Saturday, 3 February 2024

आदिवासी भागातील कुपोषण आणखी कमी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग घ्यावा चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करावी -

 आदिवासी भागातील कुपोषण आणखी कमी करण्यासाठी

सरपंचांचा सहभाग घ्यावा

चावडी वाचनशिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुपोषणविषयक कृती दलाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

            मुंबई, दि. १ : आदिवासी भागातील पोषण आहार आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर राज्य शासनाचे विविध विभाग समन्वयाने काम करीत असल्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होताना दिसते. मात्र, कृती दलाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून हे प्रमाण आणखी कमी झाले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकामी सरपंचांचा सहभाग वाढविण्याचे आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेण्याचे निर्देश दिले. 

            आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांना कृती दलाचा पहिला अहवाल अध्यक्ष डॉ दीपक सावंत यांनी सुपूर्द केला. यावेळी अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिकमहिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव आणि कृती दलातील विविध विभागांचे सचिवअधिकारी उपस्थित होते.

            प्रारंभी विभागाने केलेल्या सादरीकरणात गेल्या तीन वर्षात आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण १.८२ टक्क्यांवरुन १.६२ टक्के इतके कमी झाल्याचे आणि उर्वरित राज्यातील कुपोषणाचे प्रमाण १.४३ टक्क्यांवरून १.२२ टक्के इतके कमी झाल्याची माहिती देण्यात आली.  आरोग्य सेविकाअंगणवाडी कार्यकर्तीआशा स्वयंसेविका व आयुष यांच्या जोडीने सरपंचांशी देखील समन्वय साधून आरोग्य आणि पोषण सेवा देण्यात येत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.       

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीग्रामविकासात सरपंचांची मोठी भूमिका असते. सरपंचांचे देखील आपापल्या गावपाड्यामधील कुपोषण कमी करण्यात सहभाग असणे गरजेचे आहे. चावडी वाचनशिबिरे या माध्यमातून कुपोषित महिलाबालकांची माहिती वेळीच प्रशासनाला कळेल आणि त्यावर त्वरेने उपाययोजना करता येतील.

माध्यान्ह भोजन आठवीपुढे सुद्धा

            सध्या आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येते. ही योजना नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यासंदर्भात तसेच अमृत आहार योजना शहरी भागात देखील देण्यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याच्या सूचना देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

            कुपोषण ही गंभीर समस्या आहे. संबंधित सर्व विभागांनी एकत्रित समन्वयाने काम करून उचित पाऊले टाकली पाहिजे. कुपोषणात देशाच्या आकडेवारीत महाराष्ट्र सर्वात शेवटी हवा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीयामध्ये आदिवासी भागात एखादी महिला गरोदर राहिल्यापासून तिचे आरोग्यआहारावर सातत्याने आरोग्यमहिला व बालविकास विभागाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लेक लाडकी योजनेविषयी देखील आदिवासी भागात चांगला प्रसार झाला पाहिजे. मेळघाटपालघरप्रमाणे इतरत्रही  दुचाकी रुग्णवाहिका किंवा नौका रुग्णवाहिका कायम तयार असल्या पाहिजेत. दुर्गम गावे आणि पाड्यांमध्ये किमान एखादे वाहन आपत्कालीन परिस्थितीत जाण्यायेण्यासाठी साधी वाट हवी यासाठी लवकरच वन विभागाची बैठक घेण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

डेटा एकत्रित झाल्याने लाभ

            या कृती दलाने केलेल्या शिफारशींवर उत्तमरीत्या कार्यवाही झाल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी सांगितले. सर्व संबंधित विभाग प्रथमच एकत्र येऊन काम करीत आहेतत्यामुळे त्यांच्यात योग्य समन्वय आहे. कुपोषित बालके व महिलांचा डेटा एकत्रित संकलित केला जात असल्याने वेळीच माहिती मिळत आहे.

हिमोग्लोबिनकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे

            पोषणाचे व्हिडिओ आदिवासींच्या भाषेत भाषांतर करून प्रसारित करणेपोषण ट्रेकरचे विश्लेषण करणेअती तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्रांचा सुधारित दरमध्यम कुपोषित बालकांकडे देखील लक्ष देणे व त्यांना अतिरिक्त पोषण देणेबालकांच्या पोषणाची चावडी वाचनाद्वारे माहिती देणेआश्रमशाळेने एक नर्सआणि क्रीडा शिक्षकाची नेमणूक करणेकिशोरवयीन मुलींच्या हिमोग्लोबिन तपासणीसाठी डिजिटल मीटर उपलब्ध करणेगर्भवती महिलांना ॲनिमिया कमी करण्यासाठी लोहयुक्त गोळ्यांऐवजी एमएमएस देणे अशा शिफारशी करण्यात आल्याचे डॉ. सावंत  यांनी यावेळी सांगितले.

            कृती दलाने केलेल्या काही सूचनांवर कार्यवाही झाली असून गरोदर स्त्रियांना देण्यात येणाऱ्या एकवेळच्या चौरस आहार दरात ३५ रुपयांवरून ४५ रुपये वाढ झाली आहे. मध्यम कुपोषित बालकांसाठी अतिरिक्त पोषण आहार कार्यक्रम सुरु झाला आहे. सरपंचांना देखील सहभागी करणे सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

0000


श्री राम व्या पूजसेठी

 २२/१/२४, अयोध्येत रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठेदिनी लोणावळ्याच्या राममंदिरात आलेल्या वानराने त्याला खायला दिलेल्या कशालाही हात लावला नाही, रामाकडे उडी मारून जाऊन बसले, रामाच्या पायांना हात लावला आणि निघून गेले.


मुंबई येथे वार्षिक जागतिक रंगभूमी महोत्सव व्हावा

 मुंबई येथे वार्षिक जागतिक रंगभूमी महोत्सव व्हावा

- राज्यपाल रमेश बैस

दशावतारनौटंकीयक्षगान यांसह सर्व नाट्य परंपरा जगापुढे आणाव्या

            मुंबई, दि. १ : भारताला रंगभूमीचा मोठा इतिहास लाभला आहे. प्रत्येक राज्याची आपली स्वतंत्र रंगभूमी आहे. तमाशायक्षगाननौटंकीजत्रादशावतार यांसारख्या अनेक परंपरा देशात आहेत. या सर्व नाट्य परंपरा जगापुढे आणण्याची गरज आहे असे सांगताना न्यूयॉर्क मधील 'मेट गालाफॅशन महोत्सवाप्रमाणे मुंबईत जागतिक रंगभूमीचा वार्षिक महोत्सव व्हावाअशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे व्यक्त केली.  

            राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे आयोजित २५ व्या भारत रंग महोत्सवाचे उद्घाटन एनसीपीए मुंबई येथे झालेत्यावेळी ते बोलत होते.

            उद्घाटन सत्राला राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे अध्यक्ष अभिनेते परेश रावल, 'भारंगममहोत्सवाचे ब्रँड ऍम्बॅसेडर पंकज त्रिपाठीअभिनेते रघुवीर यादवराष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी आदी उपस्थित होते.  

            रंगभूमी सर्वसमावेशक असावी. समाजाच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत रंगभूमीने पोहोचावे. लोकांचे दुःख आपण दूर करू शकत नाही. परंतु काही तासांकरिता तरी लोकांना मनोरंजनाच्या माध्यमातून दुःख विसरायला लावण्याची शक्ती कलाकारांकडे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

            आपण चाळीस वर्षे राजकीय मंचावर वावरत आहोत. परंतु, रंगकर्मींच्या मंचावर प्रथमच आलो असे सांगून राज्यातील व शहरातील नाट्यगृहे सुस्थितीत ठेवण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            नाट्यगृहाचे भाडे परवडणारे ठेवल्यास लोकांना नाटकांची तिकिटे कमी किमतीत मिळू शकतीलअसे त्यांनी सांगितले. रंगभूमी ही लोकचळवळ झाली पाहिजे व सर्व प्रादेशिक भाषा व बोलींमधून रंगभूमीला चालना दिली गेली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

            निवृत्त कलाकार व तंत्रज्ञ यांना दिली जाणारी पेन्शन वाढवली पाहिजे तसेच त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च देखील केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

प्रत्येक राज्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालय असावे : परेश रावल

            मुंबई ही रंगभूमीची राजधानी आहे. येथे दररोज मराठीहिंदीगुजरातीइंग्रजीकोकणी नाटके होतात. परंतु राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे केंद्र दिल्लीत आहेमुंबईत नाहीयाकडे लक्ष वेधून 'एम्सप्रमाणे प्रत्येक राज्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालय असावे व त्यासोबत कमी भाडे आकारणारे नाट्यगृह देखील असावे असे विद्यालयाचे अध्यक्ष श्री. रावल यांनी सांगितले.

            रंगभूमीचे ओटीटी प्रमाणे स्वतःचे हक्काचे असावे.  राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने आत्मनिर्भर बनावे व प्रत्येक विद्यापीठासोबत काम करावेत्यातून अनेक कलाकार निर्माण होतील असे त्यांनी सांगितले.

            आपण जबलपूर जवळील एका लहान गावातून आलो. तेथील पापड विक्रेताचणा विक्रेता आदी लोकांच्या लकबी शिकत येथवर आलो, असे श्री. यादव यांनी सांगितले.

            बिहारमध्ये रंगकर्मीला 'रंगबाजम्हणतात असे सांगून रंगभूमीशी  नवनवे प्रेक्षक जोडले पाहिजे, असे श्री. त्रिपाठी यांनी सांगितले.

            भारतीय रंग महोत्सव गेल्या २५ वर्षांपासून सुरु असून आज तो जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव झाला आहे, असे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक श्री. त्रिपाठी यांनी सांगितले. 

            एकूण २२ दिवस १५ शहरांमध्ये चालणाऱ्या या नाट्य महोत्सवात १५० नाटकांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या 'भारंगममहोत्सव गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

0000

 


 

Maharashtra Governor inaugurates International Theatre Festival of India

 

      Maharashtra Governor Ramesh Bais presided over the inauguration ceremony of the 25th Bharat Rang Mahotsav 'Bharangam' - the International Theatre Festival of India, organized by the National School of Drama at NCPA Mumbai.

      Chairman of National School of Drama and senior actor Paresh Rawal, Brand Ambassador of 'Bharangam' festival Pankaj Tripathi, senior actor Raghubir Yadav, Director of National School of Drama Chittaranjan Tripathi, eminent personalities from theatre, critics and alumni of NSD were present.

      The Festival began with the group rendition of the 'Bharangam' Festival song penned by lyricist Swanand Kirkire.

      The 22 day long 'Bharangam' festival to be held in 15 cities will showcase 150 plays.

राज्यपालांच्या हस्ते राजभवन परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना

 राज्यपालांच्या हस्ते राजभवन परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना

मुंबई दि. 22 : अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर प्रतिष्ठापना समारोहाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील श्री गुंडी देवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सोमवारी (दि. २२) श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली.

राज्यपाल बैस यांनी पत्नी रामबाई बैस यांचेसह प्रभू रामाची आरती केली व उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला.

राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिराचा दोन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी या मंदिराला भेट दिली होती.

साकळाई देवी व सागरमाता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवी मंदिर परिसरातच श्रीराम पंचायतन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

राजभवन देवी मंदिर समितीतर्फे यावेळी राज्यपाल व श्रीमती रामबाई बैस यांचा सत्कार करण्यात आला.  

श्री राम पंचायतन स्थापना विधीला राज्यपाल बैस यांचे कुटुंबिय तसेच राजभवन संकुलातील निवासी उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांनी मंदिर निर्माण कार्य करणाऱ्या श्रमिकांची भेट घेतली तसेच मंदिराची योग्य देखभाल ठेवल्याबद्दल राजभवन देवी मंदिर सदस्यांना कौतुकाची थाप दिली. 

0000

Maha Governor performs consecration of Shriram Darbar in Raj Bhavan Complex

Maharashtra Governor Ramesh Bais performed the consecration of the Shri Ram Darbar in the Sri Gundi Mandir Complex in Raj Bhavan on Monday (22 Jan).

The consecration ceremony was organised to coincide with the consecration of the Shri Ram Temple in Ayodhya.

The Governor accompanied by his wife Rambai Bais performed the aarti alongwith his family members and the residents of Raj Bhavan complex.

Raj Bhavan has an ancient temple of Sri Gundi, also known as Sagar Mata and Sakalai. Prime Minister Narendra Modi had visited the renovated Sri Gundi Mandir in the Raj Bhavan premises during his visit on 14th June 2022.

The Governor and Smt Rambai Bais were welcomed and felicitated by the members of the Raj Bhavan Devi Mandir Committee.

The Governor and Smt Rambai Bais met the teams of construction workers of the temple and applauded the Raj Bhavan Devi Mandir Samiti for maintenance and cleanliness of the temple.

युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करू या

 युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करू या

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा गौरव

            मुंबई, दि. २४ : प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २५ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक प्रक्रियेची आस्था वाढावी यासाठी राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या अद्ययावतीकरणाचे काम केले आहे. ही प्रक्रिया अविरत सुरू असूननव मतदारांनी नाव नोंदणी करावी. राज्यातील सर्व युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

            जयहिंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २४ व २५ रोजी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते.  मतदानाबद्दल ज्यांनी साक्षरता वाढविण्याचे काम केलेमतदार जनजागृतीचे काम केले अशा स्वयंसेवी संस्थामहाविद्यालयविद्यार्थीअधिकारी आणि कर्मचारी यांचा निवडणूक आयोगामार्फत गौरव करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगमुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जयहिंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरउपनगरचे डॉ. राजेंद्र भोसलेजय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकरव्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक वाडियानिवडणूक सदिच्छा दूत प्रणित हाटेचित्रपट समीक्षक डॉ. संतोष पाठारेलेखिका डॉ. निर्मोही फडकेदिग्दर्शक प्रकाश कुंटेअभिनेता विकास पाटील उपस्थित होते.

            श्री. देशपांडे म्हणाले कीविद्यार्थी देशाचा आशावाद आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थी सोबत असेल, तर भरीव कामगिरी करेल.  सदिच्छा दूतलोकशाही मित्रउत्कृष्ट वार्तांकनभित्तीचित्रेघोषवाक्यजाहिरात निर्मिती अशा विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले. याचबरोबर जिल्हाधिकारीउप जिल्हा निवडणूक अधिकारीउत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी माहिती व तंत्रज्ञान समन्वयकउत्कृष्ट समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्धी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी उत्तम कार्य केले आहे. आपण सर्वांनी मिळून राज्यातील सर्व युवा-युवतींची नावे मतदार यादीत नोंद व्हावी यासाठी आपले कार्य असेच यापुढेही सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे आहे.

            एकत्रित संख्येने काम केल्यास काहीही शक्य नाही. आणि एकी चा प्रत्यय मुंगी देतेम्हणूनच निवडणूकीचे शुभचिन्ह म्हणजेच मॅस्कॉटचे आज सदिच्छा दूत प्रणित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचे राहुल कर्डिलेअकोला जिल्ह्याचे अजित कुंभारपुणे विभागात जितेंद्र डुडीनाशिक विभाग मनीषा खत्रीछत्रपती संभाजीनगर विभागात डॉ. सचिन ओम्बासेकोकण विभागात किशोर तावडे यांना प्रदान करण्यात आला.

            मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग- स्वीप उपक्रम राबवून मतदार यादी दुरूस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि स्वीप नोडल अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर विभागात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरउपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरेअमरावती विभागात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एसउप जिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरेमतदार नोंदणी अधिकारी वैशाली देवकरपुणे विभागात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखउप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकरस्वीप नोडल अधिकारी डॉ. अर्चना तांबेनाशिक विभागात जिल्हाधिकारी जलज शर्माउप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळेस्वीप नोडल अधिकारी शुभांगी भारदेनांदेड विभागात जिल्हाधिकारी अभिजित राऊतउपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चव्हाणमतदार नोंदणी अधिकारी शरद मंडलिककोकण विभागाचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहउप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडमतदार नोंदणी अधिकारी जीवन देसाई यांना  उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट उप जिल्हा निवडणूक अधिकारी नागपूर विभाग:- उप जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावितअमरावती विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकरपुणे विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी  भगवान कांबळेनाशिक विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश मिसाळछत्रपती संभाजी नगर विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादवकोकण विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार पुणे विभाग :- मतदार नोंदणी अधिकारी अतुल म्हेत्रेमतदार नोंदणी अधिकारी सुरेंद्र नवलेनागपूर विभाग मतदार नोंदणी अधिकारी वंदना सौरंगपतेकोकण विभाग मतदार नोंदणी अधिकारी अमित सानपआकाश लिगाडेनाशिक विभाग मतदार नोंदणी अधिकारी विशाल नरवडेमतदार नोंदणी अधिकारी सुभाष दळवीअमरावती विभाग मतदार नोंदणी अधिकारी अनिता भालेरावमतदार नोंदणी अधिकारी ललितकुमार वराडेछत्रपती संभाजी नगर विभाग मतदार नोंदणी अधिकारी सुशांत शिंदेमतदार नोंदणी अधिकारी संजय पाटील यांना प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट माहिती व तंत्रज्ञान समन्वयक पुरस्कार राज्य माहिती व तंत्रज्ञान समन्वयक कैलास हिरे यांना प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट समाजमाध्यम पुरस्कार :- रत्नागिरी जिल्हा जिल्हाधिकारी वैभव आंबेरकरठाणे जिल्हाधिकारी अजिंक्य दिवेकरपुणे जिल्हामनोज पुराणिकठाणे जिल्हा विलास पाटील यांना समाजमाध्यम समन्वयक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार :- सोसायटी फॉर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्चपुणेडॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयपुणेआर.एन.सी. महाविद्यालय नाशिकपुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयपुणेरयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी महाविद्यालयसाताराकॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरअहमदनगर या महाविद्यालयांनी निवडणूक साक्षरता मंडळांसाठी उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने त्यांना गौरविण्यात आले.

            उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. पुनम शिंदेपुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे शरद गव्हाळेसुशिलादेवी महाविद्यालयाचे शिवाजी मोहळे यांना प्रदान करण्यात आला.

            विनयन वाघमारेनिकीता सालगुडेभारती डोईफोडे यांना उत्कृष्ट विद्यार्थी सदिच्छा दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            सेंटर फॉर प्रोमोटिंग डेमोक्रॅसी सोबत सहयोगी संस्थांना विशेष संस्थात्मक मतदार मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            विशेष संस्थात्मक लोकशाही मित्र पुरस्कार बबन पारधीचंद्रकांत गडेकरअरुण जाधवराजू अवताडेकडुदास कांबळेमारूती बनसोडेशैला यादव यांना प्रदान करण्यात आला.

            विशेष जिल्हाधिकारी पुरस्कार सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादधाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना प्रदान करण्यात आला.  टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार निशा नांबियार यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिव्यक्ती मताच्या स्पर्धेत उत्कृष्ट भित्तिपत्रकासाठी धनश्री भागडकर यांना प्रथम पुरस्कारउत्कृष्ट घोषवाक्यास साक्षी चक्रदेव यांस प्रथम पुरस्कारउत्कृष्ट जाहिरातनिर्मिती स्पर्धेत तेजस साळगावकर यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

 

 

