Thursday, 8 February 2024

आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतिशक्ती जिल्हास्तरीय कार्यशाळेचे ९ फेब्रुवारी रोजी आयोजन

 आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतिशक्ती

जिल्हास्तरीय कार्यशाळेचे ९ फेब्रुवारी रोजी आयोजन

 

            मुंबई, दि. ७ : उद्योग संवर्धन एवं आंतरिक व्यापार विभागभारत सरकारनवी दिल्ली यांनी पश्चिम विभागातील महाराष्ट्रगुजरात व राजस्थान या ३ राज्यातील ११ आकांक्षित जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र (४)गुजरात (२) आणि राजस्थान (५)] दि.९ फेब्रुवारी२०२४ रोजी यशदापुणेयेथे दुसऱ्या प्रधानमंत्री गतिशक्ती जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे नियोजन विभागाने कळविले आहे.

            राज्यातील नंदुरबारवाशीमधाराशिवगडचिरोली या चार जिल्ह्यांचा आकांक्षित जिल्हा म्हणून समावेश आहे.

            ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या एक दिवसीय कार्यशाळेचे सकाळी दहा वाजता उद्घाटन करण्यात येईल. कार्यशाळेत विशेष सचिव (लॉजिस्टिक्स) प्रधानमंत्री गती शक्ती बाबत सादरीकरण आणि व्हीडिओ प्रसारित करण्यात येईल.

            "पीएम नॅशनल मास्टर प्लॅन फॉर एरिया डेव्हलपमेंट प्लॅनिंगवर जिल्हाधिकाऱ्यांसाठी हॅण्डबुक" या विषयावर सादरीकरण तसेच पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनवरील भूमिका आणि जबाबदाऱ्यांच्या संकलनावर सादरीकरण केले जाईल. तसेच पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्राच्या नियोजनाच्या सर्वांगीण नियोजनात गतीशक्ती  प्रधानमंत्री प्रात्यक्षिक तसेच  पीएम गतिशक्तीमध्ये क्षेत्र विकास दृष्टिकोनाचा अवलंब करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल.

            कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात यशोगाथा सादरीकरण होईल. यामध्ये एपएमपी/एसएमपी (NMP/SMP) प्लॅटफॉर्मचे सादरीकरण – (BISAG-N) द्वारेउपयुक्तता आणि पायाभूत सुविधा मंत्रालये/विभागांद्वारे सादरीकरण,  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH दूरसंचार विभाग (DoT) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (MoPNG),  सामाजिक क्षेत्रातील मंत्रालये/विभागांद्वारे सादरीकरणउच्च शिक्षण विभागशालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आदिवासी व्यवहार मंत्रालय,  कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या द्वारा सादरीकरण करण्यात येईल. क्षेत्र विकास दृष्टिकोन अंगीकारण्यावर प्रात्यक्षिकक्षेत्र विकासावर या कार्यशाळेत सादरीकरण केले जाईल.

००००

विभागीय सहकार विभाग निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेत ४५ टक्के गुण प्राप्त उमेदवारांना आवाहन

  विभागीय सहकार विभाग

निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेत

४५ टक्के गुण प्राप्त उमेदवारांना आवाहन

 

          मुंबईदि. ७ : सहकार विभागातील गट-क संवर्गातीलकोकण विभागातील निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठो परोक्षा दिलेल्या उमदेवारांपैकी ज्या उमेदवाराना परीक्षेस किमान ४५ टक्के गुण प्राप्त आहेतअशा उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त व निबंधकसहकारी संस्थापुणे या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर १० जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

          व्यावसायिक चाचणी मराठी अथवा इंग्रजी भाषेतून घ्यावयाची आहे. मात्रयादीतील उमेदवारांनी लघुलेखन व टंकलेखनाचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना ऑनलाईन सादर केलेले नसल्याने किती उमेदवार मराठी आणि किती उमेदवार इंग्रजी भाषेतील प्रमाणपत्र धारण करीत आहेत याचा तपशिल उपलब्ध होत नाही. व्यावसायिक चाचणी घेण्यासाठी संबंधित उमेदवार हे मराठी माध्यमातून परीक्षा देणार की इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणार याबाबतची माहिती आवश्यक आहे. संबंधित उमेदवारांनी ही माहिती व प्रमाणपत्र सादर करण्यासाठीची लिंक सहकार आयुक्त व निबंधकसहकारी संस्थापुणे कार्यालयाकडील https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ५ ते ११ फेब्रुवारी २०२४ (रात्री २३.५९ वा. पर्यंत) या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या कालावधीत संबंधित माहिती उमेदवारांनी उक्त संकतेस्थळावर भरण्याबाबतची दक्षता घ्यावीअसे आवाहन कोकण विभागाचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

स्वयम’च्या धर्तीवर राज्यात ‘महास्वयम’ प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन

 स्वयम’च्या धर्तीवर राज्यात ‘महास्वयम’ प्लॅटफॉर्म विकसित

 करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबई, दि. ७ : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘स्वयम’ च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘महास्वयम’ प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            हॉटेल ट्रायडंट येथे मंत्री श्री. पाटील आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षणातील शैक्षणिक सुविधा आणि नवीन धोरण अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा झाली.

            महास्वयम प्रकल्प आणि संशोधन प्रकल्पास केंद्राकडून निधी प्राप्त करून देण्यास विद्यापीठ अनुदान आयोग महाराष्ट्र राज्यास सर्वोतोपरी सहकार्य करेल असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी यावेळी सांगितले.

            विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.५ सप्टेंबर २०२२च्या पत्रानुसार  सहाय्यक प्राध्यापक पदाच्या निवडी साठी नेट/सेट मधून सूट मिळण्यासाठी एम. फिल अर्हता व्यक्तिगत सूट म्हणून ग्राहय धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील एम. फिल अर्हता धारक अध्यापकांना अद्यापही पूर्णतः नेट/सेट मधून सूट मिळालेली नाहीयासाठी विद्यापीठ अनुदान आयोग सकारात्मक असून संबंधित अध्यापकांनी विद्यापीठामार्फत विद्यापीठ अनुदान आयोगास फेरप्रस्ताव सादर करावा, असेही श्री.जगदीश कुमार यांनी सांगितले.

            विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठात अध्यापकाची नियुक्ती करतेवेळी दि.१ जुलै २०२१ पासून पीएच.डी पदवी अनिवार्य केली आहे व त्यास आयोगाच्या दि.१२ ऑक्टोबर २०२१ च्या पत्रान्वये दि.०१.जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली होती.

             विद्यापीठात नेमणूक करतेवेळी अध्यापकांना पदव्युत्तर पदवी आणि नेट/सेट अथवा पीएच.डी हीच शैक्षणिक अर्हता लागू राहील  याबाबत आयोगाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

          राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आणि धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील महाविद्यालयामधील ७५ टक्के शिक्षकीय पदभरती बाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ

 कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 

            मुंबई, दि. 7 :राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहेअशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            ते म्हणालेशेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने आज करण्यात आली आहे. पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढविण्यात आला आहे.

            विविध कृषी पुरस्कारांची संख्यापुरस्काराच्या सुधारित रकमा व कंसात पुरस्कारांची संख्या पुढीलप्रमाणे-

            डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (1) पूर्वीची रक्कम 75000 होती ती वाढवून 3 लाख रुपये देण्यात येतील.

            वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार(8)जिजामाता कृषी भूषण पुरस्कार (5) आणि कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार(8)उद्यान पंडित(8) या चारही पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी 50 हजार वरून 2 लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.

            तर वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार(3) व युवा शेतकरी पुरस्कार(8) या पुरस्कारांसाठी पूर्वी 30 हजार रुपयांची रक्कम देण्यात येत होती ती आता 1 लाख 20 हजार रुपये करण्यात आली आहे.

             तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट(34)वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट(06) दोन्ही पुरस्कार रक्कम 11 हजार वरून 44 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार 10 जणांना तर उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार 4 जणांना देण्यात येईल.

             पुरस्कार विजेत्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता दैनिक प्रवास भत्त्यात वाढ करण्यात आली असून प्रत्येक विजेत्याला 15 हजार रुपये भत्ता देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आलेला आहे.

000000

शासन आणि प्रशासन ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके

 शासन आणि प्रशासन ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापन दिन


            मुंबई, दि. ७ : शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावलीत की विकास वेगाने होतो. याचे उदाहरण राज्यात पहायला मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोकण विभागाचे आयुक्त महेंद्र कल्याणकरमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरराजेंद्र भोसलेमहासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथेअध्यक्ष विनोद देसाईकोशाध्यक्ष नितीन काळेकल्याण केंद्र समन्वयक श्री.टाव्हरेसरचिटणीस समीर भाटकर आदी उपस्थित होते.

            राज्याच्या कारभारात अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीराज्याच्या कारभारात तुमचे काम महत्वाचे आहे. नियमांचे पालन करून अधिकारी काम करत असतात. काम नियमांमध्ये कसे करावे याचे चांगले ज्ञान अधिकारी वर्गाकडे आहे. अधिकारी हे शासनाचे अविभाज्य अंग आहे. राज्याचा गाडा हाकताना रथाची चाके आपण आहोतच. पण त्याचबरोबर या चाकांमध्ये वंगण घालण्याचे काम ही अधिकारी वर्ग करत असतो. शासन आणि प्रशासन यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणालेशासन राज्यातील शेतकरीकामगारकष्टकरीमहिलाज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अनेक योजना राबवत आहे. अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचे आणि त्याचा लाभ लोकांना देण्याचे काम प्रशासन करत आहे. सरकारची प्रतिमा निर्माण करण्याचे काम अधिकारी करत आहेत. लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी योजनांची अंमलबजावणी अधिकारी करत असतात.

            राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे. त्यामुळेच आज राज्यात परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी दावोस येथे करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी ८० टक्के करार पूर्ण झाले आहेत. यंदा ३५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. उद्योगांसाठी पोषक वातावरण असलेले राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. देशात परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. जीडीपी मध्येही राज्याचा मोठा वाटा आहे. हे सर्व आपण अधिकाऱ्यांच्या जोरावर करत आहोत. लोकांच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी लोकप्रिय असतात, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

            अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम करावे असे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीअधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांना  भेटावे. जितके जास्त अधिकारी जनतेला भेटतील तितके चांगले काम होईल आणि माझ्याकडे येणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होईल.

 

महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी भरीव निधी देणार

            राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अनेक मागण्या आहेत. या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या पूर्ण होतील. महासंघ कल्याण केंद्रासाठी निधी दिला जाईल. जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

            प्रास्ताविकात महासंघाचे अध्यक्ष श्री. देसाई यांनी महासंघाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच आतापर्यंत केलेल्या मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री शिंदे यांचे आभार व्यक्त केले. आभार श्री. काळे यांनी व्यक्त केले तर सूत्र संचालन मीनल जोगळेकर यांनी केले.

विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ

 कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 

            मुंबई, दि. 8 : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहेअशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            ते म्हणालेशेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने आज करण्यात आली आहे. पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढविण्यात आला आहे.

            विविध कृषी पुरस्कारांची संख्यापुरस्काराच्या सुधारित रकमा व कंसात पुरस्कारांची संख्या पुढीलप्रमाणे-

            डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (1) पूर्वीची रक्कम 75000 होती ती वाढवून 3 लाख रुपये देण्यात येतील.

            वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार(8)जिजामाता कृषी भूषण पुरस्कार (5) आणि कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार(8)उद्यान पंडित(8) या चारही पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी 50 हजार वरून 2 लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.

            तर वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार(3) व युवा शेतकरी पुरस्कार(8) या पुरस्कारांसाठी पूर्वी 30 हजार रुपयांची रक्कम देण्यात येत होती ती आता 1 लाख 20 हजार रुपये करण्यात आली आहे.

             तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट(34)वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट(06) दोन्ही पुरस्कार रक्कम 11 हजार वरून 44 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार 10 जणांना तर उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार 4 जणांना देण्यात येईल.

             पुरस्कार विजेत्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता दैनिक प्रवास भत्त्यात वाढ करण्यात आली असून प्रत्येक विजेत्याला 15 हजार रुपये भत्ता देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आलेला आहे.

‘महाप्रित’ च्या विशेष कार्य अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती

 ‘महाप्रित’ च्या विशेष कार्य अधिकारी पदी

बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती

 

 

            मुंबई‍‍दि. ८ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या सहयोगी उप कंपनीच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            श्री. श्रीमाळी हे सेवानिवृत्त वरिष्ठ सनदी अधिकारी असून ते यापुर्वी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित" (महाप्रित)" या नावाची सहयोगी उप कंपनीचीकंपनी कायदा२०१३ अंतर्गत स्थापन झाली.  महाप्रित या उप कंपनीमार्फत बदलत्या काळाची गरजमागास व दुर्बल समाजाच्या गरजा व वाढत्या आकांक्षा लक्षात घेऊनकेंद्र व राज्य शासनाची विविध उद्दिष्टेयोजना व उपाय योजना एकत्रित करुन मागासवर्गीय समाजाच्या सर्व समावेशक विकासासाठी ‘नवयुग योजना’ आखली आहे. या उपकंपनीच्या सहभागाने शासन ते शासन (Govt. to Govt.) प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत महाप्रित या उप कंपनीमार्फत ठाणे महानगर पालिका क्षेत्रात (टेकडी बंगलाहजुरी व किसन नगर) एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत समूह विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.  राज्यभरात इतर अनेक महत्वपूर्ण प्रकल्प ‘महाप्रित’ मार्फत राबविण्यात येणार आहेत.

0000

Featured post

Lakshvedhi