Saturday, 3 February 2024

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर

 एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड


परीक्षेचा निकाल जाहीर


 


            मुंबई, दि. २ : कला संचालनालयामार्फत शालेयस्तरावर आयोजित शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९५.५७ टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा ९५.४४ टक्के निकाल जाहीर झाला आहे.


            इंटरमिजिएट डॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ३१ जानेवारी २०२४ रोजी www.doa.maharashtra.gov.in, / https://dge.doamh.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, लिमेंटरी डॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ५ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे.


            या दोन्ही परीक्षांमध्ये २०२३ या वर्षी एकूण आठ लाख १५ हजार १२९ विद्यार्थ्यांची नावे नोंदविलेली होती. एलिमेंटरी परीक्षेस ४ लाख ४६ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती प्रवीष्ट विद्यार्थी ४ लाख २३ हजार ६०७ तर, अनुपस्थित विद्यार्थी २३ हजार १२२ यापैकी एकूण उत्तीर्ण विद्यार्थी ४ लाख ४ हजार ८५७ आहेत.


            इंटरमिजिएट परीक्षेस ३ लाख ६८ हजार ४०० विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ३ लाख ५९ हजार १९ प्रविष्ठ झाले तर ९ हजार ३८१ अनुपस्थित होते. यापैकी ३ लाख ४२ हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी २२६२०२३१ / ३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


०००


श्रद्धा मेश्राम/ससं/

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात आयोजित महासंस्कृती महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे

 मुंबईत फेब्रुवारी महिन्यात आयोजित

महासंस्कृती महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. २ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महासंस्कृती महोत्सवामध्ये सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमप्रदर्शनीय दालनेही असणार आहेत. त्यासाठी इच्छुक संस्थाकलाकार संच/समूह/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था यांच्याकडून ५ फेब्रुवारी२०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधितांनी अर्ज rdcmumbaicity@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा तहसीलदार तथा रचना व कार्यपद्धती अधिकारीजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहररुम नं. १०७पहिला मजलाजुने जकात घरफोर्ट मुंबई- ०१ यांच्याकडे कार्यालयीन वेळेत पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

            या महोत्सवात आपल्या राज्यातील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रमशिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमलोककलाकवितांचे कार्यक्रम व व्याख्यानेदेशभक्तीपर गीतेजिल्ह्यातील स्थानिक सणउत्सव आदीबाबत विविध कार्यक्रम आणि राज्य संरक्षित स्मारके आणि गडकिल्ले यांची माहिती सादर केली जाणार आहे.

000

मुंबईत रंगणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई येथे ३ ते ५ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सव

 मुंबईत रंगणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव

यशवंत नाट्यमंदिरमाटुंगामुंबई येथे ३ ते ५ फेब्रुवारी२०२४ दरम्यान

शास्त्रीय संगीत महोत्सव

 

            मुंबई, दि. २ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे  ३ ते ५ फेब्रुवारी२०२४ दरम्यान सायंकाळी ६ ते १० वेळेत यशवंत नाट्यमंदिरमाटुंगा येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन होणार आहे.  शनिवार३ फेब्रुवारी २०२४ रोजी संजीवनी भेलांडे यांच्या शास्त्रीय गायनाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर श्री आशिष रानडे यांचे शास्त्रीय गायन होईल.

            अंकिता जोशीकलाकार रवी चारी यांच्या वाद्य संगीताचा कार्यक्रम होईल आणि सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर सादरीकरण करतील. रविवार४ फेब्रुवारी२०२४ रोजी रमाकांत गायकवाड यांच्या शास्त्रीय गायनाने सुरुवात होईलशास्त्रीय गायिका मधुवंती बोरगावकर यांच्या गायनाच्या सादरीकरणाचा कार्यक्रम होईल. पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांचे देखील सादरीकरण होईलअभिजित पोहनकर यांच्या वाद्य संगीताच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होईलगायिका सानिया पाटणकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होईलतर सोमवार ५ फेब्रुवारी२०२४ रोजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीधारक  यश कोल्हापुरेभारतरत्न पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीधारक मृणालिनी देसाई यांचे सादरीकरण होईल. छत्रपती संभाजीनगर येथील गायिका चंदल पाथ्रीकर यांचे गायन होईल. नंदिनी शंकर यांचे वाद्य संगीताचे सादरीकरण होईल. अर्चिता भट्टाचार्य यांचे गायन होईल आणि शास्त्रीय संगीत गायिका मंजुषा पाटील यांचे गायन सादरीकरणाने या समारंभाची सांगता  होईल. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.

            ३ ते ५ फेब्रुवारी२०२४ या कालावधीत होणाऱ्या या शास्त्रीय संगीत महोत्सवाचा रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार

 साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

गरिबांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळणे मुलभूत अधिकार

- साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे

उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य - उद्घाटक सुमित्रा महाजन

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अमळनेर येथे उद्घाटन

            जळगावदि. २ : राज्यात अध्यात्मज्ञानतत्वज्ञान रुजविणारे अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे.  राज्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर साहित्यकलासंस्कृती व क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाईल. साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नयेयाची दक्षता शासनाकडून घेतली जाते. मराठी साहित्य संमेलनास गौरवाशाली परंपरा आहे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. प्रताप हायस्कूलमध्ये सानेगुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते. साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक झाले पाहिजे. अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

            अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने  आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आज उद्घाटन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. उद्घाटक म्हणून लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरसंमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलनिमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलआमदार मंगेश चव्हाणजिल्हाधिकारी आयुष प्रसादउद्योजक अशोक जैनसाहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबेसंमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशीकार्यवाह उज्ज्वला मेहेंदळेसमन्वयक नरेंद्र पाठकसाने गुरुजींच्या पुतणी सुधा साने आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीअमळनेर मध्ये सुरू झालेल्या अनेक गोष्टी जगात पोहचल्या आहेत. विप्रो कंपनीतत्वज्ञान केंद्राचा जागतिक पातळीवर नावलौकिक आहे. बहिणाबाईंनी अतिशय सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. राज्यात वाचनसंस्कृती वाढावी. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. डिजिटल युगात वाचन संस्कृती बदलली आहे. वाचनसंस्कृती टिकून राहणे. ही समाजाची गरज आहे. मराठी साहित्य संमेलनास आता डिजिटल टच देण्यात आला आहे. सामाजिक सुधारणांच्या चळवळीत साहित्यलेखक व कलाकारांचे अमूल्य योगदान आहे. राज्याच्या विकासासाठी साहित्यिकांनी व्यक्त झाले पाहिजेत. त्यांच्या सूचनांचा निश्चितच स्वीकार केला जाईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषासंस्कृतीचे जतन होत असते. असेही त्यांनी सांगितले.

            मराठी ही ज्ञानभाषा व्हावीअशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे. तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी‌ शासनाची आहे तशी आपण सर्वांची आहे. इंग्रजीहिंदी आणि मराठी हा भाषा अभ्यासाचा क्रम बदलून मराठीहिंदी आणि इंग्रजी असा असावा. गाव खेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार असल्याचे मत संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ. शोभणे यांनी आज येथे व्यक्त केले.

            संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. शोभणे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषालेखकधर्मसंस्कृतीपरंपरा व आजच्या तरुणाईचे प्रश्न याविषयी मत मांडले. ते म्हणाले कीमराठी साहित्य व भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची शासनाबरोबर वेगवेगळ्या समाजघटकसंस्थांची जबाबदारी आहे. प्रसार माध्यमांनी ही मराठी भाषा व व्यवहाराला अग्रक्रम देण्याची गरज आहे. अभिरुची वाढविणारे दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी दृकश्राव्य वाहिन्यांवरील निर्मात्यांची आहे. तसे वृत्तपत्रांतून दर्जदार मजकूर देण्याचे काम संपादकांचे आहे.

            मराठी साहित्य जगताचा विचार करतांना नव्या पिढीकडून आशा पल्लवित होत आहेत. आपल्या अनुभवांना वेगवेगळ्या आकृतिबंधात मांडत आपला शोध घेणारी म्हणून नवी पिढी आज काही लक्षवेधी लेखन करीत आहे. भारतीय लोकशाहीतील आधारस्तंभ असलेल्या संसद व राज्य विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात साहित्यकलावंतांची त्यांच्या राखीव जागेवर वेळोवेळी निवड होणे गरजेचे आहे. अशी‌ अपेक्षाही साहित्य संमेलनाध्यक्ष श्री.शोभणे यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा धोरण जाहीर करणार – मंत्री दीपक केसरकर

            शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले कीमराठी भाषा वेगवेगळ्या राज्यात पोहचविण्याचे काम बृहन्महाराष्ट्र मंडळांने केले आहे. तालुकास्तरावर साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी २ लाख रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वर्षापासून शाळेत वाचनाचा तास अनिवार्य केला आहे. साहित्य पारितोषिकात शासनाचा हस्तक्षेप नसावाही शासनाची भूमिका आहे. साहित्याची चळवळ रुजविण्याचे काम शासनाची चार मंडळ करत आहेत. मराठी धोरण यावर्षी जाहीर करणार आहोत. लवकरच मराठी भाषा धोरण जाहीर करणार आहोत. संत साहित्य संमेलनास दरवर्षी २५ लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहा विभागात पुस्तकाचे गाव केले जाणार आहे. मुंबई मध्ये शासनाच्यावतीने मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. वाई येथे मराठी विश्वकोश मंडळाची भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. मराठी युवक मंडळांना पाच हजारांचे अनुदान दिले जाईल. मराठी भाषेच्या विकासासाठी साहित्यिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. अशी ग्वाही मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिली.

उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य - उद्घाटक सुमित्रा महाजन

            संमेलनाच्या उद्घाटक श्रीमती महाजन म्हणाल्या कीकाळ्या मातीला हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून सेवा केलेले कवी ना.धो.महानोरजीवनाचे मर्म आपल्या अहिराणी रचनेच्या माध्यमातून मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यासारख्यांनी खान्देशचे साहित्य समृद्ध केले आहे. राजकारणातील लोकांना साहित्याचा गंध नसतो, असे म्हणता येणार नाही. साहित्यातून समाजात वागावे कसे याची शिकवणूक मिळते. तळागाळातील लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारणसमाजकारण केले जाते. उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य मिळतात. तुमचे मन शुध्द असेल तर तुम्ही जीवनात अयशस्वी होऊ शकत नाहीत. पुस्तके जगाला जवळ आणण्याचे काम करतात, असेही त्यांनी सांगितले.

            संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले की७२ वर्षांनी जळगाव जिल्ह्यास साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहेही सर्व जळगाव वासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. जळगाव जिल्ह्याबरोबरच अमळनेर तालुक्याला साहित्याची परंपरा आहे. पूज्य साने गुरुजीच्या नगरीत होत असलेले भव्य-दिव्य होण्यासाठी संमेलनास येणा-या सर्वांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात येत असून त्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

            संमेलनाचे निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले कीअमळनेर तालुक्याला संत सखाराम महाराजांचे आशीर्वाद लाभले आहेत. साने गुरुजींची कर्मभूमी आहे. शिक्षणाचे पंढरपूर म्हणून अमळनेरचा लौकिक आहे. अमळनेर सारख्या साहित्य नगरीत संमेलन होत आहे ही अभिमानाची बाब आहे. संमेलनाच्या निमित्ताने अमळनेर शहराची शोभा वाढली आहे. साहित्यिकांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी झाला पाहिजेअशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            श्रीमती तांबे म्हणाल्या कीजीवनाची मूल्य साने गुरुजींनी रूजवलेली आहेत. खान्देश साहित्यिक व रत्नांची खाण आहे. साहित्य संस्थांचे मराठी साहित्य व्यवहारात योगदान आहे.

            यावेळी प्रताप महाविद्यालयाचे मराठी भाषा विभाग प्रमुख  प्रा.रमेश माने यांनी‌ संपादित केलेल्या 'खान्देश वैभवस्मरणिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००


 


पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी ९७ व्या साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडीने सुरुवात

 पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी

९७ व्या साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडीने सुरुवात

शंखनादटाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पुजनाने झाला दिंडीस प्रारंभ

चार हजार मराठी सारस्वतांचा सहभागफुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत

            जळगावदि. २ : शंखनादटाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबेसंमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणेसंमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजननिमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलअमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशीमाजी आमदार स्मिता वाघजैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री संत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोधश्री ज्ञानेश्वरीभारताचे संविधानश्रीमद्‌‍ भगवतगीताभारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.

            सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थीप्राध्यापकशिक्षकविविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे 4 हजार सारस्वतांच्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. अमळनेरकरांकडून दिंडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता.

            ग्रंथदिंडी सराफ बाजारदगडी दरवाजाराणी लक्ष्मीबाई चौकसुभाष चौकस्टेट बॅंकपोस्ट ऑफिसनाट्यगृहउड्डाणपूल या मार्गाने येत असताना चौकात विविध ठिकाणी रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी 8 वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री श्री. महाजनजैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. जैनकेशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत पायी चाललेतर मंत्री श्री. महाजन यांनी दिंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

या संस्थाचा होता सहभाग

            केशव शंखनाद पथकपुणेखान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयमहाविद्यालयाचे प्राचार्यउपप्रचार्यसर्व विभाग प्रमुखकर्मचारीएनएसएसएनसीसीवसतिगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरढोल ताशा पथकगंगाराम सखाराम शाळा अमळनेरद्रो. रा. कन्या शाळाअमळनेरप्रताप हायस्कूलअमळनेरमंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखीस्वामी विवेकानंद शाळाबंजारा समाज पारंपरिक नृत्य, चाळीसगावधनगर समाज पारंपरिक नृत्यवासुदेव पथक, जामनेरनवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूलसावित्रीबाई फुले शाळा, अमळनेरसाने गुरुजी शाळानगर परिषदेचे सर्व कर्मचारीमराठी वाड:मय मंडळाचे सर्व समिती सदस्यवारकरी पाठशाळा अमळनेरनंदगाव माध्यमिक विद्यालयभरवस माध्यमिक विद्यालयमहसूल व पोलीस प्रशासनफार्मसी महाविद्यालयएसएनडीटी कॉलेजएमएसडब्ल्यू कॉलेजटाकरखेडा माध्यमिक हायस्कूलउदय माध्यमिक विद्यालयचौबारी माध्यमिक विद्यालयरणाईचा माध्यमिक आश्रमशाळाहातेड माध्यमिक शाळाकोळपिंप्री माध्यमिक विद्यालयशारदा माध्यमिक शाळा कळमसरेपी. एन. मुंदडा माध्यमिक शाळाइंदिरा गांधी माध्यमिक शाळागडखांब माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  ग्रंथदिंडी सहभागी झाले होते

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

 राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

 

            मुंबई, दि. २ : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २७ व्या आणि महिलांच्या २२ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे कामगार क्रीडा भवनप्रभादेवीमुंबई येथे आज उद्घाटन करण्यात आले.

            आमदार कालिदास कोळंबकरविकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.एच.पी.तुम्मोडकामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळउपसचिव दीपक पोकळेकामगार कल्याण आयुक्त रविराज इळवेभारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड.अनिल ढुमणेज्येष्ठ कबड्डीपटू जया शेट्टीछाया शेट्टीभाग्यश्री भुर्केबाळ वडावलीकर आदी उपस्थित होते.

            महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवनाच्या मैदानात दररोज सायंकाळी ४ वाजेपासून स्पर्धेचे सामने खेळवले जातील. सोमवार ५ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. पुरुष शहरीपुरुष ग्रामीण आणि महिला खुला अशा तीन गटात सामने खेळवले जातील. राज्यभरातून ११० संघ स्पर्धेत सहभागी झाले असून यात ५७ संघ पुरुष कामगारांचे असून महिला खुला गटातून ५३ संघ सहभागी झाले आहेत.

0000

मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:ख, व्यथा,‌ वेदनांची मांडणी व्हावी

 मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:खव्यथा,‌ वेदनांची मांडणी व्हावी

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान‌ या विषयावरील परिसंवादात आशावाद

            जळगावदि. २ : साहित्य समाजाचा आरसा आहे. राज्यघटनेत प्रत्येकाला समान हक्क व संधी प्रदान केले आहेत. असे असताना मराठी साहित्यात तृतीयपंथीय समुदायाचे चित्रण दिसून येत नाही. तसेच तृतीयपंथीयांना समान वागणूक मिळत नाहीत. तेव्हा मराठी साहित्यिक व लेखकांनी तृतीयपंथीयपारलिंगी समुदायाच्या दु:खव्यथावेदनासमस्या जाणून घेऊन साहित्यात चित्रण करावे. असा आशावाद 'तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थानया विषयावरील परिसंवादात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केला.

            भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्थ कार्यरत असलेल्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात 'तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थानया विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात 'एलजीबीटीआयक्यू समुदायाचे अभ्यासक आणि बिंदू क्वीअर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरेतृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटीलविजया वसावेपुनीत गौडाडैनियल्ला मॅक्डोन्सा आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे सहभागी झाले.

            मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले कीलोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत तृतीयपंथीय समुदायाचे स्थान जसे महत्त्वपूर्ण आहे, तसे मराठी साहित्यातही तृतीयपंथीय समुदायाचे वास्तववादी चित्रण झाले आहे.

            श्री. खिरे म्हणाले कीतृतीयपंथीय समुदायाचे साहित्यातील व समाजातील स्थान समजून घेतांना लिंगलिंगभाव व लैंगिकता ह्या शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत.  पुनित गौडा म्हणाले कीपारलिंग पुरुष जन्माने स्त्री असतो. मात्र, मनाने तो पुरुष असतो. त्यांचे मन पुरुषाप्रमाणे घडत असते. डैनियल मॅक्डोन्सा म्हणाल्या कीमाणसाला माणसाप्रमाणे वागविण्यासाठी धर्माची गरज पडत नाही. तृतीयपंथीय व्यक्तींचे मन समाजाने समजून घेतले पाहिजेत.

            शमिभा पाटील म्हणाल्या कीपारलिंगी समुदायाचे साहित्यात चित्रण जास्त झाले नाही. अण्णाभाऊ साठे यांच्यानंतर अनेक वर्षांचा कालखंडात लिखाण झाले नाही. स्वाती चांदोरकरदिशा पिंकी शेखलक्ष्मीपारूमदन नाईकनागा किन्नरी यांनी पारलिंगी समुदायाचे चित्रण त्यांच्या पुस्तके व कवितांतून मांडले आहे.

तृतीयपंथीय समुदायाची स्वतःची भाषा असते. तृतीयपंथी समाज आता समाज माध्यमातून लिहायला लागला आहे. साहित्य विश्वाने आमच्या जगण्याचे प्रश्न मांडले पाहिजेत, अशी अपेक्षाही शमिभा पाटील यांनी व्यक्त केली.

            विजया वसावे यांनी वनरक्षक भरतीत त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन केले.

            निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतोपण लोकशाही शासन व्यवस्था समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून ती रसरशीत होणेही तितकेच महत्त्वाचे असते. या अनुषंगाने मराठी साहित्यात तृतीयपंथी समुदायाचे चित्रण झाले आहे काते कशा प्रकारे केले गेले आहेते करतांना लोकशाहीसांविधानिक मुल्यांचे प्रतिबिंब उमटले आहे कात्यांच्यापर्यंत लोकशाही पोहोचली आहे काती पोहोचण्यासाठी काय करता येईलअशा विविध प्रश्नांची चर्चा या परिसंवादात करण्यात आली. 

मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रा. डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक होते.

Featured post

Lakshvedhi