Friday, 5 April 2024

#स्पाय गर्ल…. राजामणि"

 *#स्पाय गर्ल….*

🇮🇳🇮🇳🇮🇳


*१९२७ मध्ये रंगून (तत्कालीन बर्मा, आत्ताचे म्यानमार) शहरातील एका श्रीमंत घराण्यात एक मुलगी ‘सोन्याचा चमचा’ घेऊन जन्माला आली! हो, अक्षरशः सोन्याचा चमचा घेऊनच; कारण त्या मुलीचे वडील सोन्याच्या खाणीचे मालक होते! सुखवस्तू घरातील मंडळींनी त्या मुलीचे नाव "राजामणि" ठेवले. राजामणिच्या वडिलांचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा होता. त्यासाठी ते वेळोवेळी आर्थिक मदतदेखील करीत असत. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित नेते किंवा भारतीय व्यावसायिक रंगूनला गेले तर त्यांच्या घरी आवर्जून जात असत.*


*एकदा गांधीजी या कुटुंबाच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते. घरातील सर्वांचा परिचय झाला. राजामणि मात्र कुठे दिसली नाही म्हणून सर्वजण तिला शोधत असता, घराच्या बागेत राजामणि हातात बंदूक घेऊन निशाणेबाजी करतांना आढळली. दहा वर्षाच्या एका मुलीच्या हातात बंदूक पाहून गांधीजींना आश्चर्य वाटले, ते तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले, "बेटी, तुला बंदुक शिकायची काय गरज?"*


*"इंग्रजांचा खात्मा करण्यासाठी", आपले निशाणावरील लक्ष जराही विचलित न होऊ देता राजामणि उत्तरली.*


*"हिंसा हि काही एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही मुली, आम्ही सर्वजण अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांचा विरोध करीत आहोत. तुलादेखील हातात शस्त्र न घेता विरोध करता आलं पाहिजे," गांधीजींनी तिला समाजावणीच्या सूरात अहिंसेचे महत्व सांगितले.*

 

*"का? आम्ही डाकू, लुटारूंना मारीत नाही? हे इंग्रज आमच्या देशाला लुटत आहेत, त्यामुळे ते लुटारू आहेत! त्या लुटारूंना मारणे हि काही हिंसा नाही." अतिशय निर्भय आणि स्पष्ट शब्दात राजामणि उत्तरली, "मी मोठी झाल्यावर निदान एकातरी इंग्रज अधिकाऱ्याला शूट करणार!"*


*गांधीजी अवाक होऊन ऐकण्याव्यतिरिक्त काहीच करू शकले नाहीत.*


*#एके दिवशी राजामणिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण ऐकले. त्यांच्या भाषणाने ती पेटून उठली. गांधीजींची ‘अहिंसा’ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांविरुद्ध चा ‘सशस्त्र लढा’; यात तिला नेताजींचा प्रखर विरोध अधिक भावला!*


*#एका सभेमध्ये नेताजींनी लोकांना अपील केले की, त्यांनी इंग्रजांच्या विरुद्धच्या त्यांच्या लढाईसाठी आर्थिक मदत करावी. हे ऐकून सोळा वर्षाच्या राजामणिने आपले सारे सोन्याचे दागिने काढून नेताजींच्या ‘आझाद हिंद सेनेला’ (INA-Indian National Armi- आयएनए) दान केले.*

 

*‘एवढे सारे सोन्याचे दागिने कुणी दिले?’ याची चौकशी करत असताना नेताजींना कळाले की, एका सोळा वर्षाच्या मुलीने हे सर्व दागिने दिले आहेत. अधिक चौकशी केल्यानंतर; ते सर्व दागिने परत करण्यासाठी नेताजी स्वतः राजामणिच्या घरी गेले. सर्व दागिने राजामणिच्या वडिलांच्या हाती सुपूर्द करतांना नेताजी म्हणाले, "मला वाटतं, आपल्या मुलीने चुकून हे सर्व दागिने आम्हाला दिले आहेत. मी ते सर्व परत करायला आलो आहे." खरंतर, राजामणिच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी असं दान अनेक वेळा केलं होतं; त्यामुळे त्यांच्या मुलीने जे केलं त्याबद्दल त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही. नेताजी परत करीत असणाऱ्या त्या दागिन्यांकडे पहात ते फक्त हसले. तेवढ्यात राजामणि तिथे आली. समोरचा प्रकार पाहून ती रागात उद्गारली, "हे सर्व दागिने माझे स्वतःचे आहेत; वडिलांचे नाही! मी आता ते आपल्याला दान केले आहेत आणि दान केलेली वस्तू मी परत घेत नाही."*


*#त्या षोडशवर्षीय मुलीचा दृढनिश्चय पाहून नेताजींना तिची प्रशंसा केल्याशिवाय रहावले नाही, ते राजामणीला म्हणाले, "लक्ष्मी येते आणि जाते; परंतु सरस्वतीचं तसं नाही. सरस्वती म्हणजे बुद्धी! ती आली की परत कधीच जात नाही; तर ती सतत वाढत जाते! तू सरस्वती सारखीच बुद्धिमान आहेस; म्हणून मी आजपासून तुझं नाव “सरस्वती” ठेवतो! त्या दिवशीपासून राजामणि आता "सरस्वती राजामणि" या नावाने ओळखू जाऊ लागली.*


*परंतु राजामणी एवढ्यावरच थांबली नाही. तिने नेताजींच्या शिबिरात जाऊन त्यांची भेट घेतली. तिला त्यांच्या आर्मी मध्ये सहभागी करून घेण्यासाठी विनंती केली. सरस्वती राजामणिचा निश्चय एवढा पक्का होता की; नेताजी तिला नाही म्हणू शकले नाहीत. तिला ‘आयएनए’ मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले!*


*सुरुवातीला सरस्वती राजामणि सैन्याच्या सेवा-सुश्रुतेचं काम करू लागली. परंतु केवळ या कामावरती सरस्वती राजामणिचे समाधान झालं नाही. तिला अधिक जोखमीचं काम हवं होतं. #तिची जिद्द आणि बुद्धी पाहून नेताजींनी तिला गुप्तहेराची कामगिरी दिली. इंग्रजांच्या छावणीमध्ये जाऊन तिथल्या बातम्या काढणे आणि त्या ‘आयएनए’ च्या कार्यालयापर्यंत पोचवणे अशी महत्वाची जिम्मेदारी देण्यात आली. अशाप्रकारे सरस्वती राजामणि ही सर्वात कमी वयाची गुप्तहेर ठरली!*


*खरंतर गुप्तहेराचे काम म्हणजे; सदैव प्राण संकटात ठेवणे! गुप्तहेर जर पकडला गेला तर त्याला हाल-हाल करून मारण्यात येतं, शिवाय आपली माहिती शत्रूला जाण्याची शक्यता असते; म्हणून गुप्तहेर जर शत्रूकडून पकडला गेला तर त्याला स्वतःच प्राणार्पण करण्याचे आदेश देण्यात आलेले असतात. आझाद हिंद सेनेसाठी आपले प्राणपणाला लावण्याची जबाबदारी या सोळा वर्षाच्या मुलीने हसत-हसत स्वीकारली!*


*#लांबसडक केस कापण्यात येऊन मुलांसारखे छोटे केस करून झाले. मुलींच्या पेहरावाऐवजी मुलाचे कपडे घालण्यात आले. राजामणि आता "मणि" नावाने मुलगा झाला! तसेच वेष बदलून नीरा आर्य, मानवती आर्य आणि दुर्गा मल्ल गोरखा या तीन तरुणीदेखील हेरगिरीच्या कामगिरीसाठी नियुक्त केल्या गेल्या.*


*सफाई-कर्मचारी, लाउंड्री- बॉय आदींच्या माध्यमातून आझाद हिंद सेनेचे हे वीर हेरगिरी करण्यासाठी इंग्रजांच्या छावणीत प्रवेश मिळविते झाले. काकदृष्टीने आणि प्रसंगावधान राखून इंग्रजांच्या छावणीतील हालचाली, गोपनीय माहिती, बातम्याच नव्हे तर प्रसंगी शस्त्रदेखील नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचवणे सुरु झाले. सुमारे दोन वर्षे त्यांची हेरगिरीची कामगिरी बिनबोभाटपणे चालू होती. दुर्दैवाने एकेदिवशी "दुर्गा" इंग्रजांच्या तावडीत सापडली. तिचे आत्महत्येचे प्रयत्न विफल झाले. इंग्रजांनी तिला पकडून जेलमध्ये बंदिस्त केले! आता सारेच बिंग बाहेर येण्याची परिस्थिती निर्माण झाली. दुर्गाला एकटीला इंग्रजांच्या विळख्यात सोडून पळून जाणे सरस्वती राजामणिच्या मनाला पटेना. शेवटी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने धाडस करायचे ठरवले. पुन्हा आपला वेष बदलून; ती दुर्गाला जिथे डांबून ठेवले होते तिथे पोचली. पिनच्या सहाय्याने कुलूप उघडून दुर्गाला सोडवले आणि पहारेकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन दुर्गासह पसार होण्यात यशस्वी झाली. परंतु लगेचच हि बाब इंग्रज सैन्याच्या निदर्शनास आली. एकच गोंधळ माजला, "लडकी भाग गयी, लडकी भाग गयी" करीत इंग्रजी सैन्याने शोधाशोध सुरु केली. सरस्वती राजामणि, नीरा आर्य आणि दुर्गा जंगलाच्या दिशेने पळत सुटल्या. त्यांच्या मागे इंग्रजी सैनिक लागले, मुली हाताशी येत नाहीत हे पाहून सैनिकांनी मुलींच्या दिशेने गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी सरस्वती राजामणिच्या पायाला लागली. रक्ताळलेला पाय तसाच घेऊन ती खुरडत खुरडत पळू लागली. कोणत्याही परिस्थितीत त्यांना इंग्रजांच्या हातात सापडायचे नव्हते! आझाद हिंद सेनेच्या त्या शूर सेनानी होत्या! आता पळणे अशक्य झाल्याचे पाहून त्या तिघी एका झाडावर चढल्या… गोळीमुळे झालेली भळभळती जखम घेऊन नि उपाशीपोटी त्यांनी तीन दिवस झाडावरच काढले. केव्हढे ते साहस, धडाडी, सहनशीलता, जिद्द, त्याग नि नेताजींवरील निष्ठा!*


*जंगलातील शोधाशोध थांबल्याचा अदमास घेऊन त्या खाली उतरल्या आणि नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचल्या. अवघ्या अठरा वर्षाच्या त्या कोवळ्या सरस्वती राजामणिचे धाडस नि जिद्द पाहून नेताजी खुश झाले. #तीन दिवस पायात बंदुकीची गोळी घुसून राहिल्याने सरस्वती राजामणि एका पायाने कायमची अधू झाली. या साहसाबद्दल नेताजींनी सरस्वती राजामणिला आझाद हिंद सेनेच्या 'राणी झाँसी ब्रिगेड' मध्ये "लेफ्टिनेंट" चे पद देऊन तिचा सन्मान केला!*


*इ. स. १९४५ मध्ये इंग्रजांचा विजय होऊन दुसरे विश्वयुद्ध समाप्त झाले. आझाद हिंद सेना बरखास्त करून नेताजींनी सैनिकांना भारतात परतण्याची मुभा दिली. दुर्दैवाने त्याच दरम्यान तैवानमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि आझाद हिंद सेनेचे हजारो देशभक्त पोरके झाले!*


*#पुढे दोन वर्षात १९४७ ला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. या नव्या भारताला सरस्वती राजामणि सारख्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांची गरज उरली नव्हती. भारतीय स्वतंत्रता संग्रामात आपल्या सुखी नि ऐश्वर्यसंपन्न तारुण्याची राखरांगोळी करून घेणाऱ्या अनेक क्रांतीकारकांच्या वाट्याला उपेक्षाच आली!*

 

*#एकेकाळी सोन्याच्या खाणींची वारसदार असलेल्या सरस्वती राजामणि; चेन्नईमधील एका पडझड झालेल्या घरात किरायाने राहू लागल्या. "सुमारे पंचवीस वर्षांनंतर" मिळालेली स्वातंत्र्य सैनिकांची मिळालेली तुटपुंजी पेन्शन यावरच त्यांची गुजरान चाले. तशाही परिस्थितीत त्यांनी समाजसेवाच केली. ड्रेसेस शिवणाऱ्या टेलरकडून उरलेल्या कापडाचे तुकडे त्या आणायच्या. त्यांना जोडून, त्याचे कपडे शिवून; ते गरीब नि गरजू लोकांना फुकटात देऊ करायच्या.*     


*दरम्यान स्वातंत्र्यप्राप्तीची पन्नास वर्षे उलटून गेल्यावर; एका शोध पत्रकाराने ‘सरस्वती राजामणिला’ शोधलं. त्यांची माहिती आणि सद्यस्थिती वर्तमानपत्रात छापली. तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय जयललिता यांच्या निदर्शनास ती बातमी आली; पन्नास वर्षानंतर का होईना पण जयललिताजींनी त्यांचा यथोचित सन्मान केला, सरकारी घर आणि भत्ता देऊ केला!*


*दिनांक १३ जानेवारी २०१८ रोजी नेताजींच्या आझाद हिंद सेनेतील सरस्वती राजामणि या शूर सेनानीने शेवटचा श्वास घेतला!*


*#चेन्नईमधील छोट्याशा सरकारी घरात आयुष्य काढणाऱ्या सरस्वती राजामणि, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनेक ‘अनसंग हीरोज’ चे प्रतिनिधित्व करतात. ज्यांना ना इतिहासाच्या पानांवर गौरवास्पद स्थान मिळाले, ना राजकीय नेत्यांनी लक्ष दिले, ना हि जनतेने त्यांच्या कर्तृत्वाचे गीत गायले! हा इतिहास आम्हाला कधी शिकवलाच गेला नाही; तो नवीन पिढीपर्यंत पोचला नाही तर कदाचित त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळणार देखील नाही आणि मग स्वातंत्र्य म्हणजे केवळ "सत्याग्रह आणि अहिंसेचे बक्षीस" अशीच धारणा बनली जाण्याचा धोका संभवतो. सरस्वती राजामणिसारख्या देशभक्तांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपण सारे त्यांचे ऋणी आहोत, स्वातंत्र्यदिन साजरा करीत असतांना सरस्वती राजामणि सारख्या देशभक्तांचे कर्तृत्व आणि योगदान सर्वदूर पोचवण्याचे काम केलेतरी आपण काही प्रमाणात त्यांचा गौरव करू शकलो असे म्हणता येईल.* 


*“स्पाय गर्ल” "सरस्वती राजामणिला" ही एक श्रद्धांजली! जय हिंद!*

🙏🇮🇳🙏


*©️ शिरीष अंबुलगेकर,*

*मुंबई. आठवण: माझा ब्लॉग, माझे विचार (7021309583)*

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा

 निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर

अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा

- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

 गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु

 

            मुंबई, दि. 5 :- मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी 50 हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील 5 प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत.

            या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.

-----000-----                                        

अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत - स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी मुंबई, दि. 5 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 26 मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांची नोंदणी वाढावी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून 159- दिंडोशी मतदारसंघातील नियुक्त क्षेत्रीय अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला असे 700 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमात उपस्थित होते. विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष समन्वय अधिकारी डॉ. दळवी यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने अंगणवाडी सेविकांना निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. दळवी म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पेाहोचून आपण शिक्षण आणि आरोग्याचे काम करत आहात. या क्षेत्रातील मतदारांच्या निवडणूक संदर्भात समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सकारात्मकरित्या काम करावे. नव मतदारांनी २४ एप्रिलपर्यंत नाव नोंदवावे एक अंगणवाडी सेविका किमान २०० कुटुंबापर्यंत पाहोचते. तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी नवमतदारांना संकेतस्थळावर अथवा वोटर हेल्प लाईन मोबाईल ॲपच्या साहाय्याने २४ एप्रिल पर्यंत नाव नोंदविण्यास मदत करावी. अपंग अथवा ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या सुविधांची माहिती देणे. आपल्याला ज्या नागरी सुविधा हव्या आहेत त्यासाठी आपण आपला राष्ट्रीय हक्क बजावणे गरजेचे असून, कुणाच्याही मतप्रवाहात किंवा भावनांना बळी पडून विचार करु नये. मतदार तसेच आशा वर्कर, स्वच्छता कर्मचारी, अभिनेते, पोलीस शिपाई यांच्या सहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित करावेत, असेही डॉ. दळवी यांनी यावेळी सांगितले. यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी विजयकुमार चौबे, निवडणूक नायब तहसीलदार स्मृती पुसदकर, ‘स्वीप’च्या अधिकारी संगीता शेळके, भास्कर तायडे आणि अश्विनीकुमार राहिणीकुमार उपस्थित होते. ०००

 अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी

वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत

- स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी

            मुंबई, दि. 5 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले.

            लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 26 मतदारसंघाचा समावेश आहे.  मुंबई उपनगर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांची नोंदणी वाढावी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून 159- दिंडोशी मतदारसंघातील नियुक्त क्षेत्रीय अधिकारी,  केंद्रस्तरीय अधिकारीआशा सेविकाअंगणवाडी सेविका,  बचत गटातील महिला असे 700 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी  मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमात उपस्थित होते. विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी विशेष समन्वय अधिकारी डॉ. दळवी यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने अंगणवाडी सेविकांना निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

            डॉ. दळवी म्हणाले कीसमाजातील शेवटच्या घटकापर्यंत पेाहोचून आपण शिक्षण आणि आरोग्याचे काम करत आहात.  या क्षेत्रातील मतदारांच्या निवडणूक संदर्भात समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सकारात्मकरित्या काम करावे.  

नव मतदारांनी २४ एप्रिलपर्यंत नाव नोंदवावे

            एक अंगणवाडी सेविका किमान २०० कुटुंबापर्यंत पाहोचते. तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी नवमतदारांना संकेतस्थळावर अथवा वोटर हेल्प लाईन मोबाईल ॲपच्या साहाय्याने २४ एप्रिल पर्यंत नाव नोंदविण्यास मदत करावी. अपंग अथवा ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या सुविधांची माहिती देणे. आपल्याला ज्या नागरी सुविधा हव्या आहेत त्यासाठी आपण आपला राष्ट्रीय हक्क बजावणे गरजेचे असूनकुणाच्याही मतप्रवाहात किंवा भावनांना बळी पडून विचार करु नये.  मतदार तसेच आशा वर्करस्वच्छता कर्मचारीअभिनेतेपोलीस शिपाई यांच्या सहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित करावेतअसेही डॉ. दळवी यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी विजयकुमार चौबेनिवडणूक नायब तहसीलदार स्मृती पुसदकर, ‘स्वीपच्या अधिकारी संगीता शेळकेभास्कर तायडे आणि अश्विनीकुमार राहिणीकुमार उपस्थित होते.

०००

- स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी

            मुंबई, दि. 5 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले.

            लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 26 मतदारसंघाचा समावेश आहे.  मुंबई उपनगर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांची नोंदणी वाढावी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून 159- दिंडोशी मतदारसंघातील नियुक्त क्षेत्रीय अधिकारी,  केंद्रस्तरीय अधिकारीआशा सेविकाअंगणवाडी सेविका,  बचत गटातील महिला असे 700 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी  मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमात उपस्थित होते. विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी विशेष समन्वय अधिकारी डॉ. दळवी यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने अंगणवाडी सेविकांना निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

            डॉ. दळवी म्हणाले कीसमाजातील शेवटच्या घटकापर्यंत पेाहोचून आपण शिक्षण आणि आरोग्याचे काम करत आहात.  या क्षेत्रातील मतदारांच्या निवडणूक संदर्भात समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सकारात्मकरित्या काम करावे.  

नव मतदारांनी २४ एप्रिलपर्यंत नाव नोंदवावे

            एक अंगणवाडी सेविका किमान २०० कुटुंबापर्यंत पाहोचते. तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी नवमतदारांना संकेतस्थळावर अथवा वोटर हेल्प लाईन मोबाईल ॲपच्या साहाय्याने २४ एप्रिल पर्यंत नाव नोंदविण्यास मदत करावी. अपंग अथवा ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या सुविधांची माहिती देणे. आपल्याला ज्या नागरी सुविधा हव्या आहेत त्यासाठी आपण आपला राष्ट्रीय हक्क बजावणे गरजेचे असूनकुणाच्याही मतप्रवाहात किंवा भावनांना बळी पडून विचार करु नये.  मतदार तसेच आशा वर्करस्वच्छता कर्मचारीअभिनेतेपोलीस शिपाई यांच्या सहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित करावेतअसेही डॉ. दळवी यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी विजयकुमार चौबेनिवडणूक नायब तहसीलदार स्मृती पुसदकर, ‘स्वीपच्या अधिकारी संगीता शेळकेभास्कर तायडे आणि अश्विनीकुमार राहिणीकुमार उपस्थित होते.

०००


उत्सव लोकशाहीचा, सहभाग नागरिकांचा' मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थी, महिला आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद

 लोकसभा निवडणूक-2024

'उत्सव लोकशाहीचासहभाग नागरिकांचा'

मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थीमहिला आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद

 

            मुंबई, दि. 5 : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीमहिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पथनाट्यनिवडणूक प्रतिज्ञा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मतदानाचे महत्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

            जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी हे  मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीविषयक उपक्रम राबवित आहेत. नवमतदारांची संख्या वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. 

            आजही जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ‘पथनाट्य’ आणि ‘निवडणुकीची प्रतिज्ञा’ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  मतदानासंदर्भात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीही अभियानातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

यांनी घेतली निवडणुकीची प्रतिज्ञा आणि सहभाग

            जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती अभियान (स्वीप) अंतर्गत १७७ वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 'एच पश्चिमविभागातील बचत गटांनी रेल्वे कर्मचारी वसाहत वांद्रे (पश्चिम)एफ उत्तर विभागात सायन सर्कल (सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ) तसेच 176- वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील एच/पूर्व विभागातील बचत गटांनी एच/पुर्व विभाग कार्यालय प्रभात कॉलनीसांताक्रुझ (पुर्व) याठिकाणी 'निवडणूक प्रतिज्ञाघेऊन मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार केला. महाविद्यालयातील नवमतदारांना मतदानाचे महत्व समजावे आणि त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी 'मतदान अमूल्य दानया पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

            163-गोरेगाव विधानसभा मतदार संघ येथे महानगरपालिका पी- दक्षिण विभागातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी  मतदान जागृतीकरण अभियान अंतर्गत वनराई पोलीस स्टेशन पासून ते वनराई कॉलनी येथे मतदान जागृती अभियान फेरी काढण्यात आली. 177 वांद्रे (प.) सखी सहेली मेळावाअंगणवाडी सेविका तसेच बचत गट यांच्यासमवेत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. 27- मुंबई उत्तर - पश्चिम लोकसभा मतदार संघात 159- दिंडोशी विधानसभा मतदार संघातली आप्पा पाडा मालाड  पूर्व येथे भरारी पथकाने स्वाक्षरी अभियान राबविले. या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांनी ‘….मी मतदान करणार’ अशी शपथ घेतली.

नव-विवाहित दांपत्याने घेतली मतदान करण्याची शपथ

            27- मुंबई उत्तर - पश्चिम लोकसभा मतदार संघात 159 दिंडोशी विधानसभा मतदार संघातली आप्पा पाडा मालाड  पूर्व येथे भरारी पथकाच्या स्वाक्षरी अभियानांतर्गत नव दाम्पत्यानी स्वाक्षरी करून आम्ही जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणार’ अशी शपथ घेतली. तसेच 176- वांद्रे पूर्व येथील अनुयोग विद्यालय ते खार स्टेशन परिसरात अनुयोग विद्यालयाचे मुख्याध्यापकशिक्षक वर्ग,  विद्यार्थीक्षेत्रीय अधिकारीबीएलओपोलीस अधिकारी- पोलीस कर्मचारीआरोग्य  सेविकाअंगणवाडी सेविकानागरिकयांच्या मदतीने मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

            याचबरोबर दिंडोशी येथे दीनानाथ नाट्य मंदिर विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिरातून अंगणवाडी सेविकांनी प्रशिक्षण देण्यात आले. स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मतदारांचे कसे प्रबोधन करावे याबाबत त्यांना प्रशिक्षण दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विषयक सर्व यंत्रणा आता जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी आणि प्रत्येक सुजाण नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी अधिक गतिमान झाली आहे.

०००


पेहेचा न कौन

 आली आली गो भाघावाई,आली आली गो भाघावा भाघाबाई, उमेदवारीची झाली घाई, आली आली गो भाघावाई२ शेजरणीचा नवरा मारतोय डोळा,, घरवल्याला मात्र शेजारणीचा लळा,,, काय करू मी सांगा बाई आता वाटच लागली बाई,आली आली गो भाघावाई.

कसं बोललात बराबर


 

सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या माहितीसाठी .सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय*



*सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय*


 सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या माहितीसाठी .

प्रिय मित्रानो, हे आश्चर्यकारक आहे. 

भारताच्या *सर्वोच्च न्यायालयाने ०१  जुलै २०१५ रोजी* दिलेला लँड मार्क निर्णय, *दिवाणी अपील क्र. 2015 च्या 1123 कडे कोणाचेही लक्ष* गेले नाही. 


 *श्री.एस आर सेन गुप्ता* यांनी IBA ला दिलेले *संक्षिप्त पत्र वगळता* इतर कोणत्याही *युनियनने कोणतीही पावले* उचलली नाहीत. 


 *निकालाची ठळक वैशिष्ट्ये:* 


 1. खंडपीठाने अधिकृतपणे असा निर्णय दिला आहे की *पेन्शन हा एक अधिकार* आहे आणि त्याचा भरणा सरकारच्या विवेकबुद्धीवर अवलंबून नाही. पेन्शन हे नियमांद्वारे नियंत्रित केले जाते आणि त्या नियमांमध्ये येणारा *सरकारी कर्मचारी पेन्शनचा दावा करण्याचा हक्कदार* असतो. 


2. निवृत्ती वेतन आणि वेतनश्रेणीचे पुनरावृत्ती अविभाज्य असल्याचे निवाड्याने मान्य केले आहे.


 3. खंडपीठाने पुनरुच्चार केला आहे की पुनरावृत्ती करताना मूळ पेन्शन पूर्व-सुधारित स्केलशी संबंधित *सुधारित स्केलमधील वेतन बँडच्या किमान 50% पेक्षा कमी* असू शकत नाही.


 4. पेन्शनधारकांची कायदेशीर देणी नाकारण्यासाठी *सरकार आर्थिक भाराची याचिका* घेऊ शकत नाही. 


5. सरकारने अवांछित खटले टाळले पाहिजेत आणि खटल्याच्या फायद्यासाठी कोणत्याही खटल्याला प्रोत्साहन देऊ नये. 


6. जेव्हा पेन्शन हा अधिकार आहे आणि बाउंटी नाही, तेव्हा निवृत्ती वेतनाची सुधारणा आणि वेतनश्रेणीचे पुनरावृत्ती अविभाज्य आहे या प्रतिवादाचा परिणाम म्हणून, *पेन्शनचे अपग्रेडेशन हा देखील एक अधिकार आहे* आणि बाउन्टी नाही. हा निकाल डीएस नाकारा प्रकरणावरील निर्णयावर आधारित आहे. हा निकाल अतिशय स्पष्ट आहे आणि मला आश्चर्य वाटते की या महत्त्वाच्या बाबी कोणाच्याही लक्षात आल्या नाहीत आणि कोणीही हे प्रकरण सरकारकडे का उचलले नाही? या निकालावर कोणीही का प्रतिक्रिया दिली नाही हे आश्चर्यकारक आणि गोंधळात टाकणारे आहे.


      *प्रिय पेन्शनधारक!* 


       हा मेसेज तुमच्या संपर्क यादीतील किमान वीस लोकांना (पेन्शन न घेणारे देखील भारताचे नागरिक म्हणून) फॉरवर्ड करा; आणि त्या बदल्यात त्यांना प्रत्येकाला तसे करण्यास सांगा. तीन दिवसांत, भारतातील बहुतेक लोकांकडे हा संदेश असेल.


    लिखित याचिका

 क्रमांक:- 405/23 कर्नाटक उच्च न्यायालय.


       *बँकेचे कर्तव्य* 


 पेन्शनधारकाने *जीवन प्रमाणपत्र* सादर केले नसल्यास;  पेन्शन थांबवण्यापूर्वी, पेन्शनधारकाच्या घरी *भेट देणे आणि न सादर करण्याचे कारण जाणून घेणे* हे बँकेचे कर्तव्य आहे.


 न्यायालयाने सर्व थकबाकी भरण्याचे आदेश दिले आणि *₹ दंडही ठोठावला.  प्रतिवादीवर एक लाख*.


 _पेमेंट *6%* व्याजासह दोन आठवड्यांत करावयाचे आहे._ जर 2 आठवड्यात पेमेंट केले नाही तर, व्याजाचा दर *18%* टक्के व्याजाने वाढला.


     सर्व बँकर्सनी नोंद घ्यावी.


 *सर्व पेन्शनधारकांसाठी उपयुक्त निर्णय.*


 😇😊👍


 कृपया ही पोस्ट सर्व पेन्शनधारक/गटांपर्यंत पोहोचवा.

Featured post

Lakshvedhi