामध्ये 4 कोटी 80 लाख 81 हजार 638 पुरुष मतदार तर 4 कोटी 44 लाख 04 हजार 551 महिला मतदार आणि 5 हजार 617 तृतीयपंथी मतदार आहेत.

5 जिल्ह्यात 30 लाखांहून अधिक मतदार

            अहमदनगरसोलापूरजळगावकोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये 30 लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 252 आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 141 आहेत. जळगावमध्ये एकूण मतदार 35 लाख 22 हजार 289 आहेत. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार 31 लाख 72 हजार 797 आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार 30 लाख 48 हजार 445 आहेत.

            बुलढाणाअमरावतीयवतमाळनांदेडरायगडमुंबई शहरबीडसातारासांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

००००

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची 

सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

            मुंबईदि. १० : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रितगट-ब मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या  एकूण ३७८ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. ही यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

            ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो, असे आयोगाने कळविले आहे.

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पुढे ढकलला

 पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा 

शारीरिक चाचणी कार्यक्रम पुढे ढकलला

 

            मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा - २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे२०२४ या कालावधीत आयोजित केला होता. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक आहे. या कारणांमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होवू न शकल्याने शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

            पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा - २०२२ च्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले असल्याने शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.

सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करणार

            राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे शारीरिक चाचणीचा दिनांक १५ एप्रिल ते २ मे२०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असूनशारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi