Friday, 5 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत

३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल

 

           मुंबईदि. ४ : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत  एकूण ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल झाले आहेत.

               दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये बुलढाणाअकोलाअमरावतीवर्धायवतमाळ-वाशिमहिंगोलीनांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे.

            आज दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा २९ उमेदवारांचे ४२ अर्जअकोला २८ उमेदवारांचे ४०अमरावती ५९ उमेदवारांचे ७३वर्धा २७ उमेदवारांचे ३८यवतमाळ- वाशिम ३८ उमेदवारांचे ४९हिंगोली ५५ उमेदवारांचे ७८नांदेड ७४ उमेदवारांचे ९२ आणि परभणी ४२ उमेदवारांचे ६५ अर्ज दाखल झाले आहेत.

0000

कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता गाजलेल्या मराठी गझल ♻

 अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. श्रीधर-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला. श्रीधर स्वत: डॉक्टर असूनही काहीही करू शकले नाहीत कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस वा औषधच उपलब्ध नव्हती.

अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकला नाही. शालेय शिक्षण संपता संपता मॅट्रिकला पण नापास झाला. डॉ. श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली. मग दुसर्‍यांदा मॅट्रिकला बसून पास झाला, तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाला. तिथेही परत परीक्षेला बसून पास झाला तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला. तिसर्‍यांदा परीक्षेला बसून तिसर्‍या श्रेणीत पास झाला व मग पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली. पण तीही एकामागून एक सुटतच होती. पण एक गोष्ट मात्र सुरेशकडे कायम टिकून होती ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. कुठेतरी आत कविता रुजली व फुलत होती. समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेऊन कंदीलाच्या पिवळ्या प्रकाशात सुरेश तळपत होता. असेच एकदा अमरावतीला सुरेश गेला असताना प्रा. मधुकर केचे त्याला स्टेशनवर भेटले व स्वत: यशस्वी वाटेवर आरूढ असल्याने उपहासाने सुरेशला म्हणाले, कवी म्हणून तू संपलास. आता फक्त मास्तरकीच कर. पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, ते अजून ठरायचंय!


१९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले. यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला १३ वर्षांचा काळ जावा लागला व त्यातही सुरेशने ‘रंग माझा वेगळा’ हे दाखवून देत केशवसुत पारितोषिक पटकावले. बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेशचा ‘रंग माझा वेगळा’नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला. १९८३ साली सुरेशने स्वत:च प्रकाशक व्हायचं ठरवलं व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.


शिक्षणात गती नसलेल्या सुरेशने आईकडून काव्याप्रमाणेच संगीताची आवड पण उचलली होती. मैदानी खेळ पायाच्या अधूपणाने न खेळू शकणार्‍या मुलाला डॉ. श्रीधर यांनी बाजाची पेटी आणून दिली. पुढे त्याची संगीतातील आवड व प्रगती बघून संगीतातील शिक्षणासाठी प्रल्हादपंतांकरवी घरी त्याला संगीत शिकवणी सुरु केली.

पुढे शालेय जीवन संपता संपता पायातील कमजोरीवर मात करण्यासाठी सुरेश जिद्दीने व्यायाम करू लागला.मवेळ बराच लागला पण दंडबैठका—डिप्स यासारख्या व्यायामामुळे तो हाडापेराने मजबूत झाला. नंतर नंतर तर पायात पण चांगलीच शक्ती आल्याने सुरेश सायकल पण चालवू लागला. वडिलांनी मग त्याला रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी आणून दिली.


अभ्यासात गती नसलेला सुरेश आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप, पेरिस्कोपसारख्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात वाकबगार होता. तसंच तो काचा कुटून पतंगाचा मांजा बनवी. सुरेशला बेचकी छान बनवता येई व त्यातही त्याचा नेम अचूक असे. या व्यायामाचा फायदा पुढे जेव्हा सुरेशने काव्यगायनाच्या मैफिली करायला सुरुवात केली तेव्हा मांडी घालून तासन् तास बसण्यासाठी झाला. सुरेशने केवळ शारीरिकच नव्हे तर शैक्षणिक कमतरतेमुळे त्याला दिल्या गेलेल्या दुय्यम वागणुकीला आपल्या जिद्दीच्या बळावर मात केली आणि तथाकथित साहित्यिकांना व दांभिकांना आपल्या कवितांद्वारे चोख उत्तर दिले.


