Wednesday, 10 April 2024

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आतापर्यंत 14 हजार 368 तक्रारींचे निवारण

 मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

आतापर्यंत 14 हजार 368 तक्रारींचे निवारण

 

            मुबंईदि. १० : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

            देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँड पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त १८ तर गुजरातमध्ये ७१२४ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत,

            महाराष्ट्रातील तक्रारींमध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे २ हजार ८१८, मुंबई उपनगरातून २ हजार ३३१ आणि ठाण्यातून २ हजार १८३ तक्रारी आलेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातून सर्वांत कमी म्हणजे ३४ तक्रारी आलेल्या आहेत.

            सर्वाधिक तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्यांमध्ये ४ हजार ५५६ तक्रारींचा समावेश आहे. मतदार ओळखपत्रावरील दुरुस्त्या करण्यास विलंब झाल्याबद्दल १ हजार ८४८ तक्रारी आल्या आहेत. ई- मतदार ओळखपत्राविषयी १०४७ तक्रारी आहेततर नवे ओळखपत्र मिळवण्याधा अर्ज नाकारल्याबद्दल ५२१ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मतदार यादीत नाव न सापडल्याबद्दल ५०० तक्रारी आलेल्या आहेत.

            तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्रमतदार यादीमतदान चिट्ठी (स्लिप)निवडणूक आयोगाची विविध अॅप्सराजकीय पक्षमतदान दिन आणि इतर या विषयांवरील तक्रारींचा समावेश आहे. मतदारांच्या तक्रारींचे निवारण करताना त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जातात. मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांना मतदार नोंदणीपासून ओळखपत्र मिळेपर्यंतचा कालावधी साधारण ४५ दिवसांचा असतो. मात्र ई-ओळखपत्र दहा-बारा दिवसांत मिळू शकतेत्यासाठी त्यांनी मतदार यादीत मोबाइल क्रमांक नोंदवावाअसे सांगितले जातेकोणाला मतदार यादीत नाव सापडत नसल्यास त्यांना नाव शोधण्याची प्रक्रिया सांगितली जाते. तसेच कोणाचे नाव वगळले गेले असल्यास त्याचे कारण आणि प्रक्रिया सांगितली जाते. प्रश्नकर्त्यांचे उत्तराने समाधान न झाल्यास त्याला पुन्हा प्रश्न विचारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

0000

कोकण कुणबी रहिवासी संघ डोंबिवली यांनी शोभा यात्रा मध्ये रामराज्य ची थीम सादर करताना

 कोकण कुणबी रहिवासी संघ डोंबिवली यांनी शोभा यात्रा मध्ये रामराज्य ची थीम सादर करताना





जर तुम्हीही जेवणानंतर "बडीशेप" खात असाल, तर आवश्य वाचा

 *जर तुम्हीही जेवणानंतर "बडीशेप" खात असाल, तर आवश्य वाचा.* 


           बडीशेपला सर्व मसाल्यांचा राजा म्हटलं जातं, भारतातील बहुतांश लोक जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणे पसंद करतात. अनेक जणांना तर बडीशेप शिवाय जेवण झाल्यासारखेच वाटत नाही. बडीशेपमुळे पचन सुधारण्यास मदत होते, सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधी देखील कमी होते. बडीशेप मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करू शकतात. कदाचित आपल्याला माहीत नसेल, मात्र जे लोक नियमित बडीशेपचे सेवन करतात. त्यांचं आरोग्य आणि रोग प्रतिकार शक्ती बडीशेप न खाणाऱ्या व्यक्तीपेक्षा किती तरी पटीने अधिक असते, हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे.


बडीशेप ही केवळ स्वयंपाक घरातील एक मसाला नाही, यामध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशिअम यांसारखे तत्व आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. बदाम आणि बडीशेप एकत्र वाटून, दररोज जेवणानंतर त्याचे एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. तर मित्रांनो आज आपण बडीशेप चे असेच फायदे पाहणार आहोत.


१) बडीशेप खाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे, तो म्हणजे तुमच्या त्वचेच्या तक्रारी दूर होतात. दररोज बडीशेप खाल्यास आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो, आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल्स, मुरुम येत असतील, तर हे मुरुम देखील दूर होऊ शकतात.


२) शरीरातील हार्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी, तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे घटक उपयोगी असतात. नेमके हेच घटक बडीशेप मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळेच आपल्या शरीरातील हार्मोनची पातळी चांगली राहते. तसेच पिंपल्स पासून देखील आपला बचाव होतो.

 

३) रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत, बडीशेप मध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ही बडीशेप मोठी उपयोगी ठरते. रक्त शुद्धीकरणाचे काम फार चांगल्याप्रकारे होते.


४) चौथा फायदा तो म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी, डोळ्यांचे आरोग्य जर चांगले राखायचे असेल, जर सुंदर डोळे हवे असतील, तर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन A, अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंट हे घटक असायला हवेत. मित्रांनो या बडीशेप मध्ये हे तीनही घटक अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच जे लोक बडीशेपचं सेवन करतात, त्यांच्या डोळ्यांच आरोग्यही चांगलं राहतं.


 ५) अपचन, गॅसेस म्हणजेच ॲसिडिटीच्या तक्रारींवर उपयुक्‍त, बडीशेप मध्ये जे घटक आहेत, हे घटक आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्यामुळेच बडीशेप खाल्ल्यामुळं आपण खाल्लेल्या अन्नाच चांगल्या प्रकारे पचन होतं आणि परिणामी आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत नाही.


६) शेवटचा एक फायदा आहे तो म्हणजे आपल्या हृदयाशी निगडित तक्रारी. आजकाल हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण हे खूप वाढलं आहे. हार्ट अटॅक येण्यामागे एक प्रमुख कारण आहे, आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढणे. मित्रांनो बडीशेप जर आपण रोज खाल्ली तर आपल्या हृदयाशी निगडित जे आजार आहेत, ते दूर होण्यास मदत होऊ शकते. बडीशेपमध्ये पोटॅशिअम नावाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या पोटॅशिअममुळेच आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि म्हणूनच तर बडीशेप जर आपण दररोज खाल्ली, तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी हृदय रोग, हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होते.

Tuesday, 9 April 2024

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३ दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३

दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

            मुंबईदि.9 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रितगट - ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३ या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण ४९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मुळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहून  जाहीर करण्यात आला आहे.

            या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भूषण निवृत्ती लांडगे हे अराखीव व मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला अराखीव गटातून सांगली जिल्ह्यातील गितांजली रविंद्रनाथ कोळेकर  राज्यात प्रथम आल्या आहेत.

            उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

            हा अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेतील सूचना पाहवे असे आयोगाने कळविले आहे.

 

0000000


राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

 राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत हजार 641 मतदान केंद्रे वाढली

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

            मुंबई दि. 9: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात हजार 641 नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे असणार आहेत.

            2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या 98 हजार 114 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

 सर्वांत जास्त मतदान केंद्र पुण्यात तर सर्वांत कमी मतदान केंद्र सिंधुदुर्गात

            सर्वांत जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. याची संख्या  8 हजार 382 आहे. यानंतर मुंबई उपनगर येथे हजार 380 मतदान केंद्रे असणार आहेत. ठाण्यात हजार 592, नाशिकमध्ये हजार 800 आणि नागपूरमध्ये हजार 510 मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये 918 आणि गडचिरोलीमध्ये 950 मतदान केंद्रे असणार आहेत.

3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे जिल्हयात

            3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे जिल्हयात आहेत. अहमदनगरमध्ये हजार 734,सोलापूरमध्ये हजार 617, जळगावमध्ये हजार 582, कोल्हापूरमध्ये हजार 368, औरंगाबादमध्ये हजार 085, नांदेडमध्ये हजार 047 आणि सातारामध्ये हजार 025 मतदान केंद्र असतील.

