Sunday, 7 April 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग

लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

 

            मुंबई दि.६ : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

            राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम२०२४दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ मधील तरतुदीनुसार दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत,जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागविण्यात आलेले असून निवड प्रक्रिया सुरु झालेली नाहीअशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करिता दिनांक २९ डिसेंबर२०२३ रोजी विविध संवर्गातील एकूण २७४ पदांकरीता जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा दिनांक २८ एप्रिल२०२४ रोजी घेण्यात येणार होती. परंतुमहाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम२०२४दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ अंमलात आल्याने या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या दिनांक २१ मार्च२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच दिनांक १९ मे२०२४ रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारीगट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारीगट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

            महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम२०२४दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ मधील तरतुदीनुसार दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत किंवा जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तथापिनिवड प्रक्रिया सुरु झालेली नाहीअशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे.

            महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा२०२४ करिता शासनाच्या महसूल व वन विभागवित्त विभागसामान्य प्रशासन विभागग्राम विकास विभागआदिवासी विकास विभागउद्योग उर्जा व कामगार विभागकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग इत्यादी विभागांकडून विविध गट-अ व गट-ब राजपत्रित संवर्गाकरिता प्राप्त मागणीपत्रामध्ये अराखीव पदांचा समावेश असल्यानेसामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण विचारात घेऊन सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागास कळविण्यात आले आहे.

            सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नसल्याने सध्या परिक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही. प्रस्तुत परीक्षेतील सर्व संवर्गाकरिता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर परिक्षेच्या पूर्व तयारीकरिता पुरेसा कालावधी देऊन तसेच संघ लोकसेवा आयोग व कर्मचारी चयन आयोग इत्यादींमार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेचे दिनांक विचारात घेऊन परिक्षेचा सुधारित दिनांक आयोगामार्फत जाही

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !

 लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !

 

        मुंबईदि. ६ : पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४२००९, २०१४आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये  महिला मतदारांची संख्या वाढली आहे.

        २००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये  १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

स्वीप अभियान

        महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोगस्‍वीप (SVEEP-Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्वाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविकाआशा कर्मचारीपरिचारिकामहिला बचत गटअशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योगशिक्षणसामाजिकसाहित्यकला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात येत आहे.

एकूण मतदार

        २०१९ मध्ये  सेवा मतदार धरुन ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.

०००


 

वृत्त क्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक

 

            मुंबईदि. ६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

        मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहिता व कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना व दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी संबंधित विभागांना दिले. निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा दैनंदिन अहवाल अद्ययावत ठेवून तो दररोज पाठविण्याबाबत पोलीस उपायुक्त यांनी दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

       मुंबई शहर जिल्ह्याच्या बहुतांश सीमा या सागराशी संलग्न असल्यामुळे सागरी सीमा सुरक्षेशी संबंधित कोस्ट गार्ड मेरीटाइम बोर्ड आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश श्री. यादव यांनी संबंधितांना दिले. अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण व त्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

       मुंबई शहर जिल्ह्याला लागून असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे फ्लाईंग सर्व्हेलन्स टीम (FST), स्टॅटस्टीक सर्व्हेलन्स टीम (SST) यांच्याशी परस्परांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

       या बैठकीला अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी (कायदा व सुव्यवस्था) तेजुसिंग पवार ,मुंबई शहर उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री श्यामसुंदर सुरवसेमेरीटाईम बोर्ड उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली भोसले आदी उपस्थित होते.

Saturday, 6 April 2024

शेत नांगरताना असं काही सापडलंय??

 शेत नांगरताना असं काही सापडलंय??


- तुमच्यासाठी खास कोर्स "पुरातत्वशास्त्राची ओळख"

कल्पना करा, शेत नांगरत असताना एक महत्त्वाचा पुरातत्वीय पुरावा सापडतो आणि त्याच्यावरून आपल्या इतिहासाबद्दल भन्नाट काहीतरी उघडकीस येतं...? ही कल्पनाच कमालीची रोमंचित करणारी आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण खरंच असं प्रत्यक्षात घडलंय, एकदा नव्हे तर अनेकदा! आतापुरतं एक उदाहरण महाराष्ट्रातलं, तर एक महाराष्ट्राच्या बाहेरचं!

उत्तर प्रदेशाच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात मांडी नावाचं गाव आहे. ती एक महत्त्वाची पुरातत्वीय साईट. अपघाताने उघडकीस आली. तिथे शेत नांगरलं जात असताना शेतकऱ्यांना सुमारे १० किलो वजनाची सोन्याची नाणी व दागिने मिळतात. त्याचा बोभाटा व्हायचा आत त्यातले बरेचसं सोनं वितळवलं जातं. मात्र, ही माहिती पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचते. त्यावर लगेचच कार्यवाही होते आणि सोन्याचा उरलेला साठा जप्त केला जातो. त्याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येथे की हे सर्व सोन्याचे दागिने हरप्पन / सिंधू संस्कृतीच्या उत्तर कालखंडातील आहेत. (काही अभ्यासाकांचं आधी असं मत होतं की हा सोन्याचा साठा कुषाण काळातील असावा.) विशेष म्हणजे आतापर्यंत हरप्पन संस्कृतीच्या कालखंडात सोन्याचे जे काही दागिने मिळाले आहेत, त्यातला हा सर्वात मोठा साठा असल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना गेल्या काही दशकातली. सोन्याच्या संदर्भातली ही खूपच महत्त्वाची निष्पत्ती. यापूर्वी सुद्धा हरप्पन संस्कृतीच्या ठिकाणांवरून सोनं मिळालं होत, पण अतिशय अल्प प्रमाणात. मात्र इथल्या सोन्यामुळे या संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

दुसरी गोष्ट १९९० च्या थोडीशी आधीची. नागपूरजवळ आडम नावाचं गाव आहे. तिथं शेत नांगरत असताना काही रोमन नाणी मिळाली. त्यांचा अभ्यास केला तेव्हा त्या ठिकाणाचे पुरातत्वीय महत्त्व वाढले. खरंतर आडम इथं पुरातत्वीय साईट असल्याचं माहीत होतंच, पण तिची क्षमता किती मोठी आहे, हे या नाण्यांवरून लक्षात आलं.

अशा अपघाताने मिळालेल्या कितीतरी छोट्या-मोठ्या पुराव्यांवरून आपला इतिहास, प्राचीन संस्कृती उलगडते. ती उलगडणारी अभ्यासशाखा म्हणजे पुरातत्वशास्त्र (Archaeology). 
सर्वसामान्य माणसाला या गोष्टींबद्दल कुतूहल असते, पण नेमकी माहिती नसते. म्हणूनच ‘भवताल इको-कोर्सेस’ तर्फे सर्वसामान्यांसाठी ‘पुरातत्वशास्त्राची ओळख’ (Introduction to Archaeology) हा शनिवार-रविवार असा ऑनलाईन वीकेंड कोर्स आखण्यात आला आहे. जरूर सहभागी व्हा आणि इतिहास, संस्कृती, जुना काळ कसा उलगडत जातो हे समजून घ्या...

कालावधी:
२७ एप्रिल ते २६ मे २०२४

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:

(जागा मर्यादित; लगेचच नावनोंदणी करा.)

संपर्क:
9545350862 / bhavatal@gmail.com

(फोटो- साभार इंटरनेट)
--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

Es baar nayi machine aa gayi hai* Ab aapko saamne se sab dikhega, ki kiso vote Kiya hai। 🙏

 _*Es baar nayi machine aa gayi hai* Ab aapko saamne se sab dikhega, ki kiso vote Kiya hai। 🙏


लोकसभा निवडणुकीसाठी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

 लोकसभा निवडणुकीसाठी

440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

 

            मुंबई दि. 5 : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.     

            ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे  असणार आहे. जळगावमध्ये 33, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये 30, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.

            या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

            'महिला नियंत्रित मतदान केंद्रस्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारीकर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालयपोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहीलअशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

            जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर 12, अकोला 6, अमरावती 8, औरंगाबाद 20, बीड 6, भंडारा 7, बुलढाणा 14, चंद्रपूर 6, धुळे 5, गोदिंया 4, हिंगोली 6, जालना 5, कोल्हापूर 10, लातूर 6, मुंबई शहर 10, नागपूर 12, नांदेड 20, नंदुरबार 4,  उस्मानाबाद 16, पालघर 6, परभणी 4, पुणे 21, रायगड 7, सांगली 8, सातारा 16, सोलापूर 22, वर्धा 8 आणि यवतमाळ 7 असे असणार आहेत.

००००

मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

 मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून

पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

 

            मुंबई, दि. 5 :- कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्ण-प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

            राज्यात लोकसभा निवडणूक 2024 पाच टप्प्यात होणार आहे. पूर्व-प्रमाणित करण्याबाबतचे दिनांक पुढीलप्रमाणे :

टप्पा पहिला – 19.4.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 18.4.2024 आणि 19.4.2024

टप्पा दुसरा – 26.4.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 25.4.2024 आणि 26.4.2024

टप्पा तिसरा – 7.5.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 6.5.2024 आणि 7.5.2024

टप्पा चौथा – 13.5.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 12.5.2024 आणि 13.5.2024

टप्पा पाचवा – 20.5.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 19.5.2024 आणि 20.5.2024

००००


Featured post

Lakshvedhi