कधीतरी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना सुरेशचा काव्यसंग्रह एका खोपटवजा दुकानात सापडला. तो वाचून प्रभावित होऊन त्यांनी सुरेशला शोधून काढलं आणि त्याच्या अनेक गाण्यांना चाली लावून अजरामर केलं. ‘मालवून टाक दीप’ ते पार ‘केंव्हातरी पहाटे’पर्यंत मंडळी अशा या तळपत्या सूर्याचा — सुरेशचा म्हणजेच कवीवर्य सुरेश भट यांचा आज स्मृतिदिन आणि म्हणून हे सगळं आठवण्याचं व सांगण्याचं कारण.


रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार यानंतर भटसाहेबांनी गझलेची बाराखडी, काफिला, झंझावात, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग, निवडक सुरेश भट आणि हिंडणारा सूर्य ही पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना मानाचा सप्रेम मुजरा! त्यांच्याबाबत बोलायचं तर ओठी असं येतं :


कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता

उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता

गाजलेल्या मराठी गझल  ♻

✒ 

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?

एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला

अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?

सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?

उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?

बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा

रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?

उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा

तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?

                      (सुरेश भट)

मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग

राजसा किती दिसात , लाभला निवांत संग

त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात

हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग

दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात

सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग

गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत

मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग

ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल

सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग

काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास

बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग

                 (सुरेश भट)

आताच अमृताची बरसून रात गेली

आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले

मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जराजरासे गगनात मंद तारे

हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..

गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?

                 (सुरेश भट)

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे

अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा

पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू

दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे

                           (सुरेश भट)

केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली

मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली

कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी

कळले मला न केव्हा , निसटून रात गेली

सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?

उसवून श्वास माझा , 

स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती

मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !

                  (सुरेश भट)

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!

गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;

मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;

हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो

अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :

'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

                     (सुरेश भट)

मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे

मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे

लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही

राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे

तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी

रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे

रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी

मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे

                     (सुरेश भट)

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !

एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे

पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे

अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी

मी कशी होते मलाही आठवावे लागले !

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;

राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !

                   (सुरेश भट)

नोंदणी व मुद्रांक विभाग; महसूल संकलनाची विक्रमी 112 टक्के उद्दिष्टपूर्ती मार्चअखेर २८ लाख दस्तांची नोंदणी पूर्ण

 नोंदणी व मुद्रांक विभागमहसूल संकलनाची विक्रमी 112 टक्के उद्दिष्टपूर्ती

मार्चअखेर २८ लाख दस्तांची नोंदणी पूर्ण

- नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे

 

            पुणेदि. ४ : महसूल संकलनाच्या उद्दिष्ट़पुर्तीसाठी विविध उपाययोजना व आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून नियोजनबद्ध प्रयत्ऩाद्वारे सन २०२३-२०२४ साठी ४५,००० कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे  उद्दिष्ट असताना उद्दिष्टाच्या ११२ टक्के महसूल संकलित केला असून रुपये ५०,५०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली.  मार्चअखेर २८ लाख २६ हजार १४९ इतक्या दस्तांची नोंदणी पूर्ण केली असून  सन २०२३-२४ मध्ये वार्षिक बाजारमूल्य़ दरतक्त्यात कोणतीही दरवाढ न करता महसूल वसुलीचे उद्दिष्ट विभागाने पूर्ण केले असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी दिली.

            मुद्रांक विभागाकडे सन १९८० पासूनची मुद्रांक शुल्काच्या थकीत वसुलीच्या प्रलंबित प्रकरणी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम ४६ मधील तरतुदीनुसार सक्तीच्या मार्गाने वसुली करण्यासाठी थकबाकीदारांना नोटीस देण्यात आली. बाजारमूल्य दरतक्यानुसार मुद्रांक शुल्काची वसुली तसेच अंतर्गत तपासणीतात्काळ दस्त तपासणी महालेखापाल तपासणीमधील मुद्रांक शुल्काच्या वसुलीच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये वसुलीसाठी विभागातील अधिकारीकर्मचारी यांनी थकबाकीदारांच्या घरी सुट्टीच्या दिवशी भेटी देऊन वसुलीसाठी पाठपुरावा करुन ही वसुली करण्यात आली.

            मुद्रांक शुल्काच्या थकबाकीची काही प्रकरणे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेतअशा प्रकरणी स्थगिती उठविणेतसेच प्रकरणे निर्गत करण्यासाठी सहायक सरकारी वकील यांच्याकडे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करुन प्रकरणे प्राधान्याने निर्गत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे अभिनिर्णयासाठी दाखल झालेली प्रकरणे प्राधान्याने निर्गत करुन त्याद्वारे मुद्रांक शुल्काची रक्कम मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आली.

            नोंदणी महानिरिक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्याकडे मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदीनुसार दाखल असलेली अपिल व पुनरिक्षण प्रकरणे निर्गत करण्यासाठी विशेष मोहीमेद्वारे मुंबई शहर व उपनगर येथील प्रकरणांची संख्या जादा असल्याने लोकांच्या सोयीसाठी या प्रकरणांची सुनावणी मुंबई येथे घेण्यात येत आहे. सन २०२३-२४ या वर्षात ४६१ अपिल,रिव्हीजन प्रकरणे निर्गत करण्यात आली. त्याद्वारे थकीत मुद्रांक शुल्काची मोठ्या प्रमाणात वसुली झाली.

            महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम १० ड (१) अन्वये शासनाच्या ३ जून २०१६ रोजीच्या अधिसुचनेनुसार राज्य शासनाचे सर्व विभागस्थानिक स्वराज्य संस्थाशासकीय निमशासकीय संस्था इत्यादी कार्यालयांना त्यांच्या यंत्रणामार्फत करण्यात येणाऱ्या कार्यकंत्राटविकसन करारटी डी आर हस्तांतरणभाडेपट्टा इत्यादी दस्तावरील मुद्रांक शुल्क जीआरएएस (GRAS) प्रणालीवर भरून त्याबाबत दरमहा मासिक अहवाल मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्याबाबत ७ जुलै २०२३ रोजीच्या परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या कामी समूचित प्राधिकारी व नोडल अधिकारी नियुक्त करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे स्तरावरून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

            नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिने दस्त़ नोंदणी करण्यासाठी मार्च २०२४ अखेर येणाऱ्या २३,२४ तसेच २९,३० व ३१ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राज्यातील सर्व दुय्य़म निबंधक कार्यालय तसेच सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांची कार्यालयेनोंदणी उपमहानिरिक्षक तसेच नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य़ पुणे यांची कार्यालये सुट्टयांच्या दिवशी सुरु ठेऊन दस्त नोंदणी करण्यात आली. 

अभय योजनेची अंमलबजावणी

            शासनाने सन १९८० ते २०२० या कालावधीत निष्पादित करण्यात आलेल्या नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत दस्तांसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलतमाफी देण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३  लागू करण्यात आली आहे.  त्यानुसार अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील अधिकारी यांची प्रत्येक विभागासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. समन्वय अधिकारी यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांना भेटी देवून अभय योजनेमध्ये वसुलीवरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून अभय योजनेचा साप्ताहिक आढावा घेण्यासाठी सर्व अधिकारी यांच्या दर आठवड्यालापंधरावड्याला ऑनलाईन पद्धतीने बैठका घेऊन प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.

            अभय योजनेमध्ये डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ६० हजार २५७ अर्ज  प्राप्त झाले असून त्यापैकी ४३ हजार ६५९ प्रकरणांची निर्गती करण्यात आली आहे. अभय योजनेमध्ये रुपये २७७.९०कोटी एवढी थकीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.  तसेच सन १९८० ते २००० या कालावधीतील दस्तांवरील थकीत मुद्रांक शुल्क रुपये १ लाखापर्यंत असलेल्या २५ हजार ३१ प्रकरणांमध्ये रुपये  ७१.७१ कोटी एवढ्या मुद्रांक शुल्काची व रुपये २३२.६३ कोटी दंडाची माफी देण्यात आली आहे

0000

किरण वाघ/विसंअ/

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने

 विशेष निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

 

       मुंबईदि. ४ :  राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्याकरिता नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार (सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा)विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा (सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवा) यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा मंत्रालयात घेतला.

     महाराष्ट्रामध्ये एकूण ४८ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये सुरू असलेली तयारी, निवडणूकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळनिवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्था, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रमनिवडणुकीच्या अनुषंगाने  प्रशासन सज्ज असून सर्व तयारीची माहिती यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम  यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

      यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णीउपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकरअवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवीयासह निवडणूक विभागाचे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

राज्यस्तरीय माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाला विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी

 राज्यस्तरीय माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाला

विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी

 

       मुंबईदि. ४ : लोकसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने आज भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार (सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा),विशेष निवडणूक  पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा (सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवा) यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील  राज्यस्तरीय माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाला भेट देवून येथील कामकाजाची पाहणी केली.

          माध्यम नियंत्रण कक्षामार्फत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बातम्यांचा दर दोन तासांचा तसेच मुद्रित माध्यमांचा अहवाल मुख्य मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केला जातो. तसेच लोकसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी केली जात असल्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ.राहुल तिडके यांनी  सांगितले.

     लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावीनिष्पक्ष आणि निर्भिडपणे वातावरणात मतदान व्हावे यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने विविध माध्यमांव्दारे जनजागृती करावी. निवडणूक विभागामार्फत राबविण्यात येणा-या  विविध उपक्रमांना जास्तीत जास्त प्रसिध्दी द्यावी  अशा सूचना विशेष निवडणूक निरीक्षक यांनी केल्या.

      यावेळी माध्यम नियंत्रण कक्षाचे  सहसचिव तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुलसंचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रेअवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यावेळी उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ

Thursday, 4 April 2024

पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण

 पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण


‘सीएआर-टी’पेशी जनुकीय उपचार पद्धती कर्करूग्णांना

नवजीवन देण्यात यशस्वी होईल


- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


            मुंबई, दि. 04 : भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज व्यक्त केला.


        भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात कर्करोगासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार पद्धती (जीन थेरपी) चे लोकार्पण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपती बोलत होत्या. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशीष चौधरी, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुदीप गुप्ता उपस्थित होते. तसेच शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधा विषयक व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा.एस.सुदर्शन, वित्त आणि परराष्ट्र व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा.के.व्ही.के. राव यांच्यासह आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्रा.राहुल पुरवार, टाटा मेमोरियल केंद्राचे डॉ.हसमुख जैन आणि शस्त्रक्रिया विभाग तज्ज्ञ डॉ.गौरव नरुला आदी या उपचार पद्धतीमधील महत्त्वाचे भागधारक यावेळी उपस्थित होते.


      सीएआर- टी सेल थेरपी ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगती मानली जात असल्याचे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, सीएआर-टी पेशीवर आधारीत उपचार प्रणाली ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगतीच्या बाबींपैकी एक समजली जाते. विकसित देशांमध्ये काही काळापासून ही प्रणाली उपलब्ध आहे, मात्र ती अत्यंत खर्चिक असल्याने जगभरातील बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेरील आहे. आज सुरु करण्यात आलेली उपचार पद्धती ही जगातील सर्वात परवडण्याजोगी असल्याचे समजून त्यांनी आनंद व्यक्त केला.


            मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यातील सहकार्यासह आणि इम्युनोअॅक्ट या उद्योग क्षेत्रातील भागीदाराच्या सहकार्याने भारताची ही पहिलीच सीएआर-टी सेल उपचार प्रणाली विकसित करण्यात आली आहे. देशातील शिक्षणक्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील भागीदारीचे हे उत्कृष्ट उदाहरण असून त्यातून अशा पद्धतीच्या इतर प्रयत्नांना प्रेरणा मिळेल, असेही राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी सांगितले.


            राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, तंत्रज्ञान शिक्षणाचे मॉडेल म्हणून आयआयटी मुंबई केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. सीएआर-टी पेशी उपचार पद्धती विकसित करण्यामध्ये संस्थेसोबत उद्योगाशीही भागीदारी केली जात आहे. आयआयटी मुंबईने गेल्या तीन दशकांमध्ये संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे हे शक्य झाले आहे. आयआयटी मुंबई इतर तत्सम संस्थांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्ये संपूर्ण भारताला सध्या सुरू असलेल्या तांत्रिक क्रांतीमध्ये खूप उपयोगी ठरणार आहेत.


कर्करूग्णांना ‘सीएआर –टी’ उपचार पद्धती वरदान ठरेल


-राज्यपाल रमेश बैस


       आजचा दिवस हा देशासाठी व विशेषत्वाने आयआयटी मुंबई, टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्या इतिहासातील महत्वाचा दिवस आहे. देशातील दोन प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन वैद्यकीय क्षेत्रातील हा अत्युत्कृष्ट उपक्रम सुरू केला आहे. आज आपण काही प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात मदत करणाऱ्या नव्या कर्करोग उपचार प्रणालीची सुरुवात करीत आहोत. ही उपचार पद्धती कर्करोगाशी लढत असलेल्या रूग्णांना वरदान ठरणारी असून खेळण्याच्या वयात आजाराशी झुंज देणाऱ्या लहान बालकांना कुठल्याही संजीवनीपेक्षा कमी असणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.


        राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले, सीएआर – टी उपचार पद्धती काही मोजक्याच देशांमध्ये उपलब्ध होती. भारताने ही उपचार पद्धत संशोधित करून जगालाही आशेचा किरण दाखविला आहे. देशाच्या दुर्गम भागात सिकलसेल आजार दिसून येतो. या आजारावरसुद्धा कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे. भारत हा जगामध्ये मधुमेहाची राजधानी बनत आहे, ही चिंतेची बाब असून आयआयटी मुंबई सारख्या अन्य संस्थांनी याबाबत संशोधन केले पाहिजे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर संशोधन करून दुर्धर आजारांच्या निदानाचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मतही राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केले.


     आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशीष चौधरी व टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ.सुदीप गुप्ता यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला मान्यवरांसह आयआयटी संस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी, टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट या संस्थेचे अधिकारी सहभागी झाले होते. 


‘सीएआर-टी’ सेल उपचारपद्धती विषयी


    नेक्ससीएआर 19 सीएआर-टी उपचारपद्धती ही शिक्षण क्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्या भागीदारीतून स्वदेशी पद्धतीने भारतात पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेली सीएआर-टी उपचार प्रणाली आहे. नेक्ससीएआर 19 ही जगातील सर्वात परवडण्याजोगी सीएआर-टी उपचारपद्धती आहे. या प्रणालीच्या विकसनामुळे पेशी तसेच जनुकीय उपचार पद्धती विषयक जागतिक नकाशात भारताचे स्थान ठळक झाले आहे. टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट यांच्या संपूर्ण सहकार्यासह प्रा. राहुल पुरवार आणि त्यांच्या पथकाने आयआयटी मुंबई या संस्थेतील बीएसबीई विभागात ही उपचार पद्धती विकसित केली.


००००


निलेश तायडे/विसंअ/

डो ल्या मधले आसू पुसून

 🙏हे छायाचित्र आहे  दुसऱ्या महायुद्धातलं (१९४५). अमेरिकन फोटोग्राफर जो ओडोनेलने १९४५ साली जपानमधील नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाल्यानंतर हे छायाचित्र टिपलं होतं ! जवळपास ८-९ वर्षांचा एक जपानी मुलगा आपल्या वर्षभराच्या लहान भावाचा मृतदेह पाठीवर बांधून त्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात रांगेत उभा होता.  फोटोग्राफर जो ओडोनेलने अशी माहिती दिली की, त्या उभ्या असलेल्या मुलाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता आणि रडणं टाळण्यासाठी तो आपले ओठ दातांनी जोरजोरात चावत होता. इतक्या जोरात की त्याचे ओठ फाटून त्यातून रक्त यायला लागलं होतं.जेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका स्मशानातल्या रक्षकाने त्याला विचारलं.. "ते तुझ्या पाठीवर असलेलं ओझं मी घेतो." यावर त्याने उत्तर दिलं. "हे कुठलंही सामान किंवा ओझं नाही... हा माझा भाऊ आहे !" आजही जपानमध्ये हे छायाचित्र सामर्थ्याचं प्रतीक  म्हणून वापरतात.आणि आपल्या देशात भाऊ-बहिणी जमिनीच्या तुकड्यांसाठी भांडत आहेत आणि मरत आहेत.तीस टक्के भाऊ फक्त कोर्टाच्या दाराजवळच भेटतात.   हेच तत्व समजून घेणे यासाठी योग साधना कामी येते आपण जन्माला येताना काहीही घेऊन येत नाही आणि  शेवटचा श्वास संपताना काहीही घेऊन जाऊ शकत. सर्व येथेच शिल्लक राहते पण उपभोगता बदलतो.हा फोटो पाहून मी तर खूपच अस्वस्थ झालो आयुष्याच्या होत्या नव्हत्या त्या अभिलाषा अशावेळी संपुष्टात येतात.अर्थात शब्दप्रपंच फक्त  संवेदनशील आणि प्रामाणिक लोकांसाठी आहे. -


Featured post

Lakshvedhi