10 जिल्हयांत 2000 हून अधिक मतदान केंद्रे

            2000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 10 जिल्हयात आहेत. रायगडमध्ये हजार 719, अमरावतीमध्ये हजार 672, यवतमाळमध्ये हजार 532, मुंबई शहरमध्ये हजार 517, सांगलीमध्ये हजार 448, बीडमध्ये हजार 355, बुलढाण्यामध्ये हजार 266, पालघरमध्ये हजार 263, लातूरमध्ये हजार 102 आणि चंद्रपूरमध्ये हजार 044 मतदान केंद्र असतील. 

      2000 पेक्षा कमी मतदान केंद्रे असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे - नंदुरबार 1 हजार 412, धुळे 1 हजार 704, अकोला 1 हजार 719, वाशिम 1 हजार 76, वर्धा 1 हजार 308, भंडारा 1 हजार 156, गोंदिया 1 हजार 288, हिंगोली 1 हजार 17, परभणी 1 हजार 587, जालना 1 हजार 719, उस्मानाबाद 1 हजार 503, रत्नागिरी 1 हजार 717 मतदान केंद्रे असतील.

            मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकषमतदान केंद्राची रचनामतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणेमतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चितीमतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची 'संवेदनशीलताबघून त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

            केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्पपिण्याचे पाणीप्रसाधनगृहविद्युत पुरवठाप्रकाश योजनाव्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

0000000

 

दि.9 एप्रिल2024

                                                                           

Solar eclipse in South America 30 min ago,

 Solar eclipse in South America 30 min ago, 👌👌👌💓💓💓👆👆👆


अगर आप मानते हो कि हनुमान जी पृथ्वी पर हैं तो इसे पढ़कर औरों को भी भेजें ।

 अगर आप मानते  हो कि हनुमान जी पृथ्वी पर हैं तो इसे पढ़कर औरों को भी भेजें ।

                जयश्रीराम

मुरैना जिले के बीरपुर कस्बे में हनुमान जी के मंदिर में पुजारी जी पूजा कर रहे थे ।उसी समय पेड़ से एक बंदर नीचे उतरा ,बंदर को देखकर पुजारी जी भागे  बंदर पुरुष का रूप धारण करके बोला , डरो मत वत्स  मैं जो कहता हूंँ उसे ध्यान से सुनो ,कलयुग में पाप बढ़ रहा है पाप का अंत करने मैं इस पृथ्वी पर जन्म लुंँगा और जो धर्म का नाश कर रहें हैं उनका नाश करूंँगा जो भी मेरे नाम से 11 बार इसे किसी अन्य ग्रुप में भेजेगा उसकी मनःकामना 24 दिन में पूरी होगी, इतना कहकर बंदर रूपी हनुमान जी 21 कदम पीछे हटकर जयश्रीराम बोलकर अदृश हो गए । यह सुनकर रामलखन वर्मा जी ने 11 बार अन्य को भेज दिए तो उन्हें 50लाख रुपये अचानक ही मिल गए । उन रुपयों से रामलखन जी ने महिन्द्रा ट्रेक्टर की एजेंसी खोल ली ।उसके बाद जयप्रकाशजी वर्मा ने इसे 11 बार भेजा तो उन्हें 8 दिन बाद अपने घर की नीव खोदते समय सोने की मोहरों से भरा एक कलश मिला । इसे सुनपढ़ विमल जी वर्मा ने इसे 10 बार भेजा तो उनका ग्वालियर रोड़ पर खोला गया सोने चांँदी का श्योरूम अच्छा चलने लगा । एक व्यक्ति ने इसे झूठा समझ dilet कर दिया तो उसका बहुत नुकसान हुआ ,उसकी नौकरी चली गई । एक व्यक्ति को स्वाईनफ्लु की बीमारी थी ,उसके बचने की कोई उम्मीद नहीं थी तो उसने श्रीराम भक्त हनुमान जी की प्रार्थना की और 11बार भेजने की मन्नत ली तो वह ठीक हो गई । एक गांँव में 10 ग्रुपों ने मिलकर 10 को भेजा तो  एक को 60 मिनट में ही 15 लाख का लाभ हुआ । हर व्यक्ति से मेरी प्रार्थना है कि वे इस संदेश को Delete न करें । इसे अधिक से अधिक लोगों को शेयर करें।

____________________________🙏

Featured post

Lakshvedhi