वृत्त क्र. 291

पर्यटन क्षेत्रात जागति

विदर्भातील आठ जिल्ह्यांत 'कौशल्य रथ' च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देणार

 विदर्भातील आठ जिल्ह्यांत 'कौशल्य रथच्या माध्यमातून

व्यवसाय प्रशिक्षण देणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस

 

            मुंबई दि. ३० : स्थानिक नवोदित युवकांमधील कौशल्य विकास वाढवणेप्रत्येकाच्या हाताला रोजगार देणेकौशल्य विषयक अभ्यासक्रमांच्या बाबत जनजागृती रोजगारक्षम युवक-युवतींची नोंदणी व्हावी यासाठी  विदर्भातील आठ जिल्ह्यांत "कौशल्य रथ" च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग आणि  पुष्पांचल फाउंडेशनतर्फे आयोजित "कौशल्या रथ" चे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यानी हिरवी झेंडीं दाखवून केले.

             कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त निधी चौधरीव्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवीव्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटीलमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणेपंचशील फाउंडेशनचे संचालक गौरांग पांडे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की‘कौशल्य रथ’चा प्राथमिक उद्देश  रोजगारक्षमता आणि उद्योजकता  वाढवण्यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यातील युवकाना करिअर मार्गदर्शन करणेत्यासंदर्भात कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत  होईल.

            कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले कीविदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये विविध कौशल्य क्षेत्रीय परिषदा यांच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या कौशल्य विषयक अभ्यासक्रमासाठी युवक युवतींची नोंदणी करणे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करणे  याकरिता ‘कौशल्य रथ’ महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योग विकास अभियानांतर्गत  नियोक्ते आणि नोकरी शोधणारे यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी व्यक्तींसाठी ‘कौशल्य रथा’द्वारे  व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये पाच बसेसचा वापर करून महाविद्यालयांमध्ये थेट नावनोंदणी सत्रे आयोजित केली जाणार असल्याची श्री. लोढा यांनी सांगितले.

000

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी सिडकोतर्फे नवी अभय

 नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्रभाडेपट्टा खतअभिहस्तांतरण

प्रलंबित इमारतींसाठी सिडकोतर्फे नवी अभय योजना

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मावेजा रकमेच्या वसुली स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय

 

            मुंबई, दि. ३० : नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खतअभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार ‘सिडको’तर्फे अशा इमारतींसाठी नवी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विकासकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

            यापूर्वी नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गत येणाऱ्या मावेजा रकमेच्या वसुलीशिवाय इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र/भाडेपट्टा खत/अभिहस्तांतरण देण्यात आलेले नव्हते.

            सिडकोच्या नवीन अभय योजनेनुसार मावेजा रकमेच्या वसुलीशिवाय इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रभाडेपट्टा खतअभिहस्तांतरण देण्यात येणार आहे. ही अभय योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे. तसेच अभय योजनेनुसार यापुढे मावेजा रकमेची वसुली ही भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खतअभिहस्तांतरणाशी जोडली जाणार नसून या रकमेची वसुली स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. 

             सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा न लागता त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक सर्वसामान्य सदनिकाधारकांना याचा थेट लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे भूखंड विकासाच्या अधिमूल्यामध्ये सवलत दिल्याने रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यासही मदत होणार आहे.

            तसेच या अभय योजनेंतर्गत जे विकासक विहित कालावधीत भूखंडाचा विकास करण्यास असमर्थ ठरले आहेतअशा विकासकांना ३१ मार्च २०२४ पर्यंत देय होणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्काच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. या व्यतिरिक्त मावेजा किंमत कमी करण्याबाबतही शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. लहान बंगले व रो-हाउस भूखंडांवर एकापेक्षा जास्त सदनिका बांधण्यात आलेल्या सर्व इमारती नियमित करण्याचे धोरणही शासनातर्फे आखण्यात आले आहे.

            हे सर्वसामान्याचे शासन असून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचे आमचे धोरण आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई क्षेत्रातील नागरिकांना आणि विकासकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी या निर्णयानंतर